द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. तक्रारदाराचे कथन थोडक्यात खालीलप्रमाणेः- त्याने विरुध्द पक्षाच्या सदोष सेवे संदर्भात बँकींग ओंबुडसमन द्वारा आर.बी.आय वरली, मुंबई यांचकडे तक्रार केली होती. त्यांनी अतिशय विलंबाने या तक्रारीबाबत त्याला दि.05/06/2008 रोजी कळविले व असमाधानकारक उत्तर पाठविले. त्याच्या नुकसान भरपाई मागणीचा विचार केला गेला नाही. त्यामुळे प्रार्थनेत नमुद केल्यानुसार विरुध्द पक्षाने त्याला रु.1,00,000/- नुकसान भरपाई द्यावी. बँकींग ओंबुडसमन यांनी त्याच्या आरोपा संदर्भात परत चौकशी करावी तसेच विरुध्द पक्षाला शिक्षा करण्यात यावी अशा आशयाचा आदेश मंचाने पारित करावा असे त्याचे म्हणणे आहे. निशाणी 2 अन्वये प्रतिज्ञापत्र, निशाणी 3(1) ते 3(7) अन्वये दस्तऐवज दाखल करण्यात आलेत. या कागदपत्रात प्रामुख्याने बँकींग ओंबुडसमन यांचे पत्र ... 2 ... (त.क्र.398/2009) दि.05/06/2008, दि.04/08/2008, आर.बी.आय चे पत्र दि.16/10/2008, तक्रारदाराचे ओंबुडसमनला लिहिलेले पत्र दि.20/05/2008, आर.बी.आय मुंबई यांचे माहितीच्या अधिकाराखाली अपील क्र.45/2008 यातील आदेश, आर.बी.आय यांचे दि.08/07/2008चे पत्र तसेच दि.05/06/2008चे पत्र, विरुध्द पक्षाचे दि.07/04/2008 व दि.25/04/2008 चे पत्र यांच्या प्रतींचा समावेश आहे. 2. विरुध्द पक्षाने निशाणी 6 अन्वये लेखी जबाब दाखल केला. तसेच निशाणी 7 अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्याचे म्हणणे थोडक्यात खालील प्रमाणे- तक्रार चुक व खोटी आहे. तक्रारीतील मचकुर मोघम स्वरुपाचा आहे. आर.बी.आय व बँकींग ओंबुडसमन मुंबई यांचे विरुध्द त्याच्या आरोपांची दिशा आहे व ते या प्रकरणी पक्षकार नाहीत. विरुध्द पक्षाची कोणतीही चुक नसल्याने खार्चासह खारीज करण्यात यावी असे त्यांचे म्हणणे आहे. तक्रारदाराने निशाणी 9 अन्वये प्रतीउत्तर दाखल केले. विरूध्द पक्षाने लेखी युक्तीवाद सादर केला. 3. उभय पक्षाच्या म्हणण्यांचा मंचाने विचार केला तसेच कागदपत्रांचे अवलोकन केले त्या आधारे खालील मुद्दांचा विचार केला तसेच खालील मुद्दांचा विचार करण्यात आला. 1.विरुध्द पक्ष तक्रारदाराला पुरविलेल्या त्रृटीसाठी जबाबदार आहे का? नाही. 2.तक्रारदार विरुध्द पक्षाकडुन नुकसान भरपाई व न्यायिक खर्च मिळणेस पात्र आहे काय? नाही. स्पष्टीकरण मुद्दा क्र. 1 व 2- मुद्दा क्र. 1 व 2 चे संबंधित विचार केला असता असे आढळते की तक्रारदाराची तक्रार ही पुर्णपणे संदिग्ध व मोघम स्वरुपाची आहे. विरुध्द पक्षाने त्याला कोणत्याबाबतीत व कशा प्रकारे सदोष सेवा दिली याचे स्पष्ट वर्णन तक्रारदाराने दिलेले नाही. त्याने विरुध्द पक्षाला काही योजनांच्या संदर्भात माहिती विचारली होती ती दिली नाही अशा आश्याचा मचकुर त्यांने लिहिला आहे. मात्र तो अतिशय मोघम स्वरुपाचा असल्याने त्याबाबत निश्चित कल्पना येत नाही. विरुध्द पक्षाने आपल्या जबाबात हीच बाब नमुद केलेली आहे. मंचाच्या असे ही निदर्शनास येते की त्याने सदर प्रकरण दाखल करण्यापुर्वी बँकींग ओंबुडसमन व आर.बी.आय यांचेकडे विरुध्द पक्षाचे तक्रारीसंदर्भात अर्ज ... 3 ... (त.क्र.398/2009) दाखल केले होते. तेसच माहितीच्या अधिकाराखाली देखील अर्ज केला होता. उपरोक्त विवेचनाच्या आधारे हे मंच या निष्कर्षाप्रत आला आहे की तक्रारदाराच्या मोघम तक्रारीच्या आधारे विरुध्द पक्षाला दोषपुर्ण सेवेसाठी जबाबदार आहे असे म्हणता येत नाही. स्वाभाविकपणे विरुध्द पक्ष हा सदोश सेवेसाठी जबाबदार नसल्याने तक्रारदार त्यांचे कडुन प्रार्थनेत मागणी केल्याप्रमाणे नुकसान भरपाई अथवा न्यायिक खर्च मिळण्यास पात्र नाही. सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो- अंतीम आदेश 1 तक्रार क्र.398/2009 खारीज करण्यात येते. 2.खर्चाचे वहन उभय पक्षांनी स्वतः करावे.
दिनांक – 01/11/2010 ठिकाण - ठाणे
(ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |