तक्रारदारातर्फे – वकील – ए.पी.गंडले,
सामनेवालेतर्फे – वकील – एकतर्फा आदेश
।। निकालपत्र ।।
( निकाल घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्वरुपे – सदस्या )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे मौजे. रुळीलिंबा ता.जि.बीड येथील रहिवाशी असुन शेतीवर उपजिवीका करतात. तक्रारदारांनी त्यांचे आरोग्याचे सुरक्षेसाठी पॉलीसी नं.12132908 ही सामनेवाले यांचे एजन्ट श्री.दास व किरण जगताप यांचेकडून घेतली. सदर पॉलीसीचा कालावधी 30.06.2009 ते 30.06.2019 असा आहे. सदर पॉलीसीचे प्रिमियमची रक्कम रु.3,981/- सामनेवाले यांचे एजन्ट यांचेकडे दिलेली असून ती त्यांनी स्वीकारली आहे. त्याचप्रमाणे तक्रारदाराची वार्षिक रिक्स रक्कम रु.4,00,000/- व लाईफ टाईप रिक्स रक्कम रु.20,00,000/- सदर पॉलीसीअंतर्गत कव्हर केलेली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांना मुळ पॉलीसी पाठविलेली आहे.
दुर्दैवाने ता.15.10.2009 रोजी तक्रारदार विहिर खोदकाम पाहण्याकरीता गेले असता तेथील क्रेशर मशिन हवेच्या दाबामुळे हलल्याने अचानक चालू झाल्यामुळे सदर मशिनचा धक्का लागुन विहिरीत पडले. सदर अपघातात तक्रारदाराचे पाठीला जबदस्त मार लागला. सदर अपघातानंतर ताबडतोब कट्टे हॉस्पिटल, बीड यांचेकडे नेण्यात आले. डॉ. कट्टे यांना तक्रारदारांचा अजाराबाबत निदान न करता आल्यामुळे तात्पुर्ते उपचार करुन डिसजार्च देण्यात आला.
तक्रारदारांना डॉ.कट्टे यांचे उपचारामुळे कोणत्याही प्रकारचा आराम वाटलेला नाही त्यामुळे ता. 21.12.2009 रोजी संचेती हॉस्पिटल, पुणे येथे गेले असता तेथे केलेल्या अनेक तपासण्यामुळे तक्रारदारांचे पाठीचे मणक्याला तडा गेल्याचे समजले. तक्रारदारांनी डॉ. संचेती हॉस्पिटल मध्ये अंतररुग्ण म्हणुन भरती करण्यात आले व ता.22.12.2009 रोजी ऑपरेशन झाले. तक्रारदारांनी तेथे अंतररुग्ण म्हणुन ता.26.12.2009 पासून ठेवण्यात आले. त्यानंतर ता.27.01.2010, 29.03.2010, 02.06.2010, 10.06.2010 या तारखाना पुन्हा तपासणी करीता जावे लागले. सदर उपचाराचा कालावधीमध्ये तक्रारदारांना रक्कम रु.2,00,000/- एवढा खर्च आला.
तक्रारदारांना संचेती हॉस्पिटल पुणे येथे अंतररुग्ण म्हणुन भरती झाल्यानंतर तक्रारदारांनी हेल्थ केअर मुळ पॉलीसी त्यांचेकडे जमा केली. तसेच सामनेवाले यांनी यासंदर्भात माहिती दिली. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदर पॉलीसीनुसार उपचार घेण्याची सांगीतले. तसेच सदर उपचाराची मेडीकल बीले व पावत्या दिल्यानंतर सदर उपचाराचा खर्च सामनेवाले यांचेकडून अदा करण्यात येईल. सामनेवाले यांचे प्रतिनिधीने सदर हॉस्पिटलला भेट देवून तक्रारदारांचे उपचारा बाबत, आजाराबाबत व खर्चा बाबत माहिती घेतली. त्यांनतर सामनेवाले यांनी सदर पॉलीसीचा खर्च अदा करण्याचे नाकारण्यात आले. तक्रारदाराचा आजार जुना असुन पॉलीसी घेताना सदरची बाब लपवून ठेवली. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सामनेवाले यांचे पॅनल डॉक्टर यांचेकडून पूर्णत: वैद्यकीय तपासणी करुन त्यांचे वैद्यकीय अहवालानुसार सदरची पॉलीसी सामनेवाले यांनी तक्रादारांना दिली आहे. तक्रारदारांनी यासंदर्भात सामनेवाले यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांचा पॉलीसी नंबरमध्ये चुकीचा असल्यामुळे कळवून तक्रारदारांचा विमा प्रस्ताव ता.17.12.2009 रोजी फेटाळण्यात आला. तरी तक्रारदारांची विनंती की, तक्रारदारांना रक्कम रु.3,00;000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह नुकसान भरपाई वसुल होवून मिळावे.
सदर प्रकरणात सामनेवाले यांनी मंचाची नोटीस घेण्यास नकार दिल्यामुळे ता.12.11.2010 रोजी सामनेवाले विरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याचा निर्णय न्यायमंचाने घेतला आहे.
न्याय निर्णयाची मुद्दे. उत्तरे.
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांना लाईफटाईम केअर पॉलीसी
अंतर्गत विमा रक्कम न देवून तक्रारदारांना दयावयाचे सेवेत
कसूरी केल्याची बाब तक्रारदारांनी सिध्द केली आहे काय ? नाही.
2. तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहेत काय ? नाही.
3. अंतिम आदेश काय ? निकालाप्रमाणे.
तक्रारदारांनी हेल्थकेअर पॉलीसी क्रमांक. 12132908 ही सामनेवाले यांचेकडून ता.30.6.2009 ते 30.6.2019 या कालावधीचा प्रिमियम रक्कम रु.3,981/- देवून वार्षिक रिक्स रु. 4,00,000/- व संपूर्णजीवनाची रिक्स ( Life Time) रु.20,00,000/- सदर पॉलीसी अंतर्गत कव्हर करण्यात आली. दुर्दैवाने तक्रारदारांना ता.15.10.2009 रोजी झालेल्या अपघातात पाठीला मारलागल्यामुळे डॉ.संचेती हॉस्पिटल,पुणे येथे उपचार घेतले. सदर वैद्यकीय उपचाराचा खर्च रक्कम रु.2,00,000/- पेक्षा जास्त आला असे तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केले आहे. तक्रारदारांनी या संदर्भात सामनेवाले यांना माहिती दिली. सदरचे वैद्यकीय खर्चाची बीले व पावत्या दाखल केल्यानंतर प्रतिपूर्ती करण्यात येईल असे सामनेवाले यांनी सांगीतले. परंतु सामनेवाले यांचेकडून सदरच्या खर्चाची रक्कम अदा करण्यात आली नाही. तक्रारदारांचा हा जुना अजार असून पॉलीसी घेण्याचे वेळी सदर अजाराबाबतची बाब तक्रारदारांनी सांगीतलेली नसल्याचे सामनेवाले यांनी सांगीतले. तक्रारदारांना सदर पॉलीसी देताना सामनेवाले यांचे पॅनल डॉक्टरांनी तपासणी करुन दिलेल्या अहवालाचे आधारे सामनेवाले यांनी सदरची पॉलीसी तक्रारदारांना दिली होती. तक्रारदारांनी सामनेवाले यांना यासंदर्भात नोटीस पाठविली असता तक्रारदारांचा पॉलीसी नंबर चुकीचा असल्याचे कळविण्यात येवून ता.17.12.2009 रोजी तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात आली अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सामनेवाले यांनी नोटीस स्विकारली नाही तसेच न्यायमंचात हजर होवून ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार मुदतीत खुलासा दाखल केलेला नाही.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदारांनी सामनेवाले यांना वकिलामार्फत विना दिनांकाची कायदेशीर नोटीस पाठविण्यात आल्याचे दिसून येते. सदर नोटीसमध्ये तक्रारदारांनी पॉलीसी नं.121352908 असा नमुद केल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी दाखल केलेल्या पहिल्या प्रिमियमची पावतीमध्ये तक्रारदारांचा पॉलीसी क्रमांक 12132908 असा असल्याचे दिसून येते. सामनेवाले यांची ता.6 ऑगस्ट,2010 चे पत्रानुसार तक्रारदारांची पॉलीसी क्रमांक चुकीचा असल्यामुळे तक्रारदारांनी त्याचा अचुक पॉलीसी क्रमांक सामनेवाले यांनी पाठविण्यात यावा असे कळविण्यात आला आहे. तक्रारदारांनी पाठविलेल्या कायदेशीर नोटीसीमध्ये चुकीचा पॉलीसी नंबर दिलेले असल्याचे तक्रारीत आलेल्या पूराव्यावरुन दिसून येते. सामनेवाले यांनी ता.17.12.2009 रोजी पाठविलेले पत्रानुसार तक्रारदारांची प्रि अँथोरायजेशन रिक्वेस्ट 12132908 ची कॅशलेश फॅसीलीटी नाकारल्याचे दिसून येते. सदर पत्रानुसार वैद्यकीय पॉलीसीची प्रतिपूर्ती करण्या करीता तक्रारदार प्रस्ताव पाठवू शकतात असे नमुद असल्याचे दिसून येते.
तक्रारीतील आलेल्या पुराव्यावरुन तक्रारदारांना सामनेवाले यांनी ता. 17.12.2009 रोजीचे पत्रानुसार फक्त कॅशलेश फॅसिलीटी नाकारलेली आहे. परंतु तक्रारदार सदर वैद्यकीय पोलीसीची प्रतिपूर्ती करण्याकरीता प्रस्ताव पाठविण्या बाबतची संधी दिली आहे. तक्रारदारांनी कायदेशीर नोटीसीमध्ये चुकीची पॉलीसी क्रमांक दिल्यामुळे तक्रारदाराचा प्रस्तावा बाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी सामनेवाले यांना अचुक पॉलीसीनंबर, योग्यती कागदपत्रे दाखल करणे आवश्यक आहे. तक्रारदारांनी चुकीचा पॉलीसी नंबर सामनेवाले यांचेकडे दिला असल्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांचा विमा प्रस्तावा बाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करता शक्य नाही. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांना अचुक पॉलीसी नंबर पाठविण्याबाबत ता.6 ऑगस्ट,2010 रोजीचे पत्राने कळविल्याचे स्पष्ट झाले असल्यामुळे सामनेवाले यांची सदरची कृती सेवेत कसूरीची असल्याचे स्पष्ट होत नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी सामनेवाले यांचे ता. 17.10.2010 च्या पत्रानुसार सामनेवाले यांचेकडे अचुक पॉलीसी नंबर योग्य कागदपत्रासह प्रस्ताव पाठविणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे. तसेच तक्रारदारांनी अचुक पॉलीसी नंबर योग्य कागदपत्रासह प्रस्ताव पाठविल्यानंतर सामनेवाले यांनी सदर प्रस्ताव एक महिन्याचे आत गुणवत्तेवर निकाली करणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदारांना आदेश देण्यात येतो की, आदेश मिळाल्या तारखेपासुन 15 दिवसाचे आत अचुक पॉलीसी क्रमांक व योग्यत्या कागदपत्रासह प्रस्ताव सामनेवाले यांचेकडे सादर करावा.
2. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांचा प्रस्ताव मिळाल्या पासुन एक महिन्याचे आत गुणवत्तेवर निकाली करण्यात यावा.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्याचे संच तक्रारदारांला परत करावेत.
( सौ.एम.एस.विश्वरुपे ) ( पी.बी. भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड