Maharashtra

Satara

CC/13/05

PROMAD VASANT VIBHUTE - Complainant(s)

Versus

ICICI BANK LTD - Opp.Party(s)

02 Jun 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                                                                          मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                           तक्रार क्र. 5/2013.

                                                                                                     तक्रार दाखल दि.17-1-2013.

                                                                                                     तक्रार निकाली दि.2-6-2015. 

 

श्री.प्रमोद वसंत विभुते,

रा.77 गजानन हौसिंग सोसायटी,

पूर्व विदयानगर, ता.कराड, जि.सातारा.          ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

1. आय.सी.आय.सी.आय.बँक लि.

   शकुंतला, तळमजला, प्‍लॉट क्र.420/421,

   शनिवार पेठ, कराड, ता.कराड, जि.सातारा तर्फे-

   शाखाधिकारी- श्री.योगेश बुवा.

   रा.ग्राऊंड फ्लोअर, प्‍लॉट क्र.420/421,

   शनिवार पेठ, सातारा.

2. तेज कुरियरतर्फे- शाखाधिकारी

   सौ.साधना मोहिते,

   दत्‍त चौक, सुर्या कॉम्‍प्‍लेक्‍स,

   ता.कराड, जि.सातारा.                     ....  जाबदार

 

                 तक्रारदारातर्फे अँड.एम.एच.ओक. 

                 जाबदार 1 तर्फे अँड.एस.एम.देशमुख.

                 जाबदार 2- एकतर्फा.                                        

                           न्‍यायनिर्णय

 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला

                                                     

1.       तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.

    तक्रारदार हे कराड, जि.सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवासी आहेत.  तक्रारदारानी आर्किटेक्‍चरल कन्‍सल्‍टंट ही पदवी धारण केली असून 22 वर्षाहून अधिक काळ आर्किटेक्‍ट इंजिनियरिंगचा व्‍यवसाय करतात.  श्री.नामदेव मारुती बेरडे यांनी नरवाड, ता.मिरज, जि.सांगली येथील व्‍यावसायिक काम तक्रारदाराना दिले होते, ते काम तक्रारदारांनी केले होते.  नामदेव बरडे यांचेकडून तक्रारदाराना रक्‍कम रु.1,50,000/- (रु.एक लाख पन्‍नास हजार मात्र)येणे बाकी होती म्‍हणून नामदेव बेरडे यांनी तक्रारदारास फेडरल बँक सांगली शाखेतील त्‍यांचे खातेवरील रक्‍कम रु.1,50,000/-(रु.एक लाख पन्‍नास हजार मात्र)चा धनादेश क्र.48860 दि.25-10-2012 रोजीचा दिला.  सदरचा धनादेश वटणेसाठी तक्रारदाराने जाबदार क्र.1 बँकेत तक्रारदाराचे बचत खाते क्र.049301001237 असलेने सदरचा चेक जाबदार क्र.1 बँकेचे शाखेमध्‍ये जमा होणेसाठी टाकला.  सदरचा धनादेश नामदेव मारुती बेरडे यांचे खात्‍यावर रक्‍कम शिल्‍लक नसलेने (Insufficient funds)दि.27-10-2012 रोजी न वटता जाबदार क्र.1 बँकेत परत आला.  सदर परत आलेला चेक रिटर्न मेमोसह जाबदार क्र.1 यानी जाबदार क्र.2 कुरियर कंपनीमार्फत तक्रारदारांकडे परत रवाना केला.  सदरचा चेक वटला नसलेबाबतचा एस.एम.एस.तक्रारदारांना जाबदार क्र.1 बँकेने दिला होता.  त्‍यानंतर दि.2-11-2012 रोजी तक्रारदाराने जाबदार क्र.1 बँकेत जाऊन मूळ चेक व मेमोची मागणी केली, त्‍यावेळी जाबदार क्र.1 बँकेने सदरचा धनादेश मेमोसह तक्रारदाराकडे देणेसाठी जाबदार क्र.2 कुरियर मार्फत रवाना केलेचे सांगितले व तसा दाखला व पी.ओ.डी.नंबर तक्रारदारास जाबदार क्र.1 बँकेने उपलब्‍ध करुन दिला. सदर टपालाबाबत जाबदार क्र.2 कडे चौकशी केली असता सदरचे टपाल गहाळ झालेचे जाबदार क्र.2 ने सांगितले.  अशा प्रकारे नामदेव बेरडे यानी तक्रारदाराला दिलेला धनादेश व मेमो जाबदार क्र.1 व 2 चे निष्‍काळजीपणामुळे गहाळ झालेला असल्‍याने सदरचा चेक न वटता आलेबाबत मूळ चेकच तक्रारदारास परत मिळाला नसलेने तक्रारदारास नामदेव बेरडे यांचेविरुध्‍द कारवाई करता आली नाही. दुसरा चेक देणेबाबत नामदेव बेरडे याना विनंती केली असता त्‍यांनीही हात झटकले असल्‍याने तक्रारदारास चेक किंवा रक्‍कम मिळालेली नाही.  अशा प्रकारे जाबदार क्र.1 व 2 यानी तक्रारदारास सदोष सेवा पुरवली असलेने नुकसानभरपाई मिळणेसठी तक्रारदाराने सदर तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केला आहे. 

2.    तक्रारदाराने सदर कामी जाबदार क्र.1 व 2 यानी तक्रारदारास दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केलेली आहे असा निष्‍कर्ष काढून नुकसानभरपाईपोटी गहाळ झालेल्‍या चेकची रक्‍कम रु.1,50,000/- (रु.एक लाख पन्‍नास हजार मात्र) जाबदार क्र.1 व 2 कडून मिळावेत.  सदर रकमेवर रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.10 टक्‍के व्‍याज जाबदार क्र.1 व 2 कडून तक्रारदारास मिळावे, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- तर अर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- जाबदार क्र.1 व 2 कडून मिळावेत अशी विनंती तक्रारदारानी केली आहे. 

3.     तक्रारदाराने सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागयादीसोबत नि.5/1 ते 5/4 कडे अनु्क्रमे तक्रारदाराने जाबदार क्र.1 बँकेला पाठवलेली नोटीस, जाबदार बँकेने Insufficient funds म्‍हणून तक्रारदारास पाठवलेले पत्र, लेजर अकौंटची प्रत, तक्रारदाराने जाबदार क्र.1 बँकेत भरलेली पे स्‍लीप वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. 

4.      जाबदार क्र.1 यानी सदर कामी नि.9 कडे म्‍हणणे दाखल केले आहे तर नि.10 चे कागदयादीसोबत नि.10/1 कडे जाबदार क्र.2 तेज कुरियर यांनी आय.सी.आय.सी.आय.बँकेस (जाबदार क्र.1 बँकेस) दिलेले पत्र वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.  जाबदार क्र.2 हे नोटीस लागू होऊनही मे.मंचात हजर राहिलेले नाहीत तसेच म्‍हणणेही दाखल केलेले नाही, सबब त्‍यांचेविरुध्‍द नि.1 वर एकतर्फा आदेश पारित करणेत आलेला आहे. 

      जाबदार क्र.1 यानी नि.9 कडील म्‍हणण्‍याचे तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.  त्‍यांनी तक्रारअर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप मांडलेले आहेत. जाबदार क्र.1 ही बँकींग क्षेत्रात कार्यरत असून वेगवेगळया बँकींग सुविधा खातेदारास पुरवते.  तक्रारदाराचे जाबदार बँकेत बचत खाते क्र.049301001237 आहे.  सदर खात्‍यात तक्रारदारानी श्री.नामदेव मारुती बेरडे यांनी तक्रारदारास रक्‍कम रु.1,50,000/-चा धनादेश स्‍वतःच्‍या बचत खात्‍यावर जमा होणेसाठी भरला होता.  सदरचा चेक नामदेव बेरडे यांचे खात्‍यात रक्‍कम शिल्‍लक नाही म्‍हणून दि.27-10-2012 रोजी न वटता परत आला.  सदरचा चेक न वटता परत आल्‍याने जाबदार क्र.1 बँकेने तक्रारदारास मोबाईल बँकींगद्वारे एस.एम.एस.पाठवला.  त्‍यानंतर जाबदार क्र.1 बँकेने बँकेच्‍या कार्यपध्‍दतीनुसार व तक्रारदार मूळ चेक व मेमो नेणेसाठी बँकेत न आल्‍यामुळे तक्रारदारास मुदतीत सदरचेक व मेमो मिळावा या हेतूने सदरचा न वटलेला चेक व मेमो जाबदार क्र.2 तेज कुरियरमार्फत तक्रारदाराचे पत्‍त्‍यावर ताबडतोब पाठवून दिला.  त्‍याचा क्र.पी.ओ.डी.क्र.6487979 असा होता.  परंतु सदरचे कुरियर जाबदार क्र.2 चे निष्‍काळजीपणामुळे व चुकीमुळे गहाळ झालेले आहे.  त्‍यामध्‍ये जाबदार क्र.1 बँकेची कोणतीही चूक नाही.  सदर कुरियर गहाळ होणेस केवळ जाबदार क्र.2 हेच सर्वस्‍वी जबाबदार आहेत.  त्‍यासंबंधी जाबदार क्र.2 कुरियर कंपनीने जाबदार क्र.1 बँकेस दि.2-11-2012 रोजीचे पत्राने कळविले आहे.  सदरचे पत्र याकामी दाखल केले आहे.    

       तक्रारदाराने नामदेव मारुती बेरडेकडून सदर रक्‍कम वसूल करुन घेतली किंवा नाही याबाबत कोणताही पुरावा नामदेव बेरडे यांचेमार्फत दाखल केलेला नाही.  निव्‍वळ जादा रक्‍कम जाबदारांकडून उकळणेसाठी तक्रारदारानी प्रस्‍तुत तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केलेला आहे.  कुरियर गहाळ करण्‍यामध्‍ये जाबदार क्र.1 बँकेने कोणतीही चूक केलेली नाही.  जाबदार क्र.2 या कुरियर कंपनीनेच सदरचे टपाल गहाळ केले आहे.  त्‍यामुळे तक्रारदारांचा तक्रारअर्ज जाबदार क्र.1 बाबतीत खर्चासह फेटाळणेत यावा व तक्रारदारांनी जाबदार क्र.1 यांना रक्‍कम रु.25,000/- खर्चापोटी व त्रासापोटी अदा करावेत अशी विनंती जाबदार क्र.1 ने केली आहे. 

5.       वर नमूद तक्रारदार व जाबदारांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, तोंडी युक्‍तीवाद वगैरेचा काळजीपूर्वक अभ्‍यास करता सदर तक्रारअर्जाचे निराकरणार्थ मे.मंचाने पुढील मुद्दयांचा विचार केला आहे-

अ.क्र.    मुद्दा                                                उत्‍तर

1. तक्रारदार व जाबदारांचे दरम्‍यान ग्राहक व सेवा देणार

   असे नाते आहे काय?                                        होय.

2. जाबदारांनी तक्रारदारास सदोष सेवा पुरवली आहे काय?       होय. जाबदार क्र.2 यानी.

3. अंतिम आदेश काय?                                 खालील नमूद आदेशाप्रमाणे.

विवेचन-

6.     वर नमुद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारांचे जाबदार क्र.1 बँकेत बचत खाते आहे.  त्‍यांनी नामदेव मारुती बेरडे यांचेकडून रक्‍कम रु.1,50,000/-चा मिळालेला धनादेश बचत खाते क्र.049301001237 वर जमा होणेसाठी जाबदार क्र.1 बँकेत भरला.  सदर धनादेश नामदेव बेरडे यांचे खातेवर रक्‍कम शिल्‍लक नसलेने Insufficient funds  या शे-याने न वटता परत आला.  सदरचा न वटता परत आलेला धनादेश व मेमो जाबदार क्र.1 बँकेने जाबदार क्र.2 तेज कुरियरमार्फत पी.ओ.डी.क्र.6487979 ने तक्रारदाराचे पत्‍त्‍यावर पाठविला, परंतु जाबदार क्र.2 यानी सदरचे कुरियर तक्रारदाराचे पत्‍त्‍यावर व्‍यवस्थित पोहोच केले नाही तर कुठेतरी गहाळ केलेले आहे.  त्‍यामुळे तक्रारदारास नामदेव बेरडे यांचेविरुध्‍द चेक न वटल्‍याबाबत कोणतीही कारवाई करता आली  नाही.  जाबदार क्र.2 यानी व्‍यवस्थित व काळजीपूर्वक तक्रारदाराचे पत्‍त्‍यावर सदरचे कुरियर पाठवणेची जाबदार क्र.2 ची सर्वस्‍वी जबाबदारी असतानाही जाबदार क्र.2 कुरियर कंपनीने सदरचा कुरियरचा लखोटा निष्‍काळजीपणे कोठेतरी गहाळ केलेला आहे, त्‍यामुळे तक्रारदाराचे फार मोठे नुकसान झालेले आहे.  त्‍यामुळे सदर कामी जाबदार क्र.1 बँकेने न वटलेला चेक व मेमो व्‍यवस्थित तक्रारदाराचे पत्‍त्‍यावर जाबदार क्र.2 कुरियरमार्फत पाठवलेला आहे परंतु जाबदार क्र.2 कुरियरनेच सदर कुरियरचा लखोटा कोठेतरी गहाळ केलेचे स्‍पष्‍ट होते म्‍हणजे सदर बाबतीत जाबदार क्र.1 बँकेने कोणतीही सेवेत त्रुटी तक्रारदारास दिलेली नसल्‍याचे सिध्‍द होते.  मात्र जाबदार क्र.2 तेज कुरियर कंपनीने सदरचा लखोटा गहाळ करुन तक्रारदारास सदोष सेवा पुरवली आहे ही बाब जाबदार क्र.2 ने जाबदार क्र.1 बँकेस दिलेल्‍या पत्रावरुन सिध्‍द होते असे या मे.मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  सबब आम्‍ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे. 

7.     सबब सदर कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-

                        आदेश

1.  तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2. जाबदार क्र.2 कुरियर कंपनीस तक्रारदाराना सदोष सेवा दिलेबाबत जबाबदार धरणेत येते.

3. जाबदार क्र.2 यांनी तक्रारदारांस गहाळ झालेल्‍या चेकची रक्‍कम रु.1,50,000/- (रु.एक लाख पन्‍नास हजार मात्र) अदा करावी. प्रस्‍तुत रकमेवर आदेश पारित तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज अदा करावे.

4.  जाबदार क्र.2 ने तक्रारदारास मानसिक त्रास व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.10,000/- अदा करावेत.

5.  वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावे.

6.  वरील आदेशाचे पालन जाबदार क्र.2 यानी विहीत मुदतीत न केलेस तक्रारदारास कलम 25 व 27 नुसार जाबदार क्र.2 विरुध्‍द कारवाई करणेची मुभा राहील.

7.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला. 

8.  प्रस्‍तुत कामी जाबदार क्र.1 बँकेने सेवेत कोणतीही त्रुटी दिलेली नसलेने जाबदार क्र.1 बँकेला प्रस्‍तुत जबाबदारीतून वगळणेत येते.

9.   जाबदार क्र.1 विरुध्‍द कोणतेही आदेश नाहीत.

10.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

 

ठिकाण- सातारा.

दि. 2-6-2015.

 

        सौ.सुरेखा हजारे  श्री.श्रीकांत कुंभार   सौ.सविता भोसले

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.