Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/09/364

MRS SAGUNA PANDURANG KAWADE - Complainant(s)

Versus

ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD. - Opp.Party(s)

C.S DALVI

12 Apr 2012

ORDER

ग्राहक तक्रार निवारण मंच,
मुंबई उपनगर जिल्‍हा, मुंबई.
प्रशासकीय इमारत, 3 रा मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्याना जवळ,
वांद्रे (पूर्व), मुंबई 400051.
महाराष्‍ट्र राज्‍य
 
Complaint Case No. CC/09/364
 
1. MRS SAGUNA PANDURANG KAWADE
KANHERWADI, TAL- KALAMB, DIST- USMANABAD
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD.
ICICI BANK TOWER, BANDRA KURLA COMPLEX, BANDRA-EAST, MUMBAI-51.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr. J. L. Deshpande PRESIDENT
 HON'ABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR Member
 
PRESENT:
 
ORDER

   तक्रारदारांकरिता     :    श्री.सी.ए.दळवी , वकील        

          सामनेवालेंकरिता  :  श्री. अंकुश नवघरे, वकील  
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर सदस्‍या         ठिकाणः बांद्रा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
                                
एकत्रित न्‍यायनिर्णय
 
           तक्रार अर्जांचे संक्षिप्‍त स्‍वरूप खालीलप्रमाणेः-
 
तक्रार क्र.364/2009
 
           तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.पांडुरंग सुब्रराव कावडे हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे कणेरवाडी, ता.कळंब, जि.उस्‍मानाबाद येथे सर्व्‍हे. क्र.281 ही शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
2          तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.27.02.2006 रोजी पहाटे 5.00 वाजता तक्रारदारांचे पती-श्री.पांडुरंग सुब्रराव कावडे सायकलीवरुन अंदोराकडे जात होते. त्‍यावेळेस, टेंपो क्र.एमएच-25-8853 कंळंबाच्‍या बाजुने जोराने येऊन तक्रारदाराच्‍या पतीस धडक दिली. या धडकेने तक्रारदारांचे पती जबर जखमी झाले. त्‍यामुळे त्‍यांना लातुर येथे विवेकानंद हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्‍यात आले. उपचार घेतेवेळी त्‍यांच्‍या पतीचे दि.07.03.2006 रोजी निधन झाले. 
3          तक्रार अर्जासोबत, शवविच्‍छेदन अहवाल व एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
4          तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.18.03.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणतही प्रतिसाद मिळाला नाही.
5          शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.07.03.2006 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
 
 
 
तक्रार क्र.365/2009
 
6         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.दत्‍तु सिध्‍दु लोहार हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे अतिगरे, ता.हातकणंगले, जि.कोल्‍हापुर येथे सर्व्‍हे. क्र.665 ही शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
7          तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.24.01.2006 रोजी सुमारे संध्‍याकाळी 7.30 वाजता तक्रारदारांचे पती-श्री.दत्‍तु सिध्‍दु लोहार हे सायकलीवरुन सांगली-कोल्‍हापुर रस्‍त्‍याने काळजीपुर्वक डाव्‍या बाजुने जात असता, एक ट्रक क्रमांक MH-04-F-8982 मागील बाजुने येऊन जोराने धडक दिली. या धडकेने तक्रारदारांचे पती सायकलीवरुन खाली पडले व ट्रकच्‍या डाव्‍या चाकाखाली सापडले व जागीच मयत झाले.
8          तक्रार अर्जासोबत, शवविच्‍छेदन अहवाल व एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यु दाखला प्रमाणपत्र व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
9          तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली    मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला नाही परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.10.04.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणतही प्रतिसाद मिळाला नाही.
10         शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.24.01.2006 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
तक्रार क्र.366/2009
11         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.निवृत्‍ती शंकर पाटील हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे छांदरे, ता.राधानगरी, जि.कोल्‍हापुर येथे सर्व्‍हे. क्र.1387 ही शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
12         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.25.11.2005 रोजी रात्री सुमारे 9.00 वाजता, तक्रारदारांचे पती-श्री.निवृत्‍ती शंकर पाटील हे शेतावर ऊसाला पाणी घालणेसाठी गेले होते परंतु ते सकाळपर्यंत परत आले नाहीत. म्‍हणुन शोधाशोध केली असता, दि.26.11.2005 रोजी ऊस शेतीमध्‍ये बेशुध्‍द अवस्‍थेत सापडले. त्‍यानंतर, त्‍यांना हॉस्‍पीटलमध्‍ये उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्‍टरांनी त्‍यांना मृत घोषित केले.
13         तक्रार अर्जासोबत, शवविच्‍छेदन अहवाल व एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
14         तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली    मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.10.04.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणतही प्रतिसाद मिळाला नाही.
15         शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.26.11.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
तक्रार क्र.367/2009
 
16              तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.भिकाजी गंगाराम लाड हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे पिराचीवाडी, ता.कागल, जि.कोल्‍हापुर येथे सर्व्‍हे. क्र.202 ही शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे
17         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.17.12.2005 रोजी तक्रारदारांचे पती-श्री.भिकाली गंगाराम लाड, हे सायकलीवरुन जात असताना पाण्‍याच्‍या टाकीजवळ त्‍यांचा तोल गेला व ते दगडावर खाली कोसळले व त्‍यात ते जखमी झाले. उपचारासाठी त्‍यांना कोल्‍हापुर येथील सीपीआर हॉस्‍पीटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले. उपचार घेत असतेवेळी दि.26.12.2005 रोजी त्‍यांचा मृत्‍यु झाला.
18         तक्रार अर्जासोबत, शवविच्‍छेदन अहवाल व एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केलेला आहे.
19         तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली    मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.10.04.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणतही प्रतिसाद मिळाला नाही.
20        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.26.12.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
 
तक्रार क्र.368/2009
 
21         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.प्रभाकर उर्फ प्रभु लक्ष्‍मण घुगे हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे अंदुर, ता.तुळजापुर, जि.उस्‍मानाबाद येथे शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
22        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.07.03.2006 रोजी संध्‍याकाळी 4.30 वाजता, तक्रारदारांचे पती-श्री.प्रभाकर उर्फ प्रभु घुगे हे मोटर सायकल क्र.MH-25-E-4640 यावरुन काळजीपुर्वक तुळजापुर-नळदुर्ग रस्‍त्‍याने जात असता, ट्रक क्र.AP-16-TT-6788 विरुध्‍द बाजुने वेगाने आली व त्‍यास जोराने धडक दिली. या धडकेने तक्रारदारांचे पती-श्री.प्रभु घुगे हे जबर जखमी झाले. उपचार घेत असता, तक्रारदारांच्‍या पतीचे त्‍यातच निधन झाले.
23        तक्रार अर्जासोबत, शवविच्‍छेदन अहवाल व एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केलेला आहे.
24        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली    मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.10.04.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणतही प्रतिसाद मिळाला नाही.
25        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.07.03.2006 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
तक्रार क्र.369/2009
26        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.बाबसाहेब यशवंत शेंडगे हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे दहीवडी, ता.तुळजापुर, जि.उस्‍मानाबाद येथे शेतजमीन असुन सर्व्‍हे क्र.255 असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
27        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.12.09.2005 रोजी रात्री सुमारे 11.00 वाजता पिकअप व्‍हॅन क्र.MH-13-R-314 मधुन तक्रारदारांचे पती-श्री.बाबासाहेब शेंडगे व इतर प्रवास करीत होते. पुणे-सोलापुर रोडवर सोळकरवाडी येथे पोहचताच M-ट्रक क्र.MH-12-AQ-5481 ही वेगाने विरुध्‍द बाजुने येऊन सदर व्‍हॅनला धडक दिली. या धडकेने तक्रारदारांचे पती जबर जखमी झाले व त्‍यातच त्‍यांचा मृत्‍यु झाला.
28        तक्रार अर्जासोबत, शवविच्‍छेदन अहवाल, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केलेला आहे.
29        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली    मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.10.04.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणतही प्रतिसाद मिळाला नाही.
30        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.12.09.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
तक्रार क्र.370/2009
31                    तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.दिलीप लिंबाजी आवाड हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे आवाड शिरपुरा, ता.कळंब, जि.उम्‍सानाबाद येथे शेतजमीन असुन सर्व्‍हे क्र.146 असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
32        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.10.10.2005 रोजी सुमारे सायंकाळी 4.00 वाजता तक्रारदारांचे श्री.दिलीप आवाड हे जनावरांना शेतामध्‍ये चरावयास नेले असता, त्‍यांना साप चावल्‍याने ते बेशुध्‍द झाले. उपचारासाठी शिरढोणे येथील सरकारी हॉस्‍पीटलमध्‍ये त्‍यांना दाखल करण्‍यात आले. उपचार घेत असतानाच त्‍यांचा मृत्‍यु झाला.
33        तक्रार अर्जासोबत, शवविच्‍छेदन अहवाल, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, एफ.आय.आर. व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केलेला आहे.
34        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली    मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.10.04.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणतही प्रतिसाद मिळाला नाही.
35        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.10.10.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली.  
तक्रार क्र.371/2009
36       तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.बालाजी भिमराव बोंदर हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे देवधनोरा, ता.कळंब, जि.उस्‍मानाबाद येथे शेतजमीन असुन सर्व्‍हे क्र.240 असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
37        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.12.02.2005 रोजी सुमारे सायंकाळी 7.30 वाजता तक्रारदारांचे पती श्री.बालाजी बोंदर हे त्‍यांच्‍या मोटर सायकल क्र.MH-25-E-4584 यामध्‍ये पेट्रोल भरण्‍यास गेले असता, छकुर-नांदेड रोडवर एम.आय.डी.सी.मध्‍ये एम/ट्रक क्र.MH-26-B-4573 ही वेगाने येऊन तक्रारदारांच्‍या मोटार सायकलीस जोराने धडक दिली. तक्रारदारांच्‍या पतीस या धडेकने डोक्‍यास मार बसल्‍याने जबर जखमी झाल व जागीच त्‍यांचा मृत्‍यु झाला.
38        तक्रार अर्जासोबत, शवविच्‍छेदन अहवाल, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, एफ.आय.आर. व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केलेला आहे.
39        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली    मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.10.04.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणतही प्रतिसाद मिळाला नाही.
40        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.12.02.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
तक्रार क्र.372/2009
41         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.संजय प्रभाकर बिरनाळे हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे माणगांव, ता.हातकणले, जि.कोल्‍हापूर येथे शेतजमीन असुन सर्व्‍हे क्र.815 असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
