Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/09/253

MRS MANGAL BAJRANG PATIL - Complainant(s)

Versus

ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD, - Opp.Party(s)

C.S DALVI

12 Mar 2012

ORDER

ग्राहक तक्रार निवारण मंच,
मुंबई उपनगर जिल्‍हा, मुंबई.
प्रशासकीय इमारत, 3 रा मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्याना जवळ,
वांद्रे (पूर्व), मुंबई 400051.
महाराष्‍ट्र राज्‍य
 
Complaint Case No. CC/09/253
 
1. MRS MANGAL BAJRANG PATIL
41, THERGAON, TAL-SHAHUWADI, DIST-KOLHAPUR
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICICI BANK TOWER, BKC, BANDRA-EAST, MUMBAI-51.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr. J. L. Deshpande PRESIDENT
 HON'ABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR Member
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रार क्र.253/2009
 
           तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.बजरंग गणपत पाटील हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे थेरगांव, ता.शाहूवाडी, जि.कोल्‍हापूर येथे सर्व्‍हे. क्र.366 ही शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
2          तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.07.03.2005 रोजी तक्रारदारांचे पती बिर्ला सिमेंट फॅक्‍टरी, होटगी, जि.सोलापूर येथे कामगार कक्षेमध्‍ये झोपले असता पहाटे एक ते दोनच्‍या दरम्‍यान आग लागली व आगीमध्‍ये त्‍यांचे पती झोपेत असतानाच भाजल्‍यामुळे जबर जखमी झाले. उपचारासाठी त्‍यांना सोलापूर येथील सिव्‍हील हॉस्‍पीटलमध्‍ये दाखल केले असता, उपचार घेत असताना दि.07.03.2005 रोजी मयत झाले.  
3          तक्रार अर्जासोबत, शवविच्‍छेदन अहवाल व एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
4          तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.18.03.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
5          शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.14.07.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
तक्रार क्र.254/2009
6          तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.आपाजी नवलापा वागमोडे (धनगर) हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे अंबव, वाठार तर्फ वडगांव, ता.हातकणंगले, जि.कोल्‍हापूर येथे सर्व्‍हे. क्र.302 ही शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
7          तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.31.12.2005 रोजी तक्रारदारांचे पती संध्‍याकाळी सुमारे 8.30 वाजता, आंबव ते आंबव फाटयाकडे जात असताना पाठीमागुन मोटारसायकलने धडक दिल्‍याने तक्रारदाराचे पती जबर जखमी झाले, उपचारासाठी त्‍यांना सिटी हॉस्‍पीटल येथे दाखल करण्‍यात आले. तेथे उपचार घेत असता त्‍यांचे दि.24.01.2006 रोजी निधन झाले.  
8          तक्रार अर्जासोबत, शवविच्‍छेदन अहवाल, 7/12 उतारा व एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
9          तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.18.03.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
10         शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.24.01.2006 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
तक्रार क्र.255/2009
11         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.प्रताप बाबुसाहेब चौगुले हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे कसबा बावडा, ता.करवीर, जि.कोल्‍हापूर येथे सर्व्‍हे. क्र.213 ही शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
12         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती दि.16.02.2006 च्‍या मध्‍यानानंतर बेपत्‍ता होते. त्‍यांची खुप शोधाशेध केली, शेवटी दि.17.02.2006 रोजी पोलीस तक्रार नोंदविली. दि.19.02.2006 रोजी कदमवाडी येथे कसबा बावडा जवळ विहीरीत त्‍याचे सडलेल्‍या अवस्‍थेत प्रेत आढळुन आले. त्‍यांच्‍या पतीचा दि.16.02.2006 ते दि.19.02.2006 चे दरमयान बुडून अपघती मृत्‍यु झाला.
13         तक्रार अर्जासोबत, शवविच्‍छेदन अहवाल, 7/12 उतारा व एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
14       तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.18.03.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
15       शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.19.02.2006 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
तक्रार क्र.256/2009
16       तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.धरमराज लक्ष्‍मण जाधव हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे रुई, ता.हातकणंगले, जि.कोल्‍हापूर येथे सर्व्‍हे. क्र.831 ही शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
17         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती दि.14.07.2005 रोजी सुमारे संध्‍याकाळी 5.30 वाजता विजेवर चालणारी बोरवेल सुरु करीत असता, विजेचा धक्‍का लागुन त्‍यामध्‍ये त्‍यांचा मृत्‍यु झाला.
18         तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, शवविच्‍छेदन अहवाल, एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
 
19       तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.18.03.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
20        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.14.07.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
तक्रार क्र.257/2009
21                   तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांची आई श्रीमती सखुबाई आपासाहेब चौगुले, ही शेतकरी कुंटुंबातील असुन तिच्‍या नावे नेर्ली, ता.करवीर, जि.कोल्‍हापूर येथे सर्व्‍हे. क्र.349 ही शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये तिच्‍या नांवाची नोंद आहे.
22        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांची आई दि.01.09.2005 रोजी सुमारे सकाळी 9.45 वाजता म्‍हैशीस पाणी पाजणेसाठी शिरोळ येथील पाणथळयापाशी गेले असता, तक्रारदारांची आई व म्‍हैस दोघेही विजेच्‍या तारेच्‍या संपर्कात आल्‍याने दोघांचाही जागीच मृत्‍यु झाला.
23        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., शवविच्‍छेदन अहवाल, घटनास्‍थळ पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
24       तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली, म्‍हणून तक्रारदार यांनी दि.16.03.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
25       शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या आईच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.01.09.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
तक्रार क्र.258/2009
26        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती श्री.श्रीरंग राम डोईफोडे, हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे सुर्दी, ता.बार्शी, जि.सोलापूर येथे सर्व्‍हे. क्र.185/1 ही शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
27        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती दि.05.07.2005 रोजी सुमारे सकाळी 11 वाजता प्राण्‍यांना चरवण्‍यासाठी गेले असता, विजेचा तारेच्‍या संपर्कात आल्‍याने विजेचा धक्‍का बसुन ते जागीच ठार झाले. 
28        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, शवविच्‍छेदन अहवाल, एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
29       तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.21.02.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
30        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.05.07.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
तक्रार क्र.259/2009
31       तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचा मुलगा श्री.बिरप्‍पा उर्फ बिरु विठ्ठल राघोजी, हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे होटगी, ता.दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर येथे सर्व्‍हे. क्र.434/बी ही शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
32        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचा मुलगा दि.08.06.2005 रोजी सुमारे दुपारी 01.45 वाजता विजेच्‍या खांबावर विजेच्‍या तारा खाली उतरवत असताना जोराने वाहणा-या वा-यांमुळे खाली पडले व विजेच्‍या तारांच्‍या संपर्कात येऊन त्‍यांचा जागीच मृत्‍यु झाला. 
33        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, शवविच्‍छेदन अहवाल, एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
34       तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.21.02.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
35        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या मुलाच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.08.06.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली.
तक्रार क्र.260/2009
36        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती श्री.हरीदास विठोबा शिंदे, हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे शेडशिंगे, ता.माढा, जि.सोलापूर येथे सर्व्‍हे. क्र.67 ही शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
37        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती दि.22.06.2005 रोजी सुमारे दुपारी 4.30 वाजता व दुधाच्‍या टँकरमधुन प्रवास करीत असताना मुंबई-पुना हायवेवर ड्रायव्‍हरचा ताबा चाकावरील सुटल्‍याने दुधाचा टँकर उलटला व तक्रारदाराचे पती टॅंकरखाली सापडले व जबर जखमी होऊन त्‍यांचा जागीच मृत्‍यु झाला. . 
38        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, शवविच्‍छेदन अहवाल, एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
39       तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.05.02.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
40        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.22.06.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
तक्रार क्र.261/2009
 
41        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती श्री.मच्छिंद्र लक्ष्‍मण जरग, हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे कोन्‍ं‍‍हेरी, ता. मोहोळ, जि.सोलापूर येथे सर्व्‍हे. क्र.348 ही शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
42        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती दि.08.10.2005 रोजी सुमारे सकाळी 10 वाजता वखारीमध्‍ये कामास जात असताना पंढरपुर-मोहोळ रस्‍त्‍यावरुन जात असताना वाहन क्र.MH-17-P-1100 विरुध्‍द दिशेने येऊन धडकली, या धडकेने तक्रारदारांचे पती जबर जखमी होऊन त्‍यांचा जागीच मृत्‍यु झाला.
43        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, शवविच्‍छेदन अहवाल, एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
44       तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.05.03.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
45        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.08.10.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
तक्रार क्र.262/2009
 
46       तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती श्री.श्रीकांत उर्फ शेखर पंडित वैकर, हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे कंदार, ता.करमाळा, जि.सोलापूर येथे सर्व्‍हे. क्र.32/1/बी/3 ही शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
47        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती दि.23.08.2005 व दि.24.08.2005 च्‍या मध्‍यरात्री मोटर सायकलीने टेंभुर्णी-करमाळा रोडवरुन जात असताना टोलनाक्‍याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्‍याने ते मोटरसायकलीवरुन खाली कोसळले व जबर जखमी झाले. व त्‍यातच त्‍यांचा जागीच मृत्‍यु झाला.
48        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, शवविच्‍छेदन अहवाल, एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
49       तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.12.02.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
50        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.23.08.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
 
तक्रार क्र.263/2009
 
51         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचा मुलगा श्री.धनाजी रामभाऊ उर्फ रामचंद्र मोरे, हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे सकत, ता.बार्शी, जि.सोलापूर येथे सर्व्‍हे. क्र.137/1 ही शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
52        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचा मुलगा दि.13.12.2005 रोजी सुमारे दुपारी 4 वाजता तक्रारदारांचा मुलगा गायी वैराग बाजारात विकण्‍याकरिता त्‍याच्‍या मित्रांसोबत बाशी-सोलापूर रस्‍त्‍याने जात असता, श्रीकृष्‍ण पेट्रोल पंपाजवळ मध्‍यरात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्‍याने तक्रारदारांच्‍या मुलाचे व गायींचे जागीच मृत्‍यु झाले.
53        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, शवविच्‍छेदन अहवाल, एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
54       तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.21.02.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
55        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या मुलाच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.13.12.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली.
तक्रार क्र.264/2009
56       तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती श्री.बापु भिमराव धेंडे, हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे भालवणी, ता.करमाळा, जि.सोलापूर येथे सर्व्‍हे. क्र.51 आणि 82 हयां शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
57        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती दि.06.03.2005 रोजी दुपारी सुमारे 2.15 वाजता त्‍यांच्‍या मित्रासोबत मोटर सायकलीवरुन जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्‍याने तक्रारदारांचे पती मोटरसायकली खाली कोसळले व जबर जखमी झाले. व त्‍यातच त्‍यांचा जागीच मृत्‍यु झाला.
58        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, शवविच्‍छेदन अहवाल, एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
 
59       तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.12.02.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
60        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.06.03.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
तक्रार क्र.265/2009
61        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांची आई श्रीमती सुशील नवनाथ घाडगे, ही शेतकरी कुंटुंबातील असुन तिच्‍या नावे बोरगांव, ता.करमाळा, जि.सोलापूर येथे सर्व्‍हे. क्र.122 ही शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये तिच्‍या नांवाची नोंद आहे.
62       तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांची आई दि.16.10.2005 रोजी दुपारी सुमारे 5 वाजता, शेतावर विजेच्‍या तारेच्‍या संपर्कात आल्‍याने विजेचा धक्‍का लागुन जागीच ठार झाला.
63        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, एफ.आय.आर., शवविच्‍छेदन अहवाल, घटनास्‍थळ पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
64       तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली, म्‍हणून तक्रारदार यांनी दि.12.02.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
65       शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या आईच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.16.10.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
तक्रार क्र.266/2009
66       तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती श्री.महादेव दगडू बोराडे, हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे सागांव, ता.करमाळा, जि.सोलापूर येथे सर्व्‍हे. क्र.118/1 यांचे शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
67        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.01.02.2005 रोजी संध्‍याकाळी सुमारे 8 वाजता त्‍यांच्‍या पतीचे मृतदेह टेंभुर्णी नाक्‍याजवळ मृत अवस्‍थेत आढळला. तक्रारदारांना असे समजले की, तक्रारदारांच्‍या पतीस कोणत्‍या तरी अज्ञात वाहनाने धडक दिले व वाहन चालक पळून गेला. त्‍या धडकेमुळे तक्रारदारांचे पतीचा मृत्यू झाला. 
68        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, शवविच्‍छेदन अहवाल, एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
69       तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.12.02.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
70        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.01.02.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
 
तक्रार क्र.267/2009
71         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती श्रीमंत शिवाजी गायकवाड हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे मोहोळ, ता.मोहोळ, जि.सोलापूर येथे सर्व्‍हे. क्र.187/2 यांचे शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
72        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.07.10.2005 रोजी सकाळी सुमारे 7 वाजता तक्रारदारांचे पती नारखडे रोड येथे त्‍यांच्‍या मोटार सायकलजवळ मृताअवस्‍थेत आढळले. तक्रारदारांना असे समजले की, तक्रारदारांच्‍या पतीस कोणत्‍या तरी अज्ञात वाहनाने धडक दिल्‍याने त्‍यांच्‍या पतीस डोक्‍यास जबर मार लागून ते जखमी झाले व त्‍यातच ते जागीच ठार झाले.  
73        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, शवविच्‍छेदन अहवाल, एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
74       तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.12.02.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
75        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.07.10.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
76                   सर्व तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत शपथपत्र व अनुषांगिक कागदपत्रं दाखल केली आहेत तसेच तक्रार अर्जांसोबत विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला आहे. सर्व तक्रार अर्जातील तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार,  वकील नेमण्‍यास व आवश्‍यक ती कागदपत्रे जमा करण्‍यामध्‍ये तक्रार अर्ज दाखल करण्‍यास विलंब झाला. त्यासाठी विलंब माफीचा अर्ज दाखल करुन विलंब माफीची मागणी केली.
77        सामनेवाले यांनी हजर होऊन प्रत्‍येक तक्रार अर्जात वेगवेगळी कैफियती दाखल केल्‍या आहेत. तसेच विलंब माफीच्‍या अर्जावर म्‍हणणे दाखल केले. परंतु प्रत्‍येक कैफियतीमध्‍ये व विलंब माफीच्‍या अर्जातील म्‍हणण्‍यावर सामनेवाले यांचे एकसारखेच म्‍हणणे दाखल केले आहे.
78        सामनेवाले यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हे ग्राहक नाहीत तसेच तक्रारदारांनी तक्रार अर्ज विलंबाने दाखल केलेला आहे. सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार यांनी फेरफार उतारा व 6-सी चा फॉर्म व वयाचा दाखल,एफ.आय.आर.ची प्रत व पोलीस तपासाचे कागदपत्रं ही आवश्‍यक कागदपत्रं जरुरीचे दाखल केले नाही. तसेच तक्रारदार हे त्‍यांच्‍या नांवे जमीन जरी असली तरी व्‍यवसाने शेती काम करीत होते हे दाखविणारे कागदपत्रं दाखल केले नाही, त्‍यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी नाकारली. तक्रार अर्ज क्र.254/2009 सामेनवाले यांचे असे म्‍हणणे आहे की, अपघाताच्‍या वेळेस तक्रारदाराच्‍या पतीचे वय 72 वर्षाचे होते, त्‍यामुळे तक्रारदार विमा अंतर्गत मिळण्‍या-या लाभास पात्र नाहीत. सामनेवाले यांनी कैफियतीसोबत चौकशी अहवाल निशाणी-अ वर दाखल केलेली आहे. म्‍हणुन सामनेवाले यांनी तक्रार क्र.254/2009 मधील तक्रारदारांची मागणी नाकारली. तसेच तक्रार क्र.255/2009 मध्‍ये सामनेवाले यांचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदारांनी सामनेवाले यांना आवश्‍यक ती कागदपत्रं पुरविली नाही. सामनेवाले यांनी कैफियतीसोबत चौकशी अहवाल दाखल केलेला आहे व त्‍यामध्‍ये तक्रारदाराचे पतींना उत्‍तमरित्‍या पोहता येत होते तसेच विहीरीस पाय-या होत्‍या. त्‍यामुळे तक्रारदारांच्‍या पतीचे निधन हे अपघती निधन नसुन आत्‍महत्‍या असण्‍याची शक्‍यता आहे असे नोंदविले आहे. या चौकशी अहवालावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी नाकारली.
79        सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार, सामनेवाले यांनी मा.राष्‍ट्रीय आयोगापुढे एकुण 2232 प्रकरणे दाखल केलेली आहेत. त्‍यापैकी तक्रारदारांची मागणी हे पण एक त्‍या प्रकरणांपैकी एक आहे. म्‍हणुन प्रस्‍तुत मंचाने, सदरचा तक्रार अर्ज मा.राष्‍ट्रीय आयोगापुढे सुनावणी होईपर्यंत स्‍थगित करावे अशी मागणी केली आहे.
80        सामनेवाले यांनी विलंब माफीच्‍या अर्जावरम्‍हणणे दाखल केले, त्‍या म्‍हणण्‍यानुसार, ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्‍या कलम-24(अ) नुसार, तक्रारीस कारण घडल्‍यापासुन तक्रार दोन वर्षाच्‍या आत दाखल करणे आवश्‍यक होते परंतु सर्व तक्रारदारांनी तक्रार उशिराने दाखल केली आहेत व त्‍यासाठी त्‍यांनी कोणतेही ठोस कारणे दाखविलेली नाहीत. तक्रारदारांचे अज्ञान हे विंलंब माफीचे कारण होऊ शकत नाही, त्‍यामुळे तक्रारदारांचे विलंब माफीचे अर्ज मान्‍य करु नये अशी मागणी केली.
81         तक्रार अर्ज, कैफियती व उभय पक्षकारांनी दाखल केलेले अनुषांगिक कागदपत्रं व पुराव्‍याचे शपथपत्रं व लेखी युक्‍तीवाद यांची पडताळणी केली. उभय पक्षकारांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकला असता निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. 

क्र.
मुद्दे
उत्‍तरे
1
सामनेवाले यांनी सर्व तक्रार अर्जातील तक्रारदारांच्‍या मागण्‍यां नाकारुन सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली हे सर्व तक्रारदारांनी सिध्‍द केले काय ?
होय, तक्रार अर्ज क्र.255/2009 मधील तक्रारदार सोडून. 
2
सर्व तक्रारदार तक्रार अर्जातील मागणी मागण्‍यांस पात्र आहेत काय ?
होय, अंशतः
3
अंतिम आदेश ?
तक्रार अर्ज क्र.255/2009 रद्द करण्‍यात येतात. उर्वरित तक्रारीं अंशतः मंजूर करण्‍यात येतात.

 
कारणमिमांसाः-
 
82        सर्व तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रार अर्जामध्‍ये विलंबमाफीचा अर्ज दाखल केलेला आहे. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांनी मागणी अर्ज सामनेवाले यांचेकडे दाखल केल्‍यापासुन मागणी करिता पाठपुरावा करीत होते, तेव्‍हा सामनेवाले यांनी मागणीची पुर्तता करु असे आश्‍वासन देत राहिले परंतु शेवटी त्‍यांनी तक्रारदारांची मागणी नाकारली. त्‍यानंतर, वकील नेमुन सर्व कागदपत्रे यांची जमाजमाव करण्‍यास विलंब लागला म्‍हणून तक्रारदार हे विहीत कालावधीत तक्रार अर्ज दाखल करु शकले नाहीत, म्‍हणून विलंबमाफी करावी अशी मागणी केली. यावर सामनवाले यांचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम-24(ए) नुसार तक्रार अर्ज तक्रारीस कारण घडल्‍यापासुन दोन वर्षाच्‍या दाखल केली नाही व तक्रार दाखल विलंबास कोणतेही ठोस कारण दिलेले नाही, म्‍हणुन विलंब माफीचा अर्ज मान्‍य करु नये अशी मागणी केली. यावर सामेनवाले यांचे असे म्‍हणणे आहे की,
जर तक्रार अर्जास कारण हे मागणी नाकारल्‍या दिवसापासुन  गृहीत धरली तर सामनेवाले यांनी किंवा तक्रारदारांनी मागणी कधी नाकारली याचा कोठेच उल्‍लेख केलेला नाही किंवा त्‍याबाबत कागदपत्रं दाखल केलेले नाहीत. त्‍यामुळे तक्रार अर्ज दाखल करण्‍याचा कालावधी कधी पासुन सुरु होते हे स्‍पष्‍ट होत नाही. जर तक्रारीस कारण हे घटना घडल्‍यापासुन गृहीत धरले तर प्रत्‍येक तक्रार अर्जांमध्‍ये विलंब हा झालेलाच आहे. परंतु विलंब झाल्‍यास प्रस्‍ताव नाकारण्‍यात येईल अशी अट विमा करारामध्‍ये कोठेही नमूद केलेली नाही. तसेच तक्रारदारांनी प्रस्‍ताव केल्‍यानंतर तहसील कार्यालयात प्रस्‍ताव पुढे पाठविण्‍यास उशिर झाला तर यात तक्रारदारांची कोठेही चुक दिसुन येत नाही. शेतकरी वर्ग हा अशिक्षित वर्ग आहे, त्‍यामुळे त्‍यांना योजनेबद्दलची संपुर्ण माहिती असणे किंवा त्‍यातील कालावधीबद्दल माहिती असणे किंवा त्‍याचे महत्‍व माहिती असणे हे त्‍यांचेकडून अपेक्षित नाही. तसेच जरी त्‍यांना मुदतीबद्दल कल्‍पना होती असे गृहीत धरले,तरीही आवश्‍यक ती कागदपत्रं मुदतीत गोळा करणे हे त्‍यांच्‍या दृष्‍टीने जिकीरीचे काम आहे तसेच घरातील कर्ता माणुस गेलेले असताना असहाय परिस्थितीत प्रस्‍ताव अर्ज मुदतीत दाखल करणे शक्‍य होईलच असे नाही. त्‍यामुळे वरील परिस्थितीत सर्व तक्रार अर्जामध्‍ये विलंब माफीचा अर्ज मान्‍य करण्‍यात येतो.
83       सामनेवाले यांचे म्‍हणणेनुसार, तक्रारदार हे ग्राहक नाहीत.
राज्‍यामध्‍ये सुमारे एक कोटी शेतकरी आहेत. शेती व्‍यवसाय करताना होणारे विविध अपघात, तसेच विज पडणे, पूर, सर्पदंश, वाहन अपघात, कोणत्‍याही नैसर्गिक आपत्‍तीमुळे होणारे अथवा अन्‍य कोणतेही अपघात यामुळे ब-याच शेतक-यांना मृत्‍यु ओढवतो, किंवा काहींना अपंगत्‍व येते. घरातील कर्त्‍या व्‍यक्‍तीस झालेल्‍या सदर अपघातामुळे कुंटूंबाचे उत्‍पन्‍नाचे साधन बंद होऊन अडचणीची परि‍स्थिती निर्माण होऊ शकते. अशा अपघातग्रस्‍त शेतक-यांस/त्‍यांच्‍या कुंटूंबास लाभ देण्‍याकरिता कोणतीही स्‍वतंत्र विमा योजना नसलेमुळे शासनाने शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना राबविली. या योजनेनुसार शासनाने सर्व नोंदणीकृत शेतकरी यांच्‍या वतीने शासनाने शेतक-याच्‍या व्‍यक्तिगत अपघात व अपंगत्‍व यासाठी विमा पॉलीसी उतरविली. या योजनेअंतर्गत विमा हप्‍त्‍याची एकत्रित रक्‍कम शेतक-याच्‍या वतीने शासन अदा करते, त्‍यामुळे शेतक-यांने किंवा अन्‍य कोणत्‍याही संस्‍थेने त्‍यांच्‍या वतीने या योजनेअंतर्गत स्‍वतंत्ररित्‍या विमा हप्‍त्‍याची रक्‍कम भरण्‍याची गरज नाही. 
84        ग्राहक संरक्षण कायदा, 1986, कलम-2(1)(डी) मध्‍ये ग्राहकाची व्‍याख्‍या नमूद केलेली आहे ती खालीलप्रमाणे,
          Clause-2(1)(d) :-    “Consumer” means any person who-
(i)      buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment, when such use is made with the approval of such person, when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose ; or
(ii)      [hires or avails of] any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who [hires or avails of] the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payments, when such services are availed of with the approval of the first mentioned person [but does not include a person who avails of such services for any commercial purpose].
या व्‍याख्‍येनुसार, जरी शेतक-यांनी प्रत्‍यक्ष सामनेवाले यांना कोणताही मोबदला दिलेला नसला तरीही ते शेतकरी व्‍यक्तिगत अपघात योजनेचे लाभार्थी आहेत व त्‍यांच्‍या वतीने शासन विमा हप्‍ता भरते म्‍हणून वरील तक्रार अर्जातील सर्व तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत.
85        शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेची प्रत तक्रारदारांनी अभिलेखावर दाखल केलेली आहे. त्‍यामध्‍ये प्रपत्र मध्‍ये महसुल यंत्रणेमध्‍ये करावयाची कार्यवाही दिली आहे. आहे. त्‍या खालील प्रमाणेः-
(1)   अपघाती घटना घडल्‍यानंतर संबधीत शेतकरी
अथवा त्‍यांचे कुटुंबियाचा क्‍लेमफॉर्म व इतर कागदपत्रे एक आठवडयाचे आत संबधीत तलाठयास सादर करतील.
(2)   पुढील एक आठवडयामध्‍ये, सदर तलाठी शेतक-
याने एखादा अथवा काही कागदपत्राची पूर्तता केलेली नसल्‍यास स्‍वतः शासन निर्णयासोबत विहीत केलेल्‍या सर्व कागदपत्रांची आवश्‍यक त्‍या 7/12,8 नुसार तो खातेदार असल्‍याच्‍या प्रमाणपत्रासह विम्‍या दाव्‍याचा प्रस्‍ताव तहसिलदारास सादर करतील.
                 (3)   प्राप्‍त प्रस्‍तावाची तपासणी करून सदर प्रस्‍ताव
तहसिलदार यांच्‍या प्रमाणपत्रासह सरळ आय.सी.आय.सी.आय जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमीटेड यांचेकडे एक आठवडयाचे आत पाठवतील व त्‍याची एक प्रत जिल्‍हयाधिका-यांना सादर करतील.
               (4)   संबधीत शेतक-याचे अथवा कुटुंबियाचे बँकेत खाते
नसल्‍यास नवीन खाते शक्‍यतो जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या नजिकच्‍या शाखेत उघडून त्‍याचा तपशिल आय.सी.आय.सी.आय लोंबार्ड जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीस कळविण्‍याची जबाबदारी संबंधित तहसीलदाराची राहील.
यावरून प्रपत्र -2 नुसार सर्व आवश्‍यक कागदपत्रं पाठविण्‍याची जबाबदारी महसुल यंत्रणेची आहे. एकदा क्‍लेमफॉर्म भरून दिल्‍यानंतर पुढील सर्व कार्यवाही करण्‍याची जबाबदारी महसुल यंत्रणेची आहे. त्‍यानतंर प्रपत्र नुसार प्रस्‍ताव तहसिलदाराकडुन प्राप्‍त झाल्‍यानंतर विमा कंपनीने एक महिन्‍याचे आत नुकसान भरपाईचा धनादेश संबधीत कुंटुंबीयाचा, जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक अथवा राष्‍ट्रीयकृत शाखा व्‍यवस्‍थपनाकडे जमा करावयाचा असते व त्‍यानंतर संबधीत शाखा व्‍यवस्‍थापकांनी शेतक-यांच्‍या कुटुंबियाच्‍या खात्‍यामध्‍ये जमा करावयाची अस‍ते.
याप्रमाणे, सामनेवाले यांनी प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यानंतर  तक्रारदारांची मागणी जर कागदपत्रे पुर्ण नाही, या बाबींवरून तक्रारदाराची मागणी अमान्‍य करणे किंवा त्‍यावर निर्णय न घेणे हे सामनेवाले यांचे सेवेतील कमतरता ठरते. महसुल यंत्रणेच्‍या चुकीबद्दल किंवा त्‍यांनी केलेल्‍या दिरंगाईबद्दल अर्जदारांचे मागणी नाकारणे योग्‍य नाही. अर्जदारांच्‍या प्रस्‍तावावर निर्णय न घेतल्‍याने शासनाने काढलेल्‍या शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेचे उदिष्‍ट साध्‍य होणार नाही. या योजनेचे मुख्‍य उदिष्‍टे म्‍हणजे आर्थिक संकटात सापडलेल्‍या गरीब शेतक-यांना मदत करणे हे आहे. परंतु त्‍यांच्‍या प्रस्‍तावावर किरकोळ कारणावरून निर्णय न घेणे किंवा ती नाकारली तर शासनाकडुन गरीब शेतक-यांना या योजनेद्वारे मदत करण्‍याचा हेतु साध्‍य होणार नाही.
86        सामनेवाले यांनी लेखी युक्तिवादात असे म्‍हटले आहे की, राष्‍ट्रीय आयोगापुढे शासनाने सामनेवाले यांचे विरूध्‍द एकुण 2232 मागणी नाकारल्‍यासंबधी तक्रार अर्ज दाखल केलेले आहे. त्‍या 2232 मागणी अर्जापैकी हा एक मागणी अर्ज आहे. म्‍हणून या तक्रारीला “Res Judicata” ची बाधा येते. सामनेवाले यांच्‍या या म्‍हणण्‍यास मंच सहमत नाही. कारण सा.वाले यांनी त्‍याबाबतीत काही लेखीपुरावे दाखल केलेले नाही.
87        यावरून, सामनेवाले हे तक्रार अर्ज क्र.253/2009, 254/2009, 256/2009, 257/2009, 258/2009, 259/2009, 260/2009, 261/2009, 262/2011, 263/2011 264/2011 265/2011 266/2011 आणि 267/2011 या तक्रार अर्जातील तक्रारदारांना शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेखाली मिळणारी नुकसानभरपाई रू.1,00,000/- देण्‍यास जबाबदार आहेत. सामनेवाले यांना प्रस्‍ताव अर्ज कधी प्राप्‍त झाला किंवा सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कधी नाकारली हे तक्रार अर्जात किंवा कैफियतीमध्‍ये नमूद केले नसल्‍याकारणाने त्‍याची तारीख स्‍पष्‍ट होत नाही, म्‍हणुन वरील रक्‍कमेवर तक्रार अर्ज दाखल दिनांकापासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजदराने व्‍याज देण्‍यास जबाबदार राहतील.ही नुकसान भरपाई तक्रारदारांच्‍या एकत्रितपणे कुंटूंबियांसाठी आहे. त्‍यामुळे यानंतर, तक्रारदारांच्‍या कुंटूंबियातील, पतीचे/मुलाचे इतर वारसांनी पुन्‍हा या योजनेखाली तक्रार अर्ज दाखल करु नये.
88        तक्रार अर्ज क्र.254/2009 मध्‍ये सामनेवाले यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांनी योग्‍य ती कागदपत्रं पुरविली नाही. सामनेवाले यांनी प्रकरणात चौकशी केली असता, चौकशीत सौ.माया यांच्‍या जबानीवरुन तसेच इतर दाखल केलेल्‍या कागदपत्रांच्‍या छाननीवरुन तक्रारदारांच्‍या पतीचे वय 72 वर्षे होते असा निष्‍कर्ष काढला व त्‍यानुसार कैफियतीसोबत निशाणी क्र.अ वर अहवाल दाखल केला आहे. तक्रारदारांनी यावर पुराव्‍याचे शपथपत्र दाखल करुन सामनेवाले यांचे हे म्‍हणणे नाकारले व त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांच्‍या पतीचा जन्‍मदिनांक हा 16.07.1939 असा असुन अपघाताच्‍या वेळी त्‍यांचे वय 66 वर्षोचे होते. परंतु तक्रारदारांनी अभिलेखात तक्रारदाराच्‍या पतीच्‍या वयाचा दाखला किंवा वय निर्देशित करणारे कोणतेही कागदपत्रं अभिलेखात दाखल केले नाहीत, तसेच सामनेवाले यांनी चौकशी करतेवेळी कोणत्‍या कागदपत्रांच्‍या आधारे तक्रारदारांच्‍या पतीचे वय 72 वर्षे होती हे दर्शविणारे कोणतेही कागदपत्रं सोबत जोडले नाही. तक्रारदार किंवा सामनेवाले यांनी दोघांपैकी कोणीही तक्रारदारांच्‍या पतीचे वय घटनेच्‍या दरम्‍यान किती होते, हयाबद्दल कोणतेही पुरावे दाखल केले नाही. त्‍यामुळे तक्रारदारांच्‍या पतीचे वय घटनेच्‍या वेळी किती होते हे स्‍पष्‍ट होत नाही. परंतु शवविच्‍छेदन अहवालाच्‍या वेळी मयताचे वय 70 वर्षे दर्शविले आहे, त्‍यामुळे तक्रारदारांच्‍या पतीचे वय घटनेच्‍या वेळी 70 वर्षे असावे असे गृहीत धरण्‍यात येते.
शेतकरी अपघात विमा योजना, तक्रार अर्जासोबत पृष्‍ठ क्र.39 वर दाखल केलेले आहे. योजनेच्‍या प्रपत्र-ब मध्‍ये लाभार्थी पात्रतेच्‍या अटी व त्‍यासाठी आवश्‍यक ती कागदपत्रे यांची यादी दिलेली आहे. प्रपत्र-ब च्‍या कलम-1 नुसार, महाराष्‍ट्र राज्‍यातील 15 ते 70 वयोगटातील महसुली नोंदीनुसार असलेला खातेदार शेतकरी हा लाभार्थी असेल असे नमुद केले आहे. शवविच्‍छेदन अहवालानुसार, तक्रारदारांचे पती हे अपघाताच्‍या वेळी 70 वर्षोचे असल्‍याकारणाने त्‍यांना शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेचा लाभ घेता येईल. त्‍यानुसार, सामनेवाले यांनी प्रस्‍तुत तक्रारीतील तक्रारदारांची मागणी नाकारली. यामध्‍ये सामनेवाले यांनी तक्रारदारांस सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली हे स्‍पष्‍ट होते. यावरुन तक्रार अर्ज क्र.254/2009 मंजूर करण्‍यात येतो.
89        तक्रार अर्ज क्र.255/2009 मध्‍ये, तक्रारदारांनी केलेल्‍या तक्रार अर्जास सामनेवाले यांनी कैफियत दाखल केली. सामनेवाले यांचे म्‍हणणेनुसार, आवश्‍यक ती कागदपत्रं पुरविली नाही. सामनेवाले यांनी प्रस्‍तुत मागणी अर्जामध्‍ये चौकशी केली असता, त्‍यांना असे समजले कि, दि.16.02.2006 रोजी त्‍यांचे मृत शरीर विहीत आढळून आले. विहीस 21 पाय-या होत्‍या.तसेच चौकशीत असे समलजे की, तक्रारदारांच्‍या पतींस चांगले पोहता येत होते. त्‍यावरुन, तक्रारदारांच्‍या पतीचे अपघाती निधन नसून, आत्‍महत्‍येची शक्‍यता दिसुन येते. चार्टहाऊस डिटेक्टिव्‍ह सर्व्हिस यांचा चौकशी अहवाल सामनेवाले यांनी निशाणी क्र.ब वर दाखल केलेला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या चौकशी अहवाल नाकारला नाही किंवा विशेष करुन तक्रारदारांचे पतीस पोहता येत होते व विहीरीस 21 पाय-या होत्‍या या बाबीं प्रतिनिवेदन दाखल करुन किंवा पुराव्‍याच्‍या शपथपत्रामध्‍ये नाकारल्‍या नाहीत. त्‍यामुळे चौकशी अहवालातील नोंदी ग्राहय धरण्‍यात येते. विहीरीस 21 पाय-या होत्‍या तर कोणीही पायरीवरुन विहीरीत उतरुन जाईल तसेच तक्रारदारांच्‍या पतीस पोहायला येत होते यावरुन तक्रारदारांच्‍या पतीचे अपघाती निधन नसून ही आत्‍महत्‍या असण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही, या कथनास पुष्‍ठी मिळते. सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी नाकारली यामध्‍ये, सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली असे म्‍हणता येणार नाही. यावरुन, तक्रार अर्ज क्र.255/2009 हा रद्द करण्‍यात येतो.
           वरील विवेचनावरून, पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
आदेश
1     तक्रार अर्ज क्र.253/2009, 254/2009, 256/2009, 257/2009, 258/2009, 259/2009, 260/2009, 261/2009, 262/2009, 263/2009, 264/2009, 265/2009, 266/2009 आणि 267/2009 अंशतः मंजूर करण्‍यात येतात.
2    तक्रार अर्ज क्र.255/2009 रद्दबातल करण्‍यात येतात.
3    सामनेवाले यांनी आदेशामधील कलम-1 मधील सर्व तक्रारदारांची मागणी नाकारुन सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली हे जाहीर करण्‍यात येते. 
4    सामनेवाले यांनी आदेशामधील कलम-1 मधील सर्व तक्रारदारांना रक्‍कम रु.1,00,000/- तक्रार अर्ज दाखल दिनांकापासून ते पैसे देईपर्यत 9% व्‍याजदराने व्‍याजासह द्यावेत.
5    आदेशांच्‍या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.
 
 
[HON'ABLE MR. Mr. J. L. Deshpande]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.