जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 198/2008. प्रकरण दाखल तारीख - 31/05/2008 प्रकरण निकाल तारीख - 23/07/2008 समक्ष - मा.श्री.विजयसिंह राणे. - अध्यक्ष. मा.श्री.सतीश सामते - सदस्य. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. मोहमंद खलिलुल्ला पि. मोहमंद फैजूल्ला अर्जदार. वय वर्षे 32, धंदा व्यापार, रा. नई आबादी नांदेड. विरुध्द. 1. आय.सी.सी. आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. 1.औरंगाबाद. 1. 2. आय.सी.सी. आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. 2.तर्फे शाखाधिकारी, 2.कलामंदीर जवळ, यू.टी.आय. बँकेवर 2.नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - श्री.आय. एम. शेख गैरअर्जदारा तर्फे वकील - श्री.अजय व्यास निकालपञ (द्वारा - मा.श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष ) यातील तक्रारकर्ते मोहंमद खलीलूल्ला यांचे थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांच्याकडे टक्सी वाहन एम.एच.26-एन-1467 हे आहे. वाहन दि.19.12.2007 रोजी विकत घेतले व त्याच दिवशी रु.13,549/- चा विमा हप्ता देऊन विमा गैरअर्जदार विमा कंपनीकडे काढला.गैरअर्जदाराचे एजंट ठिकाणावर नसल्यामुळे कव्हर नोट नंबर 5915114 ची झेरॉक्स प्रत त्यांला देण्यात आली. दि.3.4.2008 रोजी अपघात झाला. एक प्रवासी मरण पावला. विमा कंपनीला तशी माहीती दिली. सर्व्हेअर आला नाही त्यांनी सर्व्हे केला नाही. म्हणून गैरअर्जदार क्र.2 च्या कार्यालयाला भेट देऊन मूळ पॉलिसी कव्हर नोट व पॉलिसीच्या अटीची प्रत मागितली. ती गैरअर्जदार क्र.2 ने दिली नाही. त्यामुळे सदर वाहन कोर्टातून सोडून घेण्यास उशिर लागला. शेवटी स्वतः इन्शूरन्स असल्या बददलचे शपथपञ देऊन वाहन सोडवून घेतले. मूळ इन्शूरन्स कव्हर नोट मिळाली नसल्यामुळे सदरील वाहन थांबवून ठेवावे लागले. सर्व्हे झाला नसल्यामुळे अन्य खाजगी मॅकेनिककडून वाहन रिपेंरिग करुन घेता आले नाही वा गैरअर्जदार क्र.2 यांच्या प्राधीकृत वर्कशॉपला पाठविण्यात आले नाही. त्यामुळे वाहनाचे मिळणारे उत्पन्न त्यांना मिळू शकले नाही. यास्तव दररोज रु.200/- प्रमाणे रु.11400/- चे नूकसान झाले आणि कर्ज घेतलेलया फायनान्स कार्पोरेशनचे हप्ते थकीत राहीले त्यावर रु.2240/- व्याज अर्जदारास बसले. अर्जदार दि.13.5.2008 रोजी त्यांच्या वाहनाचे दूस-या क्रमांकाची कव्हर नोट आणि पॉलिसी जीवर दि. 5.4.2008 ही तारीख आहे देण्यात आली. दूयम प्रत दि.18.4.2008 रोजी देण्यात आली. त्यानंतर गैरअर्जदार क्र. 2 च्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे वाहन त्यांच्या प्राधीकृत सर्व्हीस सेंटर बाफना मोटार्स यांच्याकडे दि. 19.5.2008 रोजी जमा करण्यात आले. तेथे गैरअर्जदाराच्या सर्व्हेअरने नूकसानीचा अंदाज लावला. वाहनाची दूरुस्ती करण्यात आली. वाहन टोचन लावून नेले त्यांचा खर्च रु.1500/- लागला. बॅटरी चोरीस गेली होती. दूरुस्तीचा खर्च रु.17,283/- आला. अर्जदाराने रु.6078/- दयावे असे त्यांला सांगण्यात आले. शिवाय रक्कम भरल्याशिवाय अर्जदारास वाहन मिळू शकत नव्हते. वाहनाचा वापर केवळ तिन महिने झाला होता. 50 टक्के घसारा वजा करण्यात आला तो चूकीचा आहे. तसेच गैरअर्जदाराने वाहनाचे फाटलेले शिट आणि उडालेला रंग या बाबत नूकसान भरपाई दिली नाही व दूरुस्त करुनही दिले नाही त्या बाबत रु.1500/- खर्च आला. गैरअर्जदारांनी जरी पॉलिसी व कव्हर नोट दिली नाही तसेच अर्जदाराने दूरुस्तीचा खर्चन देऊन अशा प्रकारे सेवेतील ञूटी केली आहे. तक्रारकर्त्याने तक्रार दाखल करुन त्यांस मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.50,000/- नूकसान भरपाई मिळावी, आर्थिक ञासाबददल रु.16,340/- व रु.8000/- तक्रार खर्चाबददल मिळावेत अशी मागणी केली आहे. यात गैरअर्जदार हजर होऊन त्यांनी आपला लेखी जवाब दाखल केला. त्यांचे म्हणणे आहे की, अर्जदार हे ग्राहक नाहीत. विमा बाबतची बाब मान्य केली. इतर सर्व विपरीत वीधाने गैरअर्जदारांनी नाकबूल केली. त्यांना घटनेची माहीती मिळाली नाही. त्यांनी असे कबूल केले की. काही तांञिक अडचणीमूळे त्यांना दूसरी कव्हर नोट दिली माञ दिरंगाईची बाब त्यांनी अमान्य केली आहे.बाफना मोटार्स यांनी जे इन्व्हाईस बिल दिले ते रु.17,283/- चे असून त्यापैकी त्यांच्या सर्व्हेअरच्या सर्व्हेप्रमाणे गैरअर्जदार कंपनी यांनी रु.11,200/- बाफना मोटार्स यांच्या खात्यात जमा केले आहेत. त्यामुळे त्यांनी सेवेत ञूटी केली नसल्यामुळे तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा. अर्जदार यांनी आपला पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी देखील पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकूण आम्ही खालील प्रमाणे मूददे पारीत करीत आहोत. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- गैरअर्जदार यांना पॉलिसी मान्य आहे. पॉलिसी बददल वाद नाही.परंतु गैरअर्जदार यांनी दोन पॉलिसी इश्यू केल्याचे निदर्शनास येते. त्याप्रमाणे सूरुवातीची पॉलिसी पीसीव्हीएफ कव्हर नोटी नंबर 5915114 ही दि.19.12.2007 रोजी दिली होती. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, त्यांचा मोटार अपघात यावीषयीचा वाद कोर्टात चालू असताना कोर्टातून त्यांचे वाहन सोडवून नेण्यासाठी त्यांना विमा पॉलिसीची गरज होती. असे असताना त्यांनी डूप्लीकेट पॉलिसी देण्याविषयी गैरअर्जदार यांना वेळोवेळी विनंती केली. गैरअर्जदारांनी या प्रकरणात कव्हर नवीन नोट दिली, असून जर समजा अर्जदाराकडून ही पॉलिसी हरवली तर त्यांना कव्हर नोट ऐवजी पॉलिसीची दूयम प्रत देता आली असती परंतु असे न करता गैरअर्जदारांनी त्या नवीन कव्हर नोट नंबर पीसीव्हीजी/7001234 देण्यात आली. नवीन कव्हर नोट देण्या मागचा हेतू किंवा अडचण हे लक्षात येण्याजोगे नाही. गैरअर्जदाराची फक्त तांञिक मूददावर असे शब्दप्रयोग केलेला आहे. ही दूसरी पॉलिसी किंवा दूसरी कव्हर नोट दि.13.5.2008 रोजी देण्यात आली. त्याचाच अर्थ अर्जदाराचे वाहन टाटा मॅझीक एस टॅक्सी वाहन क्र.एम.एच.26-एन-1467 ला अपघात दि. 3.4.2008 रोजी झाला व वाहनाची दूरुस्ती ही बाफना मोटार्स यांच्याकडे दि.17.5.2008 रोजी करण्यात आली. येथे गैरअर्जदार यांनी पॉलिसीची दूयम प्रत देण्यास उशिर केल्यामुळे सेवेत ञूटी झालेली दिसून येते. गैरअर्जदार यांनी सर्व्हेअर यांचा तपासणी अहवाल व इस्टीमेंट व सर्व्हेअर श्री.संतोष गणपत रेणके यांचे शपथपञ दाखल केलेले आहे. त्यामुळे सर्व्हेअरनी सर्व्हे करुन जे इस्टीमेंट दिले ते बरोबर होते असे गृहीत धरुन रु.11,205/- चे नूकसान झाले व तेवढी रक्कम गैरअर्जदार यांनी बाफना मोटार्स यांच्या खात्यात जमा केली. परंतु येथे सर्व्हेअरनी वाहन गॅरेजला नेण्यासाठी टोंईगची रक्कम गृहीत धरलेली नाही. त्यामुळे वाहन टोईग करुन चंद्रपूर फाटयापासून गॅरेजपर्यत आणले. त्यासाठी त्यांना टोईग चार्जेस म्हणून रु.1500/- मंजूर करणे योग्य होते परंतु सर्व्हेअरने ही रक्कम धरलेली नाही म्हणून रु.1500/- टोईग चार्जेस मंजूर करण्यात येतात. अर्जदारांनी बाफना मोटार्स प्रा. लि. यांचे टॅक्स इन्व्हाईस दाखल केलेले आहे. त्यावरुन अपघात झालेल्या वाहनाचे डेटींग, पेटींग ज्या बददल रु.4500/- लावलेले आहेत ही रक्कम देखील सर्व्हेअरनी मंजूर केलेली दिसत नाही. वाहनाचा अपघात झाला म्हटल्यावर वाहनाच्या बॉडीला ते कूठे तरी डेंन्ट असणार व त्यांला मटारुन व डेंट काढून दुरुस्त करणे आवश्यक असते व ते केल्यानंतर त्यांला कलरिंग ही करणे आवश्यक आहे. सर्व्हे रिपोर्ट मध्ये हा खर्च धरलेला नाही. त्यामुळे हे रु.1500/- अर्जदार यांचे तक्रार अर्जातील मागणीप्रमाणे देणे आवश्यक आहे. अर्जदार म्हणतात की त्याच प्रमाणे त्यांची बॅटरीही चोरीला गेलेली आहे, पण त्या बददल पूरावा समोर आलेला नाही. किंवा सर्व्हे रिपोर्टमध्येही बॅटरीचा उल्लेख नाही म्हणून ही रक्कम देता येणार नाही. गैरअर्जदारानी पॉलिसी देण्यास विलंब केल्या बददल अर्जदार यांना शारीरिक व मानसिक ञास झाला त्याबददल रु.3500/- मंजूर करण्यात येतात. वरील सर्व बाबीवरुन खालील आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.6,500/- व त्यावर प्रकरण दाखल केल्याचा दि.31.5.2008 पासून 9 व्याज दयावे, असे न केल्यास त्यावर दंडणीय व्याज म्हणून 12 व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत अर्जदारास दयावे. 3. दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात येतो. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते श्री.विजयसिंह राणे सदस्या सदस्य अध्यक्ष जे. यु. पारवेकर लघूलेखक. |