नि. १५
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २३२८/२००९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २१/१२/२००९
तक्रार दाखल तारीख : ३०/१२/२००९
निकाल तारीख : २७/१२/२०११
----------------------------------------------------------------
महमदसी शरीफ अब्दुल सत्तार मुल्ला,
वय वर्षे सज्ञान, धंदा – नोकरी
रा.रेहमत मंझील, गणेशनगर, काळे प्लाट,
सुबाना स्टोअर्स जवळ, सांगली
ता.मिरज जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. शाखा मॅनेजर,
आय.सी.आय.सी.आय.बॅंक
कार्यालय राममंदिर कॉर्नर जवळ, सांगली
२. शाखा मॅनेजर,
आय.सी.आय.सी.आय. बॅंक
कार्यालय आय.सी.आय.सी.आय. बॅंक,
कोल्हापूर .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.पी.एम.मैंदर्गी
जाबदार क्र.१ व २ : एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपले कर्जप्रकरणाबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ यांच्या गृहकर्ज विभागामध्ये घरबांधणीसाठी कर्ज मिळू शकेल का याची विचारणा केली असता जाबदार यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हांस कर्ज मिळेल असे सांगितले. तसेच तक्रारदार यांना कोणकोणती कागदपत्रे लागतील याची यादी दिली व रक्कम रु.२,७५५/- चा धनाकर्ष जाबदार बॅंकेच्या नावे काढण्यास सांगितला. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन तक्रारदार यांनी जाबदार बॅंकेच्या नावे दि.१७/३/२००६ रोजी डिमांड ड्राफ्ट काढला. सदरची रक्कम जाबदार बॅंकेस मिळाली. रक्कम मिळाल्यानंतर जाबदार यांनी तक्रारदार यांना कर्जपुरवठा करण्याची सेवा देण्याचे मान्य व कबूल केले. त्यानंतर काही दिवसांनी तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ यांना कर्जप्रकरणाबाबत विचारणा केली असता तुमचे प्रकरण लवकरच मंजूर होईल, एक महिन्यानंतर या असे सांगितले. एक महिन्यानंतर तक्रारदार विचारणा करण्यासाठी गेले असता जाबदार क्र.१ यांनी जाबदार बॅंकेचे सर्व व्यवहार जाबदार क्र.२ मार्फत सुरु झाले आहेत, तुम्ही कोल्हापूर शाखेशी संपर्क साधा असे सांगितले. तक्रारदार यांनी त्यानंतर जाबदार बॅंकेमध्ये अनेक हेलपाटे घातले. तथापि, जाबदार हे तक्रारदार यांना त्यांची कायदेशीर रक्कम देण्यास टाळाटाळ करु लागले. तक्रारदार यांनी जाबदार यांना दि.१७/१/२००९ रोजी पत्र देवून मागणी केली. त्यास जाबदार यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. जाबदार क्र.१ यांचे सूचनेनुसार तक्रारदार यांनी कोल्हापूर शाखेशी संपर्क साधला असता जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार यांना आमचा काहीच संबंध नाही, तुम्हा सांगली शाखेकडे चौकशी करा असे कळविले. जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार हे चौकशीसाठी गेले असता अपमानास्पद वागणूक दिली. त्यानंतर तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ व २ यांना रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवून रकमेची मागणी केली असता जाबदार बॅंकेने त्यास कोणतेही उत्तर दिले नाही व तक्रारदार यांची रक्कमही दिली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज स्वीकारलेली रक्कम रु.२,७५५/- व्याजासह परत मिळावी व शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ३ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांना नोटीस पाठवूनही ते याकामी हजर न झाल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
४. तक्रारदार यांनी नि.१३ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे तसेच नि.१४ ला तोंडी युक्तिवाद करणेचा नाही अशी पुरशिस दाखल केली आहे.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, सोबतचे शपथपत्र, दाखल कागदपत्रे व लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. तक्रारदार तर्फे नि.५/१ वर कर्जखात्याचा उतारा दाखल केला आहे. सदर उता-यावर कर्ज मंजूर केले आहे, परंतु वितरित केलेचे दिसून येत नाही. सदर उता-यावरुन तक्रारदार यांचेकडून दि.१७/३/२००६ रोजी रक्कम रु.२,७५५/- जमा करुन घेतलेचे दिसून येते. सदरची रक्कम तक्रारदार यांचेकडून कशासाठी घेतली ही बाब नमूद केली नाही. तक्रारदार यांना कर्ज मंजूर करुन वितरित का केले नाही याबाबतचा कोणताही खुलासा जाबदार यांनी केलेला नाही. तक्रारदार यांनी त्याबाबत दि.१७/१/२००९ रोजी जाबदार बॅंकेकडे अर्ज दिला आहे. सदर अर्ज जाबदार यांना प्राप्त झाला आहे. सदर अर्जामध्ये तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे रक्कम रु.२,७५५/- जमा केल्याचे नमूद केले आहे व गृहकर्जाबाबत काहीही कळविले नाही असेही नमूद केले आहे. तक्रारदार यांचेकडून रक्कम स्वीकारुन जाबदार यांनी सदर कर्जाबाबत काय कार्यवाही केली याबाबत तक्रारदारांना काहीही कळविलेले नाही. प्रस्तुत तक्रारअर्जाचे कामीही जाबदार उपस्थित झालेले नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांचेकडून कर्जप्रकरणासाठी रक्कम रु.२,७५५/- स्वीकारुन सदरचे कर्ज मंजूर झाले अथवा नाही याबाबत तक्रारदार यांना वारंवार पाठपुरावा करुनही काहीही न कळविणे हे जाबदार यांच्या सदोष सेवेचे द्योतक आहे. जाबदार यांनी याकामी आपले कोणतेही म्हणणे दाखल केलेले नाही, त्यामुळे त्यांचेविरुध्द प्रतिकूल निष्कर्ष काढून तक्रारदार यांनी मागणी केलेली रक्कम व्याजासह अदा करणेबाबत आदेश करणे योग्य ठरेल असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी रक्कम दि.१७/३/२००६ रोजी जाबदार यांचेकडे जमा केली आहे ही बाब विचारात घेता सदरची रक्कम दि.१७/३/२००६ पासून व्याजासह मंजूर करण्यात येत आहे.
६. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारअर्जामध्ये प्रस्तुत तक्रारअर्ज दाखल करण्यास विलंब झाला आहे असे मत झाल्यास विलंब माफ करुन मिळावा अशी मागणी केली आहे. वस्तुत: तक्रारदार यांच्या कर्जप्रकरणाबाबत जाबदार यांनी तक्रारदारांना वेळेत काहीही कळविलेले नाही. तक्रारदार यांनी दिलेल्या पत्रास व नोटीशीस जाबदार यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही अथवा तक्रारदार यांची रक्कम अथवा कर्ज देण्यास स्पष्टपणे नकार दिला नाही त्यामुळे प्रस्तुत तक्रारअर्जास मुदतीची बाधा येणार नाही असे या मंचाचे मत आहे.
७. तक्रारदार यांनी शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांचे कर्जप्रकरणाबाबत रक्कम स्वीकारुनही जाबदार यांनी तक्रारदार यांना काहीही कळविलेले नाही. तक्रारदार यांच्या तोंडी व लेखी मागणीकडे दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे तक्रारदार यांना सदर मंचामध्ये धाव घ्यावी लागली, ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणेत येत आहे.
८. प्रस्तुतचा तक्रारअर्ज तक्रारदार यांनी जाबदार यांच्या सांगली व कोल्हापूर येथील शाखा व्यवस्थापक यांचेविरुध्द दाखल केला आहे. वस्तुत: कोल्हापूर येथील शाखेचा तक्रारदार यांच्या कर्जप्रकरणाशी कोणताही संबंध दिसून येत नाही. त्यामुळे प्रस्तुतचा आदेश हा केवळ जाबदार क्र.१ सांगली शाखेविरुध्द करण्यात येत आहे. तक्रारदार यांनी जरी तक्रारअर्जामध्ये शाखा मॅनेजर आय.सी.आय.सी.आय. बॅंक यांचेविरुध्द तक्रारअर्ज दाखल केला असला तरी प्रस्तुतचा आदेश हा वैयक्तिक मॅनेजर यांचेविरुध्द न करता जाबदार क्र.१ शाखेविरुध्द करण्यात येत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
२. तक्रारदार यांना जाबदार नं.१ आय.सी.आय.सी.आय. बॅंक, शाखा सांगली यांनी रक्कम रु.
रुपये २,७५५/-(अक्षरी रुपये दोन हजार सातशे पंचावन्न माञ) दि.१७/३/२००६
पासून द.सा.द.शे.९% दराने व्याजासह अदा करावेत असा जाबदार यांना आदेश करण्यात
येतो.
३. तक्रारदार यांना जाबदार नं.१ आय.सी.आय.सी.आय. बॅंक, शाखा सांगली यांनी शारीरिक
मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये ३,०००/- (अक्षरी
रुपये तीन हजार माञ) अदा करावेत असा जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.१ आय.सी.आय.सी.आय. बॅंक, शाखा सांगली यांनी
दिनांक १२/२/२०१२ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार नं.१ आय.सी.आय.सी.आय. बॅंक, शाखा सांगली यांनी आदेशाची पुर्तता विहीत
मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद
मागू शकतील.
सांगली
दिनांकò: २७/१२/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११