(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 03.12.2014)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडून निर्माण केलेले बाऊन्डस गैरअर्जदार क्र.2 व 3 चे माध्यमातून खरेदी करण्याकरीता दि.5.7.1996 ला बाऊन्डस खरेदी करण्याकरीता अर्ज करुन रक्कम रुपये 20,800/- जमा केले. त्याबदल्यात गैरअर्जदाराने रुपये 5200/- प्रमाणे 4 बाऊन्डस सर्टीफीकेट क्र. 5968, 5969, 5970, 5971 यानुसार अर्जदारास दिले. दि.15.7.2011 रोजी प्रति बाऊन्डसची किंमत रुपये 50,000/- प्रमाणे 4 बाऊन्डसचे एकूण रक्कम रुपये 2,00,000/- अर्जदारास गैरअर्जदार क्र.1 कडून देय होती. अर्जदाराने बाऊन्डची रक्कम रुपये 2,00,000/- लाभासह गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांना वारंवार मागणी केली. गैरअर्जदार क्र.2 यांनी रक्कम मीळण्यासंबंधी कार्यवाही सुरु असल्याचे अर्जदारास सांगीतले. त्यानंतर, गैरअर्जदाराने दि.3.5.2012 व 7.5.2012 रोजी अर्जदाराला खोटे उत्तर देवून अर्जदारास बाऊन्डची रक्कम देता येणार नाही म्हणून सांगितले. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास बाऊन्डसची रक्कम मीळण्यासंबंधाने कधीही कळविले नाही. त्यामुळे, अर्जदाराने बाऊन्डसची सर्टीफीकेट क्र. 5968, 5969, 5970, 5971 या 4 बाऊन्डसची दि.15.7.2011 नंतर एकूण रक्कम रुपये 2,00,000/- ही गैरअर्जदार यांनी 9 टक्के व्याजासह अर्जदाराला द्यावे. अर्जदारास शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 50,000/- व तक्रार खर्चापोटी रुपये 5,000/- देण्याचा आदेश गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचेविरुध्द व्हावा, अशी मागणी केली.
2. अर्जदाराने नि.क्र.5 नुसार 19 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.2 यांनी नि.क्र.11 नुसार लेखीउत्तर प्राथमीक आक्षेपासह, नि.क्र.12 नुसार 9 झेरॉक्स दाखल केले. गैरअर्जदार 1 व 3 ला अनुक्रमे नि.क्र.8 ब प्रमाणे व नि.क्र. 8 अ प्रमाणे नोटीस तामील होऊनही हजर झाले नाही व लेखीउत्तर दाखल केले नाही, त्यामुळे नि.क्र.1 वर दि.20.12.2012 ला गैरअर्जदार क्र.1 व 3 चे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
3. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.11 नुसार प्राथमीक आक्षेपासह दाखल केलेल्या लेखीउत्तरात नमूद केले की, अर्जदार व गैरअर्जदार याचे दरम्यान कधीही ग्राहक नाते नव्हते. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 चे बॉन्डमध्ये पैसे गुंतविले होते व ही रक्कम नियमाप्रमाणे अर्जदाराने परत घ्यायची होती. अर्जदार व गैरअर्जदार यांचे दरम्यान व्यवहार मुंबई येथे झालेला आहे. अर्जदार कुठे राहतो हे केस दाखल करण्याकरीता कारण होवून शकणार नाही. मंचाचे अधिकार क्षेञात कोणताही व्यवहार झालेला नाही. यामुळे केस प्राथमीक दृष्टया खारीज होण्यास पाञ आहे. गैरअर्जदाराने लेखी बयाणात पुढे असे नमूद केले आहे की, अर्जदारानेरुपये 20,800/- मुंबई येथे भरणा केले हे अर्जदाराने दाखल केलेल्या पावतीवरुन स्पष्ट होते. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 चे नागपूर येथील केंद्रावर बॉन्डकरीता अर्ज दिला. पहिल्या पाच वर्षात म्हणजेच 15.7.2001 रोजी बॉन्ड संपुष्ठात आणल्यास बॉन्डची मुख्य किेंमत रुपये 11,000/- होती. नियमानुसार ज्या बॉन्डधारकांनी बॉन्डची रक्कम परत घेतली नाही ती रक्कम गैरअर्जदारक्र.1 कंपनीला स्वतःजवळ ठेवता येत नाही व भारत सरकारचे कंपनी अफेअर मंञालयाकडे जा करावी लागते. गैरअर्जदारक्र.1 कपंनीने त्यांच्याकडे उचल न केलेल्या बॉन्डची शिल्लक रक्कम आय.सी.आय.सी.आय.बॅंकेचे डिमांड ड्रॉफटव्दारे मंञालयाकडे भरणा केली आहे. गैरअर्जदार क्र.1 कंपनीने अर्जदाराची रक्कम सुध्दा भरणा केली असून त्याची यादी केंद्र सरकारकडे जमा केली असून अर्जदाराचा अनुक्रमांक 62 वर दाखल आहे. गैरअर्जदारक्र.1 कपंनीने 1996 मध्ये काढलेले बॉन्ड असुरक्षीत केव्हाही परत घेता येणारे बॉन्ड असून हे बॉन्ड प्रॉमिसरी नोटचे रुपात होते. रुपये 2,00,000/- मुख किंमत असलेले हे बॉन्ड नाममाञ रुपये 5,200/- अर्ज करणा-या बॉन्डधारकाला देण्यात आले व 25 वर्षानंतर या बॉन्डची किंमत रुपये 2,00,000/- होणार होती. अर्जदाराची बॉन्डची एकूण किंमत रुपये 41,634/’ केंद्रीय सरकारकडे नियमाप्रमाणे जमा करण्यात आली आहे. कंपनी कायद्याचे कलम 205 (क) नुसार आता अर्जदाराला गैरअर्जदार कंपनीकडून ही रक्कम मागण्याचा अधिकार नाही. अर्जदाराने कोणतेही कारण नसतांना गैरअर्जदाराविरुध्द खोटी केस विद्यमान न्यायालयाचे कार्यक्षेञ नसतांनाही दाखल केली आहे. यामुळे, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 ला कलम 26 अन्वये रुपये 10,000/- नुकसान भरपाई दाखल द्यावे असा आदेश अर्जदाराविरुध्द पारीत करण्यात यावा.
4. अर्जदाराने नि.क्र.17 नुसार शपथपञ, नि.क्र.20 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.18 नुसार पुरसीस व नि.क्र.21 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयाण, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
(2) सदर तक्रार मंचाच्या अधिकार क्षेञात आहे काय ? : नाही.
(4) अंतिम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडून निर्माण केलेले बाऊन्डस गैरअर्जदार क्र.2 चे माध्यमातून खरेदी करण्याकरीता दि.5.7.1996 ला बाऊन्डस खरेदी करण्याकरीता अर्ज करुन रक्कम रुपये 20,800/- जमा केले. त्याबदल्यात गैरअर्जदाराने रुपये 5200/- प्रमाणे 4 बाऊन्डस सर्टीफीकेट क्र. 5968, 5969, 5970, 5971 यानुसार अर्जदारास दिले, ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असून अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत असे सिध्द होत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
5. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांची शाखा व कार्यालय मुंबई मध्ये आहे. तसेच अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून वर नमूद असलेल्या बॉन्डची खरेदी नागपूर मध्ये केली होती, ही बाब अर्जदाराने नि.क्र.17 वर दाखल शपथपञाचे परिच्छेद क्र.3 मध्ये मान्य केलेली आहे. दि.5.6.1996 रोजी अर्जदार नागपूर मध्ये राहात होते व सदर बॉन्ड खरेदीकरीता अर्जदाराने नागपूर येथे गैरअर्जदाराकडे पैसे देण्यात आले. तसेच, गैरअर्जदाराने काढलेल्या बॉन्डवर अर्जदाराचा पत्ता नागपूर येथील दर्शविला आहे. अर्जदार व गैरअर्जदारांमध्ये सदर तक्रार दाखल करण्याचे कारण चंद्रपूर येथे न घडल्यामुळे सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 11 (2) प्रमाणे या मंचाच्या अधिकार क्षेञात येत नसल्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
6. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन अंतिम आदेश पारीत करण्ण्यात येत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
(2) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(3) आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 3.12.2014