42        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.23.01.2005 रोजी सुमारे तक्रारदाराचे पती श्री.संजय बिरनाळे हे अंपगासाठी असलेल्‍या मोटार सायलवरुन सनाली-कोल्‍हापूर रोडवरुन जात असताना वाहकाचा तोल गेल्‍याने मोटर सायकल उलटली व तक्रारदारांचे पती खाली पडले व जबर जखमी झाले. त्‍यामुळे त्‍यांना कोल्‍हापुर येथील सीपीआर हॉस्‍पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्‍यात आले. उपचार घेत असतानाच त्‍याचा दि.24.01.2005 रोजी मृत्‍यु झाला.
43       तक्रार अर्जासोबत, शवविच्‍छेदन अहवाल, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, एफ.आय.आर. व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केलेला आहे.
44        तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली    मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.10.04.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले याचेकडून कोणतही प्रतिसाद मिळाला नाही.
45        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.24.01.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली. 
तक्रार क्र.373/2009
46        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे वडील श्री.किसन बंकट पवार, हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे कारंजकाला, ता.कळंब, जि.उस्‍मानाबाद येथे सर्व्‍हे. क्र.36 ही शेतजमीन असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
47        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे वडील-श्री.किसन बंकट पवार, हे सायकलीवरून दि.01.05.2005 रोजी कळंब-शिरढोण रोडने जात असताना त्‍यांचा तोल गेला व तेथे असलेल्‍या पुलावर पंडले. पुलावर असलेल्‍या दगडांवर पडल्‍यामुळे जबर जखमी झाले व त्‍यातच त्‍याचा मृत्‍यु झाला
48        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, शवविच्‍छेदन अहवाल,     6-क,8-अ, एफ.आय.आर.इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
49       तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.10.04.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
50        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या मुलाच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.01.05.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली.
     तक्रार क्र.374/2009   
51         तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदारांचे पती-श्री.आनंदा यशवंत बोने (पाटील) हे शेतकरी कुंटुंबातील असुन त्‍यांचे नावे बोनेमाळा, ता.पारगांव, जि.कोल्‍हापूर येथे शेतजमीन असुन सर्व्‍हे क्र.303 असुन त्‍याबाबत 7/12 व 8-अ खाते पुस्तिकेमध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.
52        तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, दि.26.07.2005 रोजी सायंकाळी, तक्रारदारांचे पाटील श्री. बोने(पाटील) हे पराशर मिल्‍क डेअरी येथे दुध टाकणेस गेले असता परत येतेवेळी, जोराचा पाऊस लागला. पावसाच्‍या पाण्‍यात /पुरात झुडूपांमध्‍ये ते अडकले व दुसरे दिवशी पावसाच्‍या पाण्‍यात त्‍यांचा मृतदेह सापडला.
53        तक्रार अर्जासोबत, 7/12 उतारा, 6-क,8-अ, शवविच्‍छेदन अहवाल, एफ.आय.आर.इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा व पोलीसांचा अंतिम अहवाल अभिलेखात दाखल केला आहे.
54       तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदाराने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली   मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरी, सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कोणतेही सबळ कारण न दाखवता नाकारली. म्‍हणून तक्रारदार यांनी दि.10.04.2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रति‍साद मिळाला नाही.
55        शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन रु.1,00,000/-, 12% व्‍याज दराने तक्रारदाराच्‍या मुलाच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दि.26.07.2005 पासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत अशी मागणी केली.
56                   सर्व तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत शपथपत्र व अनुषांगिक कागदपत्रं दाखल केली आहेत. सर्व तक्रार अर्जातील तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, वकील नेमण्‍यास व आवश्‍यक ती कागदपत्रे जमा करण्‍यामध्‍ये तक्रार अर्ज दाखल करण्‍यास विलंब झाला. त्यासाठी विलंब माफीचा अर्ज दाखल करुन विलंब माफीची मागणी केली.
57        सामनेवाले यांनी हजर राहुन तक्रार अर्जास उत्‍तर द्यावे अशी नोटीस सामनेवाले यांना पाठविण्‍यात आली. नोटीसीस अनुसरुन सामनेवाले यांनी हजर होऊन प्रत्‍येक तक्रार अर्जात वेगवेगळया कैफियतीं दाखल केल्‍या आहेत. परंतु प्रत्‍येक कैफियतीमध्‍ये सामनेवाले यांचे एकसारखेच म्‍हणणे आहे.
58        सामनेवाले यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हे ग्राहक नाहीत तसेच तक्रारदारांनी तक्रार अर्ज विलंबाने दाखल केलेला आहे. सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार यांनी फेरफार उतारा व 6-सी चा फॉर्म व वयाचा दाखल,एफ.आय.आर.ची प्रत व पोलीस तपासाचे कागदपत्रं ही आवश्‍यक कागदपत्रे जरुरीचे दाखल केले नाही. तसेच तक्रारदार हे त्‍यांच्‍या नांवे जमीन जरी असली तरी व्‍यवसाने शेती काम करीत होते हे दाखविणारे कागदपत्रं दाखल केले नाही, त्‍यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी नाकारली.
59        तक्रार अर्ज क्र.369/2009 मध्‍ये सामनेवाले यांचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदारांनी वयाचा दाखला, फेरफार उतारा, एफ.आय.आर., स्‍पॉट पंचनामा आणि 6-क ही आवश्‍यक ती कागदपत्रे दाखल केली नाहीत. तक्रारदारांचा मृत्‍यु हा अपघाताने झाला. तक्रारदार हे अपघाताच्‍या वेळी pick-up van no.MH-13-R-314  मधुन प्रवास करीत होते त्‍यावे‍ळेस MH-12-AQ-5481 या ट्रकने धडक दिल्‍या कारणाने अपघात झाला. परंतु विमा पॉलीसीच्‍या अटी व शर्तीनुसार तक्रारदार हे मागणीस पात्र नाहीत. सामनेवाले यांनी प्रस्‍तुत प्रकरणामध्‍येचौकशी केली असता असे आढळून आले की, तक्रारदार हे मालवाहु वाहनामधुन प्रवास करीत होते. (Traveling in goods vehicle as an unauthorized passenger in goods vehicle). मालवाहु वाहनातून प्रवास करणे हे मोटर व्‍हे‍ईकल्‍स अक्‍ट, 1988 च्‍या अधिनियमाच्‍यां विरोधात आहे तसेच मालवाहनातुन प्रवाशांना प्रवास करण्‍यास परवानगी देणे हे विमा पॉलीसीच्‍या विरोधात आहे. त्‍यामुळे पॉलीसीच्‍या अटी व शर्थीनुसार सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी नाकारली. सामनेवाले यांनी कैफियतीसोबत चौकशी अहवाल निशाणी-ए वर दाखल केलेला आहे.
60        सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार, सामनेवाले यांनी मा.राष्‍ट्रीय आयोगापुढे एकुण 2232 प्रकरणे दाखल केलेली आहेत. त्‍यापैकी तक्रारदारांची मागणी हे पण एक त्‍या प्रकरणांपैकी एक आहे. म्‍हणुन प्रस्‍तुत मंचाने, सदरचा तक्रार अर्ज मा.राष्‍ट्रीय आयोगापुढे सुनावणी होईपर्यंत स्‍थगित करावे अशी मागणी केली आहे.
61       तक्रार अर्ज, कैफियती व उभय पक्षकारांनी दाखल केलेले अनुषांगिक कागदपत्रं व पुराव्‍याचे शपथपत्रं व लेखी युक्‍तीवाद यांची पडताळणी केली. उभय पक्षकारांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकला असता निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. 
    

क्र.
मुद्दे
उत्‍तरे
1
सामनेवाले यांनी सर्व तक्रार अर्जातील तक्रारदारांच्‍या मागण्‍यां नाकारुन सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली हे सर्व तक्रारदारांनी सिध्‍द केले काय ?
होय, तक्रार अर्ज क्र.369/2009 मधील तक्रारदार सोडून. 
2
सर्व तक्रारदार तक्रार अर्जातील मागणी मागण्‍यांस पात्र आहेत काय ?
होय, अंशतः
3
अंतिम आदेश ?
तक्रार अर्ज क्र.369/2009 रद्द करण्‍यात येतात. उर्वरित तक्रारीं अंशतः मंजूर करण्‍यात येतात.

 
कारणमिमांसाः-
62        सर्व तक्रारदारांच्‍या विलंब माफीच्‍या अर्जावर सुनावणी होऊन आदेश पारीत करण्‍यात आला व विलंब माफीचा अर्ज मंजुर करण्‍यात आला.
63        सामनेवाले यांचे म्‍हणणेनुसार, तक्रारदार हे ग्राहक नाहीत.
 
     राज्‍यामध्‍ये सुमारे एक कोटी शेतकरी आहेत. शेती व्‍यवसाय करताना होणारे विविध अपघात, तसेच विज पडणे, पूर, सर्पदंश, वाहन अपघात, कोणत्‍याही नैसर्गिक आपत्‍तीमुळे होणारे अथवा अन्‍य कोणतेही अपघात यामुळे ब-याच शेतक-यांना मृत्‍यु ओढवतो, किंवा काहींना अपंगत्‍व येते. घरातील कर्त्‍या व्‍यक्‍तीस झालेल्‍या सदर अपघातामुळे कुंटूंबाचे उत्‍पन्‍नाचे साधन बंद होऊन अडचणीची परि‍स्थिती निर्माण होऊ शकते. अशा अपघातग्रस्‍त शेतक-यांस/त्‍यांच्‍या कुंटूंबास लाभ देण्‍याकरिता कोणतीही स्‍वतंत्र विमा योजना नसलेमुळे शासनाने शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना राबविली. या योजनेनुसार शासनाने सर्व नोंदणीकृत शेतकरी यांच्‍या वतीने शासनाने शेतक-याच्‍या व्‍यक्तिगत अपघात व अपंगत्‍व यासाठी विमा पॉलीसी उतरविली. या योजनेअंतर्गत विमा हप्‍त्‍याची एकत्रित रक्‍कम शेतक-याच्‍या वतीने शासन अदा करते, त्‍यामुळे शेतक-यांने किंवा अन्‍य कोणत्‍याही संस्‍थेने त्‍यांच्‍या वतीने या योजनेअंतर्गत स्‍वतंत्ररित्‍या विमा हप्‍त्‍याची रक्‍कम भरण्‍याची गरज नाही. 
64        ग्राहक संरक्षण कायदा, 1986, कलम-2(1)(डी) मध्‍ये ग्राहकाची व्‍याख्‍या नमूद केलेली आहे ती खालीलप्रमाणे,
          Clause-2(1)(d) :-    “Consumer” means any person who-
(i)      buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment, when such use is made with the approval of such person, when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose ; or
(ii)      [hires or avails of] any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who [hires or avails of] the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payments, when such services are availed of with the approval of the first mentioned person [but does not include a person who avails of such services for any commercial purpose].
या व्‍याख्‍येनुसार, जरी शेतक-यांनी प्रत्‍यक्ष सामनेवाले यांना कोणताही मोबदला दिलेला नसला तरीही ते शेतकरी व्‍यक्तिगत अपघात योजनेचे लाभार्थी आहेत व त्‍यांच्‍या वतीने शासन विमा हप्‍ता भरते म्‍हणून वरील तक्रार अर्जातील सर्व तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत.
65        शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेची प्रत तक्रारदारांनी अभिलेखावर दाखल केलेली आहे. त्‍यामध्‍ये प्रपत्र मध्‍ये महसुल यंत्रणेमध्‍ये करावयाची कार्यवाही दिली आहे. आहे. त्‍या खालील प्रमाणेः-
(1)   अपघाती घटना घडल्‍यानंतर संबधीत शेतकरी
अथवा त्‍यांचे कुटुंबियाचा क्‍लेमफॉर्म व इतर कागदपत्रे एक आठवडयाचे आत संबधीत तलाठयास सादर करतील.
(2)   पुढील एक आठवडयामध्‍ये, सदर तलाठी शेतक-
याने एखादा अथवा काही कागदपत्राची पूर्तता केलेली नसल्‍यास स्‍वतः शासन निर्णयासोबत विहीत केलेल्‍या सर्व कागदपत्रांची आवश्‍यक त्‍या 7/12, 8 नुसार तो खातेदार असल्‍याच्‍या प्रमाणपत्रासह विम्‍या दाव्‍याचा प्रस्‍ताव तहसिलदारास सादर करतील.
                 (3)   प्राप्‍त प्रस्‍तावाची तपासणी करून सदर प्रस्‍ताव
तहसिलदार यांच्‍या प्रमाणपत्रासह सरळ आय.सी.आय.सी.आय जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमीटेड यांचेकडे एक आठवडयाचे आत पाठवतील व त्‍याची एक प्रत जिल्‍हयाधिका-यांना सादर करतील.
               (4)   संबधीत शेतक-याचे अथवा कुटुंबियाचे बँकेत खाते
नसल्‍यास नवीन खाते शक्‍यतो जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या नजिकच्‍या शाखेत उघडून त्‍याचा तपशिल आय.सी.आय.सी.आय लोंबार्ड जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीस कळविण्‍याची जबाबदारी संबंधित तहसीलदाराची राहील.
यावरून प्रपत्र -2 नुसार सर्व आवश्‍यक कागदपत्रं पाठविण्‍याची जबाबदारी महसुल यंत्रणेची आहे. एकदा क्‍लेमफॉर्म भरून दिल्‍यानंतर पुढील सर्व कार्यवाही करण्‍याची जबाबदारी महसुल यंत्रणेची आहे. त्‍यानतंर प्रपत्र नुसार प्रस्‍ताव तहसिलदाराकडुन प्राप्‍त झाल्‍यानंतर विमा कंपनीने एक महिन्‍याचे आत नुकसान भरपाईचा धनादेश संबधीत कुंटुंबीयाचा, जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक अथवा राष्‍ट्रीयकृत शाखा व्‍यवस्‍थपनाकडे जमा करावयाचा असते व त्‍यानंतर संबधीत शाखा व्‍यवस्‍थापकांनी शेतक-यांच्‍या कुटुंबियाच्‍या खात्‍यामध्‍ये जमा करावयाची अस‍ते.
याप्रमाणे, सामनेवाले यांनी प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यानंतर तक्रारदारांची मागणी जर कागदपत्रे पुर्ण नाही, या बाबींवरून तक्रारदाराची मागणी अमान्‍य करणे किंवा त्‍यावर निर्णय न घेणे हे सामनेवाले यांचे सेवेतील कमतरता ठरते. महसुल यंत्रणेच्‍या चुकीबद्दल किंवा त्‍यांनी केलेल्‍या दिरंगाईबद्दल अर्जदारांचे मागणी नाकारणे योग्‍य नाही. अर्जदारांच्‍या प्रस्‍तावावर निर्णय न घेतल्‍याने शासनाने काढलेल्‍या शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेचे उदिष्‍ट साध्‍य होणार नाही. या योजनेचे मुख्‍य उदिष्‍टे म्‍हणजे आर्थिक संकटात सापडलेल्‍या गरीब शेतक-यांना मदत करणे हे आहे. परंतु त्‍यांच्‍या प्रस्‍तावावर किरकोळ कारणावरून निर्णय न घेणे किंवा ती नाकारली तर शासनाकडुन गरीब शेतक-यांना या योजनेद्वारे मदत करण्‍याचा हेतु साध्‍य होणार नाही.
66        सामनेवाले यांनी लेखी युक्तिवादात असे म्‍हटले आहे की, राष्‍ट्रीय आयोगापुढे शासनाने सामनेवाले यांचे विरूध्‍द एकुण 2232 मागणी नाकारल्‍यासंबधी तक्रार अर्ज दाखल केलेले आहे. त्‍या 2232 मागणी अर्जापैकी हा एक मागणी अर्ज आहे. म्‍हणून या तक्रारीला “Res Judicata” ची बाधा येते. सामनेवाले यांच्‍या या म्‍हणण्‍यास मंच सहमत नाही. कारण सामनेवाले यांनी त्‍याबाबतीत काही लेखीपुरावे दाखल केलेले नाही.
67        यावरून, सामनेवाले हे तक्रार अर्ज क्र.364/2009, 365/2009, 366/2009, 367/2009, 368/2009, 370/2009, 371/2009, 372/2009, 373/2011 आणि 374/2009 या तक्रार अर्जातील तक्रारदारांना शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेखाली मिळणारी नुकसानभरपाई रू.1,00,000/- देण्‍यास जबाबदार आहेत. सामनेवाले यांना प्रस्‍ताव अर्ज कधी प्राप्‍त झाला किंवा सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी कधी नाकारली हे तक्रार अर्जात किंवा कैफियतीमध्‍ये नमूद केले नसल्‍याकारणाने त्‍याची तारीख स्‍पष्‍ट होत नाही, म्‍हणुन वरील रक्‍कमेवर तक्रार अर्ज दाखल दिनांकापासुन ते पैसे देईपर्यंत व्‍याजदराने व्‍याज देण्‍यास जबाबदार राहतील.ही नुकसान भरपाई तक्रारदारांच्‍या एकत्रितपणे कुंटूंबियांसाठी आहे. त्‍यामुळे यानंतर, तक्रारदारांच्‍या कुंटूंबियातील, पतीचे/मुलाचे इतर वारसांनी पुन्‍हा या योजनेखाली तक्रार अर्ज दाखल करु नये.
68        तक्रार अर्ज क्र.369/2009 मध्‍ये तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यु हा अपघाताने झाला. अपघाताच्‍या वेळी तक्रारदारांचे पती हे pick-up van no.MH-13-R-314  मधुन प्रवास करीत होते त्‍यावे‍ळेस MH-12-AQ-5481 या ट्रकने धडक दिल्‍या कारणाने अपघात झाला. अपघातामध्‍ये तक्रारदारांचे पती-श्री.बाबासाहेब शेंडगे यांचा मृत्‍यु झाला. तक्रारदाराने सदर विमा योजनेअंतर्गम मागणी केल्‍यानंतर सामनेवाले यांनी प्रस्‍तुत प्रकरणात चौकशी केली असता, तक्रारदाराचे पती हे मालवाहु वाहतुकीतुन प्रवास करीत होते असे आढळुन आले. मालवाहु वाहतुकीतुन प्रवास करणे हे मोटर व्‍हे‍ईकल्‍स अक्‍ट, 1988 च्‍या अधिनियमाच्‍या विरोधात असल्‍याने व तसेच विमा पॉलीसीच्‍या अटी व शर्थीनुसार, सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी नाकारली. तक्रारदारांच्‍या पतीने नियमांचे उल्‍लंघंन केल्‍याने तक्रारदार हे मागणीस पात्र नाहीत, म्‍हणुन सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी नाकारुन सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली असे म्‍हणता येणार नाही. म्‍हणुन तक्रार अर्ज क्र.369/2009 हा रद्दबातल करण्‍यात येतो.
           वरील विवेचनावरून, पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
आदेश
1     तक्रार अर्ज क्र.364/2009, 365/2009, 366/2009, 367/2009, 368/2009, 370/2009, 371/2009, 372/2009, 373/2011 आणि 374/2009 अंशतः मंजुर करण्‍यात येतात.
 
2    तक्रार अर्ज क्र.369/2009 रद्दबातल करण्‍यात येते.
 
3    सामनेवाले यांनी आदेशामधील कलम-1 मधील सर्व तक्रारदारांची मागणी नाकारुन सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली हे जाहीर करण्‍यात येते. 
 
4    सामनेवाले यांनी आदेशामधील कलम-1 मधील सर्व तक्रारदारांना रक्‍कम रु.1,00,000/- तक्रार अर्ज दाखल दिनांकापासून ते पैसे देईपर्यत 9% व्‍याजदराने व्‍याजासह द्यावेत.
 
5    आदेशांच्‍या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.
 
 
 
[HON'ABLE MR. Mr. J. L. Deshpande]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.