तक्रार क्रमांक – 378/2009 तक्रार दाखल दिनांक – 29/05/2009 निकालपञ दिनांक – 01/07/2010 कालावधी - 01 वर्ष 01 महिने 02 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर सौ. प्रतिभा प्रकाश अय्यर रा.ए/9, श्री.पौर्णीमा को.ऑप.हौ.सो. नामदेववाडी, पांचपाखाडी, ठाणे 400602 .. तक्रारदार विरूध्द मॅनेजर, आय.सी.आय.सी.आय बँक, राम मारुती रोड, ठाणे शाखा, ठाणे(पश्चिम). .. सामनेवाला
समक्ष - मा. श्रीमती. शशिकला श. पाटील – अध्यक्षा मा. श्रीमती भावना पिसाळ - सदस्या मा. श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल श्रीमती. एस.एस.पटारे प्रकाश पवार वि.प तर्फे वकिल श्री. ए.पी.गोगटे आदेश (पारित दिः 01/07/2010 ) मा.श्री.पी.एन.शिरसाट – सदस्य यांचे आदेशानुसार 1. सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार कलम 2(1)(डी) अन्वये दाखल केली असुन त्यातील कथन संक्षिप्तपणे खालीलप्रमाणेः- तक्रारकर्ती हि ठाणे महानगर पालिकेमध्ये नोकरी निमित्त कार्यरत आहे. तक्रारकर्तीचा मासिक पगार विरुध्द पक्षकाराचे बँकेतील खाते क्र.003501022866 जमा होतो व रक्कम काढण्यासाठी त्यांना एटीएम कार्ड देण्यात आले होते ते खराब झाल्यामुळे ते निरुपयोगी झाले. पुन्हा एटीएम कार्ड देता येत नाही असे कारण सांगुन तक्रारकर्तीस डेबिट कार्ड दिले त्याचा नंबर 4667060035626152 असा आहे. त्याप्रित्यर्थ तक्रारकर्तीकडुन रु.99/- वर्षिक रक्कम वसुल केली. विरुध्द पक्षकार हे बँक्रिग सेवा पुरविणेचे काम करतात तक्रारकर्ती त्यांची ग्राहक आहे. दि.29/05/2006 रोजी मंगलोर येथील कुल्याडीकर्स नुतन सिल्क यांचे दुकानातुन रु. 3,080/- च्या साडया खरेदी केल्या. व्यवहाराप्रित्यर्थ तक्रारकर्तीने दुकानदारास डेबिट कार्ड दिले. दुकानदाराने 3 वेळा ते कार्ड मशिनमध्ये स्विप केले. परंतु डेबिट कार्ड मध्ये खराबी (fault) असल्यामुळे कार्ड स्विप होत नसल्याची तक्रार दुकानदाराने तक्रारकर्तीकडे केली व त्यासंबंधी रोख रक्कम देण्यास फर्माविले. तक्रारकर्तीने तेथील एटीएम सेंटरमधुन रु.3,080/- .. 2 .. एवढी रक्कम काढुन दुकानदारास दिली. त्यासंबंधी दुकानदाराने साडी रोख खरेदी करण्यासाठी रु.3,080/- ची खरेदीसंबंधी पावती दिली. तक्रारकर्ती दि.01/06/2006 रोजी ठाणे येथे आली असता बँकेचे मिनी स्टेटमेंटवर रु.9,240/- म्हणजेच रु.3,080/-, 3 वेळा तक्रारकर्तीच्या एटीएम खात्यातून रक्कम वजा करण्यात आली. तक्रारकर्तीला एवढी मोठी रक्कम जाणुन बुजुन खात्यातुन बजा केल्यामुळे मानसिक व शारिरीक धक्का बसला व त्यासंबंधी तक्रार दि.09/06/2006 रोजी श्री.मेनन बँकेचे अधिकारी यांचेकडे केली. त्यांनी 8 दिवसात कळविणार असे सांगुन जास्त वेळ लोटला तरीही त्यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे दुसरी तक्रार चांदिवली मुंबई 400072 येथे दि. 17/6/2006 रोजी दिले. तेथील श्री. मेनन यांनी 8 दिवसात उत्तर दिले नाही. असे आश्वासन दिले नाही परंतु उत्तर दिले नाही. पुन्हा तक्रारकर्ती त्यांचे पतिसोबत दि.27/11/2006 रोजी चांदिवली, मुंबई येथे तक्रार केली परंतु त्यांनीही कोणतेही उत्तर दिले नाही. तक्रारकर्तीला सदर कामासाठी ब-याच वेळा सुट्टी घ्यावी लागली, मनस्ताप झाला व होत आहे. त्यांची तक्रार तक्रारकर्तीने मंचामध्ये दाखल केली व कथन केले की तक्रारीचे कारण दि. 09/06/2006 रोजी घडले व सतत घडत आहे. सदरची तक्रार चालविण्याचे व निर्णयीत करण्याचे अधिकारक्षेत्र या मंचास आहेत. तक्रारकर्तीची प्रार्थना खालील प्रमाणेः- 1.तक्रारकर्तीच्या डेबिट कार्ड वरुन वजा केलेली रक्कम रु.3,080/- 18% द.सा.द.शे व्याजासह विरुध्द पक्षकाराने परत करावी. 2.विरुध्द पक्षकाराने तक्रारकर्तीस रु.50,000/- शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई द्यावी. 3. विरुध्द पक्षकाराने तक्रारकर्तीस रु.50,000/- मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई द्यावी. 4.विरुध्द पक्षकाराने तक्रारकर्तीस रु.10,000/- तक्रारीचा खर्च द्यावा. 5. इतर योग्य व न्याय्य हुकुम तक्रारकर्तीचे लाभात व्हावेत.
2. वरील तक्रारीची नोटीस निशाणी 5 वर विरुध्द पक्षकारास पाठविली. विरुध्द पक्षकाराचे वकिलपत्र निशाणी 6 वर दाखल निशाणी 7 वर लेखी जबाब दाखल करण्यास वेळ मिळण्याचा विनंती अर्ज दाखल. निशाणी 8 वर पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल. निशाणी 9 वर लेखी जबाब दाखल केले. तक्रारदाराने निशाणी 10 वर प्रतिज्ञेवर प्रत्युत्तर दाखल केले. निशाणी 11 वर कागदपत्रे दाखल केले व निशाणी 12 वर लेखी युक्तीवाद दाखल. विरुध्द पक्षकाराने निशाणी 13 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. विरुध्द पक्षकाराचे लेखी जबाब व लेखी युक्तीवाद कथन खालील प्रमाणेः- तक्रार खोटी, खोडसाळ, तापदायक असुन या मंचात तथ्याच्या आधारावर चालण्यासारखी नाही. तक्रार दुष्ट हेतुन दाखल केली असुन विरुध्द पक्षकाराकडुन बेकायदेशीररित्या पैसे उकळण्यासाठी दाखल केली आहे. .. 3 .. तक्रारकर्तीने महत्वाचे मुद्दे मंचाकडुन दडवुन/लपवुन ठेवले आहेत. तक्रारकर्तीने डेबिट कार्ड स्विप करुन तिच्या खात्यातून जास्तीची रक्कम वसुल केली. त्या अर्थी तक्रारीचे कारण दि.29/05/2006 रोजी घडले व तक्रार दि. 29/06/2009 रोजी दाखल केली. त्याअर्थि तक्रारीला मुदतीच्या सिमेच्या बाहेर असल्यामुळे तक्रार रद्द ठरवावी. या एकाच मुद्दावर तक्रार रद्द ठरवावी गुणदोषावर विचार करण्याची आवश्यक्ता नाही. दुकानदाराने ज्या मशिनवरुन डेबिट कार्ड स्विप केले ते व्यवस्थित नव्हते किंवा व्यवस्थीत कार्य करीत नव्हते किंवा डेबिट कार्ड व्यवस्थितपणे हाताळले नाही असे जर आहे तर तक्राकर्तीने त्याच डेबिट कार्ड वरुन नंतर एटीएम मशिनवरुन कसेकाय रुपये काढले? याचा अर्थ डेबिट कार्ड मध्ये काहीच दोष नव्हता व नाही तक्रार खोटी व बनावट आहे. तक्रारकर्तीचे कोणतेही नुकसान झाले नाही त्यामुळे नुकसान भरपाई मागण्यास तक्रारकर्ती पात्र नाही. म्हणुन तक्रार रद्द ठरवुन त्याची भरपाई विरुध्द पक्षकारास द्यावी.
3. या तक्रारीसंबधी तक्रारकर्तीने 1.डेबिट कार्डची प्रत. 2.मंगलोर येथील कुल्याडीकर्स नुतन सिल्कच्या बिलांची प्रत, 3. डेबिट काडे मधुन रु.3,080/- वजा केल्याचे विवरणपत्र, 4.विरुध्द पक्षकाराबरोबर केलेला पत्रव्यवहाराचा लेखा जोखा, तसेच प्रत्युत्तर प्रतिज्ञापत्र व लेखी युक्तीवाद तसेच विरुध्द पक्षकाराने दाखल केलेले लेखी जबाब, प्रतिज्ञापत्र, लेखी युक्तीवाद. इत्यादी सर्व कागदपत्रांचा सुक्ष्मरितीने पडताळणी व अवलोकन केले असता न्यायिक प्रक्रियेसाठी एकमेव मुद्दा उपस्थित होतो तो खालीलप्रमाणेः- अ) विरुध्द पक्षकाराने सेवेमध्ये त्रृटी, न्युनता, बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा केला हे तक्रारदार सिध्द करु शकले काय? उत्तर – नाही.. कारण मिमांसा अ)स्पष्टिकरणाचा मुद्दा - तक्रारकर्तीच्या तक्रारीवरुन एक गोष्ट स्वयंस्पष्ट आहे की, तक्रारदार हि विरुध्द पक्षकाराची ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार कलम 2(1)(डी) नुसार ग्राहक आहेत. विरुध्द पक्षकाराने तक्रारकर्तीस डेबिट कार्ड बहाल केले व त्याप्रित्यर्थ रु.99/- एवढी रक्कम तक्रारकर्तीकडुन स्विकारली त्या आर्थि उभयपक्षकारामध्ये प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रक्ट होता व आहे व त्यासंबंधी उभयतामध्ये कन्सिडरेशनही झाले होते व आहे. त्याआर्थि विरुध्द पक्षकार आवश्यक ति सेवा तक्रारकर्तीस पुरविण्यास बांधील ठरतात. परंतु दि.29/05/2006 च्या मँगलोर येथील कुल्याडीकर्स नुतन सिल्क यांचे दुकानातुन रु.3,080/- च्या साडया खरेदी केल्या तेव्हा दुकानदाराने तक्रारकर्तीचे डेबिट कार्ड 3 वेळा स्विप केले. परंतु कोणताही व्यवहार सफल झाला नाही कारण मशिनमध्ये दोष असावा? नंतर तक्रारकर्तीने एटीएम मशिनवरुन रु.3,080/- काढले व दुकानदारास दिले. परंतु नंतर तक्रारकर्ती दि.01/06/2006 रोजी ठाणे येथे आल्यानंतर बँकेचे अकाऊन्ट स्टेटमेंट मिळाले त्या स्टेटमेंटवर रु.9240/- एवढी रक्कम वजा खात्यात दाखविली. त्यामुळे तक्रारकर्ती दुःखी झाली व तिने विरुध्द पक्षकाराकडे 3 वेळा लेखी व मौखिक तक्रारी केल्या परंतु काहीही फायदा झाला नाही. म्हणुन .. 4 .. तक्रारकर्तीने दि.29/05/2009 रोजी तक्रारीच्या परिमार्जणासाठी मंचामध्ये तक्रार दाखल केली. मंचाचे मते तक्रारकर्तीने मॅगलोर येथे दि.20/05/2006 रोजी साडया खरेदी केल्या. मशिनमध्ये फरक/दोष निघाला म्हणुन लेखा विवरणावर जास्तीची रक्कम रु.9,240/- दाखविली. त्याची तक्रार दि.09/06/2006 रोजी केली दुसरी तक्रार दि.17/06/2006 राजी केली व तिसरी तक्रार दि. 27/11/2006 राजी केली. त्याची तक्रार जेव्हा कारण घडले तेव्हापासुन मुदतिच्या कायद्यानुसार 2 वर्षाचे कालावधीच्या आत दाखल करणे आवश्यक होते व आहे. तक्रारकर्तीने तक्रार 2 वर्षाचे मुदतीचे आत दाखल न केल्यामुळे तक्रारीला मुदतिच्या कायद्याचा बाधा येत आहे असे या मंचास वाटते. या ठिकाणी खालील गोष्टी महत्वाचा वाटतात. LAW HELPS TO THOSE WHO ARE VIGILENT ABOUT THEIR RIGHTS. TIME AND TIDE WAITS FOR NOBODY. शेवटची तक्रार दि.27/11/2006 रोजी केली असल्यामुळे नियमाप्रमाणे/कायद्याप्रमाणे तक्रारकर्तीने 2 वर्षाची मुदत दि.27/11/2008 पर्यंत तक्रार करावयास पाहिजे होती परंतु तक्रार दिनांक 29/05/2009 रोजी केल्यामुळे उशिराच्या कारणास्तव तक्रार रद्दबातल ठरविण्याच्या पात्रतेची आहे. सबब हे मंच खालील आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश 1. तक्रार क्र. 378/2009 हि रद्दबातल ठरविण्यात येत आहे. 2.खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत. 3.या आदेशाची सांक्षांकित प्रत उभय पक्षकारास त्वरीत द्यावी.
दिनांक – 01/07/2010 ठिकाण - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|