Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/09/632

MR SAPREM THAKUR - Complainant(s)

Versus

ICICI BANK LTD, - Opp.Party(s)

ASHUTOSH SHUKLA

24 Aug 2011

ORDER


CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, MUMBAI SUBURBAN DISTRICT.Admn. Bldg., 3rd Floor, Near Chetana College, Govt. Colony, Bandra(East), Mumbai-400 051.
Complaint Case No. CC/09/632
1. MR SAPREM THAKURNIRMAN C.H.S. LTD., FLAT NO. 15/B, RANI SATI MARG, PLOT -D, S.V ROAD, MALAD-WEST, MUMBAI-64. ...........Appellant(s)

Versus.
1. ICICI BANK LTD,ANDHERI BRANCH, 248, J.B NAGAR, RPG TOWER, GROUND FLOOR, WST WING, ANAHDERI KURLA ROAD, ANHDERI-EAST, MUMBAI-59. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr. J. L. Deshpande ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR ,Member
PRESENT :

Dated : 24 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 तक्रारदार            :    स्‍वतः वकीला सोबत (वकील

                            श्री.दिनेश जैन) हजर.  
                      सामनेवाले            :    वकील प्रतिनिधी मन्‍नाडिअर
                             मार्फत हजर.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्‍यक्ष   ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्‍यायनिर्णय
 
1.    सा.वाली ही बँक आहे, व तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून 2006 मध्‍ये रु.8 लाख गृह कर्ज घेतले होते. त्‍याची परतफेड 120 मासीक हप्‍त्‍यात करावयाची होती. उभय पक्षकारांमध्‍ये झालेल्‍या करारनाम्‍याच्‍या तरतुदीप्रमाणे सा.वाले यांनी वरील गृह कर्जावर बदलता व्‍याजदर
(Floating rate of interest ) अदा करावयाचा होता.  तक्रारदारांनी त्‍या प्रमाणे आपल्‍या बँकेच्‍या खात्‍यातून सा.वाले यांना गृह कर्जाचे हप्‍ते अदा केले.
2.    तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथना प्रमाणे एप्रिल, 2009 मध्‍ये असे समजले की, बदलता व्‍याजदर बराच कमी झाला असून तो व्‍याजदर 9.75 टक्‍के चे जवळपास आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांच्‍या अंधेरी येथील शाखेत दिनांक 8.4.2009  रोजी भेट दिली. व श्री.सचिन तळेकर या कर्मचा-याकडून माहिती घेतली. सचिन तळेकर यांनी तक्रारदारांचे गृह कर्जाचे खाते तपासून तक्रारदारांना असे सांगीतले की, नविन व्‍याजदर 9.75 टक्‍के लागू करणेकामी तक्रारदारांना ज्‍यादा फी 3607/- अदा करावी लागेल. श्री.सचिन तळेकर यांनी त्‍या प्रमाणे एका कागदावर ती माहिती लिहून दिली.
3.    तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथना प्रमाणे दुस-या दिवशी म्‍हणजे दिनांक 9.4.2009 रोजी तक्रारदार सा.वाले बँकेच्‍या अंधेरी शाखेत गेले. व श्री.सचिन तळेकर यांनी दिलेल्‍या माहिती प्रमाणे पैसे भरण्‍याची तंयारी केली. परंतु सा.वाले यांचे कर्मचारी श्रीमती कृष्‍णा पटेल यांनी तक्रारदारांना रु.12,500/- बदलत्‍या व्‍याज दराने शुल्‍क भरावे लागतील व ते रु.3607/- श्री.सचिन तळेकर यांनी सांगीतल्‍या प्रमाणे नाही असे सांगीतले. त्‍या स्‍त्री कर्मचा-याने त्‍या प्रमाणे तक्रारदारांना एका कागदावर लिहून दिले.  तक्रारदारांचा हे शुल्‍क जमा करण्‍याबद्दल आक्षेप होता. वस्‍तुतः तक्रारदारांना कुठलेली ज्‍यादा शुल्‍क भरावयास लागणे आवश्‍यक नव्‍हते. त्‍यानंतर तक्रारदारांनी त्‍यांच्‍या वकीलांचा सल्‍ला घेतला व पुन्‍हा सा.वाले यांच्‍या कर्मचा-यांची भेट घेतली. परंतु सा.वाले यांनी बदललेल्‍या व्‍याज दराप्रमाणे कमी झालेले व्‍याजदर तक्रारदारांच्‍या गृह कर्जास लागू करण्‍यास नकार दिला. त्‍यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना आपल्‍या वकीलामार्फत दिनांक 17.4.2009 रोजी नोटीस दिली व तक्रारदारांच्‍या मागणी प्रमाणे कमी झालेला व्‍याजदर तक्रारदारांच्‍या गृह कर्जास लागू करण्‍यात यावा अशी विनंती केली. सा.वाले यांनी त्‍या नोटीसीला उत्‍तर दिले नाही. त्‍यानंतर तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली. व त्‍यामध्‍ये सा.वाले यांनी तक्रारदारांचे गृह कर्जावर 9.75 टक्‍के व्‍याज आकारावे त्‍याच प्रमाणे नुकसान भरपाई दाखल 50,000/- रुपये अदा करावेत अशी मागणी केली.
4.    सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्‍यामध्‍ये तक्रारदारांनी बदलत्‍या व्‍याजदाराचे शुल्‍क आकारणी बद्दल जी कागदपत्रे दाखल केलेली आहेत ती अधिकृत नाहीत असे कथन केले. सा.वाले यांनी तक्रारदारांना दिलेले गृह कर्ज व करारनामा यास नकार दिला नाही. तथापी सा.वाले यांच्‍या कथना प्रमाणे कुठल्‍याही कर्जावर व्‍याजदर हा कर्जाचा उद्देश, परतफेडीची कालमर्यादा, व हप्‍त्‍यावर अवलंबून असते. त्‍या प्रमाणे तक्रारदार विशिष्‍ट दराने व्‍याज गृह कर्जावर आकारण्‍यात यावे असा हट्ट धरु शकत नाही असे सा.वाले यांनी कथन केले. तसेच एप्रिल, 2008 नंतर व्‍याज दर कमी केलेला होता या बद्दल तक्रारदारांनी कुठलाही पुरावा दिलेला नाही असे सा.वाले यांनी कथन केले. सा.वाले यांनी असेही कथन केले की, तक्रारदारांच्‍या गृह कर्जावर बदलत्‍या दराने व्‍याज आकारणी करावयाची असल्‍याने सा.वाले यांनी वेळोवेळी बदललेल्‍या प्राईम लेंडींग रेट (P.L.R.) या प्रमाणे व्‍याजाची आकारणी केलेली आहे.  सा.वाले यांनी असेही कथन केले आहे की, तक्रारदारांना बदलत्‍या व्‍याज दराचा फायदा द्यावयाचा असेल तर तक्रारदारांनी सद्याच्‍या कर्जाची पूर्ण परतफेड करुन त्‍यावर 2 टक्‍के ज्‍यादा शुल्‍क देवून देय रक्‍कमेवर बदलत्‍या व्‍याज दराने आकारणी करावयाचा फायदा घेण्‍याबाबतची  कार्यवाही करावयास पाहिजे होती. परंतु तक्रारदारांनी त्‍या प्रमाणे कार्यवाही केलेली नाही.  त्‍याप्रमाणे सा.वाले यांनी गृह कर्जाचे संदर्भात तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर केली हया आरोपास नकार दिला.
5.    तक्रारदारांनी आपले पुरावा शपथपत्र दाखल केले. व त्‍यासोबत गृह कर्ज  करारनामा व इतर कागदपत्रे दाखल केली. सा.वाले यांनी त्‍यांची कैफीयत, पुरावा शपथपत्र, दाखल केले. दोन्‍ही बाजुंनी लेखी युक्‍तीवाद दाखल केला.  
6.    प्रस्‍तुतचे मंचाने तक्रारदारांचे वकील व सा.वाले यांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद ऐकला, तसेच तक्रार, कैफीयत, शपथपत्र, कागदपत्र, यांचे वाचन केले. त्‍यानुसार तक्रारीचे निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्‍यात येतात.
 

क्र.
मुद्दे
उत्‍तर
1
सा.वाले यांनी तक्रारदारांना त्‍यांचे गृह कर्जावर व्‍याज आकारणीचे संदर्भात ज्‍यादा शुल्‍काची मागणी करुन तसेच बदलत्‍या व्‍याज दराने व्‍याज आकारण्‍याचे नाकारुन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर केली ही बाब तकारदार सिध्‍द करतात काय ?
होय.
2
तक्रारदार सा.वाले यांचेकडून वेगळी नुकसान भरपाई वसुली करण्‍यास पात्र आहेत काय   ?
होय. रु.25000/-
3
अंतीम आदेश
तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 
कारण मिमांसा
7.   तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीसोबत तसेच पुराव्‍याचे शपथपत्रासोबत गृह कर्जाच्‍या करारनाम्‍याची प्रत हजर केलेली आहे. करारनामा तक्रारदार व त्‍यांच्‍या पत्‍नी हया कर्जदार म्‍हणून व सा.वाली बँक ही कर्ज देणारी म्‍हणून दिनांक 22.2.2006 रोजी करण्‍यात आलेला होता. सा.वाले यांनी या करारनाम्‍यास कधीही नकार दिलेला नाही. तक्रारदारांनी त्‍यानंतर गृह कर्जाचे हप्‍ते बदलत्‍या व्‍याज दराप्रमाणे भरले या बद्दल सा.वाले यांनी कधीही नकार दिलेला नाही. तक्रारदारांनी कर्जाचे हप्‍ते थकविले होते किंवा थगबाकी झाली होती असेही सा.वाले यांचे कथन नाही. याप्रमाणे करारनामा व त्‍यातील शर्ती व अटी हया उभय पक्षांना मान्‍य आहेत असे गृहीत धरावे लागेल. करारनाम्‍यातील व्‍याज दर तसेच परत फेडीचे संदर्भात ज्‍या मुख्‍य अटी व शर्ती होत्‍या त्‍या करारनाम्‍याच्‍या पृष्‍ट क्र.18 वर INTEREST  या मथळयाखाली नमुद करण्‍यात आलेले आहे. त्‍या अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत.
E – Interest
       (a)  ICICI bank Floating Reference Rate 9.25 % per annum (as on    the date of execution of this Agreement)
   (b)  Adjustable Rate of interest : ICICI bank Floating Reference
              Rate + 1.25 % p.a. = 8 % p.a.
       (c )   Pre-EMI Interest       8            % per annum.
       (d )  Additional Interest   24           % per annum.
        (e ) Commitment fees       -----     % per annum.
        (f )   Part Prepayment fees -----     % on amount prepaid.
                However, if the BORROWER make full prepayment, within
                one year of Part Prepayment, the full prepayment fees shall
                applicable on amount prepaid to foreclose the loan and on all
                amounts tendered by the BORROWER towards prepayment
                of the LOAN during the last one year from the date of Final
                 Prepayment.
           (g )   Part Prepayment : Documentation Charges Rs -------------
 
( F )     EMI is calculated on the basis of monthly rests.
( G )     Amortisation
            (a) Term of repayment      120      months
            (b) EMI Rs.9707/- *
 
8.    करारनाम्‍यातील अटी व शर्तीमध्‍ये नमुद केल्‍याप्रमाणे तक्रारदार व सा.वाले यांच्‍यात झालेल्‍या करारानुसार व्‍याजाचा दर हा बदलता/Floating  होता या प्रमाणे तो व्‍याजदर भविष्‍यात कमिजास्‍त व बदलता होता. तक्रारदारांनी वर्षे 2006-07 मधील हप्‍ते बदलत्‍या व्‍याजदाराने सा.वाले यांचेकडे जमा केले. व्‍याज दर जरी बदलता असला तरीही मासीक हप्‍ता हा रु.11,500/- असा निश्‍चीत होता. व त्‍याप्रमाणे तक्रारदारांच्‍या स्‍टेट बँक ऑफ इंडीया यांचेकडे असलेल्‍या बचत खात्‍यातून E.C.S. व्‍दारे कर्जाचे मासीक हप्‍ते सा.वाले यांचेकडे अदा केले जात होते. या सर्व बाबी प्राथमिक आहेत व त्‍याबद्दल वाद नाही.
9.    तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदारांना मार्च, एप्रिल,2008 मध्‍ये असे समजले की, व्‍याज दर कमी झाला असून तो 9.75 जवळपास आहे. व त्‍याप्रमाणे तक्रारदारांना त्‍यांचे कर्ज खात्‍यामध्‍ये देखील त्‍या बदलत्‍या व्‍याज दराचा लाभ मिळावा अशी इच्‍छा निर्माण झाल्‍याने तक्रारदार हे सा.वाले यांच्‍या अंधेरी शाखेमध्‍ये दिनांक 8.4.2009 रोजी गेले व तेथील कर्मचारी श्री.सचिन तळेकर यांनी तक्रारदारांच्‍या कर्ज खात्‍याची माहिती तपासून पाहीली व तक्रारदारांना बदलत्‍या व्‍याजाचे शुल्‍क रु.3,607/- जमा करावे लागतील व मे, महीन्‍यापासून तक्रारदारांच्‍या खात्‍यावर 9.75 दराने व्‍याज आकारले जार्इल असे सूचविले. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत तसेच पुराव्‍याचे शपथपत्रात असे कथन केले आहे की, कर्जाचा बोजा कमी करण्‍याचे उद्देशाने ते दिनांक 9.4.2009 रोजी सा.वाले बँकेकडे गेले. व त्‍यांना सा.वाले हयांची स्‍त्री कर्मचारी श्रीमती कृष्‍णा पटेल यांनी तक्रारदारांना असे सांगीतले की, तक्रारदारांना बदलत्‍या व्‍याजाचा शुल्‍क रु.12,500/- जमा करावा लागेल व बदललेल्‍या व्‍याजाच्‍या शुल्‍काचा दर कर्ज बाकी रक्‍कमेवर 1.75 असा असून तो तळेकर यांनी सांगीतल्‍याप्रमाणे 0.5 टक्‍के असा नाही.  त्‍यानंतर तक्रारदारांनी बदललेले शुल्‍क जमा करण्‍यास नकार दिला व त्‍याबद्दल वकीलांचा सल्‍ला घेतला. त्‍यावेळी त्‍यांना असे समजले की, मुळातच हे शुल्‍क करारनाम्‍यातील अटी व शर्ती प्रमाणे भरावे लागत नाहीत.
10.   तक्रारदारांनी वरील कथनाचे पृष्‍टयर्थ श्री.तळेकर यांनी तक्रारदारांना दिनांक 8.4.2008 ची जी माहिती दिली व जी नोंद लिहून दिली त्‍याची प्रत तक्रारीच्‍या सोबत निशाणी पृष्‍ट क्र.46 व 47 वर दाखल केलेली आहे. निशाणी क हा बँकेचा शिक्‍का असलेला कागद असून त्‍यावर तक्रारदारांचे नांव आहे. तसेच दिनांक 8.4.2009 रोजी लिहिलेला आहे. कामाचा उद्दे नमुद आहे. व सचिन तळेकर यांचे नांव लिहिलेले आहे. निशाणी क सोबत दिलेला कागद हा तक्रारदारांनी करावयाचे कर्जफेडीची विवरण असून त्‍यावर सचिन तळेकर असे हस्‍तांक्षर लिहिेलेले आहे व काही नोंदी आहेत. पृष्‍ट क्र.47 वर खालच्‍या भागामध्‍ये असलेल्‍या नोंदी असे दर्शवितात की, येणे बाकी रक्‍कम रु.6,54,118/- अशी होती. व्‍याजाचा दर 12.5 होता व कर्ज फेडीचे हप्‍ते 87 होते. तर 9.75 व्‍याज दर झाल्‍यानंतर कर्ज फेडीचे हप्‍ते 77 होणार होते.  व हा बदल 2009 पासून अस्‍तीत्‍वात येणार होता. तसेच नोंदीचे पुढे रु.3607/- असे हस्‍तांक्षर लि‍हीले असून 0.5 अशीही नोंद आहे. निशाणी क पृष्‍ट क्र.46 व 47 वर हस्‍तांक्षरात दिलेली नोंद तक्रारदारांच्‍या कथनास पुष्‍टी देतात की, तक्रारदारांनी दिनांक 8.4.2009 सा.वाले यांच्‍या अंधेरी शाखेस भेट दिली व कर्मचारी श्री.सचिन तळेकर यांनी बदललेल्‍या व्‍याजदाराचे शुल्‍क 0.5 टक्‍के प्रमाणे 3607/- असे तक्रारदारांना सूचविले.
11.   तक्रारदारांनी तक्रारीच्‍या व पुराव्‍याचे शपथपत्रात पुढे असे कथन केले आहे की, दिनांक 9.4.2009 रोजी तक्रारदार सा.वाले यांच्‍या अंधेरी शाखेत पुन्‍हा गेले असतांना श्रीमती कृष्‍णा पटेल यांनी ज्‍यादा शुल्‍क रु.3607/- स्विकारण्‍यास नकार दिला. व तक्रारदारांना असे सांगीतले की, बदललेल्‍या व्‍याजाच्‍या शुल्‍काचा दर हा कर्ज येणे बाकी रक्‍कमेवर 1.75 टक्‍के असा असून तो 0.5 असा नव्‍हे. या कथनाचे पृष्‍यर्थ तक्रारदारांनी निशाणी ड वर बँकेतर्फे भरुन घेण्‍यात येणारी कामकाजाची नोंदीची ची प्रत हजर केलेली आहे. त्‍यामध्‍ये तक्रारदारांचे नांव, कर्ज खाते क्रमांक , भेटीचा उद्देश व दिनांक 9.4.2009 असे नमुद असून संबंधित कर्मचा-याची स्‍वाक्षरी आहे. ही पोच पावती बँकेचा शिक्‍का व त्‍यावर बदललेला दर 8.75 असे कर्ज बाकी रक्‍कमेवर असे नमुद असून तो 0.5 असा नव्‍हे असे देखील इंग्रजीमध्‍ये नमुद केलेले आहे.  हया सर्व नोंदी हस्‍तांक्षरात आहेत. तक्रारदारांचे असेही कथन आहे की, हया नोंदी स्‍त्री कर्मचारी कृष्‍णा पटेल यांच्‍या हस्‍ताक्षरात आहेत.
12.   सा.वाले यांनी आपल्‍या कैफीयतीचे पृष्‍ट क्र. 9 मध्‍ये असे कथन केले आहे की, तक्रारदारांनी हजर केलेली निशाणी क व ड ही अधिकृत नसून त्‍याबद्दल तक्रारदारांची कुठलीही लेखी विनंती नव्‍हती. व तक्रारदारांच्‍या लेखी विनंतीला उत्‍तर म्‍हणून त्‍या नोंदी लिहिण्‍यात आलेल्‍या नव्‍हत्‍या.  येथे एक बाब नमुद करणे आवश्‍यक आहे की, सा.वाले यांनी आपल्‍या कैफीयतीत कोठेही श्री.सचिन तळेकर व श्रीमती कृष्‍णा पटेल या सा.वाले यांच्‍या कर्मचारी नव्‍हत्‍या असे नमुद केलेले नाही. निशाणी क व ड हे छापील पोच पावतीचे कागदावर असून त्‍यावर सा.वाले यांचे नांव छापलले आहे. त्‍यावर नमुद केलेला दिनांक हा तक्रारदारांच्‍या कथनाशी सुसंगत आहे. सर्वसाधारणपणे या प्रकारची सूचना किंवा माहिती कंपनीचे किंवा बँकेच्‍या कर्मचा-यांकडून उपलब्‍ध कागदपत्रावर लिहून दिली जाते.  व ती खातेदाराची माहिती असते. या प्रकारच्‍या सर्वसामान्‍य परिस्थितीमध्‍ये होणारा व्‍यवहार लक्षात घेता निशाणी क व ड वरील नोंदी तक्रारदारांच्‍या कथनाशी सुसंगत असून त्‍या नोंदी असे दर्शवितात की, सा.वाले यांचेकडून तक्रारदारांना बदललेल्‍या व्‍याज दाराच्‍या ज्‍यादा शुल्‍काची मागणी करण्‍यात आली व ती दिनांक 4.8.2009 रोजी 0.5 टक्‍के या दराने होती. तर दिनांक 9.4.2009 रोजी 1.75 टक्‍के कर्ज बाकी रक्‍कमेवर अशी वाढीव होती.
13.   वर नमुद केल्‍याप्रमाणे तक्रारदार व सा.वाले यांचे दरम्‍यान करारनामा झाला होता व कर्ज व्‍यवहाराचे शर्ती अटी त्‍या करारनाम्‍यामध्‍ये नमुद करण्‍यात आले होते. व व्‍याजा संबंधीच्‍या नेांदी वर उधृत करण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍यामध्‍ये कोठेही भविष्‍यात व्‍याज दरात बदल झाल्‍यास बदला बद्दलचे शुल्‍क आकरण्‍यात येतील असी तरतुद नाही. कर्ज थकबाकी झाल्‍यास 24 टक्‍के दराने ज्‍यादा व्‍याज आकारले जाईल असे दिसते. परंतु प्रस्‍तुत प्रकरणात कर्ज थकीत नव्‍हते. कर्जाची मुदत संपण्‍यापूर्वी एक रक्‍कमी कर्जफेड करुन खाते बंद करणेकामी देखील ज्‍यादा शुल्‍क आकारण्‍याचा करार नव्‍हता. करारनाम्‍यातील कलम ई मधील या संबंधातील सर्व रकाने कोरे आहेत. ती बाब असे दर्शविते की, कुठल्‍याही व्‍यवहाराबद्दल त्‍यादा शुल्‍क आकारण्‍याचे ठरले नव्‍हते. कर्जदाराने दिलेले धनादेश वटले नाहीत तर रु.200/- ज्‍यादा शुल्‍क पडणार होते. त्‍याची नोंद करारामध्‍ये आहे. हया सर्व नोंदीचा संदर्भ देण्‍याचा उद्देश म्‍हणजे तक्रारदार यांना सा.वाले यांनी कर्जफेड करीत असतांना भविष्‍यामध्‍ये व्‍याजदरामध्‍ये झालेल्‍या बदला करीता कुठलाही शुल्‍क (Conversation charges ) अदा करण्‍याचे ठरले नव्‍हते.  तरी देखील सा.वाले यांचेकडून त्‍या शुल्‍काची मागणी करण्‍यात आली व तक्रारदारांनी ते शुल्‍क भरले नसल्‍याने तक्रारदाराना कमी झालेल्‍या व्‍याज दाराचा फायदा देण्‍यास नकार देण्‍यात आला.
14.   व्‍याज दर बदला बद्दल सा.वाले यांचेकडून जादा शुल्‍क मागण्‍यात आले हया वर नोंदविलेल्‍या निष्‍कर्षास सा.वाले यांचे कैफीयतीमधील परिच्‍छेद क्र.12 मधील शेवटच्‍या 5 ओळी मधील कथनावरुन पुष्‍टी मिळते. सा.वाले यांनी तेथे असे कथन केले आहे की, सा.वाले बँकेने तक्रारदारांच्‍या सूचनेप्रमाणे व्‍यवहार केला.  परंतु व्‍याज दारामध्‍ये बदल झाल्‍यानंतर तक्रारदारांनी बदललेल्‍या व्‍याज दराचे शुल्‍क ( Shift fee ) अदा करण्‍यास नकार दिला जे कर्जफेडीच्‍या हप्‍त्‍याचे संख्‍येमध्‍ये बदल करणारे होते. सा.वाले यांच्‍या कैफीयतीमधील परिच्‍छेद 12 मधील वरील कथन असे दर्शविते की, सा.वाले यांनी तक्रारदारांकडून व्‍याज दरामुळे कर्ज फेडीच्‍या संहीतेत होणारे बदलाकामी ज्‍यादा शुल्‍क मागीतले ते अदा करण्‍यास तक्रारदारांनी नकार दिला. सा.वाले यांना करारनाम्‍यातील तरतुदीप्रमाणे ज्‍यादा शुल्‍काची मागणी अयोग्‍य ठरेल याची जाणीव होती असे दिसते. कारण कैफीयतीमधील परिच्‍छेद क्र.10 मध्‍ये असे कथन केले आहे की, तक्रारदारांनी बदललेला व्‍याजदर ही पध्‍दती स्विकारलेली असल्‍याने तक्रारदार हे कुठलेली जास्‍त शुल्‍क किंवा अधिभार भरण्‍यास जबाबदार नव्‍हते. तथापी त्‍याच परिच्‍छेदामध्‍ये ओळ क्रमांक 7,8,9 मध्‍ये सा.वाले असे म्‍हणतात की, तक्रारदार हे कुठलेही ज्‍यादा शुल्‍क भरण्‍यास जबाबदार नव्‍हते. हे तक्रारदारांचे कथन सा.वाले यांनी नाकारले आहे. याचाच अर्थ पर्यायाने सा.वाले हे मान्‍य करतात की, तक्रारदार ज्‍यादा शुल्‍क भरण्‍यास जबाबदार होते. या निष्‍कर्षास सा.वाले यांचे कैफीयतीचे परिच्‍छेद क्र.8 यामधून पुष्‍टी मिळते. व तेथे सा.वाले असे म्‍हणतात की,  तक्रारदारांनी 9.75 टक्‍के व्‍याजदर हा मे,2009 पासून लावण्‍यात यावा अशी कुठलीही विनंती न केल्‍याने तक्रारदारांनी येणेबाकी असलेली संपूर्ण रक्‍कम पूर्णपणे अदा करुन व त्‍यावर 2 टक्‍के दराने ज्‍यादा शुल्‍क अदा करुन व्‍याजदर बदलाचा फायदा घ्‍यावयास पाहिजे होता. या स्‍वरुपाचे संपूर्ण कथन त्‍यांच्‍या वर नमुद केलेल्‍या कैफीयतीच्‍या परिच्‍छेद क्र.10 व 12 तसेच करारनाम्‍यातील तरतुदीचे विरोधात जाते. व पर्यायाने ते असे दर्शविते की, सा.वाले यांनी तक्रारदारांकडून तक्रारदारांना बदललेल्‍या व्‍याज दराचा फायदा देण्‍यापूर्वी जे शुल्‍क वसुल करावयाचे होते ते करारनाम्‍याचे तरतुदीचे विरोधात होते. ही बाब तक्रारदारांचे वरील आरोपास पुष्‍टी देते की, सा.वाले यांनी तक्रारदारांचे गृह कर्ज व्‍याज दराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर केली आहे. वरील निष्‍कर्षास सा.वाले यांनी दाखल केलेल्‍या लेखी युक्‍तीवादातील मजकुरावरुन पुष्‍टी मिळते. सा.वाले यांनी लेखी युक्‍तीवादाचे परिच्‍छेद क्र.3 मध्‍ये असे कथन केले आहे की, सा.वाले बँकेच्‍या गृह कर्जाच्‍या व्‍याजाचा दर हा मार्च, 2009 पासून 9.75 टक्‍के असा दिला होता. परंतु या कमी झालेल्‍या दाराचा फायदा सद्याचे गृह कर्जदार म्‍हणजे जुने गृह कर्जदार यांना मिळणारा नव्‍हता. व तो फक्‍त नविन गृह कर्जदार यांना मिळणारा होता. सा.वाले यांनी आपल्‍या युक्‍तीवादाचे परिच्‍छेद क्र.3 मध्‍ये असे कथन केले आहे की, तक्रारदार हे कमी झालेल्‍या व्‍याजाचा फायदा घेण्‍यास पात्र नव्‍हते. सा.वाले यांनी संकेतस्‍थळावर उपलब्‍ध असलेल्‍या माहितीची प्रत जोडली आहे. त्‍यामध्‍ये देखील असे कथन आहे की, कमी झालेला व्‍याजदर हा फक्‍त नविन कर्जदारांना होईल व तो जुन्‍या कर्जदारांना लागू होणार नाही. त्‍या संकेत स्‍थळाचे माहितीमध्‍ये असे नमुद आहे की, S.B.I. Canara Bank हे देखील नविन कर्जदारांना कमी झालेल्‍या व्‍याज दराचा फायदा देतात. या सर्व युक्‍तीवादातून सा.वाले बँकेची मानसीकता स्‍पष्‍ट होते व ती ध्‍वनीत करते की, भविष्‍यामध्‍ये कमी झालेल्‍या व्‍याज दाराचा फायदा फक्‍त नविन कर्जदारांना मिळणार होता. व तो जुन्‍या कर्जदारांना उपलब्‍ध नाही. या स्‍वरुपाचा युक्‍तीवाद व कथन हे गृह कर्जाचे करारनाम्‍याचे तरतुदीचे विरुध्‍द जाते. गृह कर्जाच्‍या करारनाम्‍यामध्‍ये प्रस्‍तुत कर्जदाराच्‍या संदर्भात असे स्‍पष्‍ट नमुद केलेले आहे की, व्‍याज दर बदलता राहीलातर त्‍या तरतुदीप्रमाणे सा.वाली बँक ही त्‍यांच्‍या मुख्‍य व्‍याज दराचे ( Prime landing rate ) वे वर 1.25 टक्‍के व्‍याज आकारुन व्‍याज वसुल करेल. भविष्‍यामध्‍ये कमी झालेल्‍या व्‍याज दराचा फायदा तक्रारदारांना म्‍हणजे जुन्‍या कर्जदारांना झालेला नसेल तर बदललेल्‍या व्‍याज दराची करारनाम्‍यातील तरतुद ही निरर्थक ठरते. त्‍याचप्रमाणे भविष्‍यामध्‍ये बदललेल्‍या व्‍याज दराचा फायदा तक्रारदारांसारख्‍या जून्‍या कर्जदारांना द्यावयाचा नाही असे धोरण अवलंबविलेतर पर्यायाने तो व्‍याजदर निश्‍चीत (Fixed ) असा होतो, ते करारनाम्‍याचे तरतुदीचे विरुध्‍द जाते. हया सर्व परीणामाचा विचार सा.वाले बँकेने केलेला दिसत नाही. अन्‍य बँका हया हयाच प्रकारचा व्‍यवहार करीत आहेत ही बाब समर्थनीय असू शकत नाही. एस.बी.आय. असो किंवा कॅनरा बँक असो बदललेल्‍या व्‍याज दराचा फायदा जर कर्जदारांना ( ज्‍याचे कर्ज बदलत्‍या व्‍याजदराने आहे) देत नसतील तर पर्यायाने करारनाम्‍याचा भंग होतो. त्‍यातही पुन्‍हा करारनाम्‍यामध्‍ये नमुद असतांना बदललेल्‍या व्‍याज दराचा फायदा न देणे हा कर्जदारावर अन्‍याय ठरतो व शोषण ठरते.  या प्रकारच्‍या जादा शुल्‍काचे नांव किंवा लेबल काही असले तरी करारनाम्‍यात जर नमुद नसेल तर ती वसुली जाचक व अन्‍यायकारक ठरते व समर्थनीय ठरु शक्‍त नाही.
15.   वर चर्चा केल्‍याप्रमाणे सा.वाले यांनी दिनांक 1.4.2009 नंतर बदललेल्‍या व्‍याज दराचा फायदा तक्रारदारांना देणे जरुरी होते. तक्रारदारांनी दिनांक 8 व 9 एप्रिल, 2009 रोजी बँक कर्मचा-यांना भेटून तशी विनंती केली होती. परंतु बँक कर्मचा-यांनी ज्‍यादा शुल्‍काची मागणी केली ती मागणी समर्थनीय नव्‍हती. तसेच करारनाम्‍या प्रमाणे योग्‍य नव्‍हती. दिनांक 1.4.2009 रोजी सा.वाले बँकेचा बदललेला व्‍याजदर हा 9.75 झालेला होता. सा.वाले यांच्‍या कैफीयेतीमध्‍ये तसेच लेखी युक्‍तीवादामध्‍ये नमुद केलेले आहे. त्‍या व्‍याज दरामध्‍ये बँकेचे अधिकचे पैसे 1.25 संमलीत होते. यावरुन सा.वाले बँकेला Base rate/ Prime landing rate 8.50 असला पाहिजे. सा.वाले बँकेने आपल्‍या कैफीयतीचे परिच्‍छेद क्र.1 चे परिच्‍छेद क्र.M त्‍याचा IIII (पृष्‍ट क्र.5) यामध्‍ये व्‍याज आकारणीची पध्‍दत व त्‍या बद्दलची सज्ञा स्‍पष्‍ट केलेली आहे. सा.वाले असे म्‍हणतात की, बदललेला व्‍याज दर म्‍हणजे तो व्‍याज दर मुख्‍य व्‍याज दरानुसार ( Prime landing rate ) बदलत असतो. व Prime landing rate  हा रिझर्व्‍ह बँक ऑफ इंडीयाचे आर्थिक धोरणानुसार बदलत असतो. सा.वाले कैफीयतीत त्‍याच परिच्‍छेदाचे कलम V मध्‍ये असे म्‍हणतात की, कर्ज देणारी बँक ही, बदललेला व्‍याज दर देत असेत तर Prime landing rate  बदलाचे बद्दल व्‍याज दर बदलतो. त्‍यानंतर त्‍याच परिच्‍छेदाचे कलम VI मध्‍ये सा.वाले असे म्‍हणतात की, व्‍याज दर हा Prime landing rate  मध्‍ये होणा-या बदलाप्रमाणे बदलत असतो. ही सर्व वस्‍तुस्थिती मान्‍य करुनही सामनेवाले आपल्‍या युक्‍तीवादात व कैफीयतीत असे म्‍हणतात की, तक्रारदार हे बदललेल्‍या व्‍याज दराचा फायदा घेण्‍यास पात्र नव्‍हते. सा.वाले यांच्‍या करारनाम्‍यातील तरतुद, सा.वाले यांची कैफीयत, तसेच युक्‍तीवाद यांचा एकत्रित विचार केला असता असे दिसून येते की, सा.वाले यांनी Prime landing rate मध्‍ये जसा बदल झाला त्‍याप्रयमाणे गृह कर्जाचे व्‍याजामध्‍ये वेळोवेळी बदल केला नाही. बँकेच्‍या चुकीच्‍या धोरणामुळे व निर्णयामुळे त्‍या बदललेल्‍या व्‍याज दराचा फायदा तक्रारदारांना देण्‍याचे बँकेने नाकारले. तक्रारदारांनी सा.वाले बँकेच्‍या Prime landing rate  भविष्‍यामध्‍ये कसा बदलला या बद्दलचे वेगळे विवरण दाखल केलेले नाही. परंतु सा.वाले यांनी कर्ज दर श्री.भुपेंद्रपाल सिंन्‍हा यांच्‍या गृह खात्‍याचा उतारा दाखल केलेला आहे. ज्‍याचा उल्‍लेख तक्रारदारांच्‍या पुराव्‍याचे शपथपत्रामध्‍ये आहे. त्‍यामध्‍ये सा.वाले बँकेने एप्रिल, 2009 मध्‍ये 12 टक्‍के असलेल्‍या कर्जाचा दर मे, 2009 पासून 9.25 केला त्‍या कर्जाच्‍या अटी व शर्ती भिन्‍न असतील व त्‍याची तुलना तक्रारदारांच्‍या कर्जखात्‍याशी होऊ शकत नाही. ही बाब मान्‍य असली तरीही सा.वाले बँकेने Prime landing rate मध्‍ये बदल झाल्‍यानंतर सा.वाले यांनी गृह कर्जाचे Floatingrate मध्‍ये बदल केलेला आहे. ही बाब सा.वाले यांना मान्‍य आहे. तक्रारदारांना त्‍या बदललेल्‍या व्‍याज दराचा फायदा देण्‍याचे सा.वाले यांनी नाकारुन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर केली असा निष्‍कर्ष नोदवावा लागतो. सा.वाले बँकेने मे, 2009 पासून 9.75 टक्‍के दराने गृह कर्ज खात्‍यावर व्‍याज आकारावे व त्‍यानंतर वेळोवेळी बदललेला व्‍याजदर त्‍या कर्ज खात्‍यास लागू करावा व त्‍या प्रमाणे व्‍याज आकारणी करावी असा निर्देश देणे आवश्‍यक आहे.
16.   तक्रारदारांनी व्‍याज दराचे व्‍यतिरिक्‍त सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई दाखल रुपये 10,000/- अधिक रु.50,000/- अशी मागणी केलेली आहे. तथापी सा.वाले यांनी तक्रारदारांना बदललेला व्‍याज दर वेळोवेळी आकारुन तक्रारदार यांचे गृह कर्जाचे हप्‍ते कमी केले तरी देखील तक्रारदारांना बराच आर्थिक फायदा व सवलत मिळू शकेल. सबब तक्रारदारांनी मागणी केल्‍याप्रयमाणे नुकसान भरपाईचा आदिेश करण्‍याचे ऐवजी तक्रारीचा खर्च व नुकसान भरपाई असे एकत्रितपणे सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.25,000/- अरा करावेत असा आदेश देणे योग्‍य व न्‍याय राहील असे मंचाचे मत झाले आहे.
17.   प्रस्‍तुत मंच अशी अपेक्षा करतो की, सा.वाले बँक वर निर्देश दिल्‍याप्रमाणे तक्रारदारांना त्‍यांचे गृह कर्जाचे खात्‍यावर मे, 2009 पासून 9.75 टक्‍के व त्‍यानंतर वेळो वेळी बदललेला व्‍याज दरा प्रमाणे व्‍याज आकारुन त्‍याचा फायदा तक्रारदारांना देतील व यामध्‍ये काही तांत्रिक आक्षेप किंवा अडथळा निर्माण करणार नाही.
18   वरील निष्‍कर्ष व चर्चेवरुन पुढील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
 
               आदेश
1.    तक्रार क्रमांक 632/2009अंशतःमंजूर करण्‍यात येते.
     
2.    सामनेवाले यांनी तक्रारदारांच्‍या गृह कर्जाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर केली ही बाब जाहीर करण्‍यात येते.
3.    सामनेवाले बँकेने तक्रारदारांना तक्रारदारांचे गृह कर्जाचे संदर्भात दिनांक 1 मे, 2009 पासून 9.75 टक्‍के व्‍याज दराने व्‍याज आकारावे व त्‍यानंतर वेळो वेळी बदललेल्‍या Prime landing rate वर 1.25 टक्‍के प्रमाणे व्‍याज दर आकारणी करावी व तक्रारदारांना परत फेडीची मुदत बदलून निश्‍चीत करावी व बदललेल्‍या व्‍याज दराने न्‍याय निर्णयाचे तारखेपर्यतचे विवरणपत्र तक्रारदारांना द्यावे. सामनेवाले यांनी ही कार्यवाही न्‍याय निर्णयाची प्रत मिळाल्‍यापासून आठ आठवडयाचे आत करावी.
4.    हया व्‍यतिरिक्‍त सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च रु.25,000/- अदा करावेत.
5.    आदेशाच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य
      पाठविण्‍यात याव्‍यात.
 

[HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT