Maharashtra

Kolhapur

CC/09/298

Smt. Sarita Subhash Mangaonkar. - Complainant(s)

Versus

ICICI Lombard General Insurance Co. - Opp.Party(s)

Adv. R.N.Powar.

28 Jan 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/09/298
1. Smt. Sarita Subhash Mangaonkar.A/p Bhatiwade, Tal. Bhudargad.Kolhapur.Maharastra ...........Appellant(s)

Versus.
1. ICICI Lombard General Insurance Co.Keshavrao Kharkade Marg, Mumbai.Mumbai.Maharastra2. Divisional Manager, ICICI Lombard Gen. Insu. Co. Kolhapur Branch ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv. R.N.Powar., Advocate for Complainant

Dated : 28 Jan 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र :- (दि.28/01/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
 
(01)       तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू झाली.सामनेवाला क्र.1 व 2 त्‍यांचे वकीलांमार्फत हजर झाले व लेखी म्‍हणणे दाखल केले. तसेच सामनेवाला यांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केलेला आहे. तक्रारदारचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकणेत आला.सामनेवाला व त्‍यांचे वकील युक्‍तीवादाच्‍या वेळेस गैरहजर होते. 
 
           सदरची तक्रार ही सामनेवाला इन्‍शुरन्‍स कंपनी यांनी तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेमुळे दाखल केली आहे.                  
 
(02)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला क्र.1 विमा व्‍यवसाय करणारी वित्‍तीय संस्‍था असून सामनेवाला क्र.2ही त्‍यांची कोलहापूर येथील शाखा आहे. यातील तक्रारदार यांचे पती मयत सुभाष विष्‍णू माणगांवकर हे सामनेवालांकडील शेतकरी अपघात विमा योजनेचे पॉलिसीधारक होते त्‍यामुळे तक्रारदार हे सदर पॉलीसीच्‍या बेनिफिशरी आहेत.
 
           ब) तक्रारदार यांचे पती मयत सुभाष विष्‍णू माणगांवकर हे शेतकरी होते व ते दि.02/08/2005रोजी स्‍वत:चे शेतामधून वैरण आणणेकरिता गेले होते. त्‍यावेळी जोराचा पाऊस सुरु होता.त्‍यावेळी वैरणीचा भारा घेऊन येत असताना शेतातील बांधावरुन पाय घसरुन जोरात खाली पडले व त्‍यामध्‍ये त्‍यांच्‍या मानेस जोराचा मार बसला व मज्‍जातंतूस देखील मार बसला.त्‍यांना त्‍वरीत उपचाराकरिता दवाखान्‍यात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्‍यान दि.17/11/2005 रोजी त्‍यांचा मृत्‍यू झाला. तदनंतर आवश्‍यक त्‍या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन तहसिलदार ता.भुदरगड जि.कोल्‍हापूर यांचेकरवी सामनेवालांकडे क्र.एस.जी.वशी 27/2006दि.16/1/006 रोजी पाठविलेली असता अदयापपर्यंत सामनेवालांनी क्‍लेमबाबत कोणतीही माहिती कळवलेली नाही. तक्रारदाराने दि.03/05/2009 रोजी सामनेवालानां रजि.पोष्‍टाने लेखी पत्राव्‍दारे क्‍लेमची विचारणा केली आहे. परंतु त्‍यास सामनेवालांनी कोणतेही उत्‍तर दिलेले नाही. शेवटी तक्रारदाराने दि.21/04/2009 रोजी सामनेवालांनी वकीलांमार्फत नोटीस पाठवली. सदरची नोटीस सामनेवाला यांना मिळूनही त्‍यांनी सदर नोटीसला कोणतेही लेखी अगर तोंडी उत्‍तर दिलेले नाही. वास्‍तविक तक्रारदार यांचे पती मयत सुभाष विष्‍णू माणगांवकर हे शेतकरी होते. शेतात काम करीत असताना त्‍यांचा अपघाती मृत्‍यू झालेला आहे व सामनेवालांकडे योग्‍य कागदपत्रांसह क्‍लेम दाखल करुन व वेळोवेळी तोंडी व लेखी विचारणा करुनही सामनेवालांनी तक्रारदारास काहीच उत्‍तर न देऊन तक्रारदारास मानसिक त्रास दिलेला आहे. त्‍यामुळे सदरची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन विमा क्‍लेमची रक्‍कम रु.1,00,000/- दि.17/11/05 पासून 18 टक्‍के व्‍याजाने मिळावेत तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/-, व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/-सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.                         
 
(03)       तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ सामनेवाला यांना तक्रारदाराने पाठविलेले पत्र तसेच सामनेवाला यांना वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहे. तसेच दि.12/07/2010 रोजी पोष्‍टाची पोच पावती, माहिती अधिकाराखालील दिलेला अर्ज, तहसिलदारांचे क्‍लेमकरिता आवश्‍यक सर्व कागदपत्र दिलेचे पत्र, क्‍लेम फॉर्म, तलाठी प्रमाणपत्र, आरटीओ यांचा उतारा, मरणोत्‍तर पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, पंचनामा, जबाब, मृत्‍यू दाखला, गावकामगार पोलीस पाटील यांचा दाखला, रेशन कार्ड व ओळखपत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.                             
 
(04)       सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार अ) तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेद निहाय नाकारलेली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, दि.02/08/2005रोजी अपघात झाला होता. वास्‍तविक एफ.आय.आर., पंचनामा,शवविच्‍छेदन अहवाल असे कोणतेही कागदपत्रे दाखल नाहीत. तक्रारदारास Locus Standi नाही. अपघात दि.02/08/005 रोजी झाला आहे तर दि.28/04/2009 रोजी तक्रार दाखल केली आहे. सबब ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 24(ए) नुसर तक्रार मुदतीत नाही. विमाधारकाचा अपघात दि.02/08/2005 रोजी झाला तर तो दि.17/11/2005 रोजी मयत झाला आहे. दि.26/04/2006 रोजी क्‍लेम नाकारला आह. तसेच नोटीस दि.09/06/2009 रोजी पाठवली आहे. तक्रारीस कारण दि.26/04/2006 रोजी घडलेले आहे. तक्रार सन 2009 मध्‍ये दाखल केली आहे. तसेच सदरची तक्रार मुदतीत नाही. तक्रारदाराने विलंब माफीसाठी अर्ज दिलेचा दिसून येत नाही.सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळणेस पात्र आहे.सामनेवाला कंपनीने पत्र क्र.MuM/JPA/CLM/MLX/ 12084 दि.28/04/2006 चे पत्राने क्‍लेम नाकारला आहे. सदरचा क्‍लेम हा मयत सुभाष विष्‍णू माणगांवकर हे नोंदणीकृत शेतकरी नसल्‍याने नाकारला आहे. सबब तो शेतकरी होता हे कायदयाने शाबीत करणेची जबाबदारी तक्रारदाराची आहे. प्रस्‍तुतच्‍या तक्रारीस सी.पी.सी.कलम 10 मधील तरतुदीनुसार रेस ज्‍युडीकाटा तत्‍वाचा बाध येतो. महाराष्‍ट्र शासनाने 27/08 ही मा. राष्‍ट्रीय आयोग, दिल्‍ली  येथे तक्रार दाखल केली होती. प्रस्‍तुत तक्रार निर्णित करणेत आली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.  
 
(05)       सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलली नाहीत.
 
(06)       तक्रारदाराची तक्रार,दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे व लेखी युक्‍तीवाद तसेच तक्रारदाराचे वकीलांचा अंतिम युक्तिवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1) प्रस्‍तुत तक्रारदारास लोकल स्‍टॅन्‍डी आहे काय ?                   --- होय.
2) प्रस्‍तुत तक्रारीस रेस ज्‍युडीकाटाचा बाध येतो का?                 --- नाही.
3) प्रस्‍तुत तक्रारीस मुदतीचा बाध येतो काय?                          --- नाही्
4) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?      --- होय.
5) तक्रारदार हे विमा रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय?          --- होय.
6) काय आदेश ?                                                               --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 :- प्रस्‍तुत तक्रारदारचे पती सुभाष विष्‍णू माणगांवकर यांचा विमा शेतकरी अपघात विमा योजनेअतंर्गत सामनेवालांकडे उतरविलेला होता. नमुद विमा धारकाचा मृत्‍यू झालेला आहे. प्रस्‍तुत तक्रारदार या नमुद विमाधारकाच्‍या पत्‍नी असून ती कायदेशीर वारस आहे. तसेच नमुद विमा पॉलीसी अंतर्गत रक्‍कम मिळणेस कायदेशीर वारस म्‍हणून (बेनिफिशरी) लाभार्थी आहेत. तसा कायदेशीर वारस असलेबाबतचा दाखला गावकामगार तलाठी यानी दिलेला आहे. सदर दाखल्‍यामध्‍ये प्रस्‍तूत तक्रारदार यांची पत्‍नी म्‍हणून तर सुरेश व आरती  यांची मुले म्‍हणून नोंद आहे. सबब प्रस्‍तुतची तक्रार दाखल करणेचा व चालविणेचा तक्रारदारास कायदेशीर अधिकार असलेने त्‍यास लोकल स्‍टॅन्‍ड आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.2 :- सामनेवालांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेतील कलम 9 मध्‍ये महाराष्‍ट्र शासनाने प्रस्‍तुत सामनेवाला कंपनीविरुध्‍द 27/2008 व्‍दारे राष्‍ट्रीय आयोग, दिल्‍ली यांचेसमोर   शेतक-यांच्‍या वतीने तक्रार दाखल केलेली होती. प्रस्‍तुतची तक्रार महाराष्‍ट्र शासनाने ज्‍या शेतक-यांना क्‍लेम मिळालेले नाहीत त्‍यांचेवतीने दाखल केलेली होती. प्रस्‍तुतची तक्रार राष्‍ट्रीय आयोगाने निर्णित केली असलेने सीपीसी कलम 10 प्रमाणे रेस ज्‍युडीकाटाचा बाध येत असलेचे प्रतिपादन केले आहे. याचा विचार करता सामनेवाला यांनी प्रस्‍तुत राष्‍ट्रीय आयोगाचा निकाल दाखल केलेला नाही; तसेच प्रस्‍तुत प्रकरणी नमुद शेतक-याचे नांव तक्रारीमध्‍ये नमुद होते असे दाखविणारा कोणताही कागद प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. तसेच सामनेवालांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणेमध्‍ये कलम 4 मध्‍ये प्रतिपादन केले प्रमाणे पत्र क्र.MuM/JPA/CLM/MLX/12084 दि.28/04/2006 अन्‍वये क्‍लेम नाकारलेचे नमुद केले आहे. मात्र प्रस्‍तुत पत्राची सत्‍यप्रत अथवा मूळ प्रत प्रस्‍तुत कामी दाखल केलेली नाही. सबब सामनेवालांच्‍या नुसत्‍या कथनावर विश्‍वास ठेवता येणार नाही. सबब प्रस्‍तुत नमुद विमाधारकाविरुध्‍द तक्रार निर्णित झालेली आहे असे दाखविणारा कोणताही कागद प्रस्‍तुत तक्रारीत दाखल झाली नसलेने प्रस्‍तुत तक्रारीस रेस ज्‍युडीकाटाचा बाध येत नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.3 :- सामनेवालांनी तक्रारदाराने मुदतीत तक्रार दाखल केलेली नाही. तसेच विलंब माफीचा अर्जही दिलेला नाही. तसेच दि.28/04/2006 चे पत्र क्र.MuM/JPA/CLM/MLX/12084
व्‍दारे क्‍लेम नाकारलेला आहे. सबब प्रस्‍ततची तक्रार मुदतीत नसलेने ग्राहक संरक्षण कायदा कलम 24(ए) नुसार प्रस्‍तुतची तक्रार मुदतीत नसलेने चालणेस पात्र नाही असे प्रतिपादन केले आहे. याचा विचार करता तक्रारदाराची तक्रार ही तक्रारदारांच्‍या क्‍लेमबाबत सामनेवालांनी अदयापही कोणताही निर्णय दिलेला नाही याबाबतची आहे. मात्र सामनेवाला वर नमुद केले प्रमाणे क्‍लेम नाकारलेचे प्रतिपादन करतात. मात्र त्‍या संदर्भातील वर नमुद पत्राची मूळ प्रत अथवा सत्‍यप्रत दाखल केलेली नाही. तसेच क्‍लेम नाकारलेची बाब सामनेवाला सिध्‍द करु शकलेले नाहीत. त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारीस मुदतीचा बा/ध येत आहे. हा सामनेवालांचा आक्षेप हे मंच फेटाळत आहे. सामनेवालांनी अदयापही प्रस्‍तुत क्‍लेमबाबतचा निर्णय तक्रारदारास कळवलेचे मे. मंचाचे निदर्शनास न आलेने प्रस्‍तुत तक्रारीस सातत्‍याने कारण घडत आहे. सबब सदर तक्रारीस मुदतीचा बाध येत नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. यासाठी खालील पूर्वाधारचा आधार घेत आहे.
 
           मा.राष्‍ट्रीय आयोग, दिल्ली यांनी युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी व इतर विरुध्‍द आर. प्‍यारेलाल इन्‍पोर्ट अॅन्‍ड एस्‍पोर्ट लि. First Appeal No.175/2005 & 176/2005 Complaint No.SC/2/0/2000 & SC/3/0/2000 Dtd 07/03/ 05& 19/11/09 पारीत केले आदेशाप्रमाणे(I (2010) CPJ 22 NC) आदेशाप्रमाणे----(ii) Limitation- Time-barred-Insurance claim- Cause of action arises from date of repudiation of claim- Complainant’s claim neither rejected nor accepted- Cause of action continuous one – Complaint not time-barred-Maintainable.
 
मुद्दा क्र.4 :- तक्रारदारचे पती श्री सुभाष विष्‍णू माणगांवकर यांचा सामनेवालांकडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता. नमुद विमाधारकाचा दि.02/08/2005 रोजी शेतातून वैरणीचा भारा घेऊन चालत असताना सदर वेळी जोराचा पाऊस असलेने बांधावरुन पाय घसरुन पडलेने मानेस जोराचा मार बसून मज्‍जातंतूस मार बसलेने दि.17/11/2005 रोजी त्‍यांचा मृत्‍यू झालेला आहे. तसा दाखला गावकामगार पोलीस पाटील यांनी दिलेला आहे. त्‍याप्रमाणे दि.17/11/2005 चा जबाब असून दि.02/08/2005 रोजी अपघात झाला असून उपचारादरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झालेचे दिसून येते. त्‍याबाबतचा पंचनामा दाखल आहे. तसेच मरणोत्‍तर पंचनामा दाखल आहे. मरणोत्‍तर पंचनाम्‍यामध्‍ये सदर वस्‍तुस्थिती नोंद केलेली आहे. तसेच शवविच्‍छेदन अहवालामध्‍ये मृत्‍यूचे कारण हे The cause of death is – “ Death due to transaction of cervical spinal cord with dislocation of atlanto axial joint असे स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे. यावरुन नमुद वैरणीचा भारा मानेवर पडलेमुळे मज्‍जातंतूस जोराचा मार बसलेमुळे त्‍यांचा मृत्‍यू झालेला आहे. त्‍यामुळे सदरचा मृत्‍यू अपघाती असलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
           सामनेवालांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेमध्‍ये सदर अपघात झालेबाबतची कोणतीही कागदपत्रे मे. मंचासमोर दाखल केलेली नाहीत असा आक्षेप घेतलेला आहे. तक्रारदाराने दि.12/07/2010 रोजी नमुद कागद यादीप्रमाणे 1 ते 13 कागद दाखल केलेले आहेत. प्रस्‍तुत कागदपत्रे ही तहसिलदार ता.भुदरगड यांचेकडून महाराष्‍ट्र माहितीचा अधिकार 2002 अन्‍वये मागणी करुन घेतलेली आहेत. त्‍या अर्जाची सत्‍यप्रत प्रस्‍तूत प्रकरणी दाखल आहे. नमुद तहसिलदारांनी तक्रारदाराचे पतीचा अपघाती मृत्‍यू झालेने क्‍लेम फॉर्मसोबत गावचा नमुना 8-अ जमिनीची खातेवही, मरणोत्‍तर पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, पंचनामा, जबाब, मृत्‍यू दाखला, गावकामगार पोलीस पाटील यांचा दाखला, मयत विमाधारकाचे कुमार भवन पुष्‍पनगर या शाळेचे लिव्‍हींग सर्टीफिकेट, रेशन कार्ड, तक्रारदाराचे बँकेचे ओळखपत्र, गावकामगार तलाठी यांचा नमुद विमाधारक मयत झालेचे व त्‍यांचे असणारे वारसांचा दाखला, हक्‍काचे पत्रक,(गां.न.नं.6) मौजे भाटवडे ता.भुदरगड जि.कोल्‍हापूर, गावकामगार तलाठी यांचा वारस नोंदीचा दाखला,मयत विमाधारकाचे त्‍याचे स्‍वत:चे शेतामध्‍ये गट क्र.465 येथे दहन केलेबाबत गावकामगार पोलीस पाटील यांचा दाखला इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.मा. तहसिल यांनी सामनेवालांकडे क्र.27/2006दि.16/1/2006 वर नमुद कागदपत्रांसह सामनेवालांकडे क्‍लेम मागणी केलेचे आपल्‍या तक्रारीत नमुद केलेले आहे.त्‍या संदर्भात तक्रारदाराने माहिती अधिकारात मागविलेली क्‍लेम फॉर्म भाग-1 मध्‍ये नमुद विमाधारकाचा दि.17/11/2005 रोजी अपघाती मृत्‍यू झालेने रु.1,00,000/- विमा रक्‍कमेची मागणी केलेचे दिसून येते. तसेच नमुद मयत विमाधारकाचे नांवे गावचा नमुना 8-अ जमिनीची खातेवही खाते क्र.402 गाव नमुना 6 मधील नोंद नंबर 652गट नं.274 क्षेत्र 034 आकार व जुडी रु.1.16पै. सुभाष विष्‍णू माणगांवकर यांचे नांवे नोंद आहे. यावरुन नमुद मयत विमाधारका हा शेतकरी असलेची वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे.
 
           सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेमध्‍ये पत्र क्र.MuM/JPA/CLM/MLX/12084 दि.28/04/2006 चे पत्राने मयत सुभाष विष्‍णू माणगांवकर हा नोंदणीकृत शेतकरी     (रजिस्‍टर्ड फार्मर) नसलेने क्‍लेम नाकारलेचे नमुद केलेले आहे. प्रस्‍तुत पत्राची मूळ प्रत अथवा सत्‍यप्रत प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेली नाही. वादाकरिता असे पत्र सामनेवाला यांनी पाठविले असलेचे गृहीत धरले असते तर वर नमुद कारणास्‍तव क्‍लेम नाकारलेला आहे. याचा अर्थ मयत सुभाष विष्‍णू माणगांवकर यांचा विमा सामनेवालांकडे उतरविलेला होता. सामनेवाला यांनी मयत विमा धारक हा नोंदणीकृत शेतकरी नसलेमुळे विमा नाकारलेला आहे याचा विचार करता वरील विस्‍तृत विवेचन व दाखल कागदपत्र, गावचा नमुना 8-अ, खाते क्र.402, गावकामगार तलाठयाचा दाखला तसेच सदर गावचा तो रहिवाशी असलेचा गावकामगार पोलीस पाटील यांचा दाखला, तसेच गावकामगार तलाठी यांनी सहीशिक्‍क्‍यानिशी दिलेले हक्‍काचे पत्रक, नोंदणी अनुक्रम नं;665 गट क्र.274 नुसार वारसा ठराव क्र.119दि.22/06/2006 प्रमाणे फेरफार नोंदणी झालेली आहे व मयताचे वारस म्‍हणून मयताची पत्‍नी तक्रारदार सरिता माणगांवकर, मुलगा सुरज व मुलगी आरती यांची वारस म्‍हणून नोंद आहे. तसेच गावकामगार पोलीस पाटील यांनी मयत सुभाष माणगांवकर यांचे प्रेताचे दहन त्‍यांचे स्‍वत:चे शेतामध्‍ये गट 465 मध्‍ये केलेबाबत दाखल दिलेला आहे. याचा विचार करता मयत विमाधारक हा शेतकरी होता ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे व सदर क्‍लेमबाबत सामनेवाला यांनी कोणती कार्यवाही न करुन सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेली आहे. तसेच वादाकरिता क्‍लेम नाकारलेचे पत्र गृहीत धरले तरी चुकीचे कारणास्‍तव विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला विमा कंपनीने नमुद विमा योजनेचा मूळ हेतू लक्षात न घेता कागदपत्रांची छाननी न करता तांत्रिक कारणास्‍तव विमा दावा नाकारणे अथवा त्‍याबाबत निर्णय न देणे ही सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  
 
मुद्दा क्र.5 :-शेतकरी अपघात विमा योजनेअतंर्गत रक्‍कम रु.1,00,000/- क्‍लेम मागणी केलेचे .क्र.एस.जी.वशी 27/2006 दि.16/01/2006 पासून तीन महिन्‍यानंतर म्‍हणजे दि.16/04/2006 पासून विमा रक्‍कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 9 टक्‍के प्रमाणे व्‍याजासह मिळणेस तक्रारदार पात्र आहे. तसेच सामनेवाला यांनी केलेल्‍या सेवात्रुटीमुळे तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते.
 
2) सामनेवाला यांनी विमा पॉलीसी अंतर्गत क्‍लेमची रक्‍कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्‍त) दि.16/04/2006 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
3) सामनेवाला यांनी तक्रारदारस मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त)  व तक्रारीचा खर्च रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) अदा करावी.

 


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT