(मा.सदस्या सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.1,27,660/- मिळावेत, विलंबापोटी या रकमेवर 18 टक्के दराने व्याज मिळावे, आर्थिक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.22 लगत लेखी म्हणणे, पान क्र.23 लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?-होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?- होय.
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी व्याजासह रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
4) अंतीम आदेश- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
याकामी अर्जदार यांनी पान क्र.41 लगत व सामनेवाला यांनी पान क्र.39 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे क्लेमफॉर्म व कागदपत्रे दिलेली नाहीत. अपघाताचे पुर्वीच सदरचे वाहन अर्जदार यांनी बाळासाहेब रामदास गायकवाड यांना विकलेले होते ही बाब इन्व्हेस्टीगेटर यांच्या रिपोर्टवरुन स्पष्ट झालेली आहे. सामनेवाला यांनी अर्जदार यांना दि.03/08/2009, दि.05/09/2009 व दि.22/09/2009 रोजीचे पत्रे पाठवून कागदपत्रांची पुर्तता करुन मागितलेली होती. परंतु अर्जदार यांनी कागदपत्रांची पुर्तता केलेली नाही. अर्जदार यांचेकडून विमा पॉलीसीच्या अटी व शर्तींचा भंग झालेला आहे. सेवा देण्यात कमतरता केलेली नाही. अर्ज रद्द करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
परंतु या कामी तक्रार अर्ज हेडनोटमध्येच अर्जदार म्हणून श्री.निवृत्ती सदाशिव बत्तासे यांचे नाव असून जनरल मुखत्यार म्हणून श्री बाळासाहेब रामदास गायकवाड यांचे नाव आहे. वादातील ट्रकबाबत सामनेवाला यांचेकडून सर्वे करण्यात आलेला आहे असाही उल्लेख अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये केलेला आहे. पान क्र.16 लगत अर्जदार यांनी बाळासाहेब रामदास गायकवाड यांना दिलेले जनरल मुखत्यार पत्र मुळ प्रत दाखल आहे. या जनरल मुखत्यार पत्रामध्ये “वादातील वाहनाबाबत अर्जदार यांनी बाळासाहेब रामदास गायकवाड यांचेबरोबर ट्रक विक्रीचा व्यवहार केलेला होता, परंतु श्रीराम फायनान्स या वित्तीय संस्थेचे कर्ज असल्यामुळे तांत्रीक अडचण निर्माण होवून कागदोपत्री पुर्तता होवु शकली नाही. प्रत्यक्षात श्री. बाळासाहेब रामदास गायकवाड हेच गेल्या दिड वर्षापासून ट्रकचा वापर करीत आहेत. ट्रकबाबत ग्राहक मंचामध्ये तक्रार करणे व त्यासाठी करावी लागणारी सर्व कामे करणे, चेक स्विकारणे, तडजोड करणे इत्यादी सर्व कामाकरीता मुखत्यार पत्र दिलेले आहे.” असा उल्लेख आहे.
अर्जदार यांनी पान क्र.5 अ लगत विमापॉलीसी सर्टिफिकेट दाखल केलेले आहे. या सर्टिफिकेटचा विचार होता अपघाताचे वेळी अपघातग्रस्त ट्रकची विमापॉलीसी अर्जदार यांचेच नावावर होती हे स्पष्ट होत आहे. सामनेवाला यांनी पान क्र.30 लगत चार्टर हाऊस या इन्व्हेस्टीगेटरचा अहवाल दाखल केलेला आहे. या अहवालातील अंतीम निष्कर्षानुसार ट्रकची मालकी बाळासाहेब गायकवाड यांची असून विमापॉलीसी अर्जदार यांचे नावावर आहे असे दिसून येत आहे. परंतु अपघातादिवशी व अपघातानंतरही अपघातग्रस्त वाहन बाळासाहेब गायकवाड यांचे नावावर वर्ग झालेले आहे याबाबतचा कोणताही पुरावा सामनेवाला यांनी दाखल केलेला नाही. याउलट अर्जदार यांनी दाखल केलेले पान क्र.6 चे कागदपत्र याचा विचार होता अपघातग्रस्त वाहन अर्जदार यांचेच नावावर नोंद आहे असे दिसून येत आहे. तसेच पान क्र.16 चे जनरल मुखत्यार पत्रामध्येही वाहनाचा व्यवहार कागदोपत्री पुर्ण झालेला नाही असा उल्लेख आहे.
अर्जदार यांचे पान क्र.16 चे मुखत्यार पत्रातील मजकुराप्रमाणे ट्रकचा वापर बाळासाहेब गायकवाड हेच करीत आहेत. अपघाताचे दिवशी अपघातग्रस्त वाहन अर्जदार यांचेच नावावर नोंद होते ही बाब पान क्र.6 चे आर. सी. बुकचे रेकॉर्डवरुन स्पष्ट होत आहे. विमा पॉलीसी ही सुध्दा अर्जदार यांचेच नावावर आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
अपघाताचे वेळी अपघातग्रस्त वाहन अर्जदार यांचे नावावर नव्हते व बाळासाहेब रामदास गायकवाड यांना वाहन विकलेले होते. तसेच अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे क्लेमफॉर्म व योग्य ती कागदपत्रे दिलेली नाहीत. या दोन कारणामुळे सामनेवाला यांनी अर्जदार यांचा विमाक्लेम पान क्र.29 चे ऑब्झर्वेशन शिटप्रमाणे बंद केलेला आहे हे स्पष्ट होत आहे.
परंतु अपघाताचे वेळी अपघातग्रस्त वाहनाची विमापॉलीसी अर्जदार यांचे नावावर होती व आहे. जरी अपघाताचे वेळी वाहनाचा प्रत्यक्ष वापर बाळासाहेब गायकवाड हे जरी करीत असले तरी सुध्दा अर्जदार व बाळासाहेब रामदास गायकवाड यांचेमधील ट्रक खरेदीचा व्यवहार कायदेशीररित्या पुर्ण झालेला नाही ही बाब अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुनच स्पष्ट झालेली आहे. परंतु अपघातादिवशी व अपघातानंतरही अपघातग्रस्त वाहन बाळासाहेब गायकवाड यांचे नावावर वर्ग झालेले आहे याबाबतचा कोणताही पुरावा सामनेवाला यांनी दाखल केलेला नाही. याउलट अर्जदार यांनी दाखल केलेले पान क्र.6 चे कागदपत्र याचा विचार होता अपघातग्रस्त वाहन अर्जदार यांचेच नावावर नोंद आहे असे दिसून येत आहे. तसेच पान क्र.16 चे जनरल मुखत्यार पत्रामध्येही वाहनाचा व्यवहार कागदोपत्री पुर्ण झालेला नाही असा उल्लेख आहे. याउलट अर्जदार यांनी दाखल केलेले पान क्र.6 चे कागदपत्र याचा विचार होता अपघातग्रस्त वाहन अर्जदार यांचेच नावावर नोंद आहे असे दिसून येत आहे. तसेच पान क्र.16 चे जनरल मुखत्यार पत्रामध्येही वाहनाचा व्यवहार कागदोपत्री पुर्ण झालेला नाही असा उल्लेख आहे. सामनेवाला यांनी चार्टर्ड हाऊस डिटेक्टीव्ह सर्व्हीसेस यांची नेमणुक करुन अपघातग्रस्त वाहनाची संपुर्ण चौकशी केलेली आहे. चार्टर्ड हाऊस यांचा अहवाल पान क्र.30 लगत दाखल आहे. वास्तविक हा अहवाल दाखल झाल्यानंतर सामनेवाला यांनी अर्जदार यांचा योग्य तो विमाक्लेम मंजूर करणे गरजेचे होते परंतु सामनेवाला यांनी अर्जदार यांचा विमाक्लेम मंजूर केलेला नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी अपघातग्रस्त वाहनाचा सर्वे केलेला आहे असा स्पष्ट उल्लेख अर्जदार यांनी त्यांच्या तक्रार अर्जामध्ये केलेला आहे परंतु अपघातग्रस्त वाहनाचे नुकसानीबाबतचा कोणताही सर्वे अहवाल सामनेवाला यांनी दाखल केलेला नाही. पान क्र.30 चे चार्टर्ड हाऊस डिटेक्टीव्ह सर्व्हीसेस यांचा अहवाल व त्यामधील फोटोग्राफस् याचा विचार होता अपघातामध्ये वाहनाचे संपुर्ण नुकसान झालेले आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. अर्जदार यांनी पान क्र.10, पान क्र.11 व पान क्र.12 लगत अपघातग्रस्त वाहनाचे दुरुस्तीच्या खर्चाची एकूण 3 बिले झेरॉक्स प्रती हजर केलेल्या आहेत. पान क्र.10, पान क्र.11 व पान क्र.12 ची कागदपत्रे सामनेवाला यांनी स्पष्टपणे नाकारलेली नाहीत. तसेच पान क्र.10, पान क्र.11 व पान क्र.12 ची कागदपत्रे अयोग्य व चुकीची आहेत हे दर्शवण्याकरीता सामनेवाला यांनी कोणताही योग्य तो जादा लेखी पुरावा दाखल केलेला नाही. पान क्र.30 चे चार्टर्ड हाऊस यांचे सर्वे अहवालामधील फोटोग्राफस् व पान क्र.10, पान क्र.11 व पान क्र.12 लगतची बिले यांचा विचार होता अर्जदार यांचे वाहनाचे रु.1,25,660/- इतक्या रुपयांचे नुकसान झालेले आहे हे स्पष्ट होत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी रक्कम रु.1,25,660/- एवढी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाईच्या रकमेवर 18 टक्के दराने व्याज मिळावे, आर्थीक नुकसान व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- मिळावेत व अर्जाचे खर्चापोटी रु.5000/- मिळावेत अशी मागणी अर्जदार यांनी विनंती कलम 12 मध्ये मागणी केलेली आहे.
अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडुन रक्कम रु.1,25,660/- इतकी मोठी रक्कम योग्य त्या वेळेत मिळालेली नाही. पान क्र.5 अ चे विमापॉलीसीचा विचार करता अर्जदार यांनी ट्रक खरेदीसाठी श्रीराम फायनान्स कंपनी यांचेकडून कर्जाऊ रक्कम घेतलेली आहे असे दिसून येत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता निश्चीतपणे अर्जदार यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागले आहे. याचा विचार होता अर्जदार हे आर्थीक नुकसान भरपाई म्हणून मंजूर रक्कम रु.1,25,660/- या रकमेवर पान क्र.30 चे चार्टर्ड हाऊस यांचे अहवालाची तारीख दि.10/08/2009 पासून दोन महिन्यानंतर म्हणजे दि.11/10/2009 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.12 टक्के प्रमाणे व्याज मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोटाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे.
1) 1 (2008) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 265. संजीव कुमार विरुध्द न्यु इंडिया इन्शुरन्स कं.लि.
2) 2 (2008) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 186. ओरीएंटल इन्शुरन्स कं.लि. विरुध्द राजेंद्र प्रसाद बन्सल.
सामनेवाला यांनी अर्जदार यांना पान क्र.26, पान क्र.27, पान क्र.28, पान क्र.29 नुसार दि.03/08/2009, दि.05/09/2009 व दि.22/09/2009 प्रमाणे पत्रव्यवहार करुन कागदपत्रांची मागणी केलेली आहे. त्यानुसार अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे सर्व कागदपत्रांची पुर्तता केलेली आहे किवा नाही याबाबत कोणताही पुरावा अर्जदार यांनी दिलेला नाही. तसेच दि.22/09/2009 नंतर कोणकोणत्या कागदपत्रांची पुर्तता अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे कोणत्या तारखेस केलेली आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये केलेला नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळण्यास पात्र नाहीत असेही या मंचाचे मत आहे.
याकामी सामनेवाला यांनी त्यांच्या लेखी युक्तीवादासोबत पुढीलप्रमाणे वरीष्ठ
कोर्टाचे निकालपत्र दाखल केलेले आहे.
मा.राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांचेसमोरील रिव्हीजन पिटीशन क्र.2012/2007 निकाल तारीख 05/05/2011 ओरीएंटल इन्शुरन्स कं.लि. विरुध्द मे.कलम टुर्स अँण्ड ट्रॅव्हल्स्.
परंतु वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत व प्रस्तुतचे
तक्रार अर्जामधील हकिकत यामध्ये फरक आहे. प्रस्तुतचे तक्रार अर्जामध्ये विमापॉलीसी अर्जदार यांचेच नावे नोंद आहे तसेच अपघातग्रस्त वाहन अर्जदार यांचेच नावावर नोंद आहे यामुळे सामनेवाला यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र याकामी विचारात घेतलेले नाही.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, मंचाचे वतीने आधार घेतलेली व वर उल्लेख केलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) आजपासून 15 दिवसांचे आत अर्जदार श्री.निवृत्ती सखाराम बत्तासे यांनी सामनेवाला यांचेकडे अपघातग्रस्त वाहनाबाबतचे योग्य त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करावी.
3) वर कलम 2 मध्ये लिहील्यानुसार अर्जदार श्री.निवृत्ती सखाराम बत्तासे यांचेकडून सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर तेथून पुढे 15 दिवसांचे आत सामनेवाला यांनी अर्जदार श्री.निवृत्ती सखाराम बत्तासे यांना अपघातग्रस्त वाहनाचे विमाक्लेमपोटी रक्कम रु.1,25,660/- द्यावेत. व आर्थीक नुकसान भरपाई म्हणून या मंजूर रकमेवर दि.11/10/2009 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.12टक्के प्रमाणे व्याज द्यावे.