Maharashtra

Kolhapur

CC/10/261

A) Pravin Babaso Jadhav, B) Ajit Ashok Solankure, C) Kum.Anil Ashok Solankure, D) Kum.Satyam Balaso Bodhale, E) Shivam Balaso Bodhale, F) Kum.Revati Balaso Bodhale, G) Kum.Punam Balaso Jadhav - Complainant(s)

Versus

Ichalkaranji Urban Co-op Bank Ltd. Ichalkarnji - Opp.Party(s)

Umesh Mangave

30 Oct 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/261
1. A) Pravin Babaso Jadhav, B) Ajit Ashok Solankure, C) Kum.Anil Ashok Solankure, D) Kum.Satyam Balaso Bodhale, E) Shivam Balaso Bodhale, F) Kum.Revati Balaso Bodhale, G) Kum.Punam Balaso Jadhav1-A) to F) R/o.Kagal, Tal. Kagal Dist. Kolhapur. 1-G) R/o.Gargoti, Tal.Bhudargad, Dist.Kolhapur. (Complainant in Complaint No.261/10)2. A) Sou.Seem Balaso Bodhale, B) Kum.Satyam Balaso Bodhale, C) Kum.Revati Balaso Bodhale, All R/o.Patil Galli, Kagal, Tal.Kagal, Dist.Kolhapur (Complainants in Complaint No.262/10) ...........Appellant(s)

Versus.
1. Ichalkaranji Urban Co-op Bank Ltd. IchalkarnjiRajwada, Ichalkaranji, Kolhapur.2. Ichalkaranji Urban Co-opp Bank ltd.Branch-Kagal,Kagal.Kolhapur3. Chairman,Sunil Maharudra Todakar.10/74,Kalanagar,Ichalkaranji.Kolhapur4. Ashok Rajaram Shinde.17/2506,Vivekanand Coloney Ichalkaranji.Kolhapur5. Vasant Krishnaji Dattawade.1/320,Ichalkaranji Kolhapur6. Ramdas Baburao Chougule8/713,Sutarmala.Ichalkaranji Kolhapur7. Raheman Babalal Khalipha10/310,Ichalkaranji Kolhapur8. Chandrashekhar Manikchand Shah3/213,Ichalkaranji Kolhapur9. Dwarkadhis L.Sarada.3/700,Zenda Chowk.Ichalkaranji Kolhapur10. Bhupal Shripal Wathare.9/208,Sangli Road.Ichalkaranji Kolhapur11. Munaf M.Satarmekar.Tiranga Coloney.Kabnur.Ichalkarnji Kolhapur12. Ganpati Shidu Jog.3/183,Ichalkarnji Kolhapur13. Suhas Rajaram Kumbhar9/1478,Ichalkaranji Kolhapur14. Shidhu Bandu Kengar7/207, Ichalkaranji Kolhapur15. Raghnath Suryappa Desinge25/126,Shahapur.Ichalkaranji Tal-Hatkanangale.Kolhapur16. Sou.Surekha Raosaheb Patil8/82.Takwadewes,Ichalkarnji,Tal-Hatkanangale.Kolhapur17. Manager,Mahavir Annaso Alase.Visrambag.Sangli. Tal-Miraj.Sangli.18. Liqidetor.Dinesh ChandelIchalkaranji Urban co opp bank ltd. Icahalkaranji Tal-Hatkanangale.Kolhapur19. Amrutrao Patil Liqidetar.Ichalkaranji Urban Co opp Bank ltd. Ichalkaranji Tal-Hatkanangale.Kolhapur20. Liqidator.B.S.Patil.Ichalkaranji Urban co opp Bank ltd. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv.Umesh Managave for the Complainants
Adv.B.D.Patil for the complainants

Dated : 30 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

संयुक्‍त निकालपत्र :- (दि.30.10.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

(1)        प्रस्‍तुत ग्राहक तक्रार केस नं.261 व 262/2010 या तक्रारींच्‍या विषयांमध्‍ये साम्‍य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्‍याने हे मंच दोन्‍ही प्रकरणांमध्‍ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे.
 
(2)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.16 ते 19 यांनी एकत्रित म्‍हणणे दाखल केले. तसेच, सामनेवाला क्र.2 ते 15 यांनीही एकत्रित म्‍हणणे दाखल केलेले आहे. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या व सामनेवाला यांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(3)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           सामनेवाला क्र.1 ही सहकारी बँक असून सामनेवाला क्र.2 ही सदर बँकेची शाखा आहे. सामनेवाला क्र.3 हे सदर बँकेचे चेअरमन तर सामनेवाला क्र.4 हे व्‍हाईस चेअरमन आहेत. सामनेवाला क्र.5 ते 15 हे संचालक आहेत. सामनेवाला क्र.17 हे सामनेवाला बँकेचे मॅनेजर आहेत. सामनेवाला क्र.18 ते 20 हे सामनेवाला क्र.1 बँकेचे अवसायक मंडळाचे अध्‍यक्ष व सदस्‍य आहेत.   यातील तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या व कुटुंबियांच्‍या नांवे सामनेवाला बँकेकडे मासिक व्‍याज उत्‍पन्‍न ठेव, मुदत बंद, दामदुप्‍पट व रिकरिंग खात्‍याच्‍या स्‍वरुपात रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
261/10
700468
20000/-
2.
--”--
700465
20000/-
3.
--”--
700466
20000/-
4.
--”--
700467
20000/-
5.
--”--
700469
20000/-
6.
--”--
023519
1500/-
7.
--”--
023520
1500/-
8.
262/10
रिकरिंग खाते क्र. 600104
28690/-
9.
--”--
034307
25000/-
10.
--”--
034308
25000/-

 
(4)        तक्रार क्र.261/10 मधील तक्रारदार क्र.7 च्‍या विवाहकरिता उपयोगी याव्‍यात या उद्देशाने व तक्रार क्र.262/10 मधील तक्रारदार क्र.2 यांच्‍या औषधोपचाराकरिता ठेवी ठेवलेल्‍या होत्‍या.   सदर ठेवींची तक्रारदारांनी सामनेवाला बँकेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रार क्र.261/10 मधील तक्रारदारांनी दि.24.04.2009 व दि.25.05.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली.  तर तक्रार क्र.262/10 मधील तक्रारदारांनी सामनेवाला बँकेला दि.24.04.2009, दि.16.07.2009, दि.08.01.2010 रोजी सामनेवाला यांचेकडे पत्रान्‍वये ठेव रक्‍कमांची मागणी केली आहे.  तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(5)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या, रिकरिंग खात्‍यांचे पासबुक व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस व पत्रव्‍यवहार इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(6)        सामनेवाला क्र.16 ते 19 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सामनेवाला बँकेतील संपूर्ण व्‍यवहारास अनुसरुन भारतीय रिझर्व्‍ह बँकेने दि.20.04.2009 रोजीचे पत्राने दि बॅंकिंग रेग्‍युलेशन अ‍ॅक्‍ट 1949 चे कलम 35 ए प्रमाणे निर्बंध लागू केले होते. तदनंतर दि.16.10.2009 रोजीच्‍या पत्राने आर.बी.आय.ने आर्थिक निर्बंधास पुन्‍हा मुदतवाढ दिली. तसेच, आर.बी.आय. यांनी दि.08.02.2010 रोजीच्‍या आदेशान्‍वये सामनेवाला बँकेचा परवाना रद्द केला असून सह.आयुक्‍त व निबंधक, सहकारी संस्‍था, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे यांनी दि.04.03.2010 रोजीच्‍या आदेशानुसार सामनेवाला बँकेवर अवसायक मंडळाची नेमणुक केलेबाबतचा आदेश दिलेला आहे. त्‍याप्रमाणे सामनेवाला बँक ही अवसायनात काढलेली असल्‍याने सध्‍या बॅंकेचे संपूर्ण कामकाज अवसायक मंडळ पहात आहे. 
 
(7)        सामनेवाला क्र. 16 ते 19 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदार यांनी ठेवलेल्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा तक्रारदारांना व्‍याजासह परत मिळणार आहेत; त्‍यामुळे त्‍यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच, सदरचा अर्ज दाखल करणेस कोणतेही कारण घडलेले नसताना सदरचा अर्ज दाखल केलेला आहे. तसेच, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा प्रामाणिकपणे परत करणेतची इच्‍छा आहे. तथापि, सामनेवाला बँकेचे   दुस-या मोठया सक्षम बँकेत विलीनकरणाच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न सुरु आहेत.   सामनेवाला बँक ही अवसायनात गेली असलेने म.स.का.नुसार रजिस्‍ट्रार हे शासकिय प्रतिनिधी असलेने त्‍यांची लेखी परवानगीशिवाय अर्ज दाखल करता येणार नाही. तक्रारदारांच्‍या ठेवीचा विमा संरक्षण असलेने त्‍यांना व्‍याजासहीत रक्‍कम तात्‍काळ परत मिळणेसाठी विमा महामंडळाकडे कारवाई सुरु आहे. तक्रारदारांनी म.स.सं.अधिनियम 1960 चे कलम 70 प्रमाणे कागदत्रांची पूर्तता केलेली नसून त्‍याप्रमाणे ठेवींच्‍या संदर्भात रजिस्‍ट्रार यांचा आवश्‍यक तो दाखला या कामी हजर केलेला नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. 
 
(8)        सामनेवाला क्र. 16 ते 19 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ आर.बी.आय.ने निर्बंध घातलेबाबतचे दि.20.04.2009 व दि.16.10.2009 ची पत्रे, परवाना रद्द केलेबाबतचे दि.08.02.2010 व दि.11.02.2001 रोजीची पत्रे, अवसायक मंडळाची नेमणुकीचे पत्र दि.04.03.2010 चे पत्र, डिपॉ.इन्‍श्‍यु. अ‍ॅण्‍ड क्रेडिट गॅरंटी कार्पो.यांचे दि.13.04.2010 रोजीचे पत्र, दि.10.03.2010 रोजीचा ठराव इत्‍यादीच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.
 
(9)        सामनेवाला क्र.2 ते 15 यांनी त्‍यांचे म्‍हणणे सर्वसाधारणपणे सामनेवाला क्र.1, 20 ते 22 यांचेप्रमाणेच दाखल केले आहे. तथापि, त्‍यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात काही जादा मुद्दे मांडले आहेत, ते असे - सामनेवाला क्र.13, 17 ते 19 यांची तज्‍ज्ञ संचालक म्‍हणून नेमणुक झालेली असल्‍याने त्‍यांचे विरुध्‍द सदरची तक्रार चालू शकत नाही. तसेच, भारतीय रिझर्व्‍ह बँकेने बँकिंग रेग्‍युलेखन अ‍ॅक्‍ट मधील तरतुदीनुसार (कलम 22, 11 (1), 22 (3)अ, 22(3) ब व म.स.संस्‍था अधिनियम 1960 चे अधिनियम 110-अ नुसार सामनेवाला बँकेचे परवाना रद्द केलेच्‍या हुकूमाविरुध्‍द व अवसायक मंडळ नेमलेल्‍या हुकूमाविरुध्‍द व अवसायक मंडळ नेमलेल्‍या हुकूमाविरुध्‍द सामनेवाला बँकेच्‍या संबंधित संचालक मंडळाने भारत सरकार, वित्‍त मंत्रालय, अर्थ विभाग (बँकिंग डिव्‍हीजन) यांचेकडे अपिल नं.14(ड/2010) एसी दाखल केलेले आहे. सदर कामी संचालकांचे बाजूने निकाल झालेस त्‍यांचे सामनेवाला बँकेवर नियंत्रण राहील. तदनंतर, प्रस्‍तुत सामनेवाला तक्रारदारांच्‍या रक्‍कमा देण्‍यास तयार आहेत. तसेच, सारस्‍वत बँकेमध्‍ये विलीनीकरण करणेचाही प्रयत्‍न चालविलेला आहे. सद्यस्थितीत सामनेवाला बँकेवर अवसायक मंडळ असल्‍याने तक्रारदारांना त्‍यांच्‍या ठेवी त्‍यांचेकडेच मागणेचा अधिकार आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुत सामनेवाला यांना बँकेच्‍या कामकाजात हस्‍तक्षेप करता येत नसल्‍याने तक्रारदारांची रक्‍कम परतफेड करणेबाबत त्‍यांची जबाबदारी वैयक्तिक व संयुक्तिक स्‍वरुपात येत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. 
 
(10)       सामनेवाला क्र. 2 ते 15 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ आर.बी.आय.ने निर्बंध घातलेबाबतचे दि.20.04.2009 व दि.16.10.2009 ची पत्रे, परवाना रद्द केलेबाबतचे दि.08.02.2010 व दि.11.02.2001 रोजीची पत्रे, अवसायक मंडळाची नेमणुकीचे पत्र दि.04.03.2010 चे पत्र, डिपॉ.इन्‍श्‍यु. अ‍ॅण्‍ड क्रेडिट गॅरंटी कार्पो.यांचे दि.13.04.2010 रोजीचे पत्र, दि.02.06.2010 रोजीचे अर्थ मंत्रालयाचे अपिल सुनावणीबाबतचे पत्र इत्‍यादीच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.
 
(11)        या मंचाने दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांचा युक्तिवाद सविस्‍तर व विस्‍तृतपणे ऐकलेला आहे. सामनेवाला हे सहकार कायद्यान्‍वये नोंद झालेली सहकारी बँक आहे व इतर सामनेवाले हे सदर बँकेचे पदाधिकारी आहेत. तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेमध्‍ये मुदत बंद ठेवी ठेवलेल्‍या आहेत. प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता सदर ठेवींच्‍या मुदती या संपलेल्‍या आहेत. मुदत संपूनही तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा व्‍याजासह तक्रारदारांना अदा केलेल्‍या नाहीत याबाबतच्‍या तक्रारदारांच्‍या तक्रारी आहेत. सामनेवाला यांनी दाखल केलेले म्‍हणणे तसेच उपलब्‍ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. सामनेवाला यांनी सदरचा वाद हा ग्राहक वाद होत नाही असा मुद्दा उपस्थित केलेला आहे. परंतु ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2 (1)(ओ) यातील तरतुद विचारात घेतली असता सामनेवाला बँकेने त्‍यांच्‍या सभासदांच्‍याकडून ठेवी स्विकारलेल्‍या आहेत व त्‍या अनुषंगाने सदर ठेवीवर ते व्‍याज देतात. याबाबतची सेवा ही ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्‍या तरतुदीखाली येते. सबब, प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदर विवेचनास पूर्वाधार म्‍हणून - थिरुमुरुगन 2004 (I) सी.पी.आर.35 - ए.आय.आर.2004 (सर्वोच्‍च न्‍यायालय), तसेच कलावती आणि इतर विरुध्‍द मेसर्स युनायटेड वैश्‍य को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड - 2002 सी.सी.जे.1106 - राष्‍ट्रीय आयोग - याचा आधार हे मंच घेत आहे.
 
(12)       सामनेवाला बँकेवरती सद्यस्थितीत सामनेवाला हे संचालक व पदाधिकारी म्‍हणून कार्यरत नाहीत, तसेच सामनेवाला बँकेवर अवसायकांची नियुक्‍ती केली असल्‍याने प्रस्‍तुतची तक्रार तक्रारदारांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 खाली दाखल करता येणार नाही या अनुषंगाने महाराष्‍ट्र राज्‍य सहकारी संस्‍था कायदा, कलम 105 यातील तरतुदी सामनेवाला यांच्‍या वकिलांनी या मंचाच्‍या निदर्शनास आणून दिलेल्‍या आहेत. तसेच, भारतीय रिझर्व्‍ह बँकेने बँकींग रेग्‍युलेशन अक्‍ट 1949 कलम 35 (ए) प्रमाणे सामनेवाला बँकेवर निर्बंध घातले असल्‍याने या कारणावरुनही प्रस्‍तुतची तक्रार चालणेस पात्र नाही या मुद्दयाकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. प्रस्‍तुत प्रकरणी सामनेवाला यांनी भारतीय रिझर्व्‍ह बँकेने दि.16.10.2009 रोजी बँकिंग रेग्‍युलेशन अक्‍ट 1949 कलम 35 (ए) अन्‍वये निर्देश दिलेबाबतचा आदेश या मंचाच्‍या निदर्शनास आणून दिलेला आहे. परंतु, सदर दाखल केलेल्‍या आदेशाचे अवलोकन केले असता सद्य‍परिस्थितीत सदरचे निर्देश संपुष्‍टात आलेले आहेत व सामनेवाला बँकेवरती अवसायकांची नेमणुक केलेली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 3 यातील तरतुद विचारात घेतली असता सदर कायद्यातील तरतुदी या इतर अस्तित्‍त्‍वात असणा-या कायद्यास न्‍युनतम आणणा-या नसून पुरक आहेत. याचा विचार करता अवसायकांची नेमणुक झालेनंतर सामनेवाला बँक अथवा त्‍यांच्‍या पदाधिका-यांविरुध्‍द राज्‍य शासनाच्‍या सहकार खात्‍याचे निबंधक यांची महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था कायदा, कलम 107 अन्‍वये पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे याबाबतचा सामनेवाला यांनी केलेला युक्तिवाद हे मंच फेटाळत आहे. उपरोक्‍तप्रमाणे विवेचन केलेप्रमाणे भारतीय रिझर्व्‍ह बँकेने दिलेले निर्देश संपुष्‍टात आलेले आहेत. तसेच, सहकार खात्‍याच्‍या निबंधकांची तक्रार दाखल करणेपूर्वी पूर्व परवानगी घेणेची आवश्‍यकता नाही. सदर विवेचनास हे मंच खालीलप्रमाणे पूर्वाधार विचारात घेत आहे :-
 
Hon.National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi - Order dated 24th July, 2008.
(1)      Revision Petition No. 2528 of 2006 – Reserve Bank of India Vs. Eshwarappa & Anr.
 
(2)      Revision Petition No. 2529 of 2006 – Reserve Bank of India Vs. Eshwarappa & Anr.
 
(3)      Revision Petition No. 2530 of 2006 – Reserve Bank of India Vs. Eshwarappa & Anr.
 
(4)      Revision Petition No. 462 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Bhimsena Tukaramsa Miskin
 
(5)      Revision Petition No. 463 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Subhas                         
 
(6)      Revision Petition No.2254 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Ramdas Bhosale          
 
(7)      Revision Petition No.2255 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Eshwarappa Shettar     
 
(8)      Revision Petition No.2256 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Saraswati R. Bhosale   
 
(9)      Revision Petition No.2746 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Eshwarappa Ari           
 
 
(10)    Revision Petition No.2747 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Savitri Desaigoudar
 
11)     Revision Petition No.2748 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Eshwarappa Ari
 
(12)    Revision Petition No.2591 462 of 2007 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Basangouda R Kandagal
 
(13)       उपरोक्‍त विवेचन व पूर्वाधार यांचा विचार करता प्रस्‍तुतची तक्रार या मंचामध्‍ये चालणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  
 
(14)       या मंचाने प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता तक्रारदार ठेवीदारांनी सामनेवाला बँकेमध्‍ये ठेवी ठेवलेल्‍या आहेत व सदरच्‍या ठेवींच्‍या मुदती संपूनही सदर ठेव रक्‍कम व्‍याजासह दिलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे सामनेवाला यांच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी झाल्‍याचा निष्‍कर्ष हे मंच काढीत आहे.  सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तसेच युक्तिवादाचेवेळेस सामनेवाला बँकेच्‍या संचालक मंडळावरती महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था कायदा, 1960 यातील असलेल्‍या तरतुदीनुसार संचालक मंडळावरती अमर्यादित दायित्‍व (Unlimited liability) येत नाही असा मुद्दा उपस्थित केलेला आहे. तसेच, महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था कायदा कलम 83 व 88 अन्‍वये सहकार खात्‍याच्‍या निबंधकामार्फत चौकशी न झाल्‍याने संचालक मंडळावरती वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी येणार नाही या मुद्दयाकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. परंतु, ग्राहक संरक्षण कायदा, 1986 यामध्‍ये असलेल्‍या तरतुदींचा विचार करता सामनेवाला बँक ही ठेवी स्विकारते व तसेच व्‍याज देते व उपरोक्‍त उल्‍लेख केलेप्रमाणे सदरची सेवा ही ग्राहक वाद होत आहे या मुद्दयाचा विचार करता तसेच महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था कायदा कलम 83 व 88 या कलमान्‍वये निबंधक, सहकारी संस्‍था यांचेमार्फत होणारी चौकशी ही संस्‍थेमध्‍ये अपहार झालेसंबंधीची चौकशी करता येते. परंतु, प्रस्‍तुतचा वाद हा सामनेवाला बँकेने दिलेल्‍या सेवेशी संबंधित आहे. त्‍यामुळे सामनेवाला यांनी महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था कायदा, 1960 कलम 83 व 88 अनुषंगाने उपरोक्‍त विवेचन केलेले मुद्दे हे मंच फेटाळत आहे.  सामनेवाला बॅंकेवरती अवसायकांची नेमणुक झाली आहे. सामनेवाला बँकेचे प्रतिनिधी या नात्‍याने तक्रारदारांच्‍या ठेवींच्‍या देय रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र.18 ते 20- अवसायकांची जबाबदारी ही संयुक्तिकरित्‍या असेल. परंतु, महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था कायदा, कलम 73(1)(ए),(बी) यातील तरतुदींचा विचार करता तक्रारदारांच्‍या ठेवींच्‍या देय रक्‍कमा देणेची सामनेवाला बँकेचे प्रस्‍तुत प्रकरणी असलेले सामनेवाला पदाधिकारी यांची जबाबदारी ही वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या असेल. सदर विवेचनास पूर्वाधार हा पुढीलप्रमाणे :-
 
भुदरगड नागरी सहकारी संस्‍थेविरुध्‍द मा.राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोग, महाराष्‍ट्र, मुंबई यांचेकडे दाखल झालेल्‍या अपिल क्र. 1197/2003 व 1546/2003 - श्री.दत्‍तात्रय एस्. देसाई व इतर विरुध्‍द प्रतापराव इंगळे व इतर - यामध्‍ये दि.04.11.2004 रोजी मा.राज्‍य आयोग यांनी सामनेवाला यांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या जबाबदार ठरविलेले आहेत. 
 
(15)       सामनेवाला क्र.17 हे सामनेवाला बँकेचे अधिकारी असल्‍याने तक्रारदारांची ठेव रक्‍कम व्‍याजासह परत करणेकरिता त्‍यांना केवळ संयुक्तिकरित्‍या जबाबदार धरणेत यावे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 
 
(16)       तक्रार क्र.261/10 मधील तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍या या मुदत बंद व मासिक व्‍याज उत्‍पन्‍न ठेवींच्‍या आहेत व त्‍यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांच्‍या मुदत ठेव रक्‍कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(17)       तक्रार क्र.262/10 तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावती क्र.034307 व 034308 या दामदुप्‍पट ठेवींच्‍या असून त्‍यांच्‍या मुदती संपलेल्‍या आहेत असे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांवरील मुदतपूर्ण रक्‍कमा मुदत संपलेल्‍या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(18)       तसेच, तक्रार क्र.262/10 मधील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे सेव्‍हींग्‍ज खात्‍याच्‍या स्‍वरुपातदेखील रक्‍कमा ठेवल्‍याचे दिसून येते. सदर रिकरिंग खाते क्र. 600104 वर दि.21.12.2009 रोजीअखेर रुपये 28,690/- जमा असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर सेव्हिंग्‍ज खात्‍यावरील रक्‍कम द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(19)       तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(20)       उपरोक्‍त विवेचन व पूर्वाधार यांचा विचार करता हे मंच ग्राहक तक्रार क्रमांकनिहाय आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
(1)   तक्रारदारांच्‍या तक्रारी मंजूर करणेत येतात.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 16 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.17 ते 20 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील मुदत बंद व मासिक व्‍याज उत्‍पन्‍न ठेव रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर ठेव पावत्‍यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
261/10
700468
20000/-
2.
--”--
700465
20000/-
3.
--”--
700466
20000/-
4.
--”--
700467
20000/-
5.
--”--
700469
20000/-
6.
--”--
023519
1500/-
7.
--”--
023520
1500/-

 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 16 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.17 ते 20 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील दामदुप्‍पट रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर दि.04.05.2000 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
262/10
034307
25000/-
2.
--”--
034308
25000/-

 
(4)   सामनेवाला क्र.1 ते 16 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.17 ते 20 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रार क्र.262/10 मधील तक्रारदारांना त्‍यांच्‍या सेव्हिंग्‍ज खाते क्र.600104 वरील रक्‍कम रुपये 28,690/- (रुपये अठ्ठावीस हजार सहाशे नव्‍वद फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर दि.15.12.2007 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(5)   सामनेवाला क्र.1 ते 16 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.17 ते 20 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या प्रत्‍येक तक्रारीकरिता तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
 
(6)   सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्‍यांच्‍या ठेवींपोटी यापूर्वी जर काही व्‍याजाच्‍या रक्‍कमा अदा केल्‍या असतील तर सदर व्‍याजाच्‍या रक्‍कमा वळत्‍या करुन घेण्‍याचा सामनेवाला यांचा अधिकार सुरक्षित ठेवणेत येतो.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER