संयुक्त निकालपत्र :- (दि.21.07.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुत ग्राहक तक्रार केस नं.26 व 27/2010 मधील विषयांमध्ये साम्य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्याने हे मंच सदर दोन्ही प्रकरणांमध्ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे.
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (3) तक्रारदारांचे सामनेवाला क्र.1 बँकेमध्ये खाते होते. सदर खात्याचा नं.116102000013545 असा आहे. सामनेवाला क्र.1 बँकेने तक्रारदारांना एटीएम् कार्ड दिलेले आहे. सदर एटीएम् कार्डचा नं. 5211631160110033 असा आहे. दि.30.06.2003 रोजी दुपारी तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 बँकेच्या सरलष्कर भवन, भवानी मंडप कोल्हापूर येथील एटीएम् केंद्रामध्ये ते पैसे काढण्यासाठी गेले असता तक्रारदारांनी प्रथम रुपये 15,000/- काढण्यासाठी सदर एटीएम् मशिनची योग्य ती सर्व प्रक्रिया पूर्ण केली. परंतु, सदर व्यवहाराची रक्कम तक्रारदारांना सदर एटीएम् मशिनमधून मिळाली नाही. त्यानंतर लगेचच पुन्हा त्याच केंद्रामध्ये दुस-या एटीएम् मशिनमधून रुपये 5,000/- काढण्यासाठी सर्व ती प्रक्रिया पूर्ण केली. परंतु, सदर व्यवहाराची रक्कम मिळाली नाही. (4) तक्रारदार पुढे सांगतात, उपरोक्तप्रमाणे पूर्ण केलेल्या व्यवहाराची रक्कमा न मिळाल्याने तक्रारदारांनी इंटरनेटद्वारे त्यांचे सामनेवाला बँकेतील खाते तपासून पाहिले. त्यावेळेस तक्रारदारांना रक्कम रुपये 15,000/- व रुपये 5,000/- मिळाल्या नसतानाही सामनेवाला क्र.1 बँकेने चुकीच्या पध्दतीने रक्कमा वजा केलेल्या आहेत. ही बाब सामनेवाला बँकेच्या निदर्शनास आणून दिली. तसेच, सामनेवाला बँकेकडे एटीएम् डिस्प्युट फॉर्म भरुन देवूनही 12 ते 15 दिवसामध्ये पैसे परत केलेले नाहीत व दि.22.09.2009 रोजी तक्रारदारांच्या खात्यामध्ये रुपये 15,000/- जमा केले. सबब, सदरची रक्कम रुपये 15,000/- जमा करणेस 82 दिवस विलंब केला. सबब, सदर रक्कमेवर द.सा.द.शे.18 दराने व्याज देणेचा आदेश व्हावा. मानसिक-शारिरीक त्रासापोटी रुपये 80,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- देणेचे आदेश व्हावेत, तसेच रक्कम रुपये 5,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
(5) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत एटीएम कार्ड, जून व सप्टेंबर महिन्याचा खाते उतारा, सामनेवाला क्र.1 यांना ई-मेल ने दि.30.6.09, दि.28.08.09, दि.23.09.09, दि.07.10.09, दि.20.11.09 व दि.30.11.09 रोजी केलेल्या तक्रारी व उत्तरे तसेच सिटी फायनान्सकडे काढलेल्या कर्जाचा उतारा, रिझर्व बँकेचे दि.17.07.09, दि.23.10.08 व दि.11.02.2009 रोजीची मार्गदर्शक पत्रे यांच्या छायाप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(6) सामनेवाला क्र.1 बँकेने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 बँकेचे एटीएम् मशिनचा वापर त्यांच्या एटीएम कार्ड साठी केलेला आहे; परंतु, बँकेच्या रेकॉर्डप्रमाणे तक्रारदारांनी रककम रुपये 15,000/- काढलेले आहेत. परंतु, त्यांनी ते प्राप्त केलेले नाहीत. त्यामुळे त्यानंतर सर्व ती चौकशी करुन सदरची रक्कम तक्रारदारांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे. तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 बँकेच्या एटीएम् चा वापर करुन रक्कम रुपये 5,000/- काढलेले आहेत. त्यामुळे सदरची रक्कम तक्रारदारांच्या खात्यावर नांवे टाकलेली आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (7) सामनेवाला क्र.2 बँकेने तक्रारदारांची तक्रार त्यांच्या म्हणण्यान्वये नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी एकाच घटनेवरुन दोन वेगवेगळया तक्रारी दाखल करुन सामनेवाला बँकेकडून पैसे काढण्याच्या उद्देशाने प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तसेच, सामनेवाला बँकेच्या एटीएम मध्ये कोणताही दोष नाही. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुनच त्यांना रक्कम रुपये 5,000/- मिळालेले आहेत. सदर सामनेवाला यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी झालेली नाही; सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी व कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 10,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
(8) प्रस्तुत प्रकरणी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद व उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन या मंचाचे केले आहे; तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारी या सलग घडणा-या एकाच कारणावरुन दोन वेगवेगळया तक्रारी दाखल केलेल्या आहेत. त्यामुळे अशा तक्रारी दाखल करता येणार नाहीत. प्रस्तुत प्रकरणी गुणवत्तेचा विचार करता तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 बँकेकडील तक्रारदारांच्या खात्याचा उतारा दाखल केलेला आहे. त्यामध्ये दि.30.06.2009 रोजीच्या नोंदींचा विचार केला असता तक्रारदारांनी रक्कम रुपये 5,000/- एटीएम सेंटरमधून काढलेचे निदर्शनास येत आहे व तशा नोंदी सामनेवाला बँकेने केलेल्या असल्याने प्रस्तुत व्यवहाराबाबत सामनेवाला यांची कोणतीही त्रुटी दिसून येत नाही. सामनेवाला क्र.1 यांच्या बँकेचे प्रतिनिधीने चौकशीचे वेळेस एटीएम् सेंटरमधून होणारे व्यवहार याबाबत सविस्तर व विस्तृत विवेचन केले आहे. सदर वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदारांनी एटीएम सेंटरमधून रक्कम काढतेवेळेस सदर रक्कम स्विकृत केलेली नाही याबाबत सामनेवाला बँकेने सविस्तर चौकशी करुन पुन्हा तक्रारदारांच्या खात्यावर सदर रक्कम जमा केलेली आहे. उपरोक्त संपूर्ण विवेचन विचारात घेवून तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये कोणतीही गुणवत्ता या मंचास दिसून येत नाही. सबब हे मंच खालीलप्रमाणे दोन्ही तक्रारींमध्ये एकत्रित आदेश पारीत करीत आहे.
आदेश 1. तक्रारदारांच्या तक्रारी फेटाळणेत येतात. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |