तक्रारदार : गैर हजर. सामनेवाले : -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- तक्रार दाखल करुन घेण्यासंबधीचा आदेश 1. तक्रारदारांनी सा.वाले बँकेकडून कर्ज घेवून वाहन खरेदी केले. व तक्रारदार कर्जाचे हप्ते सा.वाले बँकेला अदा करीत होते. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे दिनांक 20.11.2009 रोजी सा.वाले यांच्या एजंटने तक्रारदारांचे वाहन जबरदस्तीने ताब्यात घेतले. तक्रारदाराने सा.वाले यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू सा.वाले यांचे अधिका-यांनी तकारदारांना सहकार्य केले नाही. अंतीमतः तक्रारदारांनी सा.वाले यांचे विरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल केली व तक्रारदारांचे जबरदस्तीने ताब्यात घेतलेले वाहन तक्रारदारांना परत करण्यात यावे व नुकसान भरपाई अदा करण्यात यावी अशी मागणी केली. 2. दाखल सुनावणीकामी तक्रारदारांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. तक्रारदारांचे वाहन त्यांचे चालक, चालवित असल्यामुळे तक्रारदारांचे वाहन वाणीज्य व्यवसायाकामी स्विकारलेली सुविधा होती काय ? या दृष्टीने प्रस्तुत मंचाने उपलब्ध पुराव्याची छाननी केली. 3. तक्रारदारांनी आपले तक्रारीचे परिच्छेद क्र.3 मध्ये असे कथन केले आहे की, तक्रारदारांचे चालकांनी सा.वाले यांचेअधिका-यांना असे सांगीतले की, तक्रारदारांनी वाहन कर्जाचे हप्ते भरलेले आहेत. तथापी सा.वाले यांचे अधिका-यानी तक्रारदारांचे वाहन जबरदस्तीने ताब्यात घेतले. यावरुन असे दिसते की, तक्रारदारांनी सा.वाले बॅकेकडून कर्ज घेवून विकत घेतलेले वाहन तकारदार हे आपल्या ड्रायव्हर मार्फत चालवित. सहाजीकच असा निष्कर्ष काढावा लागतो की, तक्रारदार आपले वाहन भाडयाने देत होते व त्यावर नफा कमावित होते. 4. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारदार सदरील वाहनाचा उपयोग आपल्या उपजिविकेसाठी व स्वयंरोजगार म्हणून करीत असत. तथापी तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणेच तक्रारदारांचे वाहन चालकामार्फत चालविले जात होते. मा.सर्वोच्च न्यायालयाने लक्ष्मी इंजीनियरींग वर्क्स विरुध्द पी.एस.जी.इंडस्ट्रीयल युनिट AIR 1995 सर्वोच्च न्यायालय 1428 या प्रकरणामध्ये वाणीज्य व्यवसायाकामी एखाद्या वस्तुचा वापर केला गेला आहे किंवा नाही या बद्दलची निष्कर्ष नोंदणेकामी काही दाखले दिले आहेत. त्यामध्ये परिच्छेद क्र.12 मध्ये असा अभिप्राय नोंदविलेला आहे की, एखाद्या व्यक्तीने एखादे वाहन अथवा एखादे मशिन दुस-या व्यक्तीमार्फत चालविणेकामी घेतले असेल तर ती व्यक्ती ग्राहक या संज्ञेत बसत नाही. प्रस्तुतचे प्रकरणात तक्रारदारांनी आपल्या तक्रारीतच असे मान्य केलेले आहे की, तक्रारदारांचे वाहन हे त्यांचे चालकामार्फत चालविले जात होते. उघडत आहे की, तक्रारदार ते वाहन स्वतः चालवित नव्हते. या वरुन असा निष्कर्ष नोंदवावा लागतो की, तक्रारदार हे वाहन भाडयाचे देवून त्यावर नफा कमवित होते. 5. वरील निष्कर्षानुरुप प्रस्तुतचे तक्रारदार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2 (1)(डी) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत बसत नाहीत. त्यावरुन तक्रारदारांची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे चालु शकत नाही असा निष्कर्ष नोंदवावा लागतो. सबब मंच पुढील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1 तक्रार कलम 12(3) प्रमाणे रद्द करण्यात येते. 2. आदेशाच्या प्रमाणित तक्रारदारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |