जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/218 प्रकरण दाखल तारीख - 07/09/2011 प्रकरण निकाल तारीख – 23/05/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. अरुण पि. राजाराम वाघमारे वय 43 वर्षे, धंदा नौकरी अर्जदार रा.कौठा ता.कंधार जि. नांदेड विरुध्द. आय.सी.आय.सी.प्रुडनशियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लि विनोद सिल्लक सिल्स कंपाऊंड, चक्रवती अशोक रोड, अशोकनगर, गैरअर्जदार कांदेवाली (पुर्व) मुंबई -400 101 अर्जदारा तर्फे वकील - अड.महेश कनंकदंडे गैरअर्जदारा तर्फे - अड.पी.एस.भक्कड निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्या ) 1. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा मयत गयादेवी सांगर कांबळे हिचा पती असून सदरील पॉलिसीचा नॉमिनी आहे. मयत गयादेवी हिने दि.9.7.2007 रोजी गैरअर्जदार कंपनीकडून प्रिमियत लाईफ गोल्ड विमा पॉलिसी काढली होती. पॉलिसी काढताना गैरअर्जदाराने पॅनलवरील डॉक्टरानी मयत गयादेवी हिची संपूर्ण तपासणी करुन त्या शारिरीकदद्वष्टया तंदुरुस्त असल्याचे सांगितले होते. पॉलिसीच्या नियम व अटीप्रमाणे प्रतिवर्षी विमाधारकास रु.1,00,000/- प्रिमियम भरल्यानंतर रु.12,50,000/- चे विमा संरक्षण देण्यात आलेले आहे. विमाधारकास प्रिमियम फक्त तिन वर्षच भरायचा होता व रिस्क 10 वर्ष पर्यत विमा कंपनीने घेतली होती.10 वर्षाचे आंत जर विमाधारकास नैसर्गिक मृत्यू झाला तर मयताचे वारसास रु.12,50,000/- मिळणार होते. अर्जदाराच्या पत्नीने दि.9.7.2007 रोजी विमा पॉलिसी काढली व त्यांचदिवशी रु.,1,50,000/- चा प्रिमियम भरला व त्यामूळे गैरअर्जदाराने दि.9.7.2007 ते दि.9.7.2017 पर्यत दहा वर्ष विमाधारकाची जोखीम घेतली. पॉलिसी अंतर्गत तिन प्रिमियमचे एकूण रु.4,50,000/- गैरअर्जदाराकडे जमा केले आहे. पॉलिसी काढल्यानंतर वर्ष 2009 मध्ये अर्जदाराच्या पत्नीस पोटदूखीचा ञास सूरु झाला. तिला पूणे, हैद्राबाद, सोलापूर इत्यादी ठिकाणी इलाज केला. पण तब्येत खूपच बीघडल्यामूळे उपचारादरम्यान त्यांचा सोलापूर येथील एस.पी.इन्स्टयुट ऑफ न्युरो सांयस येथे दि.15.11.2009 रोजी मृत्यू झाला. वैद्यकीय उपचाराचे कागदपञ मंचासमोर दाखल केले आहेत. सदरील कागदपञामध्ये असे कूठेही म्हटलेले नाही की, अर्जदाराचे पत्नीस कॅन्सर रोग पूर्वीपासून होता. शेवटी नोव्हेंबर 2009 मध्ये सोलापूर येथे कॅन्सर झाल्याचे समजले व त्या उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.अर्जदाराच्या पत्नीच्या आजारावर सर्व दवाखान्यात मिळून रु.4,00,000/- खर्च केला व त्यांची सर्व कागदपञे दाखल केली व पॉलिसीची रक्कम रु.12,50,000/- देण्याची विनंती केली असता गैरअर्जदार यांनी दि.12.4.2010 रोजी पञ देऊन अर्जदाराचा क्लेम नामंजूर केल्याचे कळविले. गैरअर्जदार यांनी दाखवलेली कारणे अत्यंत खोटी आहेत, रक्कम न देऊन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली आहे.अर्जदार यांनी तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, विम्याची रक्कम रु.12,50,000/- व त्यावर दि.15.11.2009 पासून 15 टक्के व्याज व मानसिक शारीरिक ञासापोटी रु.15,000/-व दाव्याचा खर्च रु.,5,000/- देण्यात यावे. 2. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदाराची तक्रार खोटी असल्यामूळे फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. सदर पॉलिसी ही चांगल्या संबंधामध्ये काढलेली आहे. गैरअर्जदार यांचे सेक्शन 45 इन्शुरन्स अक्ट 1938 प्रमाणे क्लेम नांमजूर करण्यात यावा. क्लॉज 2 अन्वये पहिल्या प्रिमियम नंतर पॉलिसी ही परत रिव्हाहल करावयास पाहिजे. ती रिव्हाहल नाही केली तर ती पॉलिसी बंद करण्यात येते. मयत विमाधारक हा मेंल्यानंतर दोन दिवसात पॉलिसी रिइनस्टेटमेंट करावयास पाहिजे तसे त्यांनी केले नाही. सदर मंचास ही तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. म्हणून गैरअर्जदार यांचे सेवेत कोणतीही ञूटी नसून अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. विमाधारक यांनी पॉलिसीचा हप्ता दि.9.7.2008 रोजी भरणे आवश्यक असताना तो दि.10.06.2009 रोजी भरला. तसेच विमाधारक यांनी तिसरा हप्ता दि.9.7.2009 रोजी भरणे आवश्यक असते,गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडून जे फॉर्म भरुन घेतला होता त्यात, 3(c) Are you aware of or have you ever been treated or Hospitalized for cancer, tumor, Cysts or any other growths ? No असे म्हटलेले आहे.विमाधारक मेल्यानंतर दोन दिवसांमध्ये पॉलिसी रिइनस्टेटमेंट दि.15.11.2009 रोजी दिले त्यात Cardiorespiratory arrest, Peripheral circulatory failure, Thrombocytopenia, secondary two carcinoma of pancreas. दि.22.1.2009 रोजी सर्जिकल पॅथालाजी रिपोर्ट मध्ये No definite malignant Cells, असे म्हटले आहे., दि.15.11.2009 रोजी न्यूरो सर्जन यांनी जो रिपोर्ट दिला आहे त्यात विमाधारकाचा मृत्यू हा Cardio respiratory arrest, Peripheral circulatory failure, Thrombocytopenia, carcinoma pancreas असे म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी विमाधारक यांची पर्सनल माहीती घेतली त्यात विमाधारक यांनी स्वतःचे माहीती ही लपवून ठेवली आहे. विमाधारक हा मूददामूहून स्वतःचे हप्ते भरण्यास वेळ करीत होता. अर्जदाराचा मृत्यू हा Pancreatiac Cancer मूळे झाला हे स्पष्ट झालेले आहे. अर्जदाराचा मृत्यू हा नैसर्गीक झालेला नाही म्हणून अर्जदाराची तक्रार ही खोटी असून खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. 3. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञ पाहून जे मूददे उपस्थित होतात, ते मुददे व त्यावरील उत्तरे खालील प्रमाणे, मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्कम देण्यास बांधील आहेत काय ? नाही 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 ः- 4. अर्जदार यांनी त्यांचे पत्नीची पॉलिसी गैरअर्जदार यांचे कार्यालयामार्फत काढलेली होती. याबददल उभयपक्षात वाद नाही म्हणून अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत. यास्तव मुददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. 5. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून रु.12,50,000/- साडे बारा लाख रुपये मागणी केली आहे. त्यावर गैरअर्जदार यांनी जे म्हणणे मांडले आहे ते जर पूर्ण तपासले असता अर्जदाराचा मृत्यू हा Pancreas Cancer मूळे झाला असे स्पष्ट केले आहे. अर्जदार यांनी दि.10.06.2009 रोजी हेल्थ डिक्लेरेशन फॉर्म भरला त्यामूळे विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला दिलेले उत्तर नाही असे होते. तो फॉर्म गैरअर्जदाराने मंचासमोर दाखल केला आहे. अर्जदाराने दि.10.06.2009 रोजी हेल्थ डिक्लेरेशन फॉर्म भरुन दिलेला होता ज्यामध्ये अर्जदारास कूठलाही रोग नाही असे लिहून दिले होते. पण दि.15.11.2009 रोजी अर्जदाराच्या पत्नीचे नीधन झाले. गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट केल्या ज्या की अर्जदार यांनी लपवलेल्या होत्या. अर्जदारांनी पॉलिसीचे हप्ते वेळेवर कधीही भरले नाहीत. तसेच अर्जदार यांचे पत्नीचे औषधोपचार ज्यावेळी चालू होते तो काळ हा पॉलिसी काढल्यावेळी चालू होता. Asian Institute of Fastroentrerology Hyderabad येथील त्यांचे औषधोपचाराचे वेळी दि.6.8.2009 ते 18.8.2009 या काळात केलेल्या उपचाराच्या वेळी अर्जदाराचे पत्नीचे नांव शैलजा वाघमारे असे दाखवलेले आहे ? प्रत्यक्षात पॉलिसीवरील नांव गयादेवी, सागर कांबळे असे आहे ? शैलजा वाघमारे हे जर लग्नानंतरचे नांव असेल तर अर्जदार हे त्यांचे पत्नीशी लग्न होण्यापूर्वीच नॉमिनी कसे झाले. अशा प्रकारच्या अनेक गुंतागूंती सदर तक्रारीत आहेत. एवढे निश्चित की, अर्जदाराची पत्नी Pancreas Cancer ने मृत झालेली आहे व पॉलिसी काढण्यापूर्वी ती हया रोगानेग्रस्त होती त्यामूळे अर्जदार सदरच्या तक्रारीत नूकसान भरपाई मागण्यास पाञ नाही. 6. गैरअर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे त्यांना जेव्हा क्लेम रक्कम दयावयाची असते तेव्हा तक्रारीबाबत योग्य नीर्णय देताना तक्रारीतील मजकुराबाबत व केलेल्या क्लेम रक्क्मेबाबत योग्यता पडताळून पाहणे आवश्यक असते. त्यामुळे सदर तक्रारीतील कारणे पाहता अर्जदार ही पॉलिसी काढण्याआधीच व्याधीग्रस्त होती अशा प्रकारची सत्यता समोर आल्यामुळे अर्जदार हे त्यांनी केलेली मागणी मिळण्यास पाञ नाहीत असे गैरअर्जदार यांनी सिध्द केलेले आहे म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदाराचा अर्ज खारीज करण्यात येतो. 2. खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सोसावा. 3. उभयपक्षांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE MR. President B.T.Narwade] PRESIDENT | |