निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या, ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे. 2. तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडून दोन व्यक्तीगत कर्ज खालील प्रमाणे घेतले होते. i) वैयक्तीक कर्ज रु.25,890/-(फाईल क्र.996248)दि.15.2.2006 ii) वैयक्तीक कर्ज रु.65,000/-(फाईल क्र.2057570)दि.डिसेंबर,2006 क्रमांक 1 चे वैयक्तीक कर्ज 24 हप्त्यामध्ये मार्च, 2006 ते फेब्रृवारी 2008 पर्यत फेडावयाचे होते व क्रमांक 2 चे वैयक्तीक कर्ज 36 हप्त्यामध्ये जानेवारी, 2009 फेडायचे होते. क्र.1 च्या वैयक्तीक कर्जावर रु.6,213.58 येवढा येवढी व्याज रक्कम द्यावी लागणार होती तर क्र.2 च्या वैक्तीगत कर्जावर रु.15,600.06 येवढी व्याज रक्कम द्यावी लागणार होती. म्हणून एकंदर वैयक्तीक कर्जाची रक्कम रु.32,103.58 येवढी रक्कम द्यावी लागणार होती. तर क्र.2 चे वैक्तीगत कर्जाची एकूण रक्कम रु.80,600.06 येवढी रक्कम द्यावी लागणार होती. 3. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, वरील व्याजाची रक्कम ही एकाच क्रेडीट कार्डमधून भरले जात होती. व त्यांचे पुढे असे म्हणणे आहे की, या व्याजाची रक्कम ते नियमितपणे फेडत होते व बँकेकडून क्रेडीट कार्डाचा तपशिल त्यांना दर महिन्यास मिळत होता. 4. तक्रारदारांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांनी पहील्या क्रमांकाचे वैयक्तीक कर्ज नियमितपणे फेडले व त्यानुसार त्यांचे खाते बंद करण्यात आले. 5. तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, तक्रारदारांनी क्रमांक 2 च्या वैयक्तीक कर्जावर पहिल्यापासूनच कराराप्रमाणे ठरलेल्या व्याज रक्कमेपेक्षा अधिक वयाज रक्कम आकारत आले. तक्रारदारांनी अशी एकूण रु.37,976/- येवढी रक्कम करारानुसार ठरलेल्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम सा.वाले यांचेकडे भरली. 6. त्यांचे पुढे असेही म्हणणे आहे की, त्यांनी या वैयक्तीक अर्जाची रक्कम ही फेब्रुवारी 2008 पर्यत म्हणजेच 14 महिन्यात पूर्णपणे फेडले तरीही सा.वाले यांनी तक्रारदारांकडून कर्जफेडीची मागणी वारंवार करु लागले. व शेवटी वसुली अधिका-यांकडून मागणीसाठी त्रास देवू लागले. 7. म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल करुन खालील प्रमाणे मागण्या केल्या. 1) सा.वाले यांनी तक्रारदारांना भरलेली अधिकची व्याज रक्कम परत द्यावी. 2) सा.वाले यांनी 36 महिन्यात फेडावयाचे कर्ज 14 महिन्यात फेडल्याने त्या रक्कमेवरील व्याज रक्कम रु.10,400/- द्यावी. 3) भरलेली अधिकची व्याज रक्कम व आगाऊ कर्जाची परत फेड केल्याने त्यावरील व्याज असे एकूण रु.10,470/- सा.वाले यांनी तक्रारदारांना द्यावे. 4) सा.वाले यांना संपर्क साधण्यासाठी आलेल्या खर्चाची रक्कम रु.2,315/- परत द्यावी. 5) नुकसान भरपाई रु.50,000/- द्यावी. 8. तक्रार अर्जास हजर राहून उत्तर दाखल करावे अशी मंचाकडून नोटीस सा.वाले यांना पाठविण्यात आली. सा.वाले यांना ही नोटीस "NOT KNOWN व REFUSED " म्हणून परत आली. परत आलेली नोटीस अभिलेखावर दाखल आहे. म्हणून मंचाने सा.वाले यांचे विरुध्द तक्रार अर्ज एकतर्फा निकाली काढण्यात यावा असा आदेश दिला. 9. तक्रार अर्ज व त्या सोबत जोडण्यात आलेली अनुषंगीक कागदपत्रांची पडताळणी करुन पाहीले असता तक्रार निकालासाठी खालील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र.. | मुद्दे | उत्तर | 1 | तक्रारदार सा.वाले यांच्या सेवेतील कमतरता सिध्द करतात काय ? | नाही. | 2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रार अर्जात नमुद केलेल्या मागण्या मागण्यास पात्र आहेत काय ? | नाही. | 3. | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 10. तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडून दोन व्यक्तीगत कर्ज खालील प्रमाणे घेतले होते. i) वैक्तीगत कर्ज रु.25,890/-(फाईल क्र.996248) दि.15.2.2006 ii) वैक्तीगतकर्ज रु.65,000/-(फाईल क्र.2057570)दि.डिसेंबर,2006 या दोन वैक्तीगत कर्जाचे हप्ते क्रेडीट कार्ड क्र.517653700326407 यामधून भरले जात होते. 11. तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, सा.वाले यांनी तक्रारदारांकडून क्र.2 च्या वैक्तीगत कर्जावर करारानुसार ठरलेल्या व्याज रक्कमेपेक्षा जादा व्याज रक्कम घेतली. सा.वाले यांचेकडे वारंवार मागणी करुनही घेतलेली रक्कम सा.वाले यांनी परत देण्यास नकार दिला. 12. यावर तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करुन पाहिली असता असे निदर्शनास आले की - 1) तक्रारदारांनी सा.वाले यांना कंझुमर गायडन्स अन्ड प्रोटेक्शन सोसायटी यांचेकडून नोटीस पाठविली त्यात भरलेल्या अधिक व्याज रक्कमेचे रु.48,397/- रक्कमेची मागणी केली. तर तक्रार अर्जात व्याज रक्कम रु.37,976/- अधिक भरल्याचे म्हटले आहे. व त्या रक्कमेची तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून मागणी केली आहे. तक्रारदारांनी मागणी केलेल्या रक्कमेमध्ये तफावत असल्याचे दिसून येते. म्हणजेच तक्रारदारांनी नेमकी किती अधिक रक्कम व्याज सा.वाले यांचेकडे भरले हे स्पष्ट होत नाही. 2) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत Loan agreement दाखल केले नाही. 3) क्र.2 चे रु.65,000/- रुपयाचे वैक्तीगत कर्जाचे Amortisation Schedule तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत पृष्ट क्र.15 वर दाखल केले आहे. परंतु क्र.1 चे रु.25,000/- चे वैक्तीगत कर्जाचे Amortisation Schedule तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दाखल केलेला नाही. 4) तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या पृष्ट क्र.3 वर परिच्छेद 2 मध्ये असे कथन केले आहे की, रु.25,890/- चे वैक्तीगत कर्ज 2008 पर्यत पैसे भरुन फेडले व त्याबद्दल काहीही तक्रार नाही. तक्रारदारांनी पैसे कसे व किती भरले याचा तपशिल पृष्ट क्र.7 ते 12 वर दिला आहे. परंतु तक्रारदारांनी त्या संदर्भात पैसे भरले व ते सा.वाले यांना मिळाले या बाबत कोणताही कागदोपत्री पुरवा दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार या दोनही वैक्तीगत कर्जाचे हप्ते कार्ड क्र.517653700326407 यामधून जात होते. तर तक्रारदारांनी या कार्डाचे अकौन्ट स्टेटमेंट तक्रार अर्जासोबत दाखल करणे जरुरीचे होते. परंतु तक्रारदारांनी सर्व अकौन्ट स्टेटमेंट दाखल केलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदाराचे क्र.1 चे 25,890/- चे वैक्तीगत कर्ज पूर्णपणे फीटले किंवा नाही हे स्पष्ट होत नाही. 5) तक्रारदारांचे पुढे असे म्हणणे आहे की, सा.वाले यांनी रुपये 65,000/- च्या वैक्तीगत कर्जावर प्रथम पासूनच करारानुसार ठरलेल्या व्याज रक्कमेपेक्षा अधिक व्याज आकारत होते. या वैक्तीगत कर्जाची हप्ते जानेवारी 2007 पासून ते डिसेंबर.2009 पर्यत फेडायचे होते. परंतु तक्रारदारांनी याकर्जाची सर्व रक्कम 36 महिन्यामध्ये फेडण्याऐवजी 14महिन्यामध्ये फेडली व सा.वाले यांना एकूण रु.37,576/- येवढी व्याज रक्कम अधिक दिली. तक्रारदारांचे हे म्हणणे सिध्द करण्यासाठी तक्रारदारांनी जानेवारी, 2007 पासुनचे सर्व कार्ड स्टेटमेंट दाखल करावयास हवे होते. परंतु तक्रारदारांनी सर्व स्टेटमेंट दाखल केलेले नाही. परंतु तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत ऑक्टोबर, 07 ते डिसेंबर,07 व नोव्हेंबर, 08 व मार्च, 09 चे कार्ड स्टेटमेंट दाखल केले आहे.या कार्ड स्टेटमेंटचे बारकाईने वाचन केले असता असे लक्षात येते की, तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे नियमित पेमेंट शेडयुल प्रमाणे पैसे भरलेले नाहीत. याउलट त्यांनी ढोबळ रक्कमा जमा केल्याचे दिसून येते. म्हणजेच मागील बाकी शिल्लक रहात होती. यावर सा.वाले यांनी जर व्याज आकारले तर सा.वाले यांची चुकी आहे असे म्हणता येत नाही. तसेच तक्रारदारांनी रु.65,000/- वैक्तीगत कर्ज 36 महिन्यात फेडण्याऐवजी 14 महिन्यात फेडले याबाबत कोणताही पुरावा दाखल केला नाही. 5) या उलट मार्च 2009 च्या कार्ड स्टेटमेंट वरुन असे दिसून येते सा.वाले यांचेकडे तक्रारदारांनी पर्सनल लोनचे पैसे भरले नाही. म्हणून सा.वाले यांनी क्रेडीट कार्डची सुविधा रद्द केल्याचे स्पष्ट होते. 13. वरील विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 824/2009 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबद्दल काही आदेश नाही. 6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |