निकालपत्र :- (दि.28/11/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू होऊन ते वकीलांमार्फत हजर झाले व त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच तक्रारदार स्वत: व सामनेवाला यांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार ही सामनेवाला बँकेने कर्ज वसुलीची कायदेशीर प्रक्रिये राबवली नसलेने दाखल केली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदाराने सामनेवाला बँकेकडून लोन क्रेडीट कार्ड खाते काढलेले आहे. सदर क्रेडीट कार्ड खाते क्रमांक अनुक्रमे 5177194306758001 व 4443410080307000 असा आहे. सदर क्रेडीट कार्डचा वापर तक्रारदार हे करत होते व अंतिम तारखेपूर्वीच मागील महिन्याची देय बाकी रक्कम सामनेवाला बँकेकडे चेकने जमा करत होते. सदर खातेचे तक्रारदार कधीही थकबाकीदार नव्हते व नाहीत. तक्रारदाराने वर नमुद खातेवरील वयवहारापोटी तक्रारदाराचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-दसरा चौक, कोल्हापूर या बँकेतील बचत खाते क्र.10967120520 वरील चेकअन्व्ये सामनेवालांचे देय रक्कमा अदा केलेल्या आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे 1. क्रेडीट कार्ड खाते क्र. 5177194306758001 अ.क्र. | कालावधी | देय रक्कम | चेक क्र. व दिनांक | अदा केलेली रक्कम | बचत खातेवरुन रक्कम कमी केले बाबतचा दि. | 01 | 20.05.08ते 20.06.08 | 2691.32 | 507181 दि.07.07.08 | 2692/- | 10.07.08 | 02 | 20.06.08ते 20.07.08 | 2174.73 | 507183 | 2175/- | 13.08.08 | 03 | 20.07.08ते 20.08.08 | 1421.68 | 507189 | 1422/- | 06.09.08 | 04 | 20.09.08ते 20.10.08 | 2350/- | 507194 | 2350/- | 10.11.08 | 05 | 20.12.08ते 20.11.09 | 992/- | 507196 | 992/- | ----- |
2. क्रेडीट कार्ड खाते क्र. 4443410080307000 अ.क्र. | कालावधी | देय रक्कम | चेक क्र. व दिनांक | अदा केलेली रक्कम | बचत खातेवरुन रक्कम कमी केले बाबतचा दि. | 01 | 20.07.08 ते 20.08.08 | 6473.22 | 507190 दि.04.09.08 | 6474/- | 06.09.08 |
वर नमुद तपशीलातील खाते क्र.1 मधील अनुक्रमांक 2 ते 4 मधील रक्कमा सामनेवाला यांनी सदर रक्कमा मिळून जवळजवळ दोन वर्षानी म्हणजेच दि.08/2/2011 रोजी जमा केली आहे. तसेच तेवढया कालावधीत रक्कमा मिळूनही सदर क्रेडीट खातेवर चुकीचे खोटे व्याज व इतर दंड आकारणी लावलेली आहे. तशी खोटी व चुकीची बिले तक्रारदारांना पाठवून व गुंड प्रवृत्तीचया लोकांना पाठवून येणे बाकी रक्कम भरणेबाबत धमकी देत आहेत. सदर खातेवर तक्रारदार कोणतीही रक्कम देणे लागत नाही. तसेच सदर रक्कमा अदा करुनही व त्या सामनेवालांकडे जमा करुनही सामनेवालांनी चुकीची दुरुस्ती करुन दिलेली नाही; तसेच तक्रारदार त्यांचे कोणतेही देणे नसलेमुळे तक्रारदाराने सदर क्रेडीट खातेवरील सर्व व्यवहार बंद केलेले आहेत. सामनेवाला यांनी सदर रक्कमा मिळूनही पुन्हा सदर रक्कमा थकीत दाखवून त्यावर दंड व्याज व इतर अधिभार आकारुन दर महिन्याला मागील महिन्यापेक्षा जादा रक्कमेची बिले पाठवून सेवात्रुटी केली आहे. तक्रारदाराने सामनेवाला बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला फोन करुन तसेच ईमेल व्दारे तक्रार सांगून निवारण करणेविषयी विनंती केली. सदर तक्रारदाराकडून येणे बाकी असलेल्या चुकीच्या आकारणीबाबत त्यांचे कागदोपत्री समाधान करणेसाठी त्यांनी मागणी केलेप्रमाणे तक्रारदाराने स्टेट बॅक ऑफ इडियाचे त्याचे खातेचा उताराही पाठविलेला आहे. तरीही सामनेवाला यांनी तक्रारदारास कोणतीही दाद दिली नाही व चुकीची बिले पाठवणे सुरुच ठेवून सदर रक्कमा भरणेबाबत धमकी देऊ लागले. वस्तुत: सदर रक्कमा वर नमुद केले तपशीलाप्रमाणे त्यांना मिळालेल्या आहेत. तरीही सामनेवाला यांनी अनुक्रमांक 1 वरील रक्कम रु.2692/- दि.06/09/2008 रोजी मिळालेली असूनही ती दि.29/08/2008 रोजी मिळालेचे कळवलेले आहे. तसेच रक्कम रु.2175/- व 1422/- व 2350/- ही रक्कम दि.08/2/011 रोजी मिळाली असलेचे कळवलेले आहे. वसतुत: सदर रक्कमा वर नमुद केले तपशीलाप्रमाणे सामनेवाला बॅकेस अनुक्रमे दि;13/08/2008, 06/09/2008 व दि.10/11/2008 रोजी वर नमुद धनादेशाव्दारे मिळालेल्या आहेत. तसेच दुसरे खातेवरील रक्कम रु.6474/- ही रक्कम दि.24/1/2009 रोजी मिळालेचे कळवलेले ओह. वस्तुत: सदर रक्कम दि.06/09/008 रोजी सामनेवाला यांना मिळालेली आहे. अशी वस्तुस्थिती असतानाही सामनेवाला बॅकेने तक्रारदार त्यांचे कोणतेही देणे लागत नसतानासुध्दा वर नमुद सदर दोन क्रेडीट कार्ड खातेचे थकबाकीदार म्हणून तक्रारदाराचे नांव CIBIL या संस्थेमध्ये दिलेले आहे. सदर संस्था ही वित्तीय संस्था व बँका यांचेकडून थकीत कर्जदार यांचे कर्जासंबंधीची पूर्वीची व चालूची सर्व प्रकारची माहिती घेऊन संगणक प्रणालीमध्ये साठवून ठेवतात व ठराविक कालांतराने सदर माहिती अदयावत करत असतात. नवीन कर्जदाराला कर्ज देणेपूर्वी सदर कर्ज मागणीदार हा CIBIL मध्ये थकबाकीदार असेल तर त्यास कर्ज देणेस नाकारतात. तक्रारदाराची CIBIL ला नोंद झालेने व तसा रिपोर्ट असलेने तक्रारदारास त्याचे दैनंदिन व व्यावसायिक गरजांसाठीचा वित्त पुरवठा वित्तीय संस्था व बँकाकडे मागणी करुनही मिळत नाही. यामुळे तक्रारदाराची बदनामी होऊन त्यास आर्थिक त्रासास सामोरे जावे लागले आहे. दि.17/8/2010 रोजी सामनेवाला बँकेने तक्रारदारास कोणतीही पूर्वसुचना न देता क्रेडीट खाते क्र. 4443410080307000 कायम स्वरुपी बंद केले आहे. यावरुन सदर खातेवर कोणतीही येणे बाकी नसलेचे सामनेवाला बँकेने मान्य केले आहे; तरीही सदर क्रेडीट कार्डचा थकबाकीदार म्हणून CIBIL मध्ये तक्रारदाराचे नांव आहे. सदर नांव काढून टाकणेबाबत तक्रारदाराने सामनेवालांना नोटीस पाठवली होती; सदर नोटीसला सामनेवाला यांनी उत्तर दिलेले नाही. सामनेवालांचे गैरकृत्यामुळे व सेवात्रुटीमुळे तक्रारदारास अपरिमित अशा आर्थिक नुकसानीबरोबरच शारिरीक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागले आहे; त्यामुळे प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन सामनेवाला बँकेस तक्रारदाराचे नांवचे CIBIL मध्ये थकबाकीदार म्हणून असलेले नांव काढून टाकणेबाबत आदेश व्हावा. तसेच सदर दोन्ही क्रेडीट कार्डावर कोणतीही येणे बाकी नसलेबाबतचा नाहरकत दाखला दयावा. आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.2,00,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/-वसुल होऊन मिळणे बाबत आदेश व्हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेले क्रेडीट कार्ड क्र.8001 व 7000, तक्रारदाराचा स्टेट बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर येथील बचत खाते क्र.10967120520, सदर बचत खात्याचा उतारा,क्रेडीट कार्ड क्र.8001चे जुन-08 ते जानेवारी-09 अखेरची बीले, सामनेवाला यांना तीन चेकचे पेमेंट मिळालेबाबतची पावती, क्रेडीट कार्ड क्र.7000 चे ऑगस्ट-08 चे बील, सदर बील फेब्रुवारी-09 मध्ये मिळालेबाबत, क्रेडीट कार्ड क्र.7000 ची बाकी नसलेबद्दले पत्र, तक्रारदार यांनी CIBIL कडे पाठवलेले पत्राची पोच पावती, CIBIL ने दिलेला तक्रारदार यांचे नावचा रिपोर्ट, तक्रारदार व सामनेवाला यांचेमधील ई मेल, तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेली वकील नोटीस, त्याची पोष्टाची पावती, पोच पावती, क्रेडीट कार्ड 8001 चे ऑगस्ट-11चे बील इत्यादी कागदपत्रे दाखल केल्या आहेत.तसेच दि.19/11/2011 रोजी सामनेवाला बँकेने तक्रारदार यांना पाठविलेले पत्र, सामनेवाला यांनी सप्टेंबर-11 चे रु.963.89/- चे पाठविलेले बील, तक्रारदार यांनी सामनेवाला बॅकेकडे रु.964/- रोखीने भरलेली पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली. (04) सामनेवाला यांचे म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार मान्य केली कथनाखेरीज परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदाराने हिशोबाचा वाद उपस्थित केलेमुळे हिशोबाबाबतचा वाद निराकरण करणेचे अधिकारक्षेत्र मे. मंचास येत नाही. तक्रारदाराचे तक्रारीस कारण घडलेला कालावधी हा दि.20/5/2008 ते 20/06/2008 अखेर असलेने प्रस्तुत तक्रारीस मुदतीचा बाध येतो. तक्रारदाराने सत्य वस्तुस्थिती मे. मंचापासून लपवून ठेवलेली आहे. तक्रार अर्ज कलम 1 मधील मजकूर बरोबर आहे. तक्रार अर्ज कलम 2 मधील मजकूर अंशत: बरोबर आहे. तक्रारदार क्रेडीट कार्डवरील देणे लागत असले रक्कमेबाबतचा मजकूर वगळता अन्य मजकूर बरोबर आहे. कलम 3 मधील मजकूर हा दिशाभूल करणारा आहे. तक्रारदार हा कधीही कथन केलेप्रमाणे खातेवरील चुकीच्या निराकरणाबाबत प्रत्यक्ष आलेला नाही. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे खातेवर शिल्लक रक्कम कोणतेही अन्य आकार न लावता रिव्हर्स करुन देऊनही अदयपही रक्कम देणे लागतो. सदर रक्कम देणेस तो कायदयाने बांधील आहे. सामनेवाला यांनी कधीही त्यांचे कुठल्याही व्यक्तीस तक्रारदाराकडे पाठवलेले नाही. सामनेवाला यांनी दिवसागणीक झालेल्या व्यवहाराची नोंद खातेउता-यावर केलेली आहे. सामनेवाला यांनी चुकीची बिले पाठवलेले नाही किंवा धमकी दिलेली नाही. सामनेवाला यांनी CIBIL ला कधीही तक्रारदाराचे नांव कळवलेले नाही. सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही; सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवालांनी आपल्या म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे व सामनेवालांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे व उभय पक्षांचा लेखी युक्तीवाद तसेच उभय पक्षांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? --- होय. 2. काय आदेश? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:- सामनेवाला यांनी तक्रारदारास क्रेडीट कार्ड खाते क्रमांक अनुक्रमे 5177194306758001 व 4443410080307000 असे दोन क्रेडीट कार्ड दिलेले आहेत. सदर खातेवर तक्रारदार व्यवहार करत असलेचे सामनेवाला यांनी मान्य केलेले आहे. प्रस्तुत क्रेडीट कार्डच्या सत्यप्रती दाखल आहेत. तसेच सदर दोन्ही खातेवर झालेल्या व्यवहाराची स्टेटमेंट प्रस्तुत कामी दाखल आहेत. तक्रारदाराने त्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाकडील सेव्हींग खाते क्र. 10967120520 चा उतारा दाखल केलेला आहे. दि.21/06/2008 चे स्टेटमेंटप्रमाणे क्रेडीट कार्ड खाते क्र.5177194306758001 रु.2691.32 इतकी रक्कम देय असलेचे दर्शवितो. सदर रक्कम तक्रारदाराने चेक क्र.507181 रक्कम रु.2692/- तक्रारदाराचे खातेतून दि.10/07/08 रोजी नमुद चेकचे अदापोटी शिल्ल्केतून कमी झालेचे दिसून येते. मात्र प्रस्तुतची रक्कम सामनेवाला यांचे स्टेटमेंटप्रमाणे दि.29/08/08 रोजी चेक क्र.507181 अन्वये क्रेडीट केलेची दिसून येते. सदर रक्कम 49 दिवस उशिरा जमा घेतलेली आहे. तदनंतर तक्रारदाराने चेक क्र.507183 अन्वये रक्कम रु.2175/- सामनेवाला यांना अदा केलेली आहे. सदर रक्कम तक्रारदाराचे नमुद बचत खातेतून दि.13/08/08 रोजी शिल्लकीतून कमी करणेत आलेली आहे. चेक क्र.507189 चा रु.1422/- इतकी रक्कम सामनेवाला यांना अदा केली असून दि.06/09/08 रोजी तक्रारदाराचे शिल्लक रक्कमेतून कमी झालेली आहे. रक्कम रु.2350/- चेक क्र.507194 अन्वये सामनेवाला यांना अदा केलेली आहे व दि.10/11/08 रोजी सदर रक्कम तक्रारदाराचे नमुद बचत खातेच्या शिल्लक रक्कमेतून कमी झालेली आहे. सदर रक्कमा सामनेवाला यांना वर नमुद केले तपशीलाप्रमाणे मिळालेले असूनही सदर रक्कमा सामनेवाला यांनी दि.20/02/2011 चे स्टेटमेंटमध्ये प्रस्तत तीनही चेकच्या रक्कमा या दि.08/02/2011 रोजी क्रेडीट केलेल्या आहेत. सदर रक्कमा सामनेवाला यांना ऑगस्ट, सप्टेंबर व नोव्हेंबर-08 मध्ये मिळालेले असतानाही जवळजवळ दि.20/02/2011 म्हणजे अनुक्रमे 2 वर्षे सहा महिने, 2 वर्षे पाच महिने व 2 वर्षे चार महिने इतक्या उशिरा जमा म्हणून क्रेडीट केलेल्या आहेत. दि.21/06/08 चे स्टेटमेंटनुसार देय असणारी रक्कम रु.2691.32 ही 8 जुन-08 पूर्वी अदा करणेची होती. सदर रक्कम दि.07/07/08 चे चेकने अदा केलेली आहे. सदर रक्कम तक्रारदाराचे बचत खातेस दि.10/07/2008 रोजी खर्ची पडलेली आहे. तक्रारदाराने नमुद देय तारखेपूर्वी चेक दिलेला आहे. सबब नमुद स्टेटमेंटप्रमाणे तक्रारदार कोणतीही देय रक्कम लागत नाही. तरीही प्रस्तुत रक्कम दि.21/7/2008 चे स्टेटमेंटमध्ये देय रक्कम म्हणून समाविष्ट केलेली आहे तसेच त्यावर विविध चार्जेस आकारलेले आहेत. सदर स्टेटमेंटनुसार तक्रारदाराने दि.15/07/08 रोजी आयडीयल सेल्यूलर लि.मुंबई, इन्व्हाईस न.66 प्रमाणे रक्कम रु.591.23 तसेच दि.30/06/08 रोजी लकी बझारचे रु.253.50 तसेच दि.07/7/08 रोजी भारती सेल्यूलर लि. यांचे रु.1330/- असे एकूण रु.2174.73 इतकी रक्कम चेक क्र.507183 अन्वये रक्कम रु.2175/- दि.13/08/08 रोजी तक्रारदाराचे नांवे बचत खातेस खर्ची पडलेली आहे. यावरुन सामनेवाला यांना प्रस्तुतची रक्कम मिळूनही दि.21/8/08 चे स्टेटमेंटमध्ये रु.2692/- बरोबरच प्रस्तुत रक्कमही देय रक्कमेत समाविष्ट केलेली आहे. तसेच त्यावर विविध आकार आकारलेले आहेत. तदनंतर सदर स्टेटमेंटप्रमाणे दि.15/08/08 रोजी आयडिया सेल्यूलर लि.मुंबई इन्व्हाईस अन्वये 621.68 व सोना फुटवेअर कोल्हापूर इन्व्हाईस नं.54 अन्वये रु.800/- असे एकूण रु.1421.68 इतकी रक्कम चेक क्र.517189 रु.1422/-दि.06/09/08 रोजी अदा केलेली आहे. दि.20/09/08 चे स्टेटमेंटनुसार चेक क्र.507181 व्दारे मिळालेली रु.2692इतकी रक्कम क्रेंडीट केलेली आहे. मात्र रु.2175/- व रु.1422/- या रक्कमा थकीत देय रक्कमेमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. प्रस्तुत स्टेटमेंटनुसार दि.15/9/2008 रोजीचे आयडिया सेल्यूलर इन्व्हाईस नंबर अनुक्रमे क्र.66 व 2570व भारती सेल्यूलरचे अनुक्रमे रु.578.87 व रु.1090 अशी एकंदरीत रु.1668.87 इतकी रक्कम देय आहे. दि.21/10/2008 चे स्टेटमेंटमध्ये चेक क्र.507193 अन्वये रक्कम रु.1670/- क्रेडीट केलेली आहे. सदर रक्कम दि.13/10/08 रोजी तक्रारदाराचे नमुद बचत खातेस खर्ची पडलेली आहे. प्रस्तुत स्टेटमेंटनुसार आयडीया सेल्यूलर लि.मुंबई यांचे रु.1170.52 व भारती सेल्यूलर रु.1180/- अशी एकंदरीत रु.2350.52 इतकी रक्कम तक्रारदाराने चेक क्र.507194 अन्वये दि.10/11/2008 रोजी अदा केलेचे दिसून येते. तक्रारदाराचे नमुद बचत खातेवर प्रस्तुत रक्कम खर्ची पडलेली आहे. दि.21/11/2008 च्या स्टेटमेंटमध्ये वरील अदा केलेल्या रक्कमासुध्दा देय बाकीत समाविष्ट केलेल्या आहेत. सदर स्टेटमेंटनुसार आयडिया सेल्यूलर लि.मुंबई यांचे दि.15/11/08 रु.1071.53 दि.27/10/08 रोजी गायत्री सिलेक्शन रु.1125/- व करवीर क्रिएशन रु.985/- व भारती सेल्यूलर रु.1550/- अशी एकूण रु.4711.53 इतक्या रक्कमेपोटी तक्रारदाराने चेक क्र.507195 अन्वये रु.4732/- दि.15/12/08 रोजी तक्रारदाराचे बचत खातेस खर्ची पडलेले आहेत. प्रस्तुत रक्कम दि.20/12/08 चे स्टेटमेंटमध्ये दि.15/12/08 रोजी क्रेडीट केलेली आहे. दि.21/01/2009 रोजीचे स्टेटमेंटनुसार दि.15/1/09 रोजी आयडिया सेल्यूलर इन्वहाईस नं.44201 अन्वये रु.581.50, दि.19/12/2008 रोजी आयडिया सेल्यूलर कोल्हापूर रु.880/- व दि.16/12/2008 रोजी लकी बझार रु.112.50 अशी एकूण रु.1574/- रक्कम देय दिसते. मात्र प्रस्तुत स्टेटमेटमध्ये रु.581.50 या आयडिया सेल्यूलरच्या रक्कमेस गोल केलेले आहे. सबब प्रस्तुत रक्कमेतून सदर रक्कम वजा जाता रु.992.50 इतकी रक्कम शिल्लक राहते. ती तक्रारदाराने चेक क्र.507197 रक्कम रु.1060/- अन्वये अदा केलेचे दिसून येते. तदनंतर तक्रारदारने क्रेडीट खातेवरील व्यवहार बंद केलेने तक्रारदार देय असलेल्या संपूर्ण रक्कमा तक्रारदाराने वेळेत अदा केलेल्या असूनही सदर रक्कमा थकीत देय रक्कमेत समाविष्ट केलेल्या आहेत. तक्रारदाराने ईमेल व्दारे व तोंडी व लेखी तक्रारी केल्यानंतर दि.20/02/2011 चे स्टेटमेंमध्ये प्रस्तुत रक्कमा जवळजवळ 2.5 वर्षापूर्वी मिळूनही प्रस्तुत रक्कमांची नोंद 2.5 वर्षानंतर सदर रक्कमांची नोंद सदर सटेटमेंटनुसार क्रेडीट केलेल्या आहेत. ही सामनेवालांची चुकी आहे. तसेच सदर रक्कमा मिळूनही सदर रक्कमा देय रक्कमांमध्ये समाविष्ट करुन त्यावर लेट फी, सर्व्हीस टॅक्स, इंटरेस्ट इत्यादीचा जादा आकार समाविष्ट केलेला आहे. त्याप्रमाणे तक्रारदाराचे बचत खातेवरुन सदर रक्कमा मिळलेचे दिसून येते. तरीही सामनेवाला यांनी प्रस्तुत रक्कमा थकीत देणे दाखवून व तयाप्रमाणे बिले पाठवून रक्कमा उकळण्याचा प्रयत्न केलेला आहे. तक्रारदाराने त्याबाबत र्इमेल व्दारे तक्रारी देऊन वेळोवेळी संपर्क साधलेला आहे. तक्रारदाराने दिलेला चेक वेळेत घेणे व वेळेत वटवून घेणे ही सामनेवालांची जबाबदारी आहे. रक्कमा मिळूनही त्या स्टेटमेंटला उशिरा नोंदवणे व त्यावर लेट पेमेंट फी व जादा आकार घेणे ही सामनेवालांची गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला इतकेच करुन थांबले नाहीत तर प्रस्तुत मिळालेल्या रक्कमांच्यापोटी थक दाखवल्यामुळे सीआयबीआयएल ला थकबाकीदार म्हणून नोंद झालेली आहे हे दाखल सीआयबीआयएल रिपोर्टवरुन दिसून येते. वस्तुत: तक्रारदार सदर खातेपोटी कोणतीही रक्कम देणे लागत नसतानासुध्दा सामनेवाला यांचे चुकीच्या हिशोब पध्दतीमुळे त्यास विनाकारण आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागले आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चेक क्र.507189 रक्कम रु.1422/- तसेच चेक क्र.507190 रक्कम रु.6474/- एकाच दिवशी अदा केलेले आहेत. चेक क्र.507190 ची रक्कम दि.24/01/2009 रोजी नमुद स्टेटमेंटला क्रेडीट दाखवले आहे. मात्र रु.1422/- ची रक्कम जवळजवळ 2 वर्षे पाच महिन्यांनी दि.08/02/2011 रोजी क्रेडीट केलेली आहे. तसेच तक्रारदाराचे क्रेडीट खाते क्र. 4443410080307000 वर तक्रारदाराने दि.21/08/08 चे स्टेटमेंटप्रमाणे रु.6473.22 इतकी रक्कम दि.04/09/08 रोजी चेकव्दारे अदा केलेली आहे व तक्रारदाराचे बचत खातेतून दि.06/09/08 रोजीच शिल्लक रक्कमेतून कमी झालेली आहे. अशी वस्तुस्थिती असतानाही प्रस्तुत रक्कम दि.24/01/2009 रोजी क्रेडीट केलेली आहे. वस्तुत: सदर स्टेटमेंटप्रमाणे सदर संपूर्ण रक्कम तक्रारदाराने अदा केलेली आहे व तदनंतर तक्रारदाराने कोणताही व्यवहार केलेला नसतानाही तक्रारदाराचे नमुद खातेवर दि.21/02/2009 चे स्टेटमेंटप्रमाणे रु.3752.51 इतकी रक्कम देय असलेबाबत नमुद केले आहे. तसेच सामनेवालांचे स्टेटमेंटप्रमाणे तक्रारदारने दि.07/09/08 पूर्वी अदा करूनही इंटरेस्ट व सर्व्हीस टॅक्स इत्यादीची आकारणी केलेली आहे जी पूर्णत: चुकीची आहे. तसेच दि.17/08/2010 चे पत्रानुसार प्रस्तुत अकौन्ट हा प्रस्तुत क्रेडीट कार्ड कायमस्वरुपी डिअॅक्टीव्हेट केलेचे कळवलेले आहे. तसेच दि.16/08/2010 अखेर सदर क्रेडीट कार्डवर कोणतेही येणे बाकी नसलेबाबत कळवले आहे. तरीही सामनेवाला यांनी तक्रारदाराचे नांवे प्रस्तुत क्रेडीट कार्डचे खाते थकबाकीदार म्हणून CIBIL कडे नमुद असलेचे दिसून येते ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी आपले म्हणणेतील पॅरा 7 मध्ये तक्रारदाराचे म्हणणेप्रमाणे तक्रारदाराचे खातेवरुन बॅलन्स रक्कम रिव्हर्स केलेचे प्रतिपादन केले आहे. तसेच सामनेवाला यांनी इतर चार्जेस रिव्हर्स केले नसून ते तक्रारदार देय असलेचे प्रतिपादन केलेले आहे. यावरुन सामनेवाला यांनी त्यांची चुक मान्यच केलेली आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार कोणतीही रक्कम देणे लागत नाही. तसेच सदर रक्कम देणे लागत असेल तर त्याप्रमाणे सामनेवाला यांनी कागदोपत्री पुरावा अथवा स्पष्टीकरण दिलेले नाही. सबब केवळ सामनेवालांचे कथन विचारात घेता येणार नाही. तसेच तक्रारदाराने दि.19/11/2011 रोजीचे कागदपत्राप्रमाणे दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता दि.25/08/2011 चे पत्राप्रमाणे खाते क्र.8001 या खातेवर दि.23/08/2011 रु.2963.87 इतकी बाकी असलेचे कळवलेले आहे. सदर रक्कम तक्रारदाराने सदर खातेवर रोखीत भरलेल्या चलनाची पावती तक्रारदारने प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेली आहे. सदरची रक्कम दि.08/10/2011 रोजी प्रस्तुत रक्कम रु.2964/- भरलेचे दिसून येते. तसेच दि.20/09/2011 चे स्टेटमेंटमध्ये रिसर्व्हसल एंट्रीची नोंद आहे. यावरुन तक्रारदाराने प्रस्तुत खातेवरील संपूर्ण रक्कमा अदा केलेचे दिसून येते. तरीही दि.29/06/2011 चे CIBIL रिपोर्टमध्ये नमुद तक्रारदाराचे क्रेडीट खाते क्र.8001 व 7000 वर तो थकबाकीदार असलेच्या नोंदी आहेत. प्रस्तुत रक्कमा अदा करुनही सामनेवाला यांनी सदर रिपोर्टमधून तक्रारदाराचे नांव कमी करणेसाठी कोणतीही हालचाल केलेली नाही ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे. तक्रारदार हा थकबाकीदार नसतानाही सामनेवाला यांनी तो थकबाकीदार दाखवल्याने CIBIL मध्ये तक्रारदाराची तशी नोंद झालेली आहे. हे सामनेवालांचे सेवेतील त्रुटीमुळे घडलेले आहे. यामुळे तक्रारदाराची बाजारातील पत घसरलेली आहे. त्यामुळे त्याला त्याचे दैनंदिन वा अन्य कारणासाठी मागणी करुनही संस्था अगर बँकाकडून वित्त पुरवठा करणेस सदर CIBIL रिपोर्टमुळे नकार दिला जात आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवालांचे सेवेतील ही अक्षम्य त्रुटी आहे. सबब तक्रारदार सदर सेवात्रुटीमुळे झालेल्या आर्थिक, मानसिक व शारीरीक त्रासापोटी तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला यांनी वर नमुद दोन्ही क्रेडीट कार्ड वर कोणतेही येणे नसलेबाबतचा नाहरकत दाखला दयावा. 3. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे CIBILमधील थकबाकीदार म्हणून असलेले नांव कमी करणेबाबत योग्य ती कार्यवाही त्वरीत करावी. 4. सामनेवाला यांनी तक्रारदारास आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (रु. पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |