Maharashtra

Ahmednagar

CC/16/245

Kavita Ramdas Kande - Complainant(s)

Versus

I.D.E.O. Infrastructure ( Partnership Sanstha ) - Opp.Party(s)

Sunil Mundada

18 Dec 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/16/245
( Date of Filing : 05 Aug 2016 )
 
1. Kavita Ramdas Kande
Flat No. B 204, Shrikrishna Vrindavan Complex, S.No- 277/5 Plot No- 1, Lendkar Mala,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. I.D.E.O. Infrastructure ( Partnership Sanstha )
Radheya, Behind Samarth School, Kushthdham Road, Savedi,
Ahmednagar
Maharashtra
2. Sau. Hema Suresh Supekar (Partner )
Ganesh Colony, Pipeline Road, Savedi,
Ahmednagar
Maharashtra
3. Sau. Prajakta Prakash Borude (Partner)
Bhgyodaya Colony, Borude Mala,
Ahmednagar
Maharashtra
4. Yogesh Arjun Gondhale (Parter)
Bhgyodaya Colony, Borude Mala,
Ahmednagar
Maharashtra
5. Ajay Chandrakant Akade (Partner)
Shinde Mala, Savedi,
Ahmednagar
Maharashtra
6. Anil Shridhar Shevate
Parijat Colony, Balikashram Road,
Ahmednagar
Maharashtra
7. Prashant Asaram Bhojane (तर्फे ज.मु.)
Savedi, Ahmednagar,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Sunil Mundada, Advocate
For the Opp. Party:
Dated : 18 Dec 2019
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – १८/१२/२०१९

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार हे अहमदनगर येथील रहिवासी असुन सामनेवाले क्र.१ ही अहमदनगर शहरामध्‍ये बांधकाम व्‍यवसाय करणारी भागीदारी संस्‍था आहे. तसेच सामनेवाले क्र.२ ते ६ हे सदर भागीदारी संस्‍थेचे भागीदार आहेत. सामनेवाले क्र.७ हे सदर भागीदारी संस्‍थेचे स्‍पे.मुखत्‍यार पत्रधारक असुन मुखत्‍यार पत्राचा दस्‍त दि.०२-०८-२०१२ रोजी दस्‍त क्र.३९८१/१२ अन्‍वये दुय्यम निबंधक, अहमदनगर यांचे कार्यालयात नोंदविलेला आहे.  सामनेवाले यांनी मौजे नालेगाव ता.नगर जि.अहमदनगर येथील स.नं.२७७/५ मधील प्‍लॉट नं.१ यावर बांधलेल्‍या ‘’श्रीकृष्‍ण वृंदावन कॉम्‍प्‍लेक्‍स बिल्‍डींग बी’’ मधील स्‍टील्‍ट पहिल्‍या मजल्‍यावरील फ्लॅट नं.बी-२०४ याचे एकुण बांधकाम क्षेत्र ६३.०३ चौ.मी. अशी मिळकतीचे बांधकाम करण्‍याचे ठरविले व तशी जाहीरात केली. तक्रारदारास स्‍वतःला राहण्‍यासाठी सदनिकेची अत्‍यंत आवश्‍यकता असल्‍याने तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याशी संपर्क साधला त्‍यावेळी सामनेवाले यांनी तक्रारदारस नियोजित अपार्टमेंटचा कच्‍चा आराखडा दाखविला व त्‍याप्रमाणे संपुर्ण योजनेचे बांधकाम करून तक्रारदारास त्‍यांनी आरक्षित केलेल्‍या सदनिकेचा पुर्णत्‍वाच्‍या दाखल्‍यासह बोजविरहीत खरेदी खताने ताबा देण्‍याचे मान्‍य व कबुल केलेले होते. त्‍याचप्रमाणे सदरील संपुर्ण योजनेचे बांधकाम उच्‍च दर्जाचे आर.सी.सी. मध्‍ये राहील असे सामनेवाले यांनी आश्‍वासन दिलेले होते. सामनेवाले यांनी दिलेल्‍या आश्‍वासनावर विसंबुन तक्रारदाराने आराखड्याप्रमाणे सदर प्‍लॉटवरील ‘श्रीकृष्‍ण वृंदावन काम्‍प्‍लेक्‍स बिल्‍डींग बी’ मधील स्‍टील्‍ट  पहिल्‍या म‍जल्‍यावरील फ्लॅट नं.बी.-२०४ याचे एकुण बांधकाम क्षेत्र ६३.०३ चौ.मी. ही सदनिका आरक्षित केलेली होती व आहे. उभयतात ठरल्‍याप्रमाणे सदनिकेची एकुण किंमत रक्‍कम रूपये १५,००,०००/- होती. सदर सदनिकेच्‍या बुकिंगपोटी सामनेवाले यांच्‍या मागणीनुसार तक्रारदाराने दि.१९-०६-२०१२ रोजी सामनेवाले यांना रक्‍कम रूपये ५,००,०००/- रोख स्‍वरूपात आणि रक्‍कम रूपये २,००,०००/- चा ए.डी.सी.सी. बॅंकेचा धनादेश क्र.६२५१६८ सामनेवाले यांना दिला. सदरील दोन्‍ही रक्‍कम सामनेवाला यांना मिळालेली असुन तशी ए‍कत्रित पावती  दि.१९-०६-२०१२ रोजी सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या लेटरहेडवर सही शिक्‍का करून तक्रारदाराच्‍या लाभात दिलेली आहे. तद्नंतर तक्रारदार व सामनेवाले यांच्‍या  दरम्‍यान सदर सदनिका खरेदीबाबत करारनामा साठेखत दस्‍त क्र.६०९१/२०१२ दिनांक ०१-११-२०१२ रोजी दुय्यम निबंधक, अहमदनगर ३ यांचे कार्यालयात नोंदविलेला आहे. त्‍यावेळी सदरील रोख रक्‍कम रूपये पाच लाखाचा उल्‍लेख करारनाम्‍यात नव्‍हता म्‍हणुन तक्रारदाराने विचारणा केली असता सामनेवाले यांनी वर नमुद केल्‍याप्रमाणे गृह कर्जाच्‍या रकमेतुन सदरची रक्‍कम तक्रारदारास परत देण्‍यात येईल असे आश्‍वासन दिले असल्‍याने तक्रारदाराने सदर करार नोंदविलेला आहे. तक्रारदाराने सामनेवाले यांना दि.३०-०४-२०१४ रोजी धनादेश क्र.१०१०१३ अन्‍वये रक्‍कम रूपये ९,५०,०००/- अदा केली. त्‍यानंतर दि.१७-०६-२०१५ रोजी धनादेश क्र.०३२९७४ अन्‍वये रक्‍कम रूपये १,५०,०००/- अदा केले. अशाप्रकारे सामनेवाले यांना एकुण रकमेपेक्षा जास्‍त रक्‍कम मिळाल्‍याने तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याकडे त्‍यांनी दिलेल्‍या आश्‍वासनाप्रमाणे बुकींगच्‍यावेळी रोख घेतलेल्‍या रकमेची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली व तक्रारदार हिला उडवाउडवीची उत्‍तरे दिली. तक्रारदाराने सदर रकमेपैकी संपुर्ण ठरलेली रक्‍कम रूपये पंधरा लाख वजा जाता असलेली रक्‍कम रूपये ३,००,०००/- विनाविलंब तक्रारदारास परत द्यावी व खरेदी खत लिहुन नोंदवुन द्यावे अशी सामनेवाले यांना विनंती केली. परंतु सामनेवाले यांनी कबुल केल्‍याप्रमाणे नियोजित वेळेत बांधकाम पुर्ण न केल्‍यामुळे आणि रक्‍कम देऊ लागु नये या गैरउद्देशाने सामनेवाला यांनी टाळाटाळ करण्‍यास सुरूवात केली आणि तक्रारदाराच्‍या  विनंतीची कोणतीही दखल घेतली नाही. सामनेवाले यांनी अपार्टमेंटचे बांधकाम अपुर्ण केले, याबाबत पाठपुरावा केला असता सामनेवाले यांनी उर्वरित संपुर्ण बांधकाम व सोई सुविधा देण्‍याचे मान्‍य केले. तक्रारदाराला स्‍वखर्चाने पिण्‍याचे पाण्‍याचे कनेक्‍शन घ्‍यावे लागले. तक्रारदाराने मोठ्या प्रमाणावर खर्च करून सदर सदनिका राहण्‍यायोग्‍य करून घेतली. तरीही सामनेवाले यांनी महाराष्‍ट्र फ्लॅट व ओनरशिप अॅक्‍टचे तरतुदीनुसार तक्रारदारास आवश्‍यक त्‍या सोईसुविधा पुरविल्‍या  नाहीत. अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदारासोबत अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करून तक्रारदारास सदोष सेवा पुरविलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदाराचे मोठ्या प्रमाणात आर्थिक, शारीरिक व मानसिक हानी झालेली असुन, सदरील मनस्‍तापास केवळ सामनेवाले हेच जबाबदार आहेत. म्‍हणुन तक्रारदार यास सामनेवालेविरूध्‍द सदरचा तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे.   

३.   तक्रारदार यांनी अशी विनंती केली आहे की, सामनेवाले यांनी तक्रारदारास सदर अपार्टमेंटमधील तक्रारदाराने आरक्षित केलेल्‍या सदनिकेच्‍या मोबदल्‍यापेक्षा रक्‍कम रूपये तीन लाख जादा दिलेले आहे. सदरील रक्‍क्‍म रूपये तीन लाख प्रत्‍यक्ष तक्रारदाराच्‍या पदरी पडेपावेतो द.सा.द.शे. २४% व्‍याजाने तक्रारदारास देण्‍याचा सामनेवालेविरूध्‍द हुकूम व्‍हावा. सदरील अपार्टमेंटचे संपुर्ण बांधकाम करून देऊन महानगरपालिकेकडुन पुर्णत्‍वाचा दाखला मिळवुन तक्रारदारास देण्‍याचा सामनेवाले यांच्‍याविरूध्‍द हुकूम व्‍हावा. सदरील अपार्टमेंटमधील तक्रारदाराने आरक्षित केलेल्‍या मिळकतीच्‍या वर्णनात नमुद केलेली ‘श्रीकृष्‍ण वृंदावन कॉम्‍प्‍लेक्‍स बिल्‍डींग बी’ मधील स्‍टील्‍ट पहिल्‍या मजल्‍यावरील फ्लॅट नं.बी-२०४ याचे एकुण बांधकाम क्षेत्र ६३.०३ चौ.मी. ही मिळकत बोजा विरहित करून देऊन त्‍याचे खरेदी खत तक्रारदाराच्‍या लाभात लिहुन नोंदवुन द्यावेत असा सामनेवाले यांच्‍याविरूध्‍द हुकुम करण्‍यात यावा. अर्ज कलम ९ मध्‍ये नमुद केलेप्रमाणे संपुर्ण बांधकाम व सोई सुविधा कॉमन विजेचे कनेक्‍शन व इतर सवलती करून द्याव्‍यात असा सामनेवाले विरूध्‍द हुकुम करण्‍यात यावा तसेच सामनेवालेकडुन मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रूपये १,५०,०००/- व सदर अर्जाचा खर्च रूपये २५,०००/- मिळावा.

४.   तक्रारदार हिने तक्रारीसोबत निशाणी १/सी ला दस्‍तऐवज दाखल केले आहेत, ते पुढीलप्रमाणे.  सामनेवाले यांनी दि.१९-०६-२०१२ रोजी दिलेली पावती, तक्रारदार व सामनेवाले यांच्‍या दिनांक ०१-११-२०१२ रोजी झालेला करारनामा (साठेखत), सामनेवाले यांना तक्रारदाराने दिनांक १७-०६-२०१५ रोजीच्‍या  धनादेशाद्वारे रक्‍कम रूपये १,५०,०००/- दिल्‍याचे बॅंकेचे पत्र, सामनेवाले यांना धनादेशाद्वारे रक्‍कम रूपये ९,५०,०००/- तक्रारदाराने दिल्‍याचे बॅंकेचे दि.३०-०४-२०१४ रोजीचे एच.डी.एफ.सी. बॅंकेचे पत्र, तक्रारदाराला सामनेवालेने नविन विद्युत कनेक्‍शन देण्‍याबाबत सामनेवालेतर्फे स्‍पेशल मुख्‍त्‍यार प्रशांत भोजने यांनी करून दिलेले संमती पत्र इत्‍यादी कागदपत्र जोडलेले आहेत.

५.   तक्रारदाराची तक्रार दाखल करण्‍यात येऊन सामनेवालेंना मंचासमक्ष नोटीस पाठविण्‍यात आली. सामनेवाले यांना वेळोवेळी मंचातर्फे नोटीस पाठविण्‍यात आली. सामनेवाले क्र.१ ते ७ हे नोटीस मिळुनही हजर झाले नाही. म्‍हणुन निशाणी ८,९,४,७,३,५ नुसार नोटीस बजावणी होऊनही सामनेवाले क्र.१ ते ६ तसेच नि.२१ नुसार सामनेवाले क्र.७ वर दैनिक नगर स्‍वतंत्र या वृत्‍तपत्रात जाहीर नोटीस प्रसिध्‍द करूनही सामनेवाले क्र.७ मे. मंचात हजर झाले नाही. म्‍हणुन सामनेवाले क्र.१ ते ७ यांच्‍याविरूध्‍द सदरचे प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा हुकुम नि.१ वर मे. मंचातर्फे पारीत करण्‍यात आला. तक्रारदाराने नि.२२ ला लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.   

६.  तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, त्‍यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज, तक्रारदाराने दाखल केलेले नि.२० वरील लेखी युक्तिवाद याचे अवलोकन करता व तोंडी युक्तिवाद ऐकला असता या मंचासमोर न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील कारणमिमांसेप्रमाणे देत आहोत.

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात त्रुटी ठेवली आहे काय ?

होय  

(२)

तक्रारदार हे तक्रारीत नमुद मागणी मिळणेस पात्र आहे काय ?

होय

(३)

आदेश काय ?

अंतिम आदेशाप्रमाणे

कारणमिमांसा

७.  मुद्दा क्र. (१) :   तक्रारदाराने त्‍यांच्‍या युक्तिवादात कथन केले आहे की, तक्रारीत नमुद मिळकतीवर सामनेवाले यांनी २ बी.एच.के. अपार्टमेंटचे बांधकाम केलेले आहे व तशी जाहीरात केली. तक्रारदाराला स्‍वतः राहण्‍यासाठी सदनिकेची अत्‍यंत आवश्‍यकता असल्‍याने तक्रारदाराने संपुर्ण योजनेचे बांधकाम करून तक्रारदारास त्‍यांनी आरक्षित केलेल्‍या सदनिकेचा पुर्णत्‍वाच्‍या दाखल्‍यासह बोजविरहीत खरेदी खताने ताबा देण्‍याचे मान्‍य व कबुल केलेले होते. तक्रारदाराने सदनिकेच्‍या बुकिंगपोटी सामनेवाले यांना त्‍यांच्‍या मागणीनुसार तक्रारदाराने दि.१९-०६-२०१२ रोजी सामनेवाले यांना रक्‍कम रूपये ५,००,०००/- रोख स्‍वरूपात आणि रक्‍कम रूपये २,००,०००/- चा ए.डी.सी.सी. बॅंकेचा धनादेश क्र.६२५१६८ सामनेवाले यांना दिला. सदरील दोन्‍ही रक्‍कम सामनेवाला यांना मिळालेली असुन तशी ए‍कत्रित पावती दि.१९-०६-२०१२ रोजी सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या  लेटरहेडवर सही शिक्‍का करून तक्रारदाराच्‍या नावे दिली. सदरील दस्‍तऐवज नि.१/सी ला तक्रारदाराने जोडले आहे. तक्रारदार व सामनेवाले यांच्‍या दरम्‍यान सदर सदनिका खरेदीबाबत करारनामा साठेखत दस्‍त क्र.६०९१/२०१२ दिनांक ०१-११-२०१२ रोजी दुय्यम निबंधक, अहमदनगर ३ यांचे कार्यालयात नोंदविलेला आहे. त्‍याचे दस्‍तऐवज नि.१/सी ला तक्रारदाराने जोडलेले आहे. त्‍यावेळी सदरील रोख रक्‍कम रूपये पाच लाखाचा उल्‍लेख करारनाम्‍यात नव्‍हता म्‍हणुन तक्रारदाराने विचारणा केली असता सामनेवाले यांनी वर नमुद केल्‍याप्रमाणे गृह कर्जाच्‍या रकमेतुन सदरची रक्‍कम तक्रारदारास परत देण्‍यात येईल असे आश्‍वासन दिले असल्‍याने तक्रारदाराने सदर करार नोंदविलेला आहे. तक्रारदाराने सामनेवाले यांना धनादेश क्र.१०१०१३ अन्‍वये रक्‍कम रूपये ९,५०,०००/- अदा केले. त्‍यानंतर दि.१७-०६-२०१५ रोजी धनादेश क्र.०३२९७४ अन्‍वये रक्‍कम रूपये १,५०,०००/- अदा केले. अशाप्रकारे सामनेवाले यांना एकुण रकमेपेक्षा जास्‍त रक्‍कम मिळाल्‍याने तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याकडे त्‍यांनी दिलेल्‍या आश्‍वासनाप्रमाणे बुकींगच्‍यावेळी रोख घेतलेल्‍या  रकमेची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी रक्‍कम दिली नाही. सबब तक्रारदाराने सामनेवालेकडुन सदर रकमेपैकी संपुर्ण ठरलेली रक्‍कम रूपये पंधरा लाख वजा जाता असलेली रक्‍कम रूपये ३,००,०००/- मिळावे व सदरील अपार्टमेंटमधील तक्रारदाराने आरक्षित केलेल्‍या मिळकतीच्‍या वर्णनात नमुद केलेली ‘श्रीकृष्‍ण वृंदावन कॉम्‍प्‍लेक्‍स बिल्‍डींग बी’ मधील स्‍टील्‍ट पहिल्‍या  मजल्‍यावरील फ्लॅट नं.बी-२०४ याचे एकुण बांधकाम क्षेत्र ६३.०३ चौ.मी. ही मिळकत बोजा विरहित करून देऊन त्‍याचे खरेदी खत तक्रारदाराच्‍या लाभात लिहुन नोंदवुन द्यावेत, तसेच संपुर्ण बांधकाम व सोई सुविधा कॉमन विजेचे कनेक्‍शन व इतर सवलती सामनेवाले यांनी करून द्याव्‍यात अशी मागणी केली.

             सामनेवाले क्र.१ ते ७ हे नोटीस मिळूनही व जाहीर नोटीस वृत्‍तपत्रात प्रसिध्‍द करूनही मे. मंचात हजर झाले नाही. म्‍हणुन सामनेवाले क्र.१ ते ७ यांच्‍याविरूध्‍द सदरचे प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा हुकुम नि.१ वर मे. मंचातर्फे पारीत करण्‍यात आला.

           तक्रारदाराने दाखल केलेल्‍या कागदपत्रात तक्रारदार व सामनेवाले यांच्‍या  दरम्‍यान सदनिका खरेदीबाबत करारनामा साठेखत (Agreement to Sale) दस्‍त क्र.६०९१/२०१२ दिनांक ०१-११-२०१२ रोजी दुय्यम निबंधक, अहमदनगर ३ यांचे कार्यालयात नोंदविलेला आहे. सदर करारनाम्‍याप्रमाणे तक्रारदाराला द्यावयाच्‍या सदनिकेची किंमत रक्‍कम रूपये १५,००,०००/- इतकी ठरली होती. सदर करारनाम्‍याची प्रत दस्‍तऐवज यादी निशाणी १ (सी) सोबत दाखल केलेली आहे. तक्रारदाराने सदनिकेच्‍या बुकिंगपोटी तक्रारदाराने दि.१९-०६-२०१२ रोजी सामनेवाले यांना रक्‍कम रूपये ५,००,०००/- आणि रक्‍कम रूपये २,००,०००/- चा ए.डी.सी.सी. बॅंकेचा धनादेश क्र.६२५१६८ सामनेवाले यांना दिला. सदरील दोन्‍ही  रक्‍कम सामनेवाला यांना मिळालेली असुन तशी ए‍कत्रित पावती दि.१९-०६-२०१२ रोजी सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या  लेटरहेडवर सही शिक्‍का करून तक्रारदाराच्‍या  नावे दिली. सदरील दस्‍तऐवज नि.१/सी ला तक्रारदाराने जोडली आहे. त्‍यानंतर तक्रारदाराने सामनेवाले यांना धनादेश क्र.१०१०१३ अन्‍वये रक्‍कम रूपये ९,५०,०००/- व दि.१७-०६-२०१५ रोजी धनादेश क्र.०३२९७४ अन्‍वये रक्‍कम रूपये १,५०,०००/- अदा केली. याबबत एच.डी.एफ.सी. बॅंकेचे पत्राची छायांकीत प्रत निशाणी १ (सी) दस्‍त क्र.३ व ४ सोबत दाखल आहे. यावरून तक्रारदार यांनी सामनेवाले यांना सदनिकेच्‍या खरेदीपोटी रक्‍कम रूपये १८,००,०००/- अदा केली असुन सदर रक्‍कम ही सदनिकेच्‍या खरेदी रकमेपेक्षा रक्‍कम रूपये ३,००,०००/- जास्‍तीची अदा केली आहे, असे दिसते. सदर जास्‍तीची रकमेची मागणी सामनेवालेकडे केली असता त्‍यांनी सदर रक्‍कम तक्रारदार यांना परत केली नाही. तसेच सदर सदनिकेचा महानगरपालिकेचा पुर्णत्‍वाचा दाखला दिला नाही व बोजा विरहित करून खरेदी खत सामनेवाले यांनी तक्रारदाराचे लाभात केले नाही. यावरून सामनेवालेने तक्रारदाराची फसवणुक केलेली असुन तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी दिली आहे, असे मंचाचे मत आहे. म्‍हणुन मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.  

८.  मुद्दा क्र. (२) :  तक्रारदार यांनी सदर प्रकरणात निशाणी क्र.१ (सी) वर दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांची पडताळणी करता व वरील मुद्दा क्र.१ वरील विवेचनावरून सामनेवाले यांना सदनिकेच्‍या खरेदीपोटी रक्‍कम रूपये ३,००,०००/- जास्‍तीची दिली आहे, हे स्‍पष्‍ट होते.  तक्रारदार यांनी सामनेवाले यांना जादा दिलेली रक्‍कम रूपये ३,००,०००/- या रकमेवर दिनांक १७-०६-२०१५ पासुन ८ टक्‍के व्‍याजासह रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराला सेवेत त्रुटी दिल्‍यामुळे तक्रारदाराला मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला व सदर तक्रार अर्जाचा खर्च करावा लागला. त्‍यामुळे तक्रारदार मा‍नसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रूपये ५०,०००/- व या अर्जाचा रक्‍कम रूपये १०,०००/- मिळण्‍यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. म्‍हणुन मुद्दा क्र.२ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

९.  मुद्दा क्र. (३) :  मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

आदेश

१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

२. सामनेवाले यांनी वैयक्तिकपणे किंवा संयुक्तिकपणे तक्रारदार यांना रक्‍कम रूपये ३,००,०००/- (अक्षरी तीन लाख) व त्‍यावर दिनांक १७-०६-२०१५ पासुन संपूर्ण रक्‍कम तक्रारदारास मिळेपावेतो द.सा.द.शे. ८ टक्‍के प्रमाणे व्‍याज द्यावे.

 

३. सामनेवाले यांनी वैयक्तिकपणे किंवा संयुक्तिकपणे  महानगरपालिकेकडुन पुर्णत्‍वाचा दाखला तक्रारदारास मिळवुन द्यावा.

 

४. सामनेवाले यांनी वैयक्तिकपणे किंवा संयुक्तिकपणे तक्रारदाराने आरक्षित केलेल्‍या मिळकतीच्‍या  वर्णनात नमुद केलेली ‘श्रीकृष्‍ण वृंदावन कॉम्‍प्‍लेक्‍स बिल्‍डींग बी’ मधील स्‍टील्‍ट पहिल्‍या मजल्‍यावरील फ्लॅट नं.बी-२०४ याचे एकुण बांधकाम क्षेत्र ६३.०३ चौ.मी. ही मिळकत बोजा विरहित करून देऊन त्‍याचे खरेदी खत तक्रारदाराच्‍या लाभात लिहुन नोंदवुन द्यावे.

 

५. सामनेवाले यांनी वैयक्तिकपणे किंवा संयुक्तिकपणे तक्रारदार यांना तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५०,०००/- (अक्षरी पंन्‍नास हजार) व  सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये १०,०००/- (अक्षरी दहा हजार) द्यावा.

 

६. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत  मिळण्‍यापासून ३० दिवसाच्‍या आत करावी.

 

७. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

८.  तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.