( आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा, श्रीमती रोहिणी दि. कुंडले)
-- आदेश --
( पारित दि. 30 मार्च, 2013)
1. तक्रारः- तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला surrender केलेल्या पॉलीसीची रक्कम मिळण्याबद्दल दाखल आहे.
2. दिनांक 02/09/2008 रोजी तक्रारकर्त्याने "लाईफ टाईम गोल्ड" ही पॉलीसी (नं. 09832579) विरूध्द पक्ष 1 कडून विरूध्द पक्ष 2 मार्फत – मुलगा आशिष वाघमारे याच्या नावाने घेतली. तक्रारकर्ता म्हणतो की, वडील म्हणून त्यांनी प्रपोजल दिले असल्याने तो विरूध्द पक्षाचा "ग्राहक" ठरतो. म्हणून त्याला तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे.
3. उपरोक्त पॉलीसीनुसार त्याला वार्षिक हप्ता रू. 25,000/- कमीतकमी तीन ते जास्तीतजास्त 10 वर्षेपर्यंत भरायचा होता. तक्रारकर्त्याने पहिला हप्ता रू. 25,000/- दिनांक 26/08/2008 रोजी, दुसरा हप्ता रू. 25,000/- दिनांक 04/09/2009 रोजी, तिसरा हप्ता रू. 25,000/- दिनांक 03/09/2010 रोजी आणि चौथा हप्ता रू. 25,000/- दिनांक 14/01/2011 रोजी याप्रमाणे एकूण रू. 1,00,000/- डी.डी. द्वारा विरूध्द पक्ष 2 कडे भरले. त्याबद्दलच्या पावत्या विरूध्द पक्ष 2 ने दिल्या आहेत.
4. दिनांक 19/07/2011 रोजी विरूध्द पक्ष 2 कडे तक्रारकर्त्याने Payout/Refund साठी विनंती केली. त्यावर विरूध्द पक्षांनी रू. 25,000/- चा चेक नं. 090795 दिनांक 18/12/2010 आयसीआयसीआय बँकेवर काढलेला तक्रारकर्त्याला दिला.
5. दिनांक 10/02/2011, 19/09/2011, 04/02/20112 आणि शेवटी 24/02/2012 रोजी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षांना लेखी विनंती करून उर्वरित रू. 75,000/- देण्याची विनंती केली. त्याला उत्तर व प्रतिसाद मिळाला नाही.
6. विरूध्द पक्षाच्या दिनांक 20/12/2010 च्या पत्रान्वये त्यांनी तक्रारकर्त्याला कळविले की, दिनांक 02/09/2009 चा हप्ता आणि त्यानंतरचे हप्ते सुध्दा विरूध्द पक्षांना प्राप्त झाले नाहीत म्हणून पॉलीसी व्यपगत (lapsed) झाली. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, त्याने सर्व चारही हप्ते (2011 पर्यंत) वेळेवर भरले आहेत. याचा पुरावा म्हणून तक्रारकर्त्याने संबंधित डिमांड ड्राफ्टच्या प्रती विरूध्द पक्षाला त्यांच्या मागणीवरून दिनांक 19/02/2012 च्या पत्रान्वये पाठविल्या.
7. दिनांक 17 मार्च 2012 च्या पत्रात विरूध्द पक्षांनी त्यांना चारही हप्त्यांचे पेमेंट प्राप्त झाल्याचे मान्य केले. पण विरूध्द पक्षाची "System" तीनच हप्ते दर्शविते. शेवटचा चौथा हप्ता, पॉलीसी व्यपगत अवस्थेत असल्याने तक्रारकर्त्याला परत करण्यात आला असे त्यांचे म्हणणे आहे.
8. तक्रारकर्त्यानुसार विरूध्द पक्षांनी त्याचे रू. 75,000/- चे Payment विनाकारण अडवून ठेवले ही त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते.
9. दिनांक 19/03/2012 रोजी रू. 75,000/- मिळावे म्हणून विरूध्द पक्षांना नोटीस दिली. त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
10. तक्रारीस कारण दिनांक 20/12/2010 रोजी एकूण रक्कम रू. 1,00,000/- पैकी विरूध्द पक्षांनी फक्त रू. 25,000/- परत केले (म्हणजेच रू. 75,000/-चे short payment केले) तेव्हापासून घडले व सतत घडत आहे.
11. तक्रारकर्त्याची प्रार्थनाः-
- विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी रू. 75,000/- तक्रारकर्त्याला न देऊन सेवेत त्रुटी केली आहे असे जाहीर करावे.
- विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला रू. 75,000/- दिनांक 19/02/2011 पासून अदा करतेपर्यंत 18% व्याजाने देण्याचा आदेश व्हावा.
- शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- व तक्रार खर्च रू. 5,000/- विरूध्द पक्ष 1 व 2 कडून मिळावा.
12. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत एकूण 13 दस्त जोडले आहेत.
13. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना मंचाने पाठविलेल्या नोटीसेस प्राप्त झाल्याची पोच रेकॉर्डवर आहे. ते हजर झाले नाहीत किंवा त्यांनी संधी देऊनही उत्तर सुध्दा दाखल केले नाही. म्हणून दिनांक 26/02/2013 रोजी त्यांना मंचाने एकतर्फी घोषित केले.
14. मंचाने तक्रारकर्त्याच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. रेकॉर्डवरील संपूर्ण कागदपत्रे तपासली. त्यावरून मंचाची निरीक्षणे व निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
- निरीक्षणे व निष्कर्ष -
15. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 व 2 कडून "लाईफ टाईम गोल्ड" ही युनिट लिंक्ड पॉलीसी घेतली. त्याचा तपशील खालीलप्रमाणेः-
Name of Life Assured : Mr. Ashish Baburao Waghmare
Address: Shashtri Ward,
Behind Nirmal Theatre
Near Yashoda Hall Category : Non-Medical
Gondia
Maharashtra – 441614
Date of Birth : 06/07/1988 Age (Years) : 20 Age Admitted : Yes
Name of the Proposer : Mr. Baburao Modku Waghmare
Policy No : 09832579 Date of Commencement of Policy : 02/09/2008 Premium Rs : 25,000.00 Cover Cessation date : 02/09/2018
Policy Term (Years) : 10 Due date of last Premium : 02/09/2017
Nominee/s (Name) :
BENEFIT SUM ASSURED (Rs.)
Life Time Gold 1,25,000.00
Periodicity of Payment shall be : Yearly
18. तक्रारकर्त्याने डी. डी. द्वारे भरलेला वार्षिक हप्ता खालीलप्रमाणेः-
दिनांक 26/08/2008 रू. 25,000/-
दिनांक 04/09/2009 रू. 25,000/-
दिनांक 03/09/2010 रू. 25,000/-
दिनांक 14/01/2011 रू. 25,000/-
19. याप्रमाणे वार्षिक चार हप्ते एकूण रू. 1,00,000/- तक्रारकर्त्याने भरले हे सिध्द होते.
20. दिनांक 19/07/2011 रोजी तक्रारकर्त्याने उपरोक्त पॉलीसी सरेन्डर करण्याचा निर्णय घेतला व Payout फॉर्म भरून दिला. त्यात “Full Surrender” असे नमूद आहे.
21. परंतु दरम्यान तक्रारकर्त्याला विरूध्द पक्षाकडून 3 पत्रे प्राप्त झाली.
1) Monday, September 13, 2010
Dear Baburao Modku Waghmare.
We regret to inform you that your policy is in paid up status for more than 6 months. The last amount received was Rs. 25,000/- on 6 Sept. 2010.
2) Friday Sept. 17, 2010
Dear Baburao Modku Waghmare.
We regret to inform you that your policy is in paid up status for more than 6 months. The last amount received was Rs. 25,000/- on 6 Sept. 2010.
3) तारीख नाही.
Dear Baburao Modku Waghmare.
We regret to inform you that your policy is in paid up status for more than 6 months. The last amount received was Rs. 25,000/- on 17 Jan. 2011.
22. उपरोक्त तीनही पत्रांमध्ये पॉलीसी व्यपगत असल्याबद्दल उल्लेख नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची एकूण चार हप्त्यांची रक्कम रू. 1,00,000/- विरूध्द पक्षाला प्राप्त झाली असा मंचाचा निष्कर्ष आहे.
23. दिनांक 20 डिसेंबर 2010 च्या विरूध्द पक्षाच्या पत्रातील अंश खालीलप्रमाणेः-
20th December 2010
Subject: Refund of payment under ICICI PRU Life Time Gold policy, policy no. 09832579
Dear Baburao Modku Waghmare
This is to inform that the above mentioned policy has lapsed with effect from 2 Sept. 09. The Company has not received premium under the above mentioned policy which was due on 2 Sept. 2009 and subsequent premiums thereafter thus resulting in lapsation of the policy.
24. उपरोक्त पत्रामध्ये प्रथमच विरूध्द पक्षाला हप्ते प्राप्त न झाल्याने पॉलीसी व्यपगत असल्याबद्दल उल्लेख येतो. हे पत्र आणि वरील तीनही पत्रे मंचाला विश्वास ठेवण्यायोग्य वाटत नाहीत. कोणतीही शहानिशा न करता मुंबई येथील कार्यालयाने ती जारी केली आहेत. तारीख नसलेल्या एका पत्रावर 17 जानेवारी 2011 पर्यंतचे हप्ते (Payment) मिळाल्याचा उल्लेख येतो.
25. तक्रारकर्त्याने हप्ते भरल्याच्या डी. डी. च्या प्रती दाखल केल्या आहेत. त्यावरून तक्रारकर्त्याने एकूण रू. 1,00,000/- भरल्याचे सिध्द होते असा मंचाचा निष्कर्ष आहे. हप्ते भरलेले असतांना पॉलीसी व्यपगत होऊ शकत नाही. शिवाय विरूध्द पक्षाने पॉलीसीचे Paid-up Status त्यांच्या पत्रातच मान्य केले आहे.
26. दिनांक 19/07/2011 रोजी तक्रारकर्त्याने (4 वर्षानंतर) पॉलीसी नियमानुसार सरेन्डर केली तेव्हा त्याला फक्त रू. 25,000/- देण्यात आले. त्यापूर्वी विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला कधीही हप्ते प्राप्त न झाल्यामुळे पॉलीसी lapsed झाल्याचे कळविले नाही. ही विरूध्द पक्षाच्या सेवेतील त्रुटी आहे असा मंचाचा निष्कर्ष आहे.
27. उर्वरित रू. 75,000/- सरेन्डर व्हॅल्यू मिळण्याबद्दल तक्रारकर्त्याने दिनांक 19/03/2012 रोजी विरूध्द पक्षाला नोटीस दिली. त्याला विरूध्द पक्षाने प्रतिसाद दिला नाही.
28. दिनांक 17 मार्च 2012 चे विरूध्द पक्षाच्या एका पत्रानुसार –
This is with reference to your request pertaining to your policy number “09832579”, we wish to inform you that as per our records your policy is in paid up status.
Further, you have made the 4 premiums in the policy but in our system it is showing that you have paid 3 premium and 1 premium has been return to you since the policy was in lapse status.
Please check the below mentioned return cheque details :
Amount : 25,000.00/-
Auth Date : 18/12/2010
Cheque Number : 090795
29. उपरोक्त पत्रात तीन हप्ते प्राप्त झाल्याबद्दलची कबुली आहे.
30. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला रू. 75,000/- परत करायला पाहिजे असे पॉलीसी दस्तावरून स्पष्ट होते.
Surrender Values
The policy acquires a surrender value after payment of full premium for the first policy year. The surrender value would be payable after applying certain surrender charges and only after completion of three policy years (For details refer to the table mentioned below)
Post payment of 3 years’ premiums:
No of completed years of policy | Surrender Value as a % of Fund Value |
3 Years | 98% |
4 Years | 99% |
5 Years | 100% |
Policyholder: means the Proposer under the Policy or the owner of the Policy at any point of time.
“Surrender” means terminating the contract once for all. On surrender, the surrender value is payable which is “Fund Value less the surrender charge” and is subject to the Clause 2.2 on “Surrender”.
2.2 Surrender
The Policy acquires a Surrender Value after the payment of full premium for the first Policy year. However, the surrender value would be payable only after completion of three policy years or whenever the Policy is surrendered thereafter. The surrender value payable is the Fund Value after deducting the following surrender charges.
b) Applicable surrender charge where three full years’ premiums have been paid.
No. of completed Policy years | Surrender Charge as a % of the Fund Value |
3 years | 2% |
4 years | 1% |
5 years and above | 0% |
The surrender shall extinguish all the rights, benefits and interest under the policy.
सबब आदेश
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला रू. 75,000/- त्यातून 1% वजा करून परत करावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 5000/- प्रत्येकी (विरूध्द पक्ष 1 ने रू. 5,000/- व विरूध्द पक्ष 2 ने रू. 5,000/-) द्यावे.
4. या तक्रारीचा खर्च विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी प्रत्येकी रू. 2,500/- तक्रारकर्त्याला द्यावा.
5. आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी करावे.