तक्रारदार : तक्रारदार वकीलासोबत हजर.
सामनेवाले : सा.वाले प्रतिनीधी वकीलासोबत हजर
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
तक्रार अर्ज संक्षिप्त स्वरूपात खालील प्रमाणे
1. सा.वाले ही बॅक असून तक्रारदार हे त्याचे ग्राहक आहेत. तक्रारदारांचे सा.वाले यांच्या ठाकुर व्हिलेज कांदिवली (पूर्व), मुंबई येथेबचत खातेअसून बचत खात्याचा क्रं. 00401054078 असा आहे. तसेच त्यांचे दूसरेही बचत खाते असून त्याचा क्रं. 94012701215 असा आहे. व या खात्यामध्ये त्यांचा पगार जमा होतो.
2. तक्रारदार यांचेकडे सा.वाले यांचे क्रेडिट कार्ड असून त्याचा क्र. 477460394659009 असा आहे.
3. तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, तक्रारदारांनी वर नमुद केलेल्या क्रेडिट कार्डवर कधीही लोन घेतलेले नव्हते. तरीही सा.वाले यांनी तक्रारदारांच्या खात्यातून न घेतलेल्या लोनची रक्कम तक्रारदारांच्या खात्यातून काढून घेतले. हे तक्रारदारांच्या लक्षात आले नाही तेव्हा तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडे संपर्क साधला असता तक्रारदारांना असे कळविण्यात आले की, तक्रारदारांच्या खात्यात असलेली रक्कम रू 71.268.73/- एवढी रक्कम क्रेडिट कार्डवरील लोन अकाऊंट मूळे रोखली (blocked) आहे.
4. तक्रारदार यांच्या म्हणण्यानूसार खालील प्रमाणे तक्रारदारांच्या खात्यातून सा.वाले यांनी रक्कम काढुन घेतली आहे.
दि. 23.07.08 | रू. 1940/- |
दि. 23.08.08 | रू. 1950/- |
दि. 24.09.08 | रू 1960/- |
दि. 24.10.08 | रू 1960/- |
दि. 24.11.08 | रू. 1970/- |
दि. 24.03.09 | रू. 2430/- |
एकुण रक्कम रू. 12,210/- |
5. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, सा. वाले यांनी लोनची रक्कम भरा असे फोन केले व तसेच लोन रक्कमेचे तपशिलही दिला.
1. लोन रक्कम रू. 2,77,290
2. डि.डि नं. रू. 20,13,16 दि. 14.05.08
3. संपर्क नं. 9819754066
4. पत्ता 1/252/2271, म्युनीसीपल शाळेजवळ
विक्रोळी(पूर्व) मुबंई- 101.
6. तक्रारदार यांनी सा.वाले यांच्या क्रेडिट कार्ड डिपार्टंमेंटकडे संपर्क साधला असता त्यांनी आय.सी.आय.सी.आय बॅकेकडे संपर्क साधण्यास सांगीतला. तेव्हा त्यांचेकडे संपर्क साधला असता सा. वाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. म्हणून तक्रारदार यांनी कांदिवली पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली.
7. त्यानंतर सा.वाले यांचेकडुन transaction’s चूकीचे झाले आहेत व चुकीने खात्यादाराच्या खात्यातुन पैसे काढल्याचे कबुलीचे पत्र तक्रारदारांना मिळाले व तसेच सा.वाले यांनी ही चूक 45 दिवसाच्या आत सुधारण्याचे कबूल केले. त्याची प्रत सा.वाले यांनी निशाणी क्रं. C-7 वर दाखल केले. यानंतर सा.वाले यांचे कडुन कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. म्हणून तक्रारदारांनी बँकीग ओंम्बड्समनः यांचेकडे तक्रार नोंदविली.
8. सा.वाले यांचेकडे वारंवार तक्रार करूनही सा.वाले यांचेकडुन काही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून तक्रारदार यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवून 83,478 /- एवढी रक्कम 24 टक्के व्याजासह खातेदारांच्या खात्यामध्ये जमा करावे. व तक्रारदारांच्या खात्यातील चुकीच्या नोंदी दुरूस्त कराव्यात व रू. 2,00000/- एवढी रक्कम मानसिक त्रासापोटी द्यावी तसेच तक्रार अर्ज खर्च रू 25,000/- द्यावा. अशी मागणी केली आहे.
9. हजर राहून तक्रारदारास उत्तर दाखल करावे अशी नोटीस सा. वाले यांना मंचाकडून पाठविण्यात आली. नोटीस सा.वाले यांना मिळाली. त्याची पोचपावती अभिलेखावर दाखल आहे. नोटीस मिळूनही सा.वाले गैरहजर राहीले. म्हणून सा.वाले यांचे विरूध्द तक्रार अर्ज एकतर्फा निकाली काढण्यात आला.
10. तक्रार अर्ज व अनुषंगीक कागदपत्रे यांची पडताळणी केली असता निष्कर्शासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारदार यांनी सा.वाले यांच्या सेवेतील कमतरता सिध्द केले आहे काय ? | नाही. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रार अर्जात केलेल्या मागणीस पात्र आहेत काय ? | नाही. |
3. | अंतीम आदेश | तक्रार अर्ज रद्द करण्यात येतो. |
कारण मिमांसा
11. तक्रारदार यांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी न घेतलेल्या लोनचे पैसे सा.वाले यांनी तक्रारदारांच्या बचत खात्यातून काढुन घेतले.
12. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे ः-
दि. 23.07.08 रू. 1940/-
दि. 23.08.08 रू. 1950/-
दि. 24.09.08 रू. 1960/-
दि. 24.10.08 रू. 1960/-
दि. 24.11.08 रू. 1970/-
दि. 24.03.09 रू. 2430/-
एकुण रक्कम रू. 12.210/-
परंतू तक्रारदारांनी या व्यवहाराबद्दल (tranjection) कोणताही पूरावा दाखल केला नाही. उलट बँकेचे जे अकौंट स्टेटमेंटन्स दाखल केले आहेत त्यातील आकडेवारी वरील व्यवहाराशी मिळतीजूळती नाही.
13. तसेच तक्रारदारांनी तक्रार अर्जात असे म्हटले आहे की, सा.वाले यांचेकडुन दि. 31.12.08 रोजी तक्रारदारांना पत्र मिळाले. त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना काही व्यवहार तक्रारदारांकडुन केलेले नाही याबद्दल कळविले आहे. हे पत्र निशाणी क्रं.C-7 वर दाखल आहे. परंतू या पत्रामध्ये नमूद केलेला क्रेडिट कार्ड क्रमांक व तक्रारदारांनी तक्रार अर्जात त्यांच्याकडे असलेला क्रेडिट कार्ड क्रमांक वेगळा आहे. यावरून तक्रारदार यांच्याकडे दूसरे क्रेडिट कार्ड असण्याची शक्यता नाकारत येत नाही व त्यावर लोन काढले असण्याची पण शक्यता नाकारता येत नाही.
14. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार सा.वाले यांनी तक्रारदाराच्या बचत खात्यातून एकूण 12,210/- एवढी रक्कम काढून घेतली आहे. परंतू तक्रारदाराने मागणी मात्र रू. 83,478/- 24 % व्याजदराने व्याजासह मागीतले आहे. यावरून तक्रारदारांची सा.वाले यांचेकडुन पैसे उकळण्याची प्रवृत्ती दिसून येते.
15. एकंदर कागदपत्रांची पडताळणी करून पाहली असता तक्रार अर्ज हा खोटया स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट होते.
16. वरील कारणावरून तक्रार अर्ज रद्द करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार अर्ज रद्द करण्यात येतो.