Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/09/205

MRS SHALAN B. CHAVAN - Complainant(s)

Versus

ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD, - Opp.Party(s)

C. S DALVI

16 Jan 2012

ORDER

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM MUMBAI SUBURBAN DISTRICT
3RD FLOOR, ADMINISTRATIVE BLDG., NR. CHETANA COLLEGE, BANDRA(E), MUMBAI-51.
 
Complaint Case No. CC/09/205
 
1. MRS SHALAN B. CHAVAN
SHELEWADI, TALUKA- MANGLWEDHA, DIST- SOLAPUR
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICICI BANK TOWER, BANDRA KURLA COMPLEX, BANDRA-EAST, MUMBAI-51.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/206
 
1. MAHADEVI RAMESH KORE
R/O. CHUNGI, TALUKA AKKALKOT, DIST- SOLAPUR
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ZENITH HOUSE, KESHAVRAO KHADE MARG, MAHALAXMI, MUMBAI-34.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/207
 
1. MRS. RUKMINI KALYAN NARSALE
R/O. KUMBHARGAON, TALUKA KARMALA, DIST- SOLAPUR
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ZENITH HOUSE, KESHAVRAO KHADE MARG, MAHALAXMI MUMBAI-34.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/208
 
1. MRS VIJAYA PANDITRAO DESHMUKH
R/O. SAVALESHWAR, TAL- MOHOL, DIST- SOLAPUR
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICICI BANK TOWER, BANDRA KURAL COMPLEX, BANDRA-EAST, MUMBAI-51.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/209
 
1. MRS KALAWATI BHIMRAO BAGAL
R/O. LAHU, TALUKA MADHA, DIST SOLAPUR
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENREAL INSURANCE CO. LTD,
ICICI BANK TOWER, ABDNRA KURLA COMPLEX, BANDRA-EAST, MUMBAI-51.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/210
 
1. MRS BHAMABAI GORAKH RAKATE
R/O. GHOTI, TALUKA MADHA, DIST SOLAPUR
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICICI BANK TOWER, BANDRA KURAL COMPLEX , NAMDRA-EAST, MUMBAI-51.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/211
 
1. MRS BHAMABAI S. BHOSALE
R/O. ARAN, TALUKA MADHA, DIST- SOLAPUR
...........Complainant(s)
Versus
1. IOCICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICICI BANK TOWER, BANDRA KURLA COMPLEX, MUMBAI-51.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/212
 
1. MRS VAISHALI SHIVAJI PANDHARE
R/O DHOKEBABUHULGAON, TAL- MOHOL, DIST- SOLAPUR
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD.
ICICI BANK TOWER, BANDRA KURAK COMPLEX, BANDRA-EAST, MUMBAI-51.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/213
 
1. MRS BAI VITHAL SHINDE
R/O. ANAN JADHAV WADI, TAL MOHOL, DIST- SOLAPUR
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICICI BANK TOWER, ABNDRA KURAL COMPLEX, BANDRA-EAST, MUMBAI-51.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/214
 
1. MRS INDUMATI HARIDAS SHELKE
R/O. KONHERI, TAL- MOHOL, DIST- SOLAPUR
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD.
ICICI BANK TOWER, BANDRA KU4RAL COMPLEX
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. Mr. J. L. Deshpande PRESIDENT
 HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR Member
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रारदारांकरिता     :    श्री.सी.एस.दळवी, वकील       
          सामनेवालेंकरिता  :  श्री.निखील मेहता, वकील  
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर सदस्‍या         ठिकाणः बांद्रा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
                                
एकत्रित न्‍यायनिर्णय
 
           तक्रार अर्जांचे संक्षिप्‍त स्‍वरूप खालीलप्रमाणेः-
 
तक्रार क्र.205/2009
 
           तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदाराच्‍या पतीच्‍या नांवे शेलेवाडी, ता.मंगळवेढा, जि.सोलापुर, येथे शेतजमीन आहे. त्‍याबाबत 7/12 उता-यात त्‍याची नोंद आहे. 7/12 उतारा व 8-अ ची खाते पुस्तिका अभिलेखात दाखल आहे. 
2          तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती दि.28.02.2006 रोजी सुमारे तीन वाजता साखर कारखान्‍यातील ऊसाच्‍या रसाच्‍या टाकीचे दुरुस्‍तीचे काम करीत असताना गरम ऊसाचा रस त्‍यांच्‍या अंगावर पडल्‍याने ते 100% भाजले व हॉस्‍पीटलमध्‍ये त्‍यावर उपचार घेत असताना दि.06.03.2006 रोजी त्‍यांचा मृत्‍यु झाला. शवविच्‍छेदन अहवाल व एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल आहे.
3          तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.21.02.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
4          शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.06.03.2006 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
  
 
तक्रार क्र.206/2009
5          तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदाराचे पती शेतकरी कुंटुंबातील असून छुंगी, ता.अक्‍कलकोट, जि.सोलापुर येथे त्‍यांचे नावे सर्व्‍हे. क्र.392 ही शेतजमीन आहे. त्‍याबाबतचा 7/12 उतारा व खाते पुस्तिका अभिलेखात दाखल आहे.
6          तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.09.10.2005 रोजी सकाळी 7 वाजता तक्रारदाराचे पती-श्री.रमेश शंकर कोरे हे शेतावर जाताना बोरी नदीतून पोहून जाताना त्‍यांचा बुडून मृत्‍यु झाला. शवविच्‍छेदनाचा अहवाल तसेच पोलीस पंचनाचा व एफ.आय.आर.ची प्रत अभिलेखात दाखल आहे. 
7          तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.21.02.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
8          शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.09.10.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली.
 
तक्रार क्र.207/2009
9          तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदाराचे पती-श्री.कल्‍याण श्रीरंग नरसाळे हे शेतकरी कुंटुंबातील असून त्‍यांच्‍या नावे सर्व्‍हे. क्र.21/3/1, 21/4/1 व 50/2/1 अशी शेतजमीन ता.करमाळा व जि.सोलापुर येथे आहे. हक्‍कांचे पुस्‍तक अभिलेखात दाखल आहे.
10         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदाराच्‍या पतीस कुंभारगांव येथो सर्पदंश झाला व त्‍यामुळे रशीन ता.कर्जत येथे खाजगी डॉक्‍टराकडे उपचार घेत असताना सर्पदंशाने दि.03.06.2005 रोजी मृत्‍यु झाला. त्‍याबाबतचे मृत्‍यु दाखलपत्र अभिलेखात आहे.   
11         तक्रारदाराचे सर्व कुंटुंब त्‍यांच्‍या पतीच्‍या मिळकतीवर अवलंबून असल्‍यामुळे तक्रारदारांच्‍या कुंटुंबीयावर आर्थिक संकट कोसळले.
12         तक्रारदारांनी शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक मदतीसाठी सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांसोबत नमुद केलेल्‍या मुदतीत अर्ज दाखल केला.
13         परंतु वारंवार पाठपुरावा करुनही, सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, म्हणुन दि.12.02.2009 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले यांना वकीलातर्फे नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली परंतु त्‍यानंतरही सामनेवाले यांनी मागणीची पुर्तता केलेली नाही.
14       शेवटी, तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याजदराने दि.03.06.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासही रक्‍कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावी अशी मागणी केली.
 
तक्रार क्र.208/2009
15         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदाराचे पती-श्री.पंडितराव कमलाकर देशमुख, हे व्‍यवसायाने शेतकरी असून त्‍यांचे नांवे ता.मोहोळ, जि.सोलापुर येथे सर्व्‍हे.क्र.27/2 अशी शेतजमीन आहे आणि त्‍याबाबतचा 7/12 उतारा, हक्‍काचे पत्र व 8-अ खाते उतारा अभिलेखात दाखल आहे.
16         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांच्‍या पतीला दि.05.04.2005 रोजी सुमारे दुपारी 4.30 वाजता गुंडांनी जबरदस्‍तींने मोटर सायकलवर घेऊन गेले व त्‍यांना लोखंडी सळीने मारहाण केली व त्‍या मारहाणीतच त्‍यांचा मृत्‍यु झाला.
17         शवविच्‍छेदनचा अहवाल, एफआयआरची प्रत व पोलीस तपासाची कागदपत्रं अभिलेखात दाखल आहेत.
18         तक्रारदाराचे सर्व कुंटुंब त्‍यांच्‍या पतीच्‍या मिळकतीवर अवलंबून असल्‍यामुळे तक्रारदारांच्‍या कुंटुंबीयावर आर्थिक संकट कोसळले.
19         तक्रारदारांनी शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक मदतीसाठी सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांसोबत नमुद केलेल्‍या मुदतीत अर्ज दाखल केला.
20        परंतु वारंवार पाठपुरावा करुनही, सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, म्हणुन दि.07.02.2009 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले यांना वकीलातर्फे नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली परंतु त्‍यानंतरही सामनेवाले यांनी मागणीची पुर्तता केलेली नाही.
21         शेवटी, तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याजदराने दि.05.04.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासही रक्‍कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावी अशी मागणी केली.
तक्रार क्र.209/2009
22        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदाराचे पती-श्री.भीमराव माधव बागल हे व्‍यवसायाने शेतकरी असून त्‍यांचे नांवे ता.माडा, जि.सोलापुर, येथे सर्व्‍हे.क्र.63 ही शेतजमीन आहे. त्‍याबाबतचा 7/12 उतारा व 8-अ खाते पुस्तिका दाखल केलेली आहे.
23        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पतीचे दि.16.08.2005 रोजी सकाळी 7 वाजता विजेचा धक्‍का लागून जागीच ठार झाले.  तक्रारदारांनी अभिलेखात पोलीस तपासणीचा अहवाल, शवविच्‍छेदनाचा अहवाल, मृत्‍यु दाखला दाखल केला आहे.
24       तक्रारदाराचे सर्व कुंटुंब त्‍यांच्‍या पतीच्‍या मिळकतीवर अवलंबून असल्‍यामुळे तक्रारदारांच्‍या कुंटुंबीयावर आर्थिक संकट कोसळले.
25        तक्रारदारांनी शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक मदतीसाठी सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांसोबत नमुद केलेल्‍या मुदतीत अर्ज दाखल केला.
26        परंतु वारंवार पाठपुरावा करुनही, सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, म्हणुन दि.07.02.2009 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले यांना वकीलातर्फे नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली परंतु त्‍यानंतरही सामनेवाले यांनी मागणीची पुर्तता केलेली नाही.
27        शेवटी, तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याजदराने दि.16.08.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासही रक्‍कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावी अशी मागणी केली.
 
तक्रार क्र.210/2009
28        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदाराचे पती-श्री.गोरख रामा रकटे हे व्‍यवसायाने शेतकरी असून त्‍यांचे नांवे ता.माडा, जि.सोलापुर, येथे सर्व्‍हे.क्र.63 ही शेतजमीन आहे. त्‍याबाबतचा 7/12 उतारा व 8-अ खाते पुस्तिका दाखल केलेली आहे.
29        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती दि.30.08.2007 रोजी दुपारी 5 वाजता रिक्षा क्र.MH-02-Q-987 मधून शेतफळकडे जात असताना समोरुन येणा-या ट्रक क्र.MH-13-R-1083 ने धडक दिली. त्‍यावेळेस तक्रारदारांचे पती जबर जखमी होऊन त्‍यांचा मृत्‍यु झाला. तक्रारदारांनी अभिलेखात एफआयआरची प्रत, पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल दाखल केलेले आहेत.
30        तक्रारदाराचे सर्व कुंटुंब त्‍यांच्‍या पतीच्‍या मिळकतीवर अवलंबून असल्‍यामुळे तक्रारदारांच्‍या कुंटुंबीयावर आर्थिक संकट कोसळले.
31         तक्रारदारांनी शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक मदतीसाठी सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांसोबत नमुद केलेल्‍या मुदतीत अर्ज दाखल केला.
32        परंतु वारंवार पाठपुरावा करुनही, सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, म्हणुन दि.07.02.2009 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले यांना वकीलातर्फे नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली परंतु त्‍यानंतरही सामनेवाले यांनी मागणीची पुर्तता केलेली नाही.
33        शेवटी, तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याजदराने दि.30.08.2007 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासही रक्‍कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावी अशी मागणी केली.
  
तक्रार क्र.211/2009
 
34              तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदाराचे पती-श्री.शंकर विठ्ठल भोसले हे व्‍यवसायाने शेतकरी असून त्‍यांचे नांवे ता.माढा, जि.सोलापुर, येथे सर्व्‍हे.क्र.910/3 ही शेतजमीन आहे. त्‍याबाबतचा 7/12 उतारा व 8-अ खाते पुस्तिका दाखल केलेली आहे.
35                  तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.15.05.2005 रोजी सुमारे सकाळी 7 वाजता तक्रारदाराचे पती हे पिण्‍याचे पाणी जवळपासच्‍या विहीरीतून आणण्‍यासाठी गेले असता, पाणी ओढत असताना पाय घसरुन विहीरीत पडले व जबर जखमी झाले. हॉस्‍पीटलमध्‍ये उपचार घेत असताना त्‍यांचा त्‍यातच दि.15.05.2005 रोजी मृत्‍यु झाला.
36        शवविच्‍छेदनाचा अहवाल, पोलीस तपासाचा अहवाल अभिलेखात दाखल केलेले आहे.
37        तक्रारदाराचे सर्व कुंटुंब त्‍यांच्‍या पतीच्‍या मिळकतीवर अवलंबून असल्‍यामुळे तक्रारदारांच्‍या कुंटुंबीयावर आर्थिक संकट कोसळले.
38        तक्रारदारांनी शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक मदतीसाठी सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांसोबत नमुद केलेल्‍या मुदतीत अर्ज दाखल केला. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण नसताना नाकारली.
39        परंतु वारंवार पाठपुरावा करुनही, सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, म्हणुन दि.07.02.2009 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले यांना वकीलातर्फे नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली परंतु त्‍यानंतरही सामनेवाले यांनी मागणीची पुर्तता केलेली नाही.
40        शेवटी, तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याजदराने दि.15.05.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासही रक्‍कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावी अशी मागणी केली.
 
तक्रार क्र.212/2009
41       तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदाराचे पती-श्री.शिवाजी चंद्रकांत पांढरे हे व्‍यवसायाने शेतकरी असून त्‍यांचे नांवे ता.मोहोळ, जि.सोलापुर, येथे सर्व्‍हे.क्र.160/7 ही शेतजमीन आहे. त्‍याबाबतचा 7/12 उतारा व 8-अ खाते पुस्तिका दाखल केलेली आहे.
42                  तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.04.10.2005 रोजी तक्रारदारांचे पती निसर्ग धाब्‍याच्‍यासमोर सोलापुर-पुणे रस्‍त्‍यावर उभे असता बस क्र.AP-11-Z-4941 बसने धडक दिली. या धडकेने तक्रारदारांचे पती दुरवर फेकले जाऊन जबर जखमी झाले. उपचारासाठी सोलापुर येथील हॉस्‍पीटलमध्‍ये दाखल करणे करीता नेत असताना, दाखल करण्‍यापूर्वीच मृत झाले. 
43        शवविच्‍छेबन अहवाल, पोलीस तपासाचा अहवाल अभिलेखात दाखल आहे.
44        तक्रारदाराचे सर्व कुंटुंब त्‍यांच्‍या पतीच्‍या मिळकतीवर अवलंबून असल्‍यामुळे तक्रारदारांच्‍या कुंटुंबीयावर आर्थिक संकट कोसळले.
45        तक्रारदारांनी शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक मदतीसाठी सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांसोबत नमुद केलेल्‍या मुदतीत अर्ज दाखल केला. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण नसताना नाकारली.
46        परंतु वारंवार पाठपुरावा करुनही, सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, म्हणुन दि.07.02.2009 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले यांना वकीलातर्फे नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली परंतु त्‍यानंतरही सामनेवाले यांनी मागणीची पुर्तता केलेली नाही.
47        शेवटी, तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याजदराने दि.04.10.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासही रक्‍कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावी अशी मागणी केली.
 
तक्रार क्र.213/2009
48        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचा मुलगा-श्री.दिपक विठ्ठल शिंदे हे व्‍यवसायाने शेतकरी असून त्‍यांचे नांवे ता.माढा, जि.सोलापुर, येथे सर्व्‍हे.क्र.42/8 ही शेतजमीन आहे. त्‍याबाबतचा 7/12 उतारा व 8-अ खाते पुस्तिका दाखल केलेली आहे.
49                   तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार,तक्रारदाराचा मुलगा दि.13.01.2005 रोजी रात्री 10 वाजता मोटर सायकलने इंदापुर रोडवरुन जात असता M/Tempo No.MH-12-RA-1326 या टेंपोने विरुध्‍द बाजूने येऊन बैलगाडीस ओव्‍हरटेक करुन जोरात धडक दिली. या धडकीने तक्रारदारांचा मुलगा-श्री.दिपक विठ्ठल शिंदे व त्‍यांचे सोबत असलेले श्री.गोविंद जाधव हे दोघेही बाजूला मोटर सायकलवरुन फेकले गेले व जखमी झाले व त्‍यातच त्‍यांचा मृत्‍यु झाला.
50        शवविच्‍छेदन अहवाल, पोलीस तपासाचे कागदपत्रं अभिलेखात दाखल आहेत.
51         तक्रारदाराचे सर्व कुंटुंब त्‍यांच्‍या मुलाच्‍या मिळकतीवर अवलंबून असल्‍यामुळे तक्रारदारांच्‍या कुंटुंबीयावर आर्थिक संकट कोसळले.
52        तक्रारदारांनी शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक मदतीसाठी सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांसोबत नमुद केलेल्‍या मुदतीत अर्ज दाखल केला. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण नसताना नाकारली.
53              परंतु वारंवार पाठपुरावा करुनही, सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, म्हणुन दि.07.02.2009 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले यांना वकीलातर्फे नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली परंतु त्‍यानंतरही सामनेवाले यांनी मागणीची पुर्तता केलेली नाही.
54        शेवटी, तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याजदराने दि.01.09.2006 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासही रक्‍कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावी अशी मागणी केली.
तक्रार क्र.214/2009
55        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती -श्री.हरीदास अंबादास शेळके हे व्‍यवसायाने शेतकरी असून त्‍यांचे नांवे ता.मोहोळ, जि.सोलापुर, येथे सर्व्‍हे.क्र.60/3 ही शेतजमीन आहे. त्‍याबाबतचा 7/12 उतारा व 8-अ खाते पुस्तिका दाखल केलेली आहे.
56                  तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.03.04.2005 रोजी दुपारी सुमारे 4 वाजता तक्रारदारांचे पती कोन्‍हेरी रोडवरुन मोटरसायकलने जात असता, अचानक समोर आलेल्‍या जनावरास वाचवीत असता त्‍यांचा तोल जाऊन मोटर सायकलवरुन खाली पडले व जबर जखमी झाले. उपचारासाठी त्‍यांना आश्विनी सहकारी हॉस्‍पीटल येथे दाखल केले. उपचार घेत असतानाचा दि.30.04.2005/01.05.2005 रोजी त्‍यांचा मृत्‍यु झाला.
57        अभिलेखात एफआयआरची प्रत, पोलीस पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, शवविच्‍छेदनाचा अहवाल दाखल केले आहे.
58         तक्रारदाराचे सर्व कुंटुंब त्‍यांच्‍या मुलाच्‍या मिळकतीवर अवलंबून असल्‍यामुळे तक्रारदारांच्‍या कुंटुंबीयावर आर्थिक संकट कोसळले.
59        तक्रारदारांनी शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक मदतीसाठी सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांसोबत नमुद केलेल्‍या मुदतीत अर्ज दाखल केला. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण नसताना नाकारली.
60        परंतु वारंवार पाठपुरावा करुनही, सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, म्हणुन दि.07.02.2009 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले यांना वकीलातर्फे नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली परंतु त्‍यानंतरही सामनेवाले यांनी मागणीची पुर्तता केलेली नाही.
61         शेवटी, तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याजदराने दि.03.04.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासही रक्‍कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावी अशी मागणी केली.
62        सर्व तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत शपथपत्र व अनुषांगिक कागदपत्रं दाखल केली आहेत तसेच तक्रार अर्जांसोबत विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला आहे.
63        सामनेवाले यांनी हजर होऊन प्रत्‍येक तक्रार अर्जात वेगवेगळी कैफियती दाखल केल्‍या आहेत. परंतु प्रत्‍येक तक्रार अर्जात सामनेवाले यांचे एकसारखेच म्‍हणणे आहे.
64        सामनेवाले यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हे ग्राहक नाहीत तसेच तक्रारदारांनी तक्रार अर्ज विलंबाने दाखल केलेला आहे. सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार यांनी फेरफार उतारा व 6-सी चा फॉर्म व वयाचा दाखल केलेला नाही, ही आवश्‍यक कागदपत्रं दाखल करणे आवश्‍यक होते. तसेच तक्रारदार हे त्‍यांच्‍या नांवे जमीन जरी असली तरी व्‍यवसाने शेती काम करीत होते हे दाखविणारे कागदपत्रं दाखल केले नाही, त्‍यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी नाकारली. तक्रारदार क्र.213/2009 सामनेवाले यांनी असे कथन केले की, प्रस्‍तुत अपघात हा तक्रारदार अंमली पदार्थांचे सेवन करुन गाडी चालविण्‍यामुळे व त्‍यांच्‍या बे‍फिकीरीमुळे झाला, त्‍यामुळे सामनेवाले यांनी त्‍यांची मागणी नाकारली.
65        सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार, सामनेवाले यांनी मा.राष्‍ट्रीय आयोगापुढे एकुण 2232 प्रकरणे दाखल केलेली आहेत. त्‍यापैकी तक्रारदारांची मागणी हे पण एक त्‍या प्रकरणांपैकी एक आहे. म्‍हणुन प्रस्‍तुत मंचाने, सदरचा तक्रार अर्ज मा.राष्‍ट्रीय आयोगापुढे सुनावणी होईपर्यंत स्‍थगित करावे अशी मागणी केली आहे.
66       तक्रार अर्ज, कैफियती व उभय पक्षकारांनी दाखल केलेले अनुषांगिक कागदपत्रं व पुराव्‍याचे शपथपत्रं व लेखी युक्‍तीवाद यांची पाहणी केली. उभय पक्षकारांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकला असता निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. 

क्र.
मुद्दे
उत्‍तरे
1
सामनेवाले यांनी सर्व तक्रार अर्जातील तक्रारदारांच्‍या मागण्‍यां नाकारुन सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली हे सर्व तक्रारदारांनी सिध्‍द केले काय ?
होय, तक्रार अर्ज क्र.209/2009 व तक्रार अर्ज क्र.213/2009  मधील तक्रारदार सोडून.  
2
सर्व तक्रारदार तक्रार अर्जातील मागणी मागण्‍यांस पात्र आहेत काय ?
होय, अंशतः
3
अंतिम आदेश ?
तक्रार अर्ज क्र.209/2009 व तक्रार अर्ज क्र.213/2009 रद्द करण्‍यात येतात. उर्वरित तक्रारीं अंशतः मंजूर करण्‍यात येतात.

 
कारणमिमांसा
67        सर्व तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रार अर्जामध्‍ये विलंबमाफीचा अर्ज दाखल केलेला आहे. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांनी मागणी अर्ज सामनेवाले यांचेकडे दाखल केल्‍यापासुन मागणी करिता पाठपुरावा करीत होते, तेव्‍हा सामनेवाले यांनी मागणीची पुर्तता करु असे आश्‍वासन देत राहिले परंतु शेवटी त्‍यांनी तक्रारदारांची मागणी नाकारली. म्‍हणून तक्रारदारांनी विहीत कालावधीत तक्रार अर्ज दाखल करु शकले नाहीत, म्‍हणून विलंबमाफी करावी अशी मागणी केली.
68        जर तक्रार अर्जास कारण हे मागणी नाकारल्‍या दिवसापासुन गृहीत धरली तर सामनेवाले यांनी किंवा तक्रारदारांनी मागणी कधी नाकारली याचा कोठेच उल्‍लेख केलेला नाही किंवा त्‍याबाबत कागदपत्रं दाखल केलेले नाहीत. त्‍यामुळे तक्रार अर्ज दाखल करण्‍याचा कालावधी कधी पासुन सुरु होते हे स्‍पष्‍ट होत नाही. 
जर तक्रारीस कारण हे घटना घडल्‍यापासुन गृहीत धरले तर प्रत्‍येक तक्रार अर्जांमध्‍ये विलंब हा झालेलाच आहे. परंतु विलंब झाल्‍यास प्रस्‍ताव नाकारण्‍यात येईल अशी अट विमा करारामध्‍ये कोठेही नमूद केलेली नाही. तसेच तक्रारदारांनी प्रस्‍ताव केल्‍यानंतर तहसील कार्यालयात प्रस्‍ताव पुढे पाठविण्‍यास उशिर झाला तर यात तक्रारदारांची कोठेही चुक दिसुन येत नाही. शेतकरी वर्ग हा अशिक्षित वर्ग आहे, त्‍यामुळे त्‍यांना योजनेबद्दलची संपुर्ण माहिती असणे किंवा त्‍यातील कालावधीबद्दल माहिती असणे किंवा त्‍याचे महत्‍व माहिती असणे हे त्‍यांचेकडून अपेक्षित नाही. तसेच जरी त्‍यांना मुदतीबद्दल कल्‍पना होती असे गृहीत धरले,तरीही आवश्‍यक ती कागदपत्रं मुदतीत गोळा करणे हे त्‍यांच्‍या दृष्‍टीने जिकीरीचे काम आहे तसेच घरातील कर्ता माणुस गेलेले असताना असहाय परिस्थितीत प्रस्‍ताव अर्ज मुदतीत दाखल करणे शक्‍य होईलच असे नाही. त्‍यामुळे वरील परिस्थितीत विलंब माफीचा अर्ज मान्‍य करण्‍यात येतो.
69        सामनेवाले यांचे म्‍हणणेनुसार, तक्रारदार हे ग्राहक नाहीत.
70        राज्‍यामध्‍ये सुमारे एक कोटी शेतकरी आहेत. शेती व्‍यवसाय करताना होणारे विविध अपघात, तसेच विज पडणे, पूर, सर्पदंश, वाहन अपघात, कोणत्‍याही नैसर्गिक आपत्‍तीमुळे होणारे अथवा अन्‍य कोणतेही अपघात यामुळे ब-याच शेतक-यांना मृत्‍यु ओढवतो, किंवा काहींना अपंगत्‍व येते. घरातील कर्त्‍या व्‍यक्‍तीस झालेल्‍या सदर अपघातामुळे कुंटूंबाचे उत्‍पन्‍नाचे साधन बंद होऊन अडचणीची परि‍स्थिती निर्माण होऊ शकते. अशा अपघातग्रस्‍त शेतक-यांस/त्‍यांच्‍या कुंटूंबास लाभ देण्‍याकरिता कोणतीही स्‍वतंत्र विमा योजना नसलेमुळे शासनाने शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना राबविली. या योजनेनुसार शासनाने सर्व नोंदणीकृत शेतकरी यांच्‍या वतीने शासनाने शेतक-याच्‍या व्‍यक्तिगत अपघात व अपंगत्‍व यासाठी विमा पॉलीसी उतरविली. या योजनेअंतर्गत विमा हप्‍त्‍याची एकत्रित रक्‍कम शेतक-याच्‍या वतीने शासन अदा करते, त्‍यामुळे शेतक-यांने किंवा अन्‍य कोणत्‍याही संस्‍थेने त्‍यांच्‍या वतीने या योजनेअंतर्गत स्‍वतंत्ररित्‍या विमा हप्‍त्‍याची रक्‍कम भरण्‍याची गरज नाही. 
71         ग्राहक संरक्षण कायदा, 1986, कलम-2(1)(डी) मध्‍ये ग्राहकाची व्‍याख्‍या नमूद केलेली आहे ती खालीलप्रमाणे,
          Clause-2(1)(d) :-    “Consumer” means any person who-
(i)      buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment, when such use is made with the approval of such person, when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose ; or
(ii)      [hires or avails of] any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who [hires or avails of] the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payments, when such services are availed of with the approval of the first mentioned person [but does not include a person who avails of such services for any commercial purpose].
72        या व्‍याख्‍येनुसार, जरी शेतक-यांनी प्रत्‍यक्ष सामनेवाले यांना कोणताही मोबदला दिलेला नसला तरीही ते शेतकरी व्‍यक्तिगत अपघात योजनेचे लाभार्थी आहेत व त्‍यांच्‍या वतीने शासन विमा हप्‍ता भरते म्‍हणून वरील तक्रार अर्जातील सर्व तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत.
73       सर्व तक्रार अर्जामध्‍ये सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांनी आवश्‍यक ती कागदपत्रं दाखल केलेली नाहीत म्‍हणून त्‍यांची मागणी नाकारली व तक्रार अर्ज क्र.213/2009 मध्‍ये तक्रारदाराचा मुलाने अंमली पदार्थ सेवन करुन बेफिकीरीने वाहन चालविल्‍याने अपघात घडला, म्‍हणून अपघातास त्‍यांचा मुलगाच जबाबदार आहे, त्‍यामुळे त्‍यांची मागणी नाकारली.
74       शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेची प्रत तक्रारदारांनी अभिलेखावर दाखल केलेली आहे. त्‍यामध्‍ये प्रपत्र मध्‍ये महसुल यंत्रणेमध्‍ये करावयाची कार्यवाही दिली आहे. आहे. त्‍या खालील प्रमाणेः-
(1)   अपघाती घटना घडल्‍यानंतर संबधीत शेतकरी
अथवा त्‍यांचे कुटुंबियाचा क्‍लेमफॉर्म व इतर कागदपत्रे एक आठवडयाचे आत संबधीत तलाठयास सादर करतील.
(2)   पुढील एक आठवडयामध्‍ये, सदर तलाठी शेतक-
याने एखादा अथवा काही कागदपत्राची पूर्तता केलेली नसल्‍यास स्‍वतः शासन निर्णयासोबत विहीत केलेल्‍या सर्व कागदपत्रांची आवश्‍यक त्‍या 7/12, 8 नुसार तो खातेदार असल्‍याच्‍या प्रमाणपत्रासह विम्‍या दाव्‍याचा प्रस्‍ताव तहसिलदारास सादर करतील.
                 (3)   प्राप्‍त प्रस्‍तावाची तपासणी करून सदर प्रस्‍ताव
तहसिलदार यांच्‍या प्रमाणपत्रासह सरळ आय.सी.आय.सी.आय जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमीटेड यांचेकडे एक आठवडयाचे आत पाठवतील व त्‍याची एक प्रत जिल्‍हयाधिका-यांना सादर करतील.
               (4)   संबधीत शेतक-याचे अथवा कुटुंबियाचे बँकेत खाते
नसल्‍यास नवीन खाते शक्‍यतो जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या नजिकच्‍या शाखेत उघडून त्‍याचा तपशिल आय.सी.आय.सी.आय लोंबार्ड जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीस कळविण्‍याची जबाबदारी संबंधित तहसीलदाराची राहील.
75              यावरून प्रपत्र -2 नुसार सर्व आवश्‍यक कागदपत्रं पाठविण्‍याची जबाबदारी महसुल यंत्रणेची आहे. एकदा क्‍लेमफॉर्म भरून दिल्‍यानंतर पुढील सर्व कार्यवाही करण्‍याची जबाबदारी महसुल यंत्रणेची आहे. त्‍यानतंर प्रपत्र नुसार प्रस्‍ताव तहसिलदाराकडुन प्राप्‍त झाल्‍यानंतर विमा कंपनीने एक महिन्‍याचे आत नुकसान भरपाईचा धनादेश संबधीत कुंटुंबीयाचा, जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक अथवा राष्‍ट्रीयकृत शाखा व्‍यवस्‍थपनाकडे जमा करावयाचा असते व त्‍यानंतर संबधीत शाखा व्‍यवस्‍थापकांनी शेतक-यांच्‍या कुटुंबियाच्‍या खात्‍यामध्‍ये जमा करावयाची अस‍ते.
76      याप्रमाणे, सामनेवाले यांनी प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यानंतर तक्रारदारांची मागणी जर कागदपत्रे पुर्ण नाही, या बाबींवरून तक्रारदाराची मागणी अमान्‍य करणे किंवा त्‍यावर निर्णय न घेणे हे सामनेवाले यांचे सेवेतील कमतरता ठरते. महसुल यंत्रणेच्‍या चुकीबद्दल किंवा त्‍यांनी केलेल्‍या दिरंगाईबद्दल अर्जदारांचे मागणी नाकारणे योग्‍य नाही. अर्जदारांच्‍या प्रस्‍तावावर निर्णय न घेतल्‍याने शासनाने काढलेल्‍या शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेचे उदिष्‍ट साध्‍य होणार नाही. या योजनेचे मुख्‍य उदिष्‍टे म्‍हणजे आर्थिक संकटात सापडलेल्‍या गरीब शेतक-यांना मदत करणे हे आहे. परंतु त्‍यांच्‍या प्रस्‍तावावर किरकोळ कारणावरून निर्णय न घेणे किंवा ती नाकारली तर शासनाकडुन गरीब शेतक-यांना या योजनेद्वारे मदत करण्‍याचा हेतु साध्‍य होणार नाही.
77           सामनेवाले यांनी लेखी युक्तिवादात असे म्‍हटले आहे की, राष्‍ट्रीय आयोगापुढे शासनाने सामनेवाले यांचे विरूध्‍द एकुण 2232 मागणी नाकारल्‍यासंबधी तक्रार अर्ज दाखल केलेले आहे. त्‍या 2232 मागणी अर्जापैकी हा एक मागणी अर्ज आहे. म्‍हणून या तक्रारीला “Res Judicata” ची बाधा येते. सामनेवाले यांच्‍या या म्‍हणण्‍यास मंच सहमत नाही. कारण सा.वाले यांनी त्‍याबाबतीत काही लेखीपुरावे दाखल केलेले नाही.
78     यावरून, सामनेवाले हे तक्रार अर्ज क्र.205/2009, 206/2009, 207/2009, 208/2009, 210/2009, 211/2009, 212/2009 आणि 214/2011 या तक्रार अर्जातील तक्रारदारांना शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेखाली मिळणारी नुकसान भरपाई रू.1,00,000/- देण्‍यास जबाबदार आहेत. सामनेवाले यांना प्रस्‍ताव अर्ज कधी प्राप्‍त झाला, याची तारीख स्‍पष्‍ट होत नसल्‍याने वरील रक्‍कमेवर तक्रार अर्ज दाखल दिनांकापासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजदराने व्‍याज देण्‍यास जबाबदार राहतील.ही नुकसान भरपाई तक्रारदारांच्‍या एकत्रितपणे कुंटूंबियांसाठी आहे. त्‍यामुळे यानंतर, तक्रारदारांच्‍या कुंटूंबियातील, पतीचे/मुलाचे इतर वारसांनी पुन्‍हा या योजनेखाली तक्रार अर्ज दाखल करु नये.
79         तक्रार क्र.209/2009 मध्‍ये, तक्रारदाराचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदाराचे पती-श्री.भीमराव माधव बागल हे व्‍यवसायाने शेतकरी आहेत व त्‍यांचे नावे माढा तालुका, जिल्‍हा-सोलापुर येथे सर्व्‍हे.क्र.63, ही शेत जमीन आहे व त्‍याबाबतचा 7/12 उतारा व 8-अ खाते पुस्तिका अभिलेखात दाखल आहे. अभिलेखात दाखल केलल्‍या सर्व कागदपत्रांची पाहणी करता, पृष्‍ठ क्र.14 वरील हक्‍कांचे परिपत्रकावरुन श्री.भीमराव माधव बागल यांनी सदर शेतजमीन श्री.अनिल भीमराव बागल यांना दि.30.04.2003 रोजी विकलेली दिसुन येते. तसेच पृष्‍ठ क्र.15 वरील खाते पुस्तिका 8-अ वरील नोंदीवरुन सदर जमीन श्री.अनिल भीमराव बागल यांचे नांवे असल्‍याचे दिसुन येते. यावरुन तक्रारदाराचे पती-श्री.भीमराव माधव बागल यांचे नांवे जमीन नाही हे स्‍पष्‍ट होते. दि.16.08.2005 रोजी तक्रारदारांचे पतीचे विजेच्‍या धक्‍क्‍याने मृत्‍यु झाला त्‍यानंतर तक्रारदारांनी शेतकरी अपघाती विमा योजनेखाली सामनेवाले यांचेकडे मागणी केली व सामनेवाले यांनी ती नाकारली असे तक्रारदारांचे म्‍हणणे धाधांत खोटे आहे असे नमूद करावे लागेल कारण घटनेच्‍या आधीच दोन वर्षे तक्रारदारांच्‍या पतीने शेतजमीन विकलेली आहे, त्‍यामुळे कदाचित, महसुल खात्‍याने त्‍यांचा प्रस्‍ताव सुरुवातीपासुनच स्विकारला नसणार. म्‍हणुन तक्रार अर्ज क्र.209/2009 रद्दबातल करण्‍यात येतो. तक्रार अर्ज क्र.213/2009 मध्‍ये सामनेवाले यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, सामनेवाले यांनी अपघाताच्‍या वेळी अंमली पदार्थांचे सेवन केले होते व बेफिकीरीने वाहन चालविल्‍याने अपघातास तक्रारदारांचा मुलगा जबाबदार आहे म्‍हणुन सामनेवाले यांनी तक्रारदाराची मागणी नाकारली. अभिलेखामध्‍ये पोलीस तपासणी अहवाल दाखल आहेत, त्‍यामध्‍ये प्रथम खबरी अहवालामध्‍ये श्री.दिपक विठ्ठल शिंदे यांने अपघातीच्‍यावेळी अंमली पदार्थं सेवन केल्‍याचे नमूद आहे. तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेले दि.13.05.2005 चे गोपनीय अहवालामध्‍ये श्री.दिपक विठ्ठल शिंदे याने अंमली पदार्थाचे सेवन केले नमूद आहे. त्‍यावरुन श्री.दिपक विठ्ठल शिंदे यांनी अपघाताच्‍या वेळी अंमली पदार्थाचे सेवन केले हे स्‍पष्‍ट होते. अपघातास तक्रारदारांचा मुलगाच जबाबदार आहे. योजनेच्‍या प्रपत्र-क मध्‍ये विमा संरक्षणामध्‍ये समाविष्‍ठ नसणा-या बाबींची सुची दिली आहे. त्‍यामध्‍ये क्र.4 मध्‍ये अंमली पदार्थाचे अंमलाखाली झालेला अपघात विमा संरक्षणाखाली येत नसल्‍याचे नमूद केले आहे. त्‍यावरुन, तक्रार अर्ज क्र.213/2009 हा रद्द करण्‍यात येतो.
          वरील विवेचनावरून, पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
आदेश
1     तक्रार अर्ज क्र.205/2009, 206/2009,  207/2009, 208/2009, 210/2009, 211/2009, 212/2009, आणि 214/2011 अंशतः मंजूर करण्‍यात येतात.
2    तक्रार अर्ज क्र.209/2009 आणि तक्रार अर्ज क्र.213/2009  रद्दबातल करण्‍यात येतात.
3    सामनेवाले यांनी आदेशामधील कलम-1 मधील  सर्व तक्रारदारांची मागणी नाकारुन सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली हे जाहीर करण्‍यात येते. 
4    सामनेवाले यांनी आदेशामधील कलम-1 मधील सर्व तक्रारदारांना रक्‍कम रु.1,00,000/- तक्रार अर्ज दाखल दिनांकापासून  ते पैसे देईपर्यत 9% व्‍याजदराने व्‍याजासह द्यावेत.
5    वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्‍यापासून सहा आठवडयाचे आत आदेशाची पूर्तता करावी.
6    आदेशांच्‍या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.
 
 
 
[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.