तक्रार क्रमांक – 496/2009 तक्रार दाखल दिनांक – 30/07/2009 निकालपञ दिनांक – 30/12/2009 कालावधी -00वर्ष 04महिना 19 दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे 1.महादेव मारुती म्हात्रे 202, निर्माण आशा को.ऑ.ही.सो, निर्माण नगर, निलेमोरे, नालासोपारा(प) ता.वसई, जि.ठाणे 401203. 2.समीर महादेव म्हात्रे 202, निर्माण आशा को.ऑ.ही.सो, निर्माण नगर, निलेमोरे, नालासोपारा(प) ता.वसई, जि.ठाणे 401203. ...तक्रारकर्ता विरुध्द आय.सी.एफ.अ.नॅशनल कॉलेज व्यवस्थापन क्षितीज अपार्टमेंट, पेट्रोल पंपाजवळ, भायंदर मिरारोड(पूर्व), जि-ठाणे. ...विरूध्दपक्षकार गणपूर्तीः - सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा श्री.पी.एन.शिरसाट, मा.सदस्य उपस्थितीः- तक्रारकर्ता स्वतः विरुध्दपक्षातर्फे प्रतिनिधी -निकालपत्र - (पारित दिनांक-30/12/2009) सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा यांचेद्वारे आदेशः- 1. तक्रारकर्ता यांचा मुलगा श्री. समीर महादेव म्हात्रे हा विरुध्द पक्षकार कॉलेजमध्ये उच्चशिक्षणासाठी (MBA) ह्या अभ्यासक्रमासाठी 2007 ते 2009 ह्या बॅच मध्ये शिकत होता. त्याचा रोल क्र. 7NBMM077 असुन, त्यांच्या पुर्ण दोन वर्षाच्या अभ्यास क्रमाची फी एकुण रुपये 3,16,000/- होती. प्रथम वर्षाची फी रु.1,63,000/- व दुस-या वर्षाची फी रु.1,53,000/- होती. प्रथम वर्षाची फी खालील प्रमाणे भरली होती. .. 2 .. अ.क्र. रक्कम तारीख डी.डी/चेक क्र. पावती क्र. 1. 10,000/- 02.07.07 138976 2. 42,075/- 11.07.07 डी.डी क्र.959729 236015 3. 1,10,925/- 22.09.07 828374 पोच 1,63,000/- एकुण जमा तक्रारकर्ता नी 22/09/2007 पर्यंत पहिल्या वर्षाची पुर्ण फी भरुन सुध्दा कॉलेज व्यवस्थानाने ता. 30/10/2007 रोजी दिलेल्या हमी चेक पैकी पहिला चेक क्र.665911 हा पत्नीच्या खात्यातुन रु.42,075/- वटविण्यात आला. पत्नीला काही कामानिमित्त पैसे पाहिजे असल्यामुळे बँकेत गेल्यानंतर समजले की बँक खात्यातुन कॉलेज व्यवस्थापनाने चेक वटविल्यामुळे खात्यात पुरेसे शिल्लक नाहित. म्हणुन हि घटना कॉलेज व्यवस्थापनाकडे तोंडी सांगुन लक्षात आणुन दिले. व्यवस्थापनाने आम्हास तोंडी आश्वासन दिले पण परत न केल्याने दि.24/01/2008 रोजी कॉलेज व्यवस्थापनाला पत्राने कळवुन दि.25/01/2008 रोजी मुख्यालय हैद्राबाद येथील पत्यावर कुरियरने पत्राची प्रत पाठविल्यानंतर चार महिन्याने दि.21/02/2008 रोजी तक्रारकर्ता यांच्या मुलाच्या नावाने रु.37,704/- म्हणजेच रु.4,371/- कमी दिले. म्हणुन पुन्हा कॉलेज व्यवस्थापनाच्या तोंडी सांगुन लक्षात आणुन दिले. परंतु त्यांच्याकडुन काहिही उत्तर न आल्याने पुन्हा दि.23/04/2008 रोजी कॉलेज व्यवस्थापनाला लेखी पत्र लिहुन कळविले की आपण रु.4,371 परत करा किंवा ती रक्कम पुढील वर्षातील फी मधुन कमी करुन घ्या म्हणजेच ऐकुण रु. 1,49,621/- एवढी घ्यावी. परंतु कॉलेज व्यवस्थापनाने दुस-या वर्षाची पूर्ण फी रु.1,53,000/-भरावयास लावली. म्हणुन पुन्हा दि.20/08/2008 रोजी कॉलेज व्यवस्थापनास लेखी कळविले की माझ्या कडुन जास्त घेतलेली रक्कम व माझे उरलेले सहा हमी असलेले चेक सुध्दा परत करावे. परंतु कॉलेज व्यवस्थापनाने पुर्णपणे दुर्लक्ष केले. शेवटी दि.17/02/2008 रोजी कॉलेज व्यवस्थापनाला पुन्हा लेखी कळवुन माझे पैसे व बाकी राहिलेले सहा चेक परत करण्याची विनंती केली, .. 3 .. परंतु कॉलेज व्यवस्थापनाने आजतागायत माझ्या चारही पत्राना उत्तर लिहिले नाही किंवा पैसे व चेक परत केले नाहीत. ह्या बद्दल फार मानसिक त्रास, शारिरीक त्रास तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागला म्हणुन आर्थिक भरपाई म्हणुन रक्कम रु.42,075/- चार महिने ठेवल्याबद्दल 12% व्याजाने झालेले रु.1,683 व्याज व स्वताचे रक्कम रु.4,371/- आजतागायत न दिल्याबद्दल 12% व्याजाने झालेले रु.655/- व रु.4371/- असे एकुण रक्कम रु.6709 मिळावे. तसेच यापुढे केसचा निर्णय लागेपर्यंत सदर रकमेवर 12% व्याज मिळावे. मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.15,000/- मिळावे. दाव्याचे खर्चापोटी रु.5,000/-. असे एकुण रु.26,709/- भरपाई मिळवुन देणे व सदर अनुचीत व्यापारी प्रथेस प्रतिबंध करावे. सेवेत निष्काळजीपणाची प्रथाबंद करावी मंचाकडे तक्रार करुन मला माझ्या झालेल्या नुकसाना पोटी भरपाई मिळवुन देण्याची कृपा करावी अशी विनंती मागणी केली आहे.
2. विरुध्द पक्षकार यांनी मंचात हजर राहुन दि.18/11/2009 रोजी लेखी जबाब दाखल केला आहे त्यांचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणेः- रक्कम रु.4,371/- परत केलेले आहेत. विलंबाने रक्कम परत करित आहेत त्याबाबत बँकदरांने व्याज रक्कम देण्यास तयार असल्याचे मान्य केले आहे. तथापी तक्रारकर्ता यांना जो त्रास ही रक्कम मिळणेसाठी झाला त्याचा खर्च व नुकसान भरपाई देण्यास तयारी दर्शवली नाही. तथापी मा.मंचाचा आदेश/निर्णय मान्य राहिल असे कबुल केल्याने मंचाने कोणत्याही मुद्दयावर ओहापोह करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. म्हणुन महत्वाचा एकच मुद्दा आहे की तक्रारकर्ता यांना वरिल धारणे मुळे आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास झाला काय? झाले असल्यास अनुतोष? उत्तर - सहाजिकच तक्रारकर्ता यांना वरिल सर्व घटनेमुळे रक्कम परत मिळवतांना स्वतःचे पैसे खर्च करुन रक्कम मिळवावी लागली .. 4 .. आहे वेळोवेळी कामधंदा सोडुन विरुध्द पक्षकार यांचे कडे जाणे त्यांना विनंती करणे व तरीही कदर न केल्याने मंचात तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. विरुध्द पक्षकार यांनी वास्तवीकरित्या त्वरित कोणत्याही प्रकारे त्रास न देता रक्कम परत केली असती तर तक्रारकर्ता या सर्व घटनेस व खर्चास समोर जावे लागेले नसते एवढया मोठया संस्थेने विद्यार्थीची व त्यांचे पालकांची गळचेपी करुन त्रास, मानहानी व अनेक मार्गाने कळत नकळत आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास नुकसान करणे ही बाब दखल घेण्यास पात्र व शौक्षणिक संस्थानी गांर्भियची आहे, पण अशा संस्था दखल गांर्भियाने घेत नाहीत म्हणुन त्यास शह बसणे, कायद्याचा चाप ठेवणे हे कायद्याचे तंत्र आहे म्हणुन न्यायोचित, विधियुक्त व संयुक्तिक आहे. म्हणुन विरुध्द पक्षकार हे तक्रारकर्तायास विलंबने रक्कम रु.4,371/- परत दिली पण तक्रारकर्ता यांना आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास व नुकसानीची कोणतीही रक्कम देणे प्रमाणिकपणे तयारी न दर्शविलेणे मंचास पुढील आदेश पारित करणे भाग पडले आहे कारण सहाजिकच ग्राहक संरक्षण कायदा 1986 हा ग्राहकांचे हक्क व हित जोपासणेसाठी स्वतंत्र एकमेव भारताचा कायदा अस्तित्वात आलेला आहे. अनेक वेळा रक्कम किती आहे यांस जास्त महत्व नसते पण ग्राहकांचा/पक्षका-याचा/तक्रारकर्ता यांचा स्वतःचा पैसा परत मिळवण्यासाठी जी तारेवरची कसरत करावी लागली, त्यासाठी जोडे झिजवावे तर लागलेच पण आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास ही दिलेला आहे. शैक्षणिक संस्था अवाढव्य अनेक प्रकारच्या रकमा चार्जेस आकारुन फी वसुल करित असतात काही वेळा दबावाने अन्य आकारण्या करुन मोठी पुंजी मिळवतात फायदा सातत्याने मिळवतात पण अशात-हेने त्रास देतात ही बाब अत्यंत गांर्भियची आहे. म्हणुन आदेश. -आदेश - 1.तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अशंतः मंजूर करण्यात आला आहे. .. 5 .. 2.विरुध्द पक्षकार आय.सी.एफ.अ.नॅशनल कॉलेज ने तर्कारकर्तांचे रक्कम रु.4,371/- हे अत्यंत विलंबाने परत केले परंतु त्यांचे व्याज व तक्रारकर्ता यांना ती रक्कम मिळविण्यासाठी आलेला खर्च, झालेला मानसिक त्रास व नुकसान यांची नुकसान भरपाई न दिल्याने व्याज, अर्जाचा खर्च नुकसान भरपाई देण्यास जबाबदार, बंधनकारक व पात्र आहेत. 3.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना रक्कम रु.4371/- 7% व्याज दराने व्याज रक्कम द्यावी तसेच सदर अर्जाचा खर्च रक्कम रु.2,000/-(रु. दोन हजार फक्त) व आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासाकरिता रक्कम रु.5,000/- (रु. पाच हजार फक्त) द्यावे. 4.सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. 5.तक्रारदार यांनी मा.सदस्यांकरीता तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल) त्वरीत परत घेऊन जाव्यात. अन्यथा मंच जबाबदार राहणार नाही. म्हणून केले आदेश. दिनांकः-30/12/2009 ठिकाणः-ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट)(सौ.शशिकला श.पाटील) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|