Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/09/194

MRS SHAHABAI SHANKARRAO WSARVE - Complainant(s)

Versus

ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD, - Opp.Party(s)

ABHAY JADHAV

21 Jun 2012

ORDER

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM MUMBAI SUBURBAN DISTRICT
3RD FLOOR, ADMINISTRATIVE BLDG., NR. CHETANA COLLEGE, BANDRA(E), MUMBAI-51.
 
Complaint Case No. CC/09/194
 
1. MRS SHAHABAI SHANKARRAO WSARVE
R/O WARUK BK, TAL-SHEVAGAON, DIST- AHMEDNAGAR
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICICI BANK TOWER, BKC, BANDRA-EAST, MUMBAI-51.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. Mr. J. L. Deshpande PRESIDENT
 HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR Member
 
PRESENT:
तक्रारदार गैरहजर
......for the Complainant
 
सा.वाले गैरहजर
......for the Opp. Party
ORDER

  तक्रारदारांकरिता     :    श्री.अभय जाधव, वकील       

          सामनेवालेंकरिता  :  श्री. अंकुश नवघरे, वकील  
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर सदस्‍या         ठिकाणः बांद्रा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
 
 
 
एकत्रित न्‍यायनिर्णय
 
           तक्रार अर्जांचे संक्षिप्‍त स्‍वरूप खालीलप्रमाणेः-
 
तक्रार क्र.184/2009
 
1.         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.पद्माकर नाशिक भोईर हे शेतकरी कुंटुंबातील होते व त्‍यांचे नांवे शेतजमीन असून  त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
2.         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.14.06.200रोजी तक्रारदारांचे पती-श्री.पद्माकर नाशिक भोईर हे आंब्‍याच्‍या झाडयावर चढत असताना पाय घसरुन खाली पडले व जबर जखमी झाले. उपचारासाठी त्‍यांना हॉस्‍पीटलमध्‍ये दाखल केले असता, त्‍यातच त्‍यांचा दि.18.06.2005 रोजी मृत्‍यु झाला.
3.         तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र, व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
4.         तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.20.10.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
5.         शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.18.06.2005 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
तक्रार क्र.185/2009
 
6.         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.अशोक ज्ञानदेव साळुंखे हे शेतकरी कुंटुंबातील होते व त्‍यांचे नांवे शेतजमीन असून  त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
7.         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.09.06.2005 रोजी तक्रारदारांचे पती- श्री.अशोक ज्ञानदेव साळुंखे हे शेतावर काम करीत होते. शेतावरील काम संपल्‍यावर पाटावर हात-पाय धुण्‍यासाठी गेले असता, पाण्‍यात पाय घसरुन पडले व पाण्‍यात पडल्‍यामुळे तोंडात पाणी जाऊन, गुदमरुन त्‍यांचा त्‍याच दिवशी मृत्‍यु झाला.
8.         तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल अभिलेखात दाखल केले आहे.
9.         तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.05.12.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
10.        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.09.06.2005 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
तक्रार क्र.186/2009
 
11.         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.अश्रु महादु दातीर हे शेतकरी कुंटुंबातील होते व त्‍यांचे नावे शेतजमीन असून त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
12.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.28.10.2005 रोजी तक्रारदारांचे पती श्री.अश्रु महादु दातीर यांच्‍या डोळयांवर शस्‍त्रक्रिया करण्‍याकरिता, हॉस्‍पीटलमध्‍ये दाखल होते. त्‍यावेळेस, हॉस्‍पीटलमधल्‍या बाथरुममध्‍ये पाय घसरुन पडले, पडल्‍यामुळे जागीच त्‍यांचा मृत्‍यु झाला.
13.        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल अभिलेखात दाखल केले आहे.
14.        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.05.12.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
15.        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.28.10.2005 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
तक्रार क्र.187/2009
 
16.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.नवनाथ शिवराम धायतडक हे शेतकरी कुंटुंबातील होते व त्‍यांचे नांवे शेतजमीन त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
17.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.01.12.2005 रोजी तक्रारदाराचे पती-श्री.नवनाथ शिवराम धायतडक हे शेतावर पिकांना पाणी देण्‍यास गेले असता, पाण्‍याचा पंप बंद करतेवेळी विजेचा धक्‍का बसला, त्‍यामुळे त्‍यांना उपचारासाठी हॉस्‍पीटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले परंतु तेथेच त्‍यांचा मृत्‍यु झाला.
18.        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल अभिलेखात दाखल केले आहे.
19.        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.14.11.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
20.        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.01.12.2005 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
तक्रार क्र.188/2009
 
21.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.सोमनाथ बापु सांगळे हे शेतकरी कुंटुंबातील होते व  त्‍यांचे नांवे शेतजमीन असून त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
22.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.20.10.2005 रोजी तक्रारदारांचे पती-श्री.सोमनाथ बापु सांगळे भाजी मंडईतुन घरी परत येत असता, एका अज्ञात वाहनाने तक्रारदारांच्‍या पतीच्‍या मोटर सायकलीस धडक दिल्‍याने अपघात झाला. या अपघातामध्‍ये तक्रारदाराचे पती गंभीर जखमी झाले व जागीच त्‍यांचा मृत्‍यु झाला.
22.        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल अभिलेखात दाखल केले आहे.
23.        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.05.12.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
24        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.20.10.2005 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
तक्रार क्र.189/2009
 
25.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.नानासाहेब किसन वावरे हे शेतकरी कुंटुंबातील होते व त्‍यांचे नांवे शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
26.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.23.12.2005 रोजी तक्रारदारांचे पती- श्री.नानासाहेब किसन वावरे, हे मोटरसायकलवर पाठीमागे बसुन भाजी मंडईतुन घरी परत असता, दुस-या मोटरसायकलने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या मोटरसायकलीस धडक दिली. या अपघातामध्‍येच तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यु झाला.
27.        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल अभिलेखात दाखल केले आहे.
28.        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.05.12.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
29.        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.23.12.2005 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
तक्रार क्र.190/2009
 
30.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.महादेव रामभाऊ खोसे हे शेतकरी कुंटुंबातील होते व त्‍यांचे नांवे शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
31.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.21.12.2005 रोजी तक्रारदारांचे पती-श्री.महादेव रामभाऊ खोसे हे त्‍यांचे गावी जात असता, वाटेत तहान लागल्‍याने पाणी पिण्‍यासाठी विहिरीत उतरले. विहीरीच्‍या पाय-या हयां जुन्‍या व घसरट असल्‍याने उतरताना त्‍यांचे पाय घसरले व ते पाण्‍यात पडले. पाणी सर्व नाका-तोंडात गेल्‍याने गुदमरुन त्‍यांचा दि.25.12.2005 रोजी मृत्‍यु झाला.
32.        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर. व मृत्‍यु दाखला अभिलेखात दाखल केले आहे.
33        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.05.12.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
34.        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.25.12.2005 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
तक्रार क्र.191/2009
 
35.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.महादेव दौलत खेडकर हे शेतकरी कुंटुंबातील होते व त्‍यांचे नांवे शेतजमीन असून त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
36        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.05.03.2005 रोजी तक्रारदारांचे पती-श्री.महादेव दौलत खेडकर हे बाजारात काही सामान खरेदी करुन आणण्‍यासाठी मोटर सायकलीवरुन जात असता, टेंपो क्र.MH-20-A-1723 याने तक्रारदारांच्‍या पतीच्‍या मोटरसायकलीस जोराने धडक दिली, या धडकेने तक्रारदारांचे पती जबर जखमी झाले व जागीच त्‍यांचा मृत्‍यु झाला.
37.        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल अभिलेखात दाखल केले आहे.
38.        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.05.12.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
39.        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.05.03.2005 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
तक्रार क्र.192/2009
 
40        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.दत्‍तात्रय धोंडिराम भोगे हे शेतकरी कुंटुंबातील होते व त्‍यांचे नांवे शेतजमीन असून त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
41         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.13.03.2005 रोजी तक्रारदारांचे पती-श्री.दत्‍तात्रय धोंडिराम भोगे, हे फार्मीयारसाठी वाळु आणण्‍यासाठी गेले असता, त्‍यांचे ट्रक्‍टर समोरुन येणा-या ट्रकला टाळण्‍यासाठी डावीकडे वळले असता, रस्‍त्‍यावरुन कलंडले व अपघात या अपघातात जबर जखमी झाले व त्‍यांतच त्‍यांचा मृत्‍यु झाला.
42.        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल अभिलेखात दाखल केले आहे.
43        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.05.12.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
44.        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.13.03.2005 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
तक्रार क्र.193/2009
 
45.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.छगन गंगाराम गोरे हे शेतकरी कुंटुंबातील होते व त्‍यांचे नांवे शेतजमीन असून  त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
46.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.11.08.2005 रोजी तक्रारदार व त्‍यांचे पती-श्री.छगन गंगाराम गोरे हे दोघे दुकानातुन काही वस्‍तु खरेदी करुन परत येत असता, एका इंडिका कार क्र.एमएच-20-वाय-5610 या वाहनाने तक्रारदाराच्‍या पतीस धड‍क दिल्‍याने ते जबर जखमी झाले व थोडयावेळाने त्‍यातच त्‍यांचा मृत्‍यु झाला.
47.        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल अभिलेखात दाखल केले आहे.
48        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.05.12.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
49.        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.11.08.2005 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
तक्रार क्र.194/2009
 
50.       तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.शंकरराव सर्जेराव वावरे हे शेतकरी कुंटुंबातील होते व  त्‍यांचे नांवे शेतजमीन असून त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
51.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.01.03.2005 रोजी तक्रारदारांचे पती-श्री.शंकरराव सर्जेराव वावरे हे गॅस-स्‍टोव्‍हवर चहा बनवित असता, स्‍टोव्‍हचा भडका उडाला. या भडक्‍याने तक्रारदारांचे पती या भडक्‍याने भाजले. त्‍यामुळे ते जबर जखमी झाले. उपचारासाठी त्‍यांना हॉस्‍पीटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले, उपचार घेत असता त्‍यांना जागीच मृत्‍यु आला.
52.        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल अभिलेखात दाखल केले आहे.
53.        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.05.12.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
54.        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.10.03.2005 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
तक्रार क्र.195/2009
 
55.       तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.भीमा विश्‍वनाथ अभंग हे शेतकरी कुंटुंबातील होते व त्‍यांचे नांवे शेतजमीन असून त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
56.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.17.08.2005 रोजी पती-श्री.भीमा विश्‍वनाथ अभंग हे बाजारातुन भाजी खरेदी करुन जीप क्र.एमएच-16-सी-1340 या वाहनाने येत असता, अचानकपणे टाटा सुमो क्र.एमएच-20-डब्‍ल्‍यु-4900 हे वाहन जोराने येऊन तक्रारदारांच्‍या पतीच्‍या वाहनास धडक दिली. या धडकेने तक्रारदारांचे पती जबर जखमी झाले. उपचारासाठी त्‍यांना हॉस्‍पीटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले. परंतु उपचार घेत असता, त्‍यांचा मृत्‍यु झाला. तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल अभिलेखात दाखल केले आहे.
57      तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल अभिलेखात दाखल केले आहे.
58.        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.05.12.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
59        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.17.08.2005 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
तक्रार क्र.196/2009
 
60.       तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.बाळकृष्‍ण लक्ष्‍मण फसाळे हे शेतकरी कुंटुंबातील होते व त्‍यांचे नांवे शेतजमीन असून त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
61.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.24.03.2006 रोजी तक्रारदाराचे पती-श्री.बाळकृष्‍ण लक्ष्‍मण फसले हे शेती काम करण्‍यासाठी शेतावर जात असता, एस.टी.बस क्र.एम.एच.-20-डी-5852 या वाहनाने जोराने धडक दिली. या धडकेने तक्रारदार गंभीररीत्‍या जखमी झाले आणि यातच त्‍यांचा मृत्‍यु झाला.  
62.        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल अभिलेखात दाखल केले आहे.
63.        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.05.12.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
64.        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.24.03.2006 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
तक्रार क्र.197/2009
 
65.       तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.हेमंत सुरेश तरमाळे हे शेतकरी कुंटुंबातील होते व त्‍यांचे नांवे शेतजमीन असून  त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
66.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.01.03.2006 रोजी तक्रारदाराचे पती- श्री.हेमंत सुरेश तरमाळे हे त्‍यांचे आजारी नातेवाईक अरूण तरमाळे यांना हॉस्‍पीटलकडे मोटर बाईकवरुन घेऊन जात असता, एका ट्रकने जोरात येऊन मोटरबार्इकला धडक दिली, या धडकेने तक्रारदारांचे पती गंभीररित्‍या जखमी झाले व त्‍यातच त्‍यांचा मृत्‍यु झाला.
67.    तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., शवविच्‍छेदन अहवाल अभिलेखात दाखल केले आहे.
68.        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.20.10.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
69.        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.01.03.2006 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
तक्रार क्र.198/2009
 
70.       तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.पांडुरंग कुंडलिक शिंदे हे शेतकरी कुंटुंबातील होते व  त्‍यांचे नांवे शेतजमीन असून  त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
71.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.22.09.2005 रोजी तक्रारदाराचे पती- श्री.पांडुरंग कुंडलिक शिंदे त्‍यांचे नातेवाईकाकडे जात असता, एका पिसाळलेल्‍या कुत्र्याने त्‍याचा पाठलाग केल्‍याने तक्रारदारांचे पती त्‍यांचा जीव वाचविण्‍यासाठी पळत सुटले. पळता पळता रेल्‍वेस धडक दिली. या धडकेने तक्रारदाराचे पती गंभीर जखमी झाले व त्‍यातच त्‍यांचा दि.25.09.2005 रोजी मृत्‍यु झाला.
72.        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., शवविच्‍छेदन अहवाल अभिलेखात दाखल केले आहे.
73        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.05.12.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
74.        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.25.09.2005 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
तक्रार क्र.199/2009
 
75.       तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.दत्‍तात्रय नारायण धवलकर हे शेतकरी कुंटुंबातील होते व त्‍यांचे नांवे शेतजमीन असून त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
76.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.01.04.2006 रोजी तक्रारदाराचे पती- श्री.दत्‍तात्रय नारायण धवलकर हे सायकलीवरुन शेतावरुन घराकडे परत येत असता, घसरडया रस्‍त्‍यामुळे सायकलीवरुन पडले व त्‍यामुळे ते जबर जखमी झाले व जागीच त्‍यांचा मृत्‍यु झाला.
77        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., पोलीस इंक्‍वेस्‍ट पंचनामा अभिलेखात दाखल केले आहे.
78.        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.20.10.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
79.        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.01.04.2006 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
तक्रार क्र.200/2009
 
80.       तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.मनोहर शंकर जयभाय हे शेतकरी कुंटुंबातील होते व त्‍यांचे नांवे शेतजमीन असून त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
81.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.30.08.2005 रोजी तक्रारदाराचे पती- श्री.मनोहर शंकर जयभाय हे गोडाऊनमधुन गवत बाहेर काढीत असता, सर्पदंश झाला, त्‍यामुळे तक्रारदारांच्‍या पतींना हॉस्‍पीटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले. उपचार घेत असताच त्‍यांचा मृत्‍यु झाला.
82.        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., शवविच्‍छेदन अहवाल अभिलेखात दाखल केले आहे.
83.        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.05.12.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
84.        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.30.08.2005 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
तक्रार क्र.201/2009
 
85.       तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.राजेंद्र जर्नादन भापकर हे शेतकरी कुंटुंबातील होते व त्‍यांचे नांवे शेतजमीन असून  त्‍याबाबत 7/12 व फेरफार उता-यामध्‍ये नोंद आहे.
86.        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.21.12.2005 रोजी तक्रारदाराचे पती- श्री.राजेंद्र जर्नादन भापकर भाजीमंडईतुन त्‍यांचे काम संपवुन घरी परतत असता, लग्‍झरी बस क्रमांक-केए-21-डी-022 याने जोरात तक्रारदाराच्‍या पतीस धडक दिल्‍याने ते गंभीररित्‍या जखमी झाले. या अपघातात ते जागीच ठार झाले.
87.        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., शवविच्‍छेदन अहवाल अभिलेखात दाखल केले आहे.
88.        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.05.12.2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
89.        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.21.12.2005 रोजी पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत तसेच रु.20,000/- सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य दिले नाही म्‍हणुन दंडात्‍मक रु.20,000/- द्यावेत, रु.5,000/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.
90.        सर्व तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत अनुषंगीक कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदारांनी तक्रार अर्जास कारण सततचे आहे. त्‍यामूळे तक्रार अर्ज मुदतीत आहे असे नमूद केले आहे. परंतू तरीही दक्षता म्‍हणून विलंब माफीचा अर्ज केलेला आहे. विलंबास कारण तक्रारदार हे अशिक्षीत आहेत व वकीलांना पेसै देण्‍यासाठी वेळेवर पैसे उपलब्‍ध होऊ शकले नाही त्‍यामुळे तक्रार अर्ज दाखल करण्‍यास विलंब झाला म्‍हणून अर्ज दाखल करून विलंब माफीची मागणी केली.
91.       सा.वाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्‍तर दयावे अशी नोटीस सा.वाले यांना पाठविण्‍यात आली. नोटीशीस अनुसरून सा.वाले हजर झाले. प्रत्‍येक तक्रार अर्जात वेगवेगळया कैफियती दाखल केल्‍या आहेत. प्रत्‍येक कैफियतीमध्‍ये सा.वाले यांचे एकसारखेच म्‍हणणे आहे.
92.      सा.वाले यांचे म्‍हणणेनूसार तक्रारदार हे ग्राहक नाहीत. तसेच तक्रारदारांनी तक्रार अर्ज विलंबाने दाखल केलेला आहे. सा.वाले यांचे म्‍हणणेनूसार सा.वाले यांनी मा. राष्‍ट्रीय आयोगापूढे एकुण 2232 प्रकरणे दाखल केलेली आहेत त्‍यापैकी तक्रारदारांनी मागणी हे पण एक त्‍याप्रकरणापैकी आहे. म्‍हणून प्रस्‍तुत मंचाने सदरचा तक्रार अर्ज मा.राष्‍ट्रीय आयोगापूढे सुनावणी होईपर्यंत स्‍थगीत करावे अशी मागणी केलेली आहे.
93.      सा.वाले यांचे म्‍हणणेनूसार तक्रारदार हे ग्राहक सरंक्षण कायदा कलम 2(1), डी नूसार ग्राहक नाहीत. त्‍यामूळे तक्रार अर्ज चालु शकत नाही.
94.     सा.वाले यांचे म्‍हणणेनूसार तक्रारदारांनी तक्रारदार हे शेतकरी असल्‍याबद्दल फेरफार उतारा दाखल केला नाही व या घटनेच्‍या वेळी तक्रारदारांच्‍या मयत नातेवाईकाचे वय दाखविणारे वयाचा दाखला दाखल केला नाही. तसेच तक्रारदारांचे मयत नातेवाईक हे नोंदणीकृत शेतकरी असून कार्यरत शेतकरी होते. हे दाखविणारे कागदपत्र दाखल केले नाही. याप्रकारे सा.वाले यांचे म्‍हणणेनूसार तक्रारदार यांनी फेरफार उतारा, 6(क) चा उतारा, वयाचा दाखला, एफआयआरची प्रत, पोलीस तपासाची कागदपत्रे अशी आवश्‍यक कागदपत्रे दाखल केली नाही ही कागदपत्रे तक्रारदारांची मागणी मान्‍य करण्‍याकरीता दाखल करणे जरूरीचे होते. त्‍यामूळे सा.वाले यांनी तक्रारदारांची मागणी नाकारली/किंवा त्‍यावर निर्णय घेतला नाही
95.       तक्रार अर्ज क्रमांक 191/09 यामध्‍ये सा.वाले यांचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदारांचे पती दिनांक 05.03.2005 रोजी मोटर सायकलच्‍या अपघातात निधन पावले. सा.वाले यांचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदारानी मागणीसोबत एफ.आय.आरची प्रत, पोलीस चौकशीचा अंतीम अहवाल, ड्रॉयव्‍हीग लायसंन्‍स दाखल केला नाही. तसेच त्‍यांनी शेतकरी असल्‍याबद्दलचा कोणतेही कागदपत्रे दाखल केली नाहीत.
96.       तक्रार अर्ज क्रमांक 192/09 यामध्‍ये सा.वाले यांचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदारांचे पती हे दिनांक 13.03.2005 रोजी ट्रॅक्‍टर चालवित असतांना ट्रॅक्‍टर नदीच्‍या पुलावर उलटले व अपघात झाला. त्‍यातच त्‍यांचा मृत्‍यु झाला. तक्रारदारांनी एफ.आय.आरची प्रत स्‍पॉट पंचनामा, पोलीसांचा अंतीम अहवाल व इम्‍प्रेस पंचानामा अशी आवश्‍यक ती कागदपत्रे दाखल केली नाही त्‍यामूळे प्रकरणात सा.वाले यांनी चौकशीसाठी पाथ फायंडरस या एजंन्‍सीची नेमणुक केली.चौकशीकरीता असे आढळून आहे की, तक्रारदारांच्‍या पतीकडे ट्रॅक्‍टर चालविण्‍याचा वैदय परवाना नव्‍हता कैफियतीसोबत पाथ फायडंर एजन्‍सची चौकशी अहवाल सोबत Exh (A)  वर दाखल केलेला आहे.
97.       तक्रार अर्ज क्रमांक 194/09 मध्‍ये सा.वाले यांचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदारांच्‍या पतीचे दिनांक 1.03.2005 रोजी चहा करतेवेळी गॅसस्‍टोचा भडका उडाला व अपघात होऊन त्‍यातच त्‍यांचे मृत्‍यु झाले. तक्रारदारांनी मागणीपत्र दाखल करतेवेळी आवश्‍यक ती कागदपत्रे दाखल केली नाहीत. एफआयआरची प्रत, पोलीस चौकशीचा अंतीम अहवाल, वयाचा दाखला, 8(ए) चा दाखला दाखल करणे आवश्‍यक होते.परंतू तक्रारदरांनी ते दाखल केलेले नाहीत.  त्‍यामुळे सा.वाले यांनी प्रकरणात चौकशीसाठी चार्टर हाऊस या एजन्‍सीस नेमले. चौकशीअंती असे आढळून आले की, घटनेच्‍या वेळी तक्रारदारांच्‍या पतीचे वय 70 वर्षाहून जास्‍त आढळून आले. कैफियतीसोबत चार्टर हाऊस एजन्‍सीचा चौकशी अहवाल दाखल केलेला आहे. सा.वाले यांचे म्‍हणणेनूसार तक्रारदारांनी हेतुपुरस्‍कर वय लपविण्‍याकरीता आवश्‍यक ती कागदपत्रे दाखल केली नाहीत.
98      तक्रार अर्ज क्रमांक 197/09 सा.वाले यांचे म्‍हणणेनूसार दिनांक 01.03.2006 रोजी तक्रारदारांचे पती मोटरबाईक चालवित असता एका अज्ञात ट्रकनी धडक दिल्‍याने अपघात झाला व अपघातात तक्रारदारांच्‍या पतीचे निधन झाले. सा.वाले यांचे म्‍हणणेनूसार मागणीपत्र दाखल करतेवेळी तक्रारदारांनी सर्व आवश्‍यक ती कागदपत्रे दाखल करणे आवश्‍यक होते परंतू तक्रारदारांनी आवश्‍यक ती कागदपत्रे दाखल केली नाहीत. म्‍हणून प्रकरणात चौकशीसाठी विशाल जेंदाणी एजन्‍सीस नेमले असता चौकशीअंती असे आढळून आले की, तक्रारदारांच्‍या मयत पतीकडे मोटरबाईक चालविण्‍याचा वैध परवाना नव्‍हता तसेच मोटरबाईकवरून तीघे जण जात होते त्‍यामूळे परवाना नियमाचे त्‍यांनी उल्‍लंघन केल्‍याने सा.वाले यांनी तक्रारदारांची मागणी नाकारली कैफियतीसोबत विशाल जेंदाणी एजन्‍सीचा अहवाल दाखल Exh (b) दाखल केला आहे. सा.वाले यांचे असेही म्‍हणणे आहे की, तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यु दि.01.03.2006 रोजी झाला परंतू मृत्‍यु दाखल्‍यामध्‍ये मृत्‍यु दिनांक 01.02.2006 नोंदविले आहे यावर तक्रारदारांकडे चौकशी केली असता तक्रारदार त्‍याचे स्‍पष्‍टीकरण देऊ शकले नाही.
99.      तक्रार क्रमांक 200/09 यामध्‍ये सा.वाले यांचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदारांनी आवश्‍यक ते कागदपत्रे दाखल केली नाही म्‍हणून प्रकरणात चौकशीसाठी चार्टर हाऊस या एजंन्‍सीस नेमले. चौकशी अहवाल Exh (A)  व (B) वर दाखल आहे. चौकशी अहवालात तक्रारदारांचा पतीचा मृत्‍यु हा केवळ निष्‍काळजीपणामूळे झालेला आहे त्‍यामूळे तक्रारदारांची मागणी नाकारण्‍यात आली.
100.       तक्रार अर्ज कैफियती व उभयपक्षकारांनी दाखल केलेले अनुषंगीक कागदपत्रे व लेखीयुक्‍तीवाद यांची पडताळणी केली व उभयपक्षकारांचा तोंडीयुक्‍तीवाद ऐकला असता निकालासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.

 क्र
           मुद्दे
       उत्‍तर
           1.
सामनेवाले यानी सर्व तक्रार अर्जातील तक्रारदारांच्‍या मागण्‍या नाकारून सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली हे सर्व तक्रारदारांनी सिध्‍द केले काय ?
 होय. तक्रार अर्ज क्र 191/09,192/09,197/09,मधील तक्रारदार सोडून
 2
सर्व तक्रारदार तक्रार अर्जातील मागणी मागण्‍यास पात्र आहेत काय ?
होय.अंशतः
 3       
 अंतीम आदेश
तक्रार अर्ज क्र. 191/09,192/09,197/09 रद्द करण्‍यात येतात उर्वरीत अंशतः मान्‍य करण्‍यात येते.

 
 
कारणमिमांसा
101.     सर्व तक्रारदारांनी तक्रार अर्जास कारण सततचे असल्‍याने तक्रार अर्ज मुदतीत आहे असे नमूद केलेले आहे तरीही दक्षता म्‍हणून विंलब माफीचा अर्ज दाखल केला या अर्जावर सा.वाले यांनी म्‍हणणे दाखल केले नाही.
(अ)     प्रपत्र नुसार घटना घडल्‍यानंतर संबधीत शे‍तकरी अथवा त्‍याचे कुटुंबीय, क्‍लेम फॉर्म व इतर कागदपत्रांसह एक आठवडयामध्‍ये संबधीत तलाठयाकडे सादर करावयाचे आहे
(ब)    त्‍यानंतर एखादया किंवा काही कागदपत्रांची पूर्तता केलेली नसल्‍यास स्‍वतः शासन निर्णयासोबत विहीत केलेल्‍या सर्व कागदपत्रांची आवश्‍यकतेनुसार पूर्तता करून  प्रस्‍ताव तहसिलदार कचेरीकडे पाठविण्‍याची जबाबदारी तलाठयाची असते.
(क)   नंतर प्रस्‍तावाची तपासणी करून सदर प्रस्‍ताव त्‍यांच्‍या प्रमाणपत्रासह सरळ आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्‍शुरंन्‍स कंपनी यांचेकडे पाठवितात.
102.         यावरून क्‍लेमफॉर्म भरल्‍यानंतर आयसीआयसीआय लोंबार्डकडे प्रस्‍ताव/कागदपत्रे मुदतीत पाठविण्‍याची जबाबदारी शेतक-याची किंवा त्‍यांच्‍या कुटुंबियांची नसते. त्‍यामुळे तलाठयाच्‍या/तहसिलदाराच्‍या दिरंगाईमुळे/चुकीमुळे शेतक-यास किंवा त्‍याच्‍या कुंटुंबबियास जबाबदार धरता येत नाही.
103    वरील स्‍पष्‍टीकरणानूसार तक्रारदारांचा विलंब माफीचा अर्ज मान्‍य करण्‍यात येतो.
104.    सा.वाले यांच्‍या म्‍हणण्‍यानूसार तक्रारदार हे ग्राहक नाहीत.
105.    राज्‍यामध्‍ये सुमारे एक कोटी शेतकरी आहेत शेतीव्‍यवसाय करतांना होणारे विविध अपघात, तसेच विज पडणे, पूर,सर्पदंश, वाहन अपघात, कोणत्‍याही नैसर्गिक आपत्‍तीमुळे होणारे अथवा अन्‍य कोणतही अपघात यामुळे ब-याच शेतक-यांना मृत्‍यु ओढवतो, किंवा काहीना अपंगत्‍व येते. घरातील कर्त्‍या व्‍यक्‍तीस झालेल्‍या सदर अपघातामुळे कुंटूंबाचे उत्‍पन्‍नाचे साधन बंद होऊन अडचणींचा परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा अपघातग्रस्‍त शेतक-यास/त्‍यांच्‍या कुटूंबास लाभ देण्‍याकरीता कोणतीही स्‍वतंत्र विमा योजना नसल्‍यामूळे शासनाने शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना राबविली. या योजनेनूसार शासनाने सर्व नोंदणीकृत शेतकरी यांच्‍या वतीने शासनाने शेतक-यांच्‍या व्‍यक्‍तीगत अपघात व अपंगतव यासाठी विमा पॉलीसी उतरविली. या योजनेअंतर्गत विमा हप्‍त्‍याची एकत्रीत रक्‍कम शेतक-याच्‍या वतीने शासन अदा करते, त्‍यामुळे शेतक-याने किंवा अन्‍य कोणत्‍याही संस्‍थेने त्‍यांच्‍या वकतीने या योजनेअंतर्गत स्‍वतंत्ररित्‍या विमा हप्‍त्‍याची रक्‍कम भरण्‍याची गरज नाही.
106.       ग्राहक संरक्षण कायदा, 1986, कलम-2(1)(डी) मध्‍ये ग्राहकाची व्‍याख्‍या नमूद केलेली आहे ती खालीप्रमाणे,
 Clause-2(1) (d):-   “Consumer” means any person who-
(i)     buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised or under any system of deferred payment, when such use made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose :or
(ii)     (hires or avails of) any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes  any beneficiary of such a services other than the person who ((hires or avails of) the services for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mention person, (but does not include a person who availed of  such services for any commercial purpose)
107.       या व्‍याख्‍यानूसार जरी शेतक-यांनी प्रत्‍यक्षात सा.वाले यांना कोणताही मोबदला दिलेला नसला तरीही, शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत. त्‍यांच्‍या वतीने शासन विमा भरते. म्‍हणून वरील तक्रार अर्जातील सर्व तक्रारदार हे  सा.वाले यांचे ग्राहक आहेत.
108.       शेतकरी व्‍यक्‍तीगत योजनेची प्रत तक्रारदारांनी अभिलेखात दाखल केलेली आहे त्‍यामध्‍ये प्रपत्र ई मध्‍ये महसूल यंत्रणेनी करावयाची कार्यपध्‍दती दिलेली आहे. ती खालीलप्रमाणे ः-
(अ)       अपघाती घटना घडल्‍यानंतर संबधीत शेतकरी अथवा त्‍यांच्‍या कुटुंबियाने क्‍लेमफॉर्म व इतर कागदपत्रे एक आठवडयामध्‍ये संबधीत तलाठयास सादर करतील
(ब)      पुढील एक आठवडयामध्‍ये सदर तलाठी शेतक-याने एखादया अथवा काही कागदपत्रांची पूर्तता केलेली नसल्‍यास स्‍वतः शासन निर्णयासोबत विहीत केलेल्‍या सर्व कागदपत्रांची आवश्‍यकतेनूसार पूर्तता करून 7/12, 8 (अ), नूसार तो खातेदार असल्‍याच्‍या प्रमाणपत्रासह विमा दाव्‍याचा प्रस्‍ताव तहसिलदारास सादर करतील.
(क)     प्राप्‍त प्रस्‍तावाची तपासणी करून सदर प्रस्‍ताव तहसिलदार यांच्‍या प्रमाणपत्रासह सरळ आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्‍शुरंन्‍स कंपनी जेनीथ हाऊस, केशवराव खाडे मार्ग, महालक्ष्‍मी, मुंबई-40034 यांचेकडे एक आठवडयात पाठवतील व त्‍याची एक प्रत जिल्‍हाअधिका-यांना सादर करतील.
(ड)     संबधीत शेतक-याचे अथवा कुटुंबियाचे बँकेत खाते नसल्‍यास नवीन खाते शक्‍यतो जिल्‍हामध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या नजीकच्‍या शाखेत उघडून त्‍याचा तपशिल, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्‍शुरंन्‍स कंपनीस कळविण्‍याची जबाबदारी सबधीत तहसिलदाराची राहील.
109.   यावरून प्रपत्र नूसार सर्व आवश्‍यक कागदपत्र पाठविण्‍याची जबाबदारी महसूल यंत्रणेची आहे एकदा क्‍लेमफॉर्म भरून दिल्‍यानंतर पुढील सर्व कार्यवाही करून देण्‍याची जबाबदारी महसूल यंत्रणेची आहे. त्‍यानंतर प्रपत्र नूसार प्रस्‍ताव तहसिलदारकडून प्राप्‍त झाल्‍यानंतर विमा कंपनीने एक महिण्‍याच्‍या आत नुकसान भरपाईचा धनादेश संबधित शेतकरी/त्‍यांचे कुटुंबियांचा, जिल्‍हामध्‍यवर्ती सहकारी बँक अथवा राष्‍ट्रीयकृत शाखा व्‍यवस्‍थापनाकडे जमा करावयाचा असतो व त्‍यानंतर संबधीत शाखा व्‍यवस्‍थापकांनी शेतक-याच्‍या कुटुंबियाच्‍या खात्‍यामध्‍ये जमा करावयाचा असतो.
110.    यानुसार सा.वाले यांनी प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यानंतर कागदपत्रे पूर्ण नाहीत या बाबींवरून तक्रारदाराची मागणी अमान्‍य करणे किंवा त्‍यावर निर्णय न घेणे हे सा.वाले यांच्‍या सेवेतील कमतरता ठरते. महसूल यंत्रणेच्‍या चुकीबद्दल किंवा दिरंगाईबद्दल अर्जदारांची मागणी नाकारणे योग्‍य नाही.       
111.   त्‍यामुळे अर्जदाराच्‍या प्रस्‍तावावर निर्णय न घेतल्‍याने किंवा मागणी नाकारल्‍याने शासनाने काढल्‍याने शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेचे उद्दिष्‍टे साध्‍य होणार नाही या योजनेचे मुख्‍य उद्दिष्‍टे म्‍हणजे आर्थिक संकटात सापडलेल्‍या गरीब शेतक-यांना मदत करणे हे आहे. पंरतू त्‍यांच्‍या प्रस्‍तावावर कागदपत्रे दाखल केली नाहीत या कारणावरून निर्णय न घेतल्‍याने किंवा ती नाकारल्‍याने शासनाकडून गरीब शेतक-यांना या योजनेद्वारे मदत करण्‍याचा हेतू साध्‍य होणार नाही.
112.     तक्रार अर्ज क्रमांक 189/09 मध्‍ये तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची वाचन केले असता तक्रारदारांचे पती श्री.नानासाहेब किसन वावरे यांचे नाव 7/12 उता-यात दिसून येत नाही. परंतू सा.वाले यांनी कैफियतीसोबत दाखल केलेले चार्टड हाऊस या एंजन्‍सीचा चौकशी अहवाल यांची पडताळणी केली असता चौकशी अहवालामध्‍ये कलम 15 मध्‍ये असे नमूद केले आहे की, तक्रारदारांचे पती हे व्‍यवसायाने शेतकरी असून त्‍यांचे नावे 65-R एवढी जमीन वरूळ येथे आहे यावरून ते शेतकरी असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे त्‍यांचा तक्रार अर्ज क्र. 189/09 मान्‍य करण्‍यात येते.
113.    तक्रार अर्ज क्रमांक 191/09 मध्‍ये तक्रारदारांचे पती हे शेतकरी कुटूंबातील आहेत व त्‍याबाबत 7/12 उता-यात त्‍यांच्‍या नावाची      नोंदणी आहे. असे तक्रारदारांचे कथन आहे. तक्रार अर्जासोबत तक्रारदारांनी 7/12 उतारा दाखल केलेला आहे. तक्रारदारांच्‍या पतीचे निधन दिनांक 05.03.2005 रोजी तक्रारदारांचे पती श्री.महादेव दौलत खेडकर बाजारातून काही वस्‍तु आणण्‍याकरीता गेले असता टेम्‍पोन धडक दिली व या अपघातात तक्रारदारांचे पती जबर जखमी होऊन त्‍यातच त्‍यांचे निधन झाले. तक्रारदारांचे कुंटूंब त्‍यांच्‍या पतीच्‍या मिळकतीवर अवलंबून असल्‍याने तक्रारदारांचे कुंटूंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदारांनी शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेखाली मागणी केली असता सा.वाले यांनी त्‍या मागणीपत्रावर अद्याप निर्णय घेतलेला नाही म्‍हणून तक्रारदारांनी ग्राहक मंचासमोर प्रस्‍तुत अर्ज दाखल करून शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेखाली मिळणा-या लाभाची मागणी केली आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या 7/12 उतारा व इतर कागदपत्रांची पाहणी करून पाहली असता तक्रारदारांचे पती श्री.महादेव खेडकर यांचे नाव 7/12 उता-यात नाही. तसेच तक्रारदारांनी त्‍यांच्‍या नावे शेतजमीन होती हे दाखविणारे किंवा ते व्‍यवसायाने शेतकरी होते हे दाखविणारे कोणतेही कागदपत्री पुरावा दाखल केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारदारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या कारणावरून तक्रारदारांनी दाखल केलेला तक्रार अर्ज रद्द करण्‍यात येतो.
114.       तक्रार अर्ज क्र. 192/09 मध्‍ये तक्रारदारांचे पती श्री. दत्‍तात्रय
धोंडीराम भोगे हे दिनांक 13.03.2005 रोजी फॉर्मयार्डसाठी ट्रॅक्‍टरने वाळू आणित असता तक्रारदारांच्‍या पतीचे ट्रॅक्‍टर पुलाजवळ घसरून उलटली. व अपघात झाला. या अपघातात तक्रारदारांचे पती गंभीरपणे जखमी होऊन त्‍यातच त्‍यांचे निधन झाले. सा.वाले यांचे म्‍हणणेनूसार तक्रारदारांनी एफआयआर, स्‍पॉट पंचनामा, पोलीस चौकशीचा अंतीम अहवाल, व इंक्‍वेस्‍ट पंचनामा यासारखे आवश्‍यक ते कागदपत्रे दाखल केली नाही. त्‍यामूळे सा.वाले यांनी प्रकरणात चौकशीसाठी पाथफायंडर्स या एजंन्‍सीची नेमणूक केली चौकशीअंती असे आढळून आले की, उलटलेले ट्रॅक्‍टर हे तक्रारदारांचे पती चालवित होते. ट्रॅक्‍टर चालविते वेळी तक्रारदारांच्‍या पतीकडे वाहन चालविण्‍याचा वैध परवाना नव्‍हता. कैफियतीसोबत सा.वाले यांनी पाथफायंडर्स एजंन्‍सीचा चौकशी अहवाल दाखल केलेला आहे. तक्रारदारांनी घटनेच्‍या वेळी मोटर वाहन कायदयाचे उल्‍लंघन केले आहे. तक्रारदारांचे पती हे ट्रॅक्‍टर बिनापरवाना चालवित होते. त्‍यामुळे त्‍यांनी विमा योजनेच्‍या अटी शर्तीचा भंग केलेला आहे. मयताने विमा योजनेच्‍या अटी/शर्तीचा भंग केल्‍याने सामनेवाले हयांनी तक्रारदारांची मागणी अमान्‍य केली यामध्‍ये सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा पुरविण्‍यात कसुर केली असे म्‍हणता येणार नाही. यावरून तक्रार अर्ज क्र 192/09 रद्द करण्‍यात येते.
115.     तक्रार अर्ज क्र 194/09 मध्‍ये तक्रारदारांचे पती श्री. शंकरराव सर्जेराव वावरे दिनांक 10.03.2005 रोजी चहा करीत असता गॅसस्‍टोचा भडका होऊन अपघात झाला त्‍यातच श्री.शंकरराव सर्जेराव वावरे हे भाजल्‍याने त्‍यातच त्‍यांचा मृत्‍यु झाला. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेखाली मागणी केली असता सा.वाले यांनी प्रकरणात तक्रारदारांनी महत्‍वाची कागदपत्रे पुरविली नसल्‍याकारणाने प्रकरणात चौकशीसाठी चार्टड हाऊस या एजन्‍सची नेमणूक केली. सा.वाले यांचे असे म्‍हणणे आहे की, चौकशीअंती असे आढळून आले की, तक्रारदारांच्‍या पतीचे वय मृत्‍युसमयी 70 वर्षाचे होते. तक्रारदारांनी हेतूपुरस्‍करित्‍या तक्रारदारांचे वय दर्शविणारे कागदपत्र दाखल केले नाही. सा.वाले यांनी कैफियतीसोबत चौकशी अहवाल दाखल केलेला आहे. चौकशी अहवालात सा.वाले यांनी तक्रारदारांच्‍या पतीचे वय 70 असल्‍याचे नमूद केले आहे. परंतू त्‍यासोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाही. त्‍याउलट वयाच्‍या दाखल्‍याची पाहणी करेपर्यंत तक्रारदारांची मागणी स्‍थगीत ठेवावी असे नमूद केलेले आहे. याउलट तक्रारदारांनी अभिलेखात तक्रारदारांच्‍या पतीचे वय दिनांक 01.01.1994 रोजी 56 वर्षाचे होते हे दर्शविणारे निवडणूक आयोगाचे ओळखपत्र दाखल केलेले आहे. त्‍यानूसार मृत्‍युसमयी म्‍हणजेच दि. 10.03.2005 रोजी तक्रारदारांच्‍या पतीचे वय 67 वर्षाचे होते हे स्‍पष्‍ट होते. यावरून तक्रारदार हे या शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेच्‍या लाभास पात्र आहेत. तक्रारदारांनी या योजनेखाली महसुल खात्‍याकडे या योजनेखाली अर्ज भरून दिल्‍यानंतर पुढील कार्यवाही करण्‍याची जबाबदारी ही महसूल यंत्रणेची असल्‍याकारणाने कागदपत्रांची पूर्तता केली नाही याकारणावरून जर सा.वाले यांनी तक्रारदारांच्‍या मागणीबद्दल निर्णय घेतला नसेल/नाकारली असेल तर सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली असा निष्‍कर्श काढावा लागेल. वरील बाबीवरून तक्रार अर्ज क्र 194/09 मान्‍य करण्‍यात येते.
116.    तक्रार अर्ज क्र 197/09 या तक्रार अर्जामध्‍ये तक्रारदारांचे पती श्री.हेमत सुरेश तरमाळे हे नातेवाईक श्री.रवींन्‍द्र तरमाळे यांना हॉस्‍पीटलकडे मोटर- बाईक वरून घेऊन जात असता एका अज्ञात ट्रकने जोरात येऊन धडक दिल्‍याने तक्रारदारांचे पती मोटरबाईक वरून खाली कोसळले व गंभीर जखमी झाले व त्‍यातच त्‍यांचा मृत्‍यु झाला. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेखाली मागणी केली. सा.वाले यांचे म्‍हणणेनूसार प्रकरणात चौकशी करणेकामी विशाल जेंदाणी या एजन्‍सीची नेमणूक केली. सा.वाले यांनी कैफियतीसोबत विशाल जेंदाणी या एजन्‍सीचा चौकशी अहवाल दाखल केलेला आहे. चौकशीअंती असे आढळून आले की, घटनेच्‍या वेळी तक्रारदारांचे पती आणखी दोन व्‍यक्‍तींसह म्‍हणजे एकुण तीन व्‍यक्‍ती मोटरबाईक वरून प्रवास करीत होते. त्‍यामुळे तक्रारदारांच्‍या पतीने मोटरवाहन कायद्याच्‍या नियमांचे उल्‍लंघन केलेले आहे. चौकशीच्‍या वेळी तक्रारदारांच्‍या पतीचे वाहन चालविण्‍याचा परवाना सादर करू शकले नाही. तसेच सा.वाले यांचे असे म्‍हणणे आहे की तक्रारदारांच्‍या पतीच्‍या मृत्‍यु दाखल्‍यात मृत्‍युची तारखेपेक्षा भिन्‍न तारीख दाखविली गेली आहे. सा.वाले यांचे असेही म्‍हणणे आहे की, तक्रारदारांचे पती हे नोदणीकृत शेतकरी नव्‍हते. तक्रारदारांच्‍या नावे जमीन नव्‍हती. चौकशीचा अहवाल व इतर कागदपत्रे यांची पडताळणी करून पाहली असता घटनेच्‍या वेळी तक्रारदारांचे पती हे श्री. हेमंत तरमाळे हे रवींन्‍द्र तरमाळे व प्रदीप तरमाळे यांच्‍यासह मोटरबाईक वरून जात होते त्‍यामूळे तक्रारदारांच्‍या पतीने मोटरवाहन कायद्याच्‍या नियमाचे उल्‍लंघन केले. हे स्‍पष्‍ट होते. तक्रारदारांचे पतीचे नाव 7/12 उता-यात दिसून येत नाही किंवा तक्रारदारांनी त्‍यांच्‍या नावे जमीन असल्‍याबाबतचा किंवा ते शेतकरी असल्‍याबाबतचा पुरावा दाखल केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारदार हे या योजनेचे लाभार्थी नाहीत. यावरून सा.वाले यांनी तक्रारदारांची मागणी नाकारली/किंवा निर्णय घेतला नाही याबद्दल सा.वाले यांच्‍या सेवेतील कमतरता दिसून येत नाही यावरून तक्रारदारांचा अर्ज रद्द करण्‍यात येतो
117.          यावरून सा.वाले हे तक्रार अर्ज क्रमांक 184/09, 185/09, 186/09, 187/09, 188/09, 189/09, 190/09, 193/09, 194/09, 195/09, 196/09, 198/09, 199/09, 201/09 अर्जातील तक्रारदारांना शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेखाली मिळणारी नुकसान भरपाई रू 1 लाख देण्‍यास जबाबदार आहेत. सा.वाले यांना प्रस्‍ताव कधी प्राप्‍त झाला किंवा सा.वाले यांनी तक्रारदारांची मागणी केव्‍हा नाकारली हे तक्रार अर्जात किंवा कैफियतीमध्‍ये नमूद केले नसल्‍याकारणाने त्‍याची तारीख सप्‍ष्‍ट होत नाही. म्‍हणून वरील रक्‍कमेवर तक्रार अर्ज दाखल दिनांकापासून ते पैसे देईपर्यंत व्‍याजदराने व्‍याज देण्‍यास जबाबदार राहतील. ही नुकसान भरपाई तक्रारदारांच्‍या एकत्रितपणे कुंटूंबियांसाठी आहे. त्‍यामुळे यानंतर, तक्रारदारंचा कुंटूंबियातील, पतीचे/मुलाचे इतर वारसांनी पुन्‍हा या योजनेखाली तक्रार अर्ज दाखल करू नये.
118.       सा.वाले यांनी कैफियतीमध्‍ये असे म्‍हटले आहे की, राष्‍ट्रीय आयोगापूढे शासनाने सा.वाले यांचेविरूध्‍द एकुण 2232 मागणी नाकारल्‍या संबधीचे तक्रार अर्ज दाखल केलेले आहे. त्‍या 2232 मागणी अर्जापैकी हा एक अर्ज आहे म्‍हणून या तक्रारीस “Res Judicata” ची बाधा येते. सा.वाले यांच्‍या या म्‍हणण्‍यास मंच सहमत नाही कारण सा.वाले यांनी त्‍याबाबतीत काही लेखीपूरावे दाखल केलेले नाहीत
119.          वरील विवेचनावरून पुढील आदेश करण्‍यात येतो         
                             आदेश
 1.      तक्रार अर्ज क्र. 184/09,185/09,186/09,187/09,188/09,    189/09,190/09,193/09,194/09,195/09,196/09,198/09,199/09,200/09,201/09 अंशतः मान्‍य करण्‍यात येतात.  
2.      तक्रार अर्ज क्र. 191/09,192/09,197/09 तक्रार अर्ज रद्द करण्‍यात येतात.
3.     सा.वाले यांनी आदेशामधील कलम-1 मधील सर्व तक्रारदारांची मागणी नाकारून सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली हे जाहीर करण्‍यात येते.
4.       सा. वाले यांनी आदेशामधील कलम-1 मधील सर्व तक्रारदारांना रक्‍कम रू.1,00,000/-(एक लाख) तक्रार अर्ज दाखल दिनांकापासून ते पैसे देईपर्यंत 9% व्‍याजदाराने व्‍याजासह द्यावेत
5.   आदेशाच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.
 
 
 
[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.