जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.347/2008. प्रकरण दाखल दिनांक – 22/10/2008. प्रकरण निकाल दिनांक – 30/03/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. प्रंशातसिंघ देवेंद्रसिंघ महंत वय वर्षे 42, व्यवसाय व्यापार, रा. गुरुद्वारा गेट नंबर 1, नांदेड जि. नांदेड. अर्जदार विरुध्द आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, मार्फत व्यवस्थापक, नांदेड, गैरअर्जदार निखिल हाईटस, दुसरा मजला, वजिराबाद, कलामंदीर रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.ऐ.एस.चौधरी गैरअर्जदार क्र.1 तर्फे - अड.जी.एस.औढेंकर गैरअर्जदार क्र.2 तर्फे - कोणीही हजर नाही. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील,अध्यक्ष) गैरअर्जदार आयसीआयसीआय इन्शुरन्स कंपनी लि. यांच्या ञूटीच्या सेवे बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे दाखल केली आहे. प्रकरणाची हकीकत खालील प्रमाणे अर्जदार हे एम.एच.-26-एच-2221 या ट्रकचे मालक आहेत. त्यांनी दि.09.07.2008 रोजी आपला ट्रक फूले आणण्याच्या भाडयासाठी चढविलेला होता. ट्रकमध्ये फुलाची चढउतार करण्यासाठी मजूर बसलले होते. त्या दिवशी ट्रक आखाडा बाळापूर येथून नांदेडकडे येत असताना राञी 12 वाजताचे सूमारास सांगवी नाक्याजवळ रोडवर उभ्या असलेल्या दुस’-या एका मोठया ट्रकला त्या ट्रकच्या पाठीमागून जोरदार धडक झाल्यामुळे अर्जदाराच्या ट्रकचे बरेच नूकसान झाले. राञीची वेळ असल्याकारणाने रोडवरील ट्रक चालकाने ट्रकचे टेल लाईटस चालू ठेवले नव्हते. त्यामूळे तो ट्रक दिसला नाही. घटनेच्या दिवशी अर्जदाराचा ट्रक हा गैरअर्जदाराकडे इन्शुअर्ड होता. सान्या अटोमोटीव्हीज यांनी रु.46,435/- च्या खर्चाचे इस्टीमेट ट्रक दूरुस्तीसाठी दिले. गैरअर्जदारांनी नूकसान भरपाई देण्याची जबाबदारी स्विकारत देखील दि.11.09.2008 रोजी एक पञ पाठवून भरपाई देण्यास नकार दिला. ट्रक सध्याही नादूरुस्त परिस्थितीत आहे. त्यामूळे त्यांचे आर्थिक नूकसान होत आहे. दूरुस्तीसाठी येणारा खर्च रु.46,435/- आर्थिक नूकसान झाल्याबददल रु.20,000/-, मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- असे एकूण रु.96,435/- व त्यावर 12 टक्के व्याज गैरअर्जदाराकडून नूकसान भरपाई पोटी मिळावेत म्हणून विनंती केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक्रारदाराची तक्रार त्यांना मान्य नाही. गैरअर्जदार यांनी तक्रारदाराच्या सर्वच गोष्टी अमान्य केल्या आहेत. ट्रक दि.09.07.2008 रोजी आखाडा बाळापूर येथील ट्रक भाडयाने घेतला व त्यात फुलाची चढउतार करण्यासाठी मजूर बसले होते व त्यावेळेस राञी 12 वाजता रोडवरील उभ्या ट्रकला अर्जदाराच्या ट्रकने धडक दिल्यामूळे अर्जदाराच्या ट्रकचे नूकसान झाले ही गोष्ट अमान्य केली आहे. दि.03.09.2007 रोजी अर्जदाराचा दावा फेटाळला हे त्यांना मान्य नाही. ट्रक दूरुस्तीसाठी खर्च रु.46,435/- व इतर मागण्या हे देखील गैरअर्जदार यांना अमान्य आहेत. तक्रारदाराने त्यांचे वाहन नंबर एम.एच.-26-एच-2221 पिकअप व्हॅनसाठी गैरअर्जदाराक्रडून पॉलिसी नंबर 3003/52/505890/00/000 ही पॉलिसी दि.18.09.2007 ते 17.09.2008 या कालावधीसाठी घेतली होती परंतु तक्रारदाराने पॉलिसीतील नियम व अटीचे उल्लंघन करुन आसन क्षमता दोन अशी होती व वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविलेले होते म्हणून दावा गैरअर्जदाराने फेटाळलेला आहे. ट्रकचे रु.46,435/- चे नूकसान झालेले नाही. तक्रारदाराकडे घटनेच्या दिवशी व्हॅलिड व इफेक्टीव्ह ड्रायंव्हीग लायसन्स नव्हते सबब गैरअर्जदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपआपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द होय. करतात काय ? 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांचे मालकीचे पिकअप व्हॅन एम.एच.-26-एच-2221 यांचा सांगवी नाक्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली व अपघात झाला. या बददल त्यांनी एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, दोषारोपपञ दाखल केलेले आहे. यावरुन वाहनाचा अपघात झाला यावीषयी शंका नाही. गैरअर्जदार कंपनीची पॉलिसी प्रकरणात दाखल आहे. पॉलिसी गैरअर्जदारांना मान्य आहे. पॉलिसीवर प्रशांतसिंघ बी महंत यांचे नांव आहे. आर.टी.ओ. कडून जे प्रमाणपञ दाखल केलेले आहे त्यात वाहनाची पाहणी ही दि.12.09.2006 रोजी झालेली असून येथून दि.11.09.2008 रोजी पर्यत पासींग वीधीग्राहय आहे असे म्हटले आहे. अर्जदाराने आपल्या लेखी म्हणण्यात दि.09.07.2008 रोजी अर्जदारांच्या वाहनास झालेल्या अपघातामध्ये प्रवासी बसलेले होते. पॉलिसी मधील नियमाप्रमाणे गूडस कॅरिअर या वाहनात आसन क्षमता दोन ची असताना क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनामध्ये बसविले व पॉलिसीच्या नियम व अटी चे उल्लंघन केले त्यामूळे अर्जदाराचा नूकसान भरपाईचा दावा नाकारला आहे. त्या अनुषंगाने त्यांने दि.11.09.2008 रोजी अर्जदारांना पञ लिहून under the policy, since the numbers of passengers traveling in the vehicle at the time of accident were exceeding the permitted seating capacity of the vehicle as mentioned in the Registration Book . Therefore, as the damage reported to the insured vehicle is caused due to violation of the provisions of the Motor Vehicles Act, 1988. या कारणास्तव दावा नाकारला आहे ते पञ या प्रकरणात अर्जदाराने दाखल केलेला आहे. घटनास्थळ पंचनामा यामध्ये Particular of Victim यात दोन जणांचे नांवे आहेत. परंतु दोषारोप पञामध्ये पडताळलेल्या साक्षीदारास 1 ते 18 साक्षीदार आहेत. यात फुल व्यापारी, चालक, वैद्यकीय अधिकारी, पॉलिसी यांचे निवाडे आहेत. त्यामूळे अर्जदार यांचे अपघातग्रस्त वाहनामध्ये चालक व क्लिनर हे दोन लोक तर असतातच याशिवाय काही मजूर मालाची चढउतार करण्यासाठी ट्रकमध्ये असतात. अर्जदाराच्या मते ते प्रवासी नव्हते. गैरअर्जदार यांनी आक्षेप घेतला आहे की, अपघातग्रस्त वाहनात हे प्रवासी होते परंतु ते प्रवासी होते यासाठी कोणताही अधिकचा पूरावा गैरअर्जदार यांनी दाखल केलेला नाही. केवळ आक्षेपावर ही गोष्ट सिध्द होणारी नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे वाहनाचा अपघात हा ट्रक मधील बसलेल्या माणसामूळे झाला काय ? हे पाहणे महत्वाचे आहे परंतु सर्व पोलिस पेपर पाहिले असता असे दिसून येते की, रोडवर उभा असलेला ट्रक हा व्यवस्थीत साईडला नव्हता व टेल लाईट बंद होते. अंधारी राञ असल्यामूळे चालकास समोर ट्रक दिसला नाही व त्यामूळे त्यांने मागून ट्रकला धडक दिली व त्यामूळे अपघात झाला. ट्रक मध्ये बसलेल्या लोकांमूळे अपघात झालेला नाही. त्यामूळे पॉलिसीतील नियमाचे उल्लंघन केले असे म्हणून गैरअर्जदारांनी आपली जबाबदारी टाळलेली आहे. अशी जबाबदारी गैरअर्जदार यांना टाळता येणार नाही. गेरअर्जदार यांनी या प्रकरणात अर्जदाराचा पिकअप व्हॅनचा अपघात झाल्यानंतर सर्व्हेअर पाठवून अपघात ट्रकचे किती नूकसान झालेले आहे यांचा आढावा घेणे आवश्यक होते परंतु यांचा उल्लेख गैरअर्जदारांनी आपल्या जवाबात केलेला नाही. सर्व्हेअर हा पहिला अधिकारी असतो जो की जायमोक्यावर जाऊन ट्रकच्या नूकसानी बददलचा अंदाज घेऊ शकतो. त्याबददलचा रिपोर्ट अर्जदाराने या प्रकरणात दाखल केलेला नाही. क्लेम नाकारतांना गैरअर्जदारांनी जो आक्षेप व कारणे दिलेली आहेत तेवढेच आता बघता येईल. त्यावेळेस ड्रायव्हर कडे व्हॅलिंड लायसन्स नवहते हा मूददा त्यांनी उपस्थित केलेला नव्हता व त्यामूळे तो मूददा आता त्यांना काढता येणार नाही. मा. राष्ट्रीय आयोगाने ब-याच प्रकरणात वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जासत प्रवासी जरी बसले असतील परंतु त्यामूळे अपघात झाला नसला तर इन्शूरन्स कंपनी यांना नूकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेले आहेत. अर्जदारांना वाहन बंद स्थितीत असताना जे नूकसान झाले त्यासाठी ही पॉलिसी नाही. फक्त वाहनाचे जेवढे नूकसान झालेले आहे त्यासाठीच ही पॉलिसी आहे. त्यामूळे व्यापारात झालेल्या आर्थिक नूकसानी बददल विचार करता येणार नाही. गैरअर्जदाराने नूकसान पाहिले नसल्यामूळे अर्जदाराने जे नूकसान मागितलेले आहे व त्यासाठी सान्या अटोमोटीव्हीज चे दि.11.09.2008 चे इस्टीमेंट दाखल केलेले आहे. जे की रु.46,435/- आहे. वाहन हे 2006 चे असल्याकारणाने त्यांस वाहनाच्या वयाप्रमाणे डिप्रिसींयेशन कमी होईल. वाहनाच्या पार्टस बददल रु.18,785/- वाहनाचे वय लक्षात घेऊन नियमाप्रमाणे डिप्रिसींयेशन जेवढे कमी होईल तेवढे कमी करावे. 30 टक्के डिप्रिसींयेशन कमी करुन रु.5735/- कमी करुन रु.13,150/- व लेबर चार्जेस रु.27,650/- असे एकूण रु.40,800/- एवढी रक्कम मिळण्यास अर्जदार पाञ आहेत. ग्राहक संरक्षण कायदा ,1986 याप्रमाणे ब्रॅच मॅनेजर एलआयसी विरुध्द आशा राम 2001 (3) सीपीआर 255 (यूपीएससीडिआरसी) यामध्ये ओव्हर लोंडीग ऑफ पॅसेंजर असे असेल व ओव्हर लोंडीग व पॅसेजर असल्याबददलचा पूरावा व अपघाताचे कारण हे प्रवाशी बसल्यामूळे झाला असे नसेल तर क्लेम मंजूर केलेला आहे. एलआयसी विरुध्द श्रीमती इंदिरा चञी 2004 (2) सीपीआर 432 (छत्तीसगढ) एससीडीआरसी 2004 (4) सीपीजे 787. Claim for damage to vehicle—in excess-- fundamental breach of policy अर्जदारांच्या ट्रकला अपघात झाला व नूकसान भरपाई यात नाकारलेले आहे. यात अधिकचे प्रवासी ट्रकमध्ये बसलेले होते. यात अपील दाखल केले, अपीलामध्ये breach of policy condition was not fundamental breach---No evidence or reason to hold that accident was caused or resulted due to passengers traveling in truck. त्यामूळे गैरअर्जदार यांची जबाबदारी पूर्ण नूकसान भरपाई देण्याची आहे. Motor Accident :- Carring unauthorized passengers, without knowledge of owner—not amount to breach, unless contributed to cause of accident—Insurer liable----- National Insurance Com. Ltd. Vs Swaraj Jain Rajasthan SCDRC Part -4, Vol. II CPJ April, 2008 page no. 414. गैरअर्जदार यांचे जबाबदारी येत असताना त्यांनी क्लेम देण्यास नकार दिला म्हणून त्यांची कृती ही सेवेतील ञूटी अशी ग्राहय धरली जाते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना वाहन नंबर एम.एच.-26-एच-2221 या वाहनाच्या नूकसान भरपाई पोटी रक्कम रु.40,800/- व त्यावर क्लेम नाकारल्याची दि.11.09.2008 पासून 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.4,000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |