Maharashtra

Nagpur

CC/612/2015

SMT. NEETA NITESH DEO - Complainant(s)

Versus

ICAD SCHOOL OF LEARNING PVT. LTD. , THROUGH, Chief Executive Officer- Shri. Sarang Upalangwar - Opp.Party(s)

VRUSHALI PRADHAN

23 May 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/612/2015
 
1. SMT. NEETA NITESH DEO
R/O. G-15, LAXMINAGAR NAGPUR
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. ICAD SCHOOL OF LEARNING PVT. LTD. , THROUGH, Chief Executive Officer- Shri. Sarang Upalangwar
R/O. 21, TILAK NAGAR, NAGPUR
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
For the Complainant:VRUSHALI PRADHAN, Advocate
For the Opp. Party:
Dated : 23 May 2017
Final Order / Judgement

 (मंचाचा निर्णय : श्री. विजय प्रेमचंदानी - मा. अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये) 

1.       तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्तीचे तक्रारीतील थोडक्‍यात कथन असे आहे की,  तक्रारकर्ती ही कु. सारंग देव याची पालक आहे. सारंग देव याने वर्ष 2013 -14 यावर्षी 10 वीची परिक्षा पास केली आहे. सारंग देव याने 10 ची परिक्षा पास केल्‍या नंतर  व 10 वी परिक्षा पास होण्‍यापूर्वी झालेला आय.सी.ए.डी. स्‍कुल लर्निंग प्रा.लि. च्‍या सी.पी.ए. ची परिक्षा पास केली. म्‍हणून विरुध्‍द पक्ष तक्रारकर्तीच्‍या मुलास दोन वर्षांचा कोर्सकरीता प्रवेश देण्‍यांस पात्र ठरविले. विरुध्‍द पक्षांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्‍याचे अगोदरच क्‍लासेस चालू केले व त्‍यावेळेस असे घोषीत केले की, या घेण्‍यांत येणा-या क्‍लासेसमध्‍ये 11 व 12 वी कोर्स स्‍टेट बोर्ड सिल्‍यॅबसचा अभ्‍यास करुन घेण्‍यांत येणार नाही. या घोषणेनंतर तक्रारकर्ती यांना काही समजेनासे झाले व तिने त्‍याबाबत विचारपूस केली. तक्रारकर्तीला प्रवेश घेण्‍यापूर्वी अशी कोणतीही घोषणा करण्‍यांत आलेली नव्‍हती व असे खोटे आश्‍वासन देण्‍यांत आले होते की, आम्‍ही तुमच्‍या पाल्‍यांना पूर्ण 11 व 12 चे कोर्स व बोर्ड सिल्‍यॅबर्स पूर्ण करुन देऊ. त्‍याच्‍या बरोबर आम्‍ही कॉम्‍पीटेटीव्‍ह परिक्षांचा कोर्स पूर्ण करुन देऊ. तक्रारकर्तीने भरलेले शुल्‍क हे प्रवेश रद्द केल्‍यानंतर परत करण्‍यांत यावे ही सरळ प्रक्रिया होती व त्‍याकरीता लागणारी सर्व कारवाई देखिल तक्रारकर्तीने केली होती. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीचे पैसे परत करायचे नसल्‍याने ते अश्‍याप्रकारची टाळाटाळ व फसवणूक करीत आहेत. म्‍हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

2.   तक्रारकर्तीने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीकडून घेतेले शुल्‍क रु.79,656/- व्‍याजासह परत करावी. तसेच तक्रारकर्तीस झालेल्‍या मानसिक, शारीरिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च मिळण्‍यचा आदेश व्‍हावा.

3.     तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन विरुध्‍द पक्षांना नोटीस काढण्‍याचा आदेश पारित करण्‍यांत आला. विरुध्‍द पक्ष नोटीसची बजावणी होऊन सुध्‍दा प्रकरणात हजर झाले निशाणी क्र.8 वर त्‍यांनी आपले लेखीउत्‍तर दाखल केले. विरुध्‍द पक्षांनी लेखीउत्‍तरात असे कथन केले आहे की, तक्रारकर्तीने तक्रारीत लावलेले सर्व आरोप खोटे असून ते त्‍यांना नाकबुल आहेत.  विरुध्‍द पक्षाने असे कथन केले आहे की, तक्रारकर्तीने ई-मेलव्‍दारे पत्र पाठवुन विरुध्‍द पक्षांना असे कळविले की, त्‍यांनी खाजगी कारणाने विरुध्‍द पक्षाचे क्‍लासेस सोडत आहेत. तसेच तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षांचे क्‍लॉसेसमध्‍ये प्रवेश घेतेवेळी प्रस्‍ताव अर्जावर नमुद असलेल्‍या अटी व शर्ती त्‍यांना मान्‍य होत्‍या. त्‍यात अट क्र.23 मधे नमुद आहे की, क्‍लॉसेस सुरु झाल्यानंतर 10 दिवसांचे नंतर जर प्रवेश रद्द झाल्‍यावर कोणतेही शुल्‍क परत केल्‍या जाणार नाही. या बाबींची जाणीव असुन सुध्‍दा तक्रारकर्तीने खोटी तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीप्रती कोणतीही न्‍यूनतम सेवा दर्शविलेली नाही. सबब सदर तक्रार खारिज करण्‍यांत यावी, अशी विनंती केलेली आहे.

4.  तक्रारकर्तीतर्फे दाखल तक्रार, दस्‍तावेज, शपथपत्र, विरुध्‍द पक्षांचे उत्‍तर, तक्रारकर्तीचा लेखी युक्तिवाद व दोन्‍ही पक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यांत आला असता खालील मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍यावरील निष्‍कर्ष आणि त्‍याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे. 

                    मुद्दे                                                                                         निष्‍कर्ष 

1) तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षांची ग्राहक आहे काय ?                                होय.                 

2) विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीप्रती अनुचित व्‍यवहार प्रथेचा अवलंब

    केला आहे काय ?                                                                              होय.

3) अंतिम आदेश काय ?                                                                     आदेशाप्रमाणे.

5.   मुद्दा क्र.1 बाबतः- तक्रारकर्तीचा मुलगा कु. सारंग देव याने विरुध्‍द पक्षांच्‍या शैक्षणिक संस्‍थान कोचिंग क्‍लॉसेसमध्‍ये एकूण रक्‍कम रु.79,656/- शुल्‍क भरुन प्रवेश घेतला होता ही बाब दोन्‍ही पक्षांना मान्‍य असून तसेच तक्रारकर्ती ही कु. सारंग देव यांची पालक असुन तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षांची ग्राहक आहे हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यांत येते. 

6.    मुद्दा क्र.2 बाबतः- तक्रारकर्तीचा मुलगा सारंग देव यांने विरुध्‍द पक्षांकडे जेईई प्रोग्रामची परिक्षेकरीता व 11 वी 12 वी मधील स्‍टेट बोर्डची परिक्षेचा अभ्‍यासक्रम पूर्ण करण्‍याकरीता प्रवेश घेतला होता. तक्रारकर्तीने तिचे मुलाचा अभ्‍यासक्रम स्‍टेट बोर्ड प्रमाणे होत नव्‍हता म्‍हणून विरुध्‍द पक्षाचे कोचिंग क्‍लॉसेसतून त्‍याचा प्रवेश रद्द करण्‍याबाबत विनंती केलेली होती ही बाब तक्रारकर्तीने दाखल निशाणी क्र.4 वरील दस्‍त क्र.7 वरुन दिसुन येते. परंतु विरुध्‍द पक्षाने याबाबत तक्रारकर्तीला कोणतेही उत्‍तर दिलेले नाही तसेच विरुध्‍द पक्षाच्‍या कोचिंग क्‍लॉसेसमध्‍ये 11 वी व 12 वी चा अभ्‍यासक्रम, स्‍टेट बोर्डचा अभ्‍यासक्रम प्रमाणे घेण्‍यात येतो ही बाब विरुध्‍द पक्ष प्रकरणात सिध्‍द करु शकले नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीने लिहीलेले दि.21.07.2015 च्‍या पत्राचे उत्‍तर दिले नाही व याबाबतही कोणतेही स्‍पष्‍टीकरण त्‍यांचे लेखीउत्‍तरात दाखल केलेले नाही. याअर्थी तक्रारकर्तीने तक्रारीत विरुध्‍द पक्षाचे अभ्‍यासक्रमबाबत लावलेले आरोप सिध्‍द होते. विरुध्‍द पक्षांकडे 11 वी व 12 वी स्‍टेट बोर्ड परिक्षेच्‍या अभ्‍यासक्रमाप्रमाणे अभ्‍यास होते असे दर्शवुन तक्रारकर्तीकडून तिचे मुलाचा प्रवेश घेतला व प्रवेश शुल्‍क भरण्‍यांस लावले, ही बाब विरुध्‍द पक्षांची तक्रारकर्तीप्रती अनुचित व्‍यवहार प्रथेचा अवलंब ठरते व सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यांत येते. 

6.  मुद्दा क्र.3 बाबतः- मुद्दा क्र. 1 व 2 चे विवेचनावरुन खालिलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्‍यांत येतो.                                            

 - // अंतिम आदेश // -

1.    तक्रारकर्तीची तक्रार अंश‍तः मंजूर करण्‍यांत येते.

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीकडून घेतलेली रक्‍कम रु.79,656/- दि.21.07.2015 पासुन प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9% व्‍याजासह परत करावी.  

3.    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीस झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,500/- अदा करावा.

4.   वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्षाने आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.

5.   दोन्‍ही पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्‍य द्यावी. 

6.    तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.