(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून वाहनाची विमा पॉलीसी घेतली आहे. वाहनाचा अपघात झाल्यानंतर नुकसान भरपाई न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार ते परळी, जिल्हा बीड येथील रहिवासी असून, त्यांनी अशोक लेलँड कंपनीचा ट्रक खरेदी केल्यानंतर त्याची नोंदणी आर.टी.ओ. बीड येथे केली आहे. गैरअर्जदार यांच्याकडून त्यांनी सदरील वाहनाची विमा (2) त.क्र.916/09 पॉलीसी घेतली आहे. गैरअर्जदार यांचे कार्यालय औरंगाबाद येथे असल्यामुळे त्यांनी या मंचात ही तक्रार दाखल केली आहे. दि.02.09.2007 रोजी अर्जदाराच्या वाहनाचा करीमनगर, आंध्रप्रदेश येथे अपघात झाला. अर्जदाराने या अपघाताची माहिती गैरअर्जदार यांना दिली असून, पंचनामा, सर्व्हे रिपोर्ट, वाहनास लागणारा दुरुस्ती खर्च इत्यादी कागदपत्रासह गैरअर्जदार यांच्याकडे क्लेम फॉर्म दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. गैरअर्जदार यांनी वाहन दुरुस्ती खर्च व नुकसान भरपाई देण्याची मागणी अर्जदाराने केली आहे. गैरअर्जदार यांच्या लेखी जवाबानुसार अर्जदार हे परळी येथे राहणारे असून, वाहनाचा अपघात आंध्र प्रदेश येथे झाला असल्यामुळे सदरील तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेरची आहे. अर्जदाराने संबंधित बँकेस प्रतिवादी केले नसल्याचे सांगून वाहन दुरुस्तीच्या खर्चाचे इस्टिमेट दाखल केलेले आहे. सर्व्हेअरने मंजूर केलेला खर्च देण्यास ते तयार असून, अर्जदार ते स्विकारत नसल्याचे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे आढळून येते की, अर्जदार हे परळी, जि.बीड येथील रहिवासी आहेत. वाहन खरेदी केल्यानंतर त्याची नोंदणी बीड येथील आर.टी.ओ. कार्यालयात करण्यात आलेली आहे. अर्जदाराच्या वाहनाचा विमा देखील गैरअर्जदार यांच्या बीड विभागाच्या कार्यालयातून घेतला आहे. गैरअर्जदार यांचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून, औरंगाबाद येथे शाखा आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार अर्जदाराने ही तक्रार बीड येथील ग्राहक तक्रार निवारण मंच किंवा गैरअर्जदार यांचे मुख्य कार्यालय असलेल्या ठिकाणी दाखल करणे अपेक्षित आहे. आदेश 1) अर्जदाराची तक्रार औरंगाबाद मंचामध्ये खारीज करण्यात येत आहे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |