Maharashtra

Sangli

CC/10/71

Balasaheb Krishna Patil - Complainant(s)

Versus

ICICI Lombard General Insurance Co., - Opp.Party(s)

M.N.Shetye

18 Jul 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/10/71
 
1. Balasaheb Krishna Patil
Nagthane, Tal.Palus, Dist.Sangli
...........Complainant(s)
Versus
1. ICICI Lombard General Insurance Co.,
Mahalaxmi, Mumbai - 34
2. Maharashtra Gov. through Collector
Sanlgi
Sangli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  A.V. Deshpande PRESIDENT
  Smt.V.N.Shinde MEMBER
 
PRESENT:M.N.Shetye, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

                                         नि. 26


 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

मा.अध्‍यक्ष श्री ए.व्‍ही.देशपांडे


 

मा.सदस्‍या - श्रीमती वर्षा शिंदे


 

ग्राहक तक्रार अर्ज क्र. 71/2010


 

तक्रार नोंद तारीख   : 02/02/2010


 

तक्रार दाखल तारीख  :  05/02/2010


 

निकाल तारीख         :   18/07/2013


 

------------------------------------------------


 

 


 

श्री बाळासाहेब कृष्‍णा पाटील


 

रा.नागठाणे, ता.पलूस जि.सांगली                                    ....... तक्रारदार


 

 


 

विरुध्‍द


 

 


 

1. आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्‍शुरन्‍स


 

   कंपनी लिमिटेड,


 

   महालक्ष्‍मी, मुंबई नं.34


 

2. महाराष्‍ट्र शासन तर्फे मा.जिल्‍हाधिकारी


 

   सांगली                                              ...... जाबदार


 

 


 

तक्रारदार तर्फे : अॅड श्री एम.एन.शेटे


 

                              जाबदारतर्फे  :  अॅड श्री एस.एच.फाटक 


 

 


 

       


 

- नि का ल प त्र -


 

 


 

द्वारा: मा. अध्‍यक्ष: श्री. ए.व्‍ही.देशपांडे  


 

 


 

1.    प्रस्‍तुतची तक्रार, वर नमूद तक्रारदार शेतक-याने शेतकरी अपघात विमा योजनेखाली, त्‍यास दि. 17/8/2005 रोजी झालेल्‍या मोटार सायकलच्‍या अपघातात उजवा पाय मोडल्‍याने आलेल्‍या कायमच्‍या अपंगत्‍वाबद्दल, दाखल केलेला विमा दावा, जाबदारांनी नाकारल्‍याने, त्‍यास मिळालेल्‍या सेवेतील त्रुटीबद्दल दाखल केलेला असून त्‍याने विम्‍याची रक्‍कम रु.1 लाख, त्‍यावर दि.17/8/05 पासून संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याज, अधिक त्‍याचा विमादावा अद्याप मंजूर न केलेने व जाबदारांनी त्‍यांचे कर्तव्‍य पार न पाडलेने रक्‍कम रु.50,000/-, अधिक त्‍यास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.40,000/-, अधिक तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- ची मागणी केली आहे.



 

2.  थोडक्‍यात हकीकत अशी की, दि. 17/8/2005 रोजी तक्रारदार मोटारसायकलवरुन वाळवा हया गावी जात असता त्‍याची मोटारसायकल घसरुन तो पडला व त्‍यांचे अंगावर मोटारसायकल पडली. त्‍यामुळे त्‍याचा उजवा पाय मोडला. त्‍यास आर.एम.मेमोरियल हॉस्‍पीटल इस्‍लामपूर येथे आंतररुग्‍ण म्‍हणून दाखल करण्‍यात आले. त्‍या दवाखान्‍यात एकूण 18 दिवस दाखल होता. त्‍यास हॉस्‍पीटलचे बिल, औषधांचे बिल इ.करीता एकूण रु.40,000/- इतका खर्च आला. तक्रारदार मौजे नागठाणे हया गावातील शेतकरी असून त्‍याची एकूण 1 हे 10 आर इतकी जमीन आहे. सदर अपघाताबद्दल तक्रारदाराने स्‍वतः पोलिसांना फिर्याद दिलेली नाही. तक्रारदार याने गाव कामगार तलाठी नागठाणे यांचेकडे सप्‍टेंबर 2005 मध्‍ये प्रस्‍ताव दाखल केला असता तहसिलदार, पलूस यांचेकडे गावकामगार तलाठयाने तो प्रस्‍ताव पाठविला आणि त्‍यानंतर तहसिलदारांनी जाबदार क्र.1 कडे योग्‍य त्‍या शिफारशीसह सदरचा प्रस्‍ताव पाठविलेला असून जाबदार विमा कंपनीने अद्यापही दावा मंजूर केलेला नाही. जाबदार क्र.1 आणि 2 यांचेमध्‍ये शेतक-यांची जोखीम पत्‍करण्‍याकरिता करार झालेला असून त्‍या करारान्‍वये जाबदार क्र.2 महाराष्‍ट्र शासनाने प्रत्‍येक शेतक-याकरिता विमापत्राची रक्‍कम अधिक सेवा कर अशी जाबदार क्र.1 विमा कंपनीकडे दाखल केलेली असून त्‍या योजनेखाली मयत शेतक-यांच्‍या वारसांकरिता रक्‍कम रु.1 लाख तर जखमी शेतक-याकरिता रक्‍कम रु.50,000/- देण्‍याचे जाबदार क्र.1 कंपनीने मान्‍य केले आहे. सदर कराराचा तक्रारदार लाभधारक ग्राहक आहे. सदरचा विमादावा मिळालेनंतर 30 दिवसांचे आत रु.50,000/- ची भरपाई तक्रारदाराच्‍या खात्‍यावर जमा करण्‍याची जबाबदारी जाबदारवर आहे. तक्रारदारास आलेल्‍या कायमच्‍या अपंगत्‍वामुळे त्‍याला मांडी घालून बसता येत नाही, वाकून काम करता येत नाही व शेतीचे काम करता येत नाही. त्‍यामुळे त्‍याचे जीवन परावलंबी झालेले आहे. शेतातील कोणतेही काम तक्रारदार यांना करता येत नसल्‍याने तक्रारदार यांचे शेती उद्योग करुन पैसे मिळण्‍याचे साधन 100 टक्‍के बंद झाले आहे, त्‍यामुळे तक्रारदार हे रक्‍कम रु.1 लाख मिळणेस पात्र आहेत. जाबदार क्र.1 हे काहीतरी खोटी कारणे देवून तक्रारदाराचा न्‍याय्य हक्‍क नाकारणार असल्‍याची कुणकुण तक्रारदारास लागली आहे. तक्रारदाराला जगण्‍याकरिता इतर कोणतेही उत्‍पन्‍नाचे साधन नाही. तक्रारदार व त्‍याच्‍या मुलांना अर्धपोटी राहण्‍याची छळवणूक जाबदार क्र.1 व 2 यांनी सुरुच ठेवली आहे. त्‍यामुळे तक्रारदार हे जादा रक्‍कम रु.50,000/- मिळण्‍यास पात्र आहेत. जाबदारांनी विमा दावा कोणतेही कायदेशीर व संयुक्‍तीक कारण नसताना मंजूर केलेला नाही किंवा नाकारलेला नाही व तक्रारदाराचे कायदेशीर देणे दिलेले नाही आणि त्‍यास मानसिक त्रास दिला म्‍हणून तक्रारदार हे रक्‍कम रु.40,000/- मिळण्‍यास पात्र आहेत. अशा कथनांवरुन तक्रारदाराने वर नमूद केल्‍याप्रमाणे मागणी केलेली आहे. 


 

 


 

3.  आपल्‍या तक्रारअर्जाच्‍या पुष्‍ठयर्थ तक्रारदाराने नि.3 ला आपले शपथपत्र दाखल केले असून नि.5 च्‍या फेरिस्‍तसोबत आपल्‍या शेताचा खातेउतारा, 7/12 उतारा व त्‍यास आलेल्‍या अपंगत्‍वाचा दाखला इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.



 

4.    जाबदार क्र.2 शासन नोटीस बजावून देखील हजर न झाल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश दि.18/5/2010 रोजी करण्‍यात आला.



 

5.    जाबदार क्र.1 विमा कंपनीने नि.13 ला आपली लेखी कैफियत दाखल करुन तक्रारदाराची संपूर्ण तक्रार अमान्‍य केली आहे. जाबदारचे स्‍पष्‍ट कथन असे की, तक्रारदाराने खोडसाळ पध्‍दतीने जाबदारकडून पैसे उकळण्‍याकरिता ही खोटी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारास अपघात होवून त्‍यात त्‍याला कायमचे अपंगत्‍व आले हे तक्रारदाराचे कथन देखील जाबदार क्र.1 ने स्‍पष्‍टपणे नाकबूल केले आहे. तक्रारदाराने विमा दावा दाखल करतेवेळी संबंधीत कागदपत्रे हजर केली नव्‍हती. तसेच विमा दावा हा विमा पॉलिसीची मुदत उलटून गेल्‍यानंतर दाखल केलेला आहे. जरी तक्रारदारास कथितरित्‍या दि.17/8/05 रोजी अपघात होवून जखमा झाल्‍या होत्‍या, तरीही दि.5/1/05 च्‍या शासन निर्णयाप्रमाणे घटनेच्‍या दिनांकापासून 7 दिवसांचे आत कोणताही विमादावा तक्रारदाराने दाखल केलेला नव्‍हता. विमा दावा सप्‍टेंबर 2005 मध्‍ये जाबदार क्र.2 यांचेकडे सादर केलेला होता आणि जाबदार क्र.2 ने तो विमा दावा दि.28/12/2005 रोजी विमा कंपनीकडे पाठविला होता. विमा दावा दाखल करण्‍यामध्‍ये 133 दिवसांचा उशिर झालेला होता, त्‍यामुळे विमा कंपनीच्‍या अटी व शर्तीविरुध्‍द तक्रारदाराने विमा दावा दाखल केलेला आहे. प्रस्‍तुत तक्रार देखील तक्रारदाराने विहीत मुदतीत दाखल केलेली नाही त्‍यामुळे ती रद्दबातल करण्‍यास पात्र आहे. विमा पॉलिसीच्‍या अटीप्रमाणे त्‍या पॉलिसीबाबत उभय पक्षकारांमध्‍ये काही वाद निर्माण झाल्‍यास तो वाद मिटविण्‍याकरिता मा.उच्‍च न्‍यायालय, मुंबई यांचेकडे वाद दाखल करण्‍याचे ठरलेले असल्‍याने प्रस्‍तुत मंचास ही तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही. तसेच विमा पॉलिसीच्‍या अटीप्रमाणे जर विमा दावा नाकारला असेल तर संबंधीत इसमाला दिवाणी दावा दाखल करण्‍याचा अधिकार आहे. त्‍यामुळे देखील सदरची तक्रार या मंचासमोर चालू शकत नाही. तक्रारदाराची संपूर्ण मागणी चुकीची व बेकायदेशीर आहे, करिता तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशा कथनांवरुन जाबदार क्र.1 ने संपूर्ण तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी केली आहे. 


 

 


 

6.    जाबदार विमा कंपनीने आपल्‍या लेखी कैफियतीचे पुष्‍ठयर्थ नि.14 ला शपथपत्र दाखल केले असून नि.15 या फेरिस्‍तसोबत एकूण 3 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्‍यात दि.28/4/06 चे तक्रारदाराचा विमा दावा नाकारलेच्‍या पत्राची प्रत, तक्रारदाराने तहसिलदार पलूस मार्फत पाठवलेल्‍या क्‍लेम फॉर्मची प्रत, व शेतकरी अपघात विम्‍याच्‍या अटी व शर्ती यांचा समावेश आहे.


 

 


 

7.    प्रस्‍तुत प्रकरणात उभय पक्षकारांतर्फे कोणीही तोंडी पुरावा दिलेला नाही. तक्रारदारांचे वकीलांनी दि.8/7/13 ला पुरावा द्यावयाचा नाही अशी पुरसिस सादर केलेली आहे. उभय पक्षकारांच्‍या विद्वान वकीलांचा युक्तिवाद आम्‍ही ऐकून घेतला.


 

 


 

8.    प्रस्‍तुत प्रकरणी खालील मुद्दे आमच्‍या निष्‍कर्षासाठी उपस्थित होतात.



 

              मुद्दे                                                   उत्‍तरे


 

 


 

1. तक्रारदार हा शेतकरी असून शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभार्थी


 

   असल्‍याने तो ग्राहक होतो हे त्‍याने सिध्‍द केले आहे काय ?                   होय.


 

 


 

2. जाबदार क्र.1 यांनी त्‍यास दूषित सेवा दिली हे तक्रारदाराने


 

  शाबीत केले आहे काय ?                                               नाही.


 

 


 

3. तक्रारदारास अर्जात मागणी केल्‍याप्रमाणे रकमा मिळणेस ते


 

   पात्र आहेत काय ?                                                      नाही.


 

 


 

4. अंतिम आदेश                                                   खालीलप्रमाणे.


 

 


 

 


 

9.    आमच्‍या वरील निष्‍कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.



 

 


 

:- कारणे -:


 

मुद्दा क्र.1  


 

 


 

10.   जाबदार क्र.1 आणि 2 यांचेमध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍यातील लाभार्थी शेतक-यांना एका विहीत मुदतीत विमा संरक्षण देण्‍याचा करार झाला होता व त्‍या करारान्‍वये जाबदार क्र.2 महाराष्‍ट्र शासनाने लाभार्थी शेतक-यांच्‍या वतीने विम्‍याचे हप्‍ते भरलेले होते ही बाब जाबदार क्र.1 आणि 2 यांनी नाकारलेली नाही. तक्रारदार हा शेतकरी आहे आणि त्‍यायोगे सदर योजनेखाली लाभार्थी आहे ही बाब देखील जाबदार क्र.1 यांनी अमान्‍य केलेली नाही. वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदाराने आपल्‍या शेतीचा 8 अ चा उतारा व 7/12 उतारा दाखल केलेला आहे. 8अ च्‍या खाते उता-यावरुन असे दिसते की, तक्रारदारास मौजे नागठाणे, ता.पलूस जि. सांगली या ठिकाणी एकूण 1 हेक्‍टर 10 आर इतकी शेतजमीन आहे. त्‍यावरुन ही गोष्‍ट सिध्‍द होते की, तक्रारदार हा शेतकरी आहे व त्‍यायोगे सदर योजनेखाली लाभार्थी आहे. जाबदार क्र.1 विमा कंपनी यांनी तक्रारदार हा लाभार्थी नाही असे म्‍हटलेले नाही. तक्रारदाराचा विमादावा जाबदार क्र.1 विमा कंपनीने दि.28/4/2006 च्‍या पत्राने केवळ याच कारणावरुन नाकारला की, सदर विमा दावा हा विहीत मुदतीत सादर केलेला नव्‍हता. याचा स्‍पष्‍ट अर्थ असा की, तक्रारदार हा सदर योजनेखाली लाभार्थी होता आणि जर त्‍याने विहीत मुदतीत विमादावा दाखल केला असता तर तो विमादावा मंजूर करावा लागला असता ही बाब जाबदार विमा कंपनीने अप्रत्‍यक्षरित्‍या मान्‍य केली आहे. त्‍यामुळे तक्रारदार हा ग्राहक आणि जाबदार क्र.1 विमा कंपनी हे सेवा देणारे असे त्‍यांचेमध्‍ये नाते निर्माण होते आणि त्‍यायोगे तक्रारदार हा ग्राहक होतो असे या मंचाचे मत आहे.  सबब आम्‍ही मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.



 

मुद्दा क्र.2


 

 


 

11.   जाबदाराचे एकूणच कथन आम्‍ही वर विस्‍तृतपणे मांडलेले आहे, म्‍हणून त्‍याचा पुनरुच्‍चार विस्‍तारभयापोटी येथे आम्‍ही टाळलेला आहे. जाबदार विमा कंपनीने ही गोष्‍ट स्‍पष्‍टपणे नाकारली नाही की, दि.17/8/05 रोजी तक्रारदारास अपघात झाला व त्‍या अपघातात त्‍याचा उजवा पाय मोडला आणि त्‍यावर त्‍यास औषधोपचार करावा लागला. तक्रारदाराचे म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यास औषधोपचाराकरता एकूण रु.40,000/- इतका खर्च करावा लागला. सदर खर्चाबद्दल तक्रारदाराने कोणतीही कागदपत्रे किंवा बिले, पावत्‍या इ. हजर केलेली नाहीत. त्‍याने फक्‍त कायम अपंगत्‍वाचा दाखला फेरिस्‍त नि.5 सोबत दाखल केला आहे. त्‍यावरुन असे दिसते की, तक्रारदारास “Old healed septic arthritis with fusion of right hip more than 40%” इतके कायमस्‍वरुपाचे अपंगत्‍व आलेले आहे. तक्रारदाराचे आपल्‍या तक्रारअर्जात स्‍पष्‍ट कथन असे आहे की, सदर अपघातामध्‍ये त्‍याचा उजवा पाय मोडला होता. सदर उजवा पाय मोडला आणि त्‍यामुळे त्‍याला कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आले याचा कोणताही पुरावा तक्रारदाराने दिलेला नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्‍या अपंगत्‍वाचे दाखल्‍यावरुन त्‍यास जे काही अपंगत्‍व आले असे दाखविलेले आहे, त्‍याचे कारण “Old healed septic arthritis with fusion of right hip ” असे दर्शविलेले आहे. उजवा पाय आणि right hip यामधील फरक हा स्‍वयंस्‍पष्‍ट आहे. हे कायमस्‍वरुपी अपंगत्‍व अपघातामध्‍ये उजवा पाय मोडल्‍याने आलेले आहे असे सदर वैद्यकीय प्रमाणपत्रामध्‍ये नमूद नाही. सदरचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि तक्रारअर्जातील कथन यामध्‍ये तफावत आहे. 


 

 


 

12.   तक्रारदाराने स्‍वतःच आपल्‍या तक्रारअर्जामध्‍ये असे नमूद केलेले आहे की, सदरचे कथित अपघाताबद्दल त्‍याने पोलिसांमध्‍ये फिर्याद दिलेली नव्‍हती. त्‍याने असेही कथन केलेले आहे की, अपघाताचे वेळेला एक श्री विलास भगवान पाटील रा.नागठाणे हे सदर मोटार सायकल चालवित होते. सदर विलास पाटील यास तक्रारदाराने साक्षीदार म्‍हणून प्रस्‍तुत प्रकरणात तपासलेले नाही. सदर विलास पाटील यांनी अपघाताबदृल पोलिसांमध्‍ये फिर्याद दिली किंवा नाही याबाबत कोणतेही कथन तक्रारदाराने आपल्‍या तक्रारअर्जात केलेले नाही. अपघात बघणारा इतर कोणताही साक्षीदार तक्रारदाराने तपासलेला नाही. ज्‍या दवाखान्‍यात त्‍याने अपघातात त्‍याचा उजवा पाय मोडला म्‍हणून उपचार घेतले, अशा दवाखान्‍यातील कोणाही डॉक्‍टरला तपासलेले नाही किंवा असा कोणताही कागदोपत्री पुरावा आणलेला नाही की ज्‍यायोगे हे शाबीत होईल की, तक्रारदारास खरोखरच मोटारसायकलवरुन पडून अपघात झाला आणि त्‍यामुळे त्‍याचा उजवा पाय मोडला. तक्रारदाराने स्‍वतःच दाखल केलेल्‍या कागदपत्रांत आणि त्‍याचे तक्रारअर्जातील कथनामध्‍ये कमालीची तफावत आहे. कायम स्‍वरुपी अपघाताचे प्रमाणपत्रामध्‍ये तक्रारदारास अपघातामुळे उजवा पाय मोडल्‍याने कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आले असे नमूद केलेले नाही. उलटपक्षी त्‍यास आलेले अपंगत्‍व हे जुनी भरुन आलेली सेप्‍टीक जखम व उजवा खुबा जोडून आलेले असल्‍याचे सदर प्रमाणपत्रामध्‍ये नमूद केलेले आहे. तक्रारदाराने कसलीही अपघाताची वर्दी, घटनास्‍थळाचा पंचनामा किंवा अपघातग्रस्‍त मोटारसायकलचा पंचनामा इ. कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. त्‍यामुळे खरोखरच तक्रारदार म्‍हणतो तसा अपघात झाला आहे किंवा नाही हीच बाब तक्रारदाराने स्‍पष्‍टपणे शाबीत केलेली नाही. तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यावर सहजासहजी विश्‍वास ठेवता येत नाही. तक्रारदाराचे तक्रारअर्जात असे कथन आहे की, त्‍याला आलेल्‍या कायमस्‍वरुपी अपंगत्‍वामुळे तो शेतात काम करु शकत नाही, त्‍यामुळे त्‍याची काम करण्‍याची शक्‍ती आणि उत्‍पन्‍नाचा स्‍त्रोत 100 टक्‍के नष्‍ट झाला आहे आणि त्‍याकरिता त्‍याने नुकसान भरपाई म्‍हणून विमा कंपनीकडून रु.1 लाखची मागणी केलेली आहे. अपघातामुळे उत्‍पन्‍न कमावण्‍याची शक्‍ती नष्‍ट होणे आणि त्‍याकरिता नुकसान भरपाई देण्‍याची जबाबदारी विमा कंपनीवर कशी टाकता येईल याचे स्‍पष्‍टीकरण तक्रारदाराचे वकीलांनी दिलेले नाही. अशा स्‍वरुपाची मागणी करण्‍याकरिता तक्रारदारास दुसरा मंच उपलब्‍ध आहे. त्‍यात तो ही केस मांडू शकला असता. प्रस्‍तुत प्रकरणात फक्‍त एवढाच मुद्दा उद्भवतो की, तक्रारदार या ग्राहकास जाबदार विमा कंपनीने दूषीत सेवा दिली किंवा नाही. दूषित सेवा दिली असा आरोप करुन जर तक्रारदार जाबदार क्र.1 विमा कंपनीकडून इतर आणखी नुकसान भरपाई, जी विमा पॉलिसीमध्‍ये समाविष्‍ट नाही, अशी मागत असेल तर तक्रारदाराच्‍या एकूणच उद्देशाबद्दल संशय निर्माण होतो आणि त्‍या संशयास तक्रारदाराने अपघातासंबंधी कोणतीही कागदपत्रे हजर न केल्‍याने जास्‍त बळकटी येते. विमा करारान्‍वये तक्रारदाराचे म्‍हणण्‍यानुसार, जर एखाद्या शेतक-याला अपघात होवून कायम स्‍वरुपाचे अपंगत्‍व आले असेल तर विमा कंपनी त्‍यास रु.50,000/- पर्यंतच भरपाई देवू शकते. मग जर असे असेल तर आणि ती भरपाई तक्रारदारास विमा कंपनीने दिली नसेल तर तक्रारदार विमा कंपनीकडून आणखी रु.1 लाख त्‍यास झालेल्‍या उत्‍पन्‍नाच्‍या कथित नुकसानीबद्दइल कशी मागू शकतो याचे स्‍पष्‍टीकरण तक्रारदाराने दिलेले नाही. त्‍यामुळे तक्रारदाराची एकूणच मागणी ही अवास्‍तव आणि अप्रस्‍तुत दिसते. 


 

 


 

13.   तथापि जाबदार क्र.1 विमा कंपनीने तक्रारदाराने दाखल केलेला विमा दावा त्‍याला प्राप्‍त झालेला आहे ही गोष्‍ट मान्‍य केलेली आहे. तक्रारदाराचे म्‍हणण्‍याप्रमाणे जाबदार क्र.1 विमा कंपनीने आजतागायत सदरचा विमा दावा मंजूर केला किंवा नाकारला हे त्‍याला कळविलेले नाही आणि म्‍हणून तक्रारदाराचे म्‍हणण्‍याप्रमाणे जाबदार क्र.1 विमा कंपनीने त्‍याला दूषित सेवा दिलेली आहे. उलटपक्षी जाबदार क्र.1 विमा कंपनीने आपल्‍या नि.15 या फेरिस्‍त सोबत तक्रारदाराचा विमा दावा फेटाळल्‍याबद्दलचे दि.28/4/06 चे पत्र दाखल केलेले आहे. हे वर नमूद केलेले आहे की, त्‍या पत्रान्‍वये तक्रारदाराचा विमा दावा जाबदार क्र.1 विमा कंपनीने उशिरा दाखल केलेला असल्‍याने नाकारलेला असल्‍याचे दिसते. जाबदार विमा कंपनीने नि.15 या फेरिस्‍तसोबत सदर पॉलिसीच्‍या अटी व शर्ती व परिशिष्‍ट दाखल केलेल्‍या आहेत. त्‍या अटी आणि शर्तींप्रमाणे शेतक-याचे मृत्‍युप्रसंगी किंवा त्‍यास आलेल्‍या कायमस्‍वरुपी संपूर्ण अपंगत्‍वाकरिता विमा संरक्षण उपलब्‍ध असल्‍याचे दिसते. कायम स्‍वरुपी संपूर्ण अपंगत्‍व म्‍हणजे काय याची व्‍याख्‍या देखील सदर अटी शर्तीमधील कलम 3 उपकलम 1 क्‍लॉज ii मध्‍ये केलेली आहे. सदर अटी व शर्ती येथे जशाच्‍या तशा सहज संदर्भाकरिता उध्‍दृत करण्‍यात येत आहे.



 

Permanent Total Disablement


 

(a)    If such injury shall within twelve month of its occurrence be the sole and direct cause of the total and irrecoverable loss of


 

(i)                 Sight of both eyes, or of the actual loss by physical separation of two entire hands or two entire feet, or one entire hand and one entire foot, or of such loss of sight of one eye and such loss of one entire hand or one entire foot, then the Capital Sum Insured stated in the Part I of the Schedule thereto as applicable to such insured person.


 

(ii)               Use of two hands or two feet, or of one hand and one foot, or of loss of sight of one eye and loss of use of one hand or one foot, than the Capital Sum insured stated in Part I of the Schedule hereto as applicable to such insured person.


 

(iii)             The sight of one eye, or of the actual loss by physical separation of one entire hand or one entire foot, then fifty percent of the Capital sum insured stated in Part I of the Schedule hereto as applicable to such insured person.


 

(iv)             Total and irrecoverable loss of use of a hand or a foot without physical separation then fifty percent of the Capital Sum insured stated in Part I of the Schedule hereto as applicable to such insured person.


 

 


 

Note : For the purpose of clause (iii) and (iv) above, physical separation of a hand or foot means separation of hand at or above the wrist, and of foot at or above the ankle.


 

 


 

      तक्रारदाराने कोणताही वैद्यकीय पुरावा न आणल्‍याने त्‍याच उजवा पाय मोडला म्‍हणजे नेमके काय झाले हे सिध्‍द होत नाही. जो कायमस्‍वरुपी अपंगत्‍वाचा दाखला तक्रारदाराने हजर केला आहे, त्‍यात आणि तक्रारदाराचे कथन यामध्‍ये कमालीची तफावत आहे. मग अशा परिस्थितीमध्‍ये तक्रारदारास खरोखरच वर नमूद केलेल्‍या अटी व शर्तीमध्‍ये परिव्‍याख्‍या केलेले कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आले असे म्‍हणता येत नाही. कदाचित तक्रारदारास केवळ साधे फ्रॅक्‍चर झालेले होते आणि ते उपचाराने भरुन आले असे देखील झाले असू शकेल. मग अशा परिस्थितीत तक्रारदारास अपघातामुळे कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आले असे म्‍हणता येणार नाही. त्‍याच अटी व शर्तीमध्‍ये रस्‍ता अपघातात झालेला मृत्‍यू किंवा जखमेबद्दलच्‍या विमा दाव्‍यासोबत पोलिसांत दिलेली वर्दी, घटनास्‍थळाचा पंचनामा, जर मृत्‍यू झाला असेल तर इंक्‍वेस्‍ट पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल इ. कागदपत्रे दाखल करणे बंधनकारक केले आहे. तक्रारदाराचेच म्‍हणण्‍याप्रमाणे सदरच्‍या अपघाताबद्दल कोणतीही फिर्याद पोलिसांत त्‍यांनी दिलेली नव्‍हती. मग अशा परिस्थितीत अपघाताची वर्दी, घटनास्‍थळाचा पंचनामा इ. कागदपत्रे विमा दाव्‍यासोबत दाखल करण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. सदर कागदपत्रे हजर न केल्‍याने खरोखरच असा अपघात घडला होता किंवा नाही याचीच शंका निर्माण होते आणि त्‍या अपघातामध्‍ये खरोखरच तक्रारदाराचा पाया मोडून त्‍यास अपंगत्‍व आले होते किंवा नाही याची देखील शंका निर्माण होते. मग अशा परिस्थितीत जर त्‍याचा विमा दावा विमा कंपनीने फेटाळला असेल तर त्‍यास कोणती दूषित सेवा दिली ? या प्रश्‍नाचे उत्‍तर अर्थातच नकारार्थी द्यावे लागेल. 


 

 


 

14.   सदर अटी व शर्तीमध्‍ये अट क्र.5 मध्‍ये विमा दावा दाखल करण्‍याच्‍या मुदतीचा उल्‍लेख आहे. सदरची अट सहजसंदर्भाकरिता खाली नमूद करण्‍यात येते. 


 

 


 

Upon the happening of any event, which may give rise to a claim under this Policy, written notice with full particulars must be given to the Company immediately. In case of death, written notice must be given before internment, cremation and in any case, within 60 days after the death, unless reasonable cause is shown. In the event of loss of sight or amputation of limbs, written notice thereof must be given within one calendar month after such loss of sight or amputation.


 

 


 

तक्रारदाराने सोयीस्‍कररित्‍या आपला विमादावा गावकामगार तलाठयाकडे नेमक्‍या कोणत्‍या तारखेला दाखल केला हे तक्रारअर्जात किंवा आपल्‍या शपथपत्रात नमूद केलेले नाही. विमा कंपनीचे दि.28/4/2006 (नि.15/1) चे पत्र पाहिले तर त्‍यावरुन असे दिसते की, तक्रारदाराने सदर कागदपत्रे दाखल करण्‍याकरिता जास्‍तीत जास्‍त 133 दिवसांचा उशिर केला होता. या उशिराचे कुठलेही संयुक्तिक कारण तक्रारदाराने दिलेले नाही. सर्वसाधारणपणे विमा दावा दाखल करताना तो शासनामार्फत विमा कंपनीकडे पाठविणे यामध्‍ये होणारा कालापव्‍यय लक्षात घेता 133 दिवसांचा उशिर हा फार मोठा उशिर समजला गेला नसता तथापि वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदारचे एकूणच कथनाबद्दल संशय निर्माण होतो आणि त्‍याकरिता सदर उशिरास जास्‍त महत्‍व द्यावे लागेल. म्‍हणून ज्‍याअर्थी जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमादावा उशिरा दाखल केला, या कारणावरुन फेटाळला त्‍याअर्थी तक्रारदारास जाबदार क्र.1 विमा कंपनीने कसलीही दूषित सेवा दिलेली नाही असे म्‍हणावे लागेल. करिता आम्‍ही वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी दिले आहे.



 

मुद्दा क्र.3 व 4


 

 


 

15.   ज्‍याअर्थी तक्रारदाराने त्‍यास जाबदार विमा कंपनीने दूषित सेवा दिली हे शाबीत केलेले नाही, त्‍याअर्थी त्‍यास विमा कंपनीकडून काही रक्‍कम वसूल करुन घेण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. तथापि हे नमूद करावे लागेल की, तक्रारदाराची रकमांची मागणी ही अवास्‍तव दिसते. हे आम्‍ही वर नमूद केलेच आहे की, तक्रारदाराने त्‍यास आलेल्‍या अपंगत्‍वाचे कारणावरुन त्‍याचे शेतीचे उत्‍पन्‍न बुडाल्‍यामुळे रु.1 लाख रकमेची मागणी जाबदार विमा कंपनीकडून केली आहे. या रकमेस विमा कंपनी कशी काय जबाबदार होऊ शकते हे तक्रारदाराने स्‍पष्‍ट केलेले नाही. त्‍याचबरोबर तक्रारदाराने विमाकृत रक्‍कम रु.50,000/- ही न दिल्‍यामुळे त्‍यास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रु.40,000/- इत्‍यादीची मागणी केली आहे. सदरच्‍या मागण्‍या अप्रस्‍तुत आणि अवाजवी आहेत आणि त्‍या मान्‍य करता येत नाहीत. म्‍हणून आम्‍ही वर नमूद केलेल्‍या मुद्दा क्र.3 चे उत्‍तर नकारार्थी दिलेले आहे. तक्रारदाराची कोणतीही मागणी मान्‍य करता येत नाही म्‍हणून त्‍यांची तक्रार नामंजूर करावी लागेल या निष्‍कर्षास हे मंच आलेले आहे म्‍हणून आम्‍ही खालील आदेश पारीत करीत आहोत.


 

 


 

आदेश


 

 


 

1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेत येत आहेत.


 

 


 

2.  प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च उभय पक्षकारांनी आपापला सोसणेचा आहे.



 

सांगली


 

दि. 18/07/2013                        


 

   


 

 


 

           ( वर्षा शिंदे )                                ( ए.व्‍ही.देशपांडे )


 

             सदस्‍या                                       अध्‍यक्ष
 
 
[ A.V. Deshpande]
PRESIDENT
 
[ Smt.V.N.Shinde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.