(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने दि.17.06.2008 रोजी गैरअर्जदार क्र.2 फुलट्रॉन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड यांचेकडून रु.49,000/- कर्ज घेतले. त्यापैकी रक्कम रु.45,000/- वैयक्तिक कर्ज म्हणून मिळाले आणि रु.4,000/- विमा व प्रोसेसिंग फी म्हणून कापण्यात आले होते. त्यावेळेस त्यास असे सांगितले की, विमा हा तुमच्या कर्जावर सुरक्षिततेसाठी आहे. त्यानुसार त्याने दि.15 सप्टेंबर 2008 रोजी कर्जाच्या विम्यासाठी लागणारा क्लेम फॉर्म, कंपनीपत्र, कंपानीचे टर्मिनेशन लेटर, पगारपत्रक अशी सर्व कागदपत्र गैरअर्जदार क्र.2 मार्फत गैरअर्जदार क्र.1 आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठविली. त्यानंतर विमा कंपनीने, 24 ऑक्टोबर 2008 रोजी तुमचा Unemployment Claim हा पॉलीसी घेतल्यापासून 90 दिवसाच्या आतमधे असल्यामुळे आम्ही कर्जाचा विमा देण्यास असमर्थ आहोत असे कळविले. फुलट्रॉन इंडियाने तक्रारदारास विम्याचे पहिले दोन हप्ते तुम्ही भरा, मग तुम्हास उर्वरीत रकमेचा आय.सी.आय.सी.आय.लोम्बार्डचा विमा मिळवून देऊ असे सांगितले. म्हणून त्याने रु.2,812/- प्रतिमहिना प्रमाणे दोन हप्ते रु.5,624/- भरले, परंतु त्याची पोचपावती मिळाली नाही. त्यानंतर फुलट्रॉन इंडियाने आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्डचा काही संबंध नसून तुम्ही रक्कम परत करा, नसता तुमचे नाव डिफॉल्ट लिस्ट व सिबिलसारख्या संस्थेत देऊ असे सांगितले. फुलट्रॉन इंडियाने विमा मिळवण्यासाठी मदत न करता रक्कम परत घेण्यासाठी रिकव्हरी एजन्सी, त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांचा उपयोग करुन, सतत दुरध्वनी करुन मानसिक त्रास दिला. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने कर्ज सुरक्षित विमा अंतर्गत कर्जाची उर्वरीत रक्कम रु.39,900/-, भरलेली रक्कम रु.5,624/- आणि त्यावरील फुलट्रॉन बँकेचे व्याज, मानसिक भरपाईसह द्यावेत. गैरअर्जदार क्र.1 आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचा विमा दावा, विमा पॉलीसीतील सेकंड शेडयुलमधील एक्सक्लुअन क्लॉज 2.3.3 (2) (d) नुसार पॉलीसी (3) त.क्र.99/09 घेतल्यानंतर 90 दिवसाचे आत जॉब लॉस झाला असेल तर, कंपनीवर विमा रक्कम देण्याची जबाबदारी नाही. तक्रारदाराने जुन 2008 मधे पॉलीसी घेतलेली असून, दि.01.07.2008 रोजी त्याची नोकरी गेलेली आहे. विमा पॉलीसीतील अटी व शर्ती दोघांनाही बंधनकारक असतात. तक्रारदाराचा विमा दावा योग्य कारणावरुन फेटाळलेला असून, त्यास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात यावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे. गैरअर्जदार क्र.2 फुलट्रॉन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड यांना नोटीसची बजावणी होऊनही ते मंचात गैरहजर राहिले. म्हणून, त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आला. तक्रारदाराचे शपथपत्र व गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने दाखल केलेले निलेश रामचंदानी यांचे शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदार व गैरअर्जदार क्र.2 गैरहजर. गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराने गैरअर्जदार क्र.2 फुलट्रॉन इंडिया क्रेडिट कंपनी कडून कर्ज रक्कम रु.49,000/- घेतले, आणि सदर कर्जाच्या सुरक्षिततेसाठी त्याने गैरअर्जदार क्र.1 आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडे विमा उतरविला होता यासंबंधी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदाराने विमा कंपनीने त्याचा विमा दावा दि.24 ऑक्टोबर 2008 रोजी फेटाळल्याचे पत्र दाखल केले नाही. तक्रारदाराने तक्रार अर्जातील म्हणण्यानुसार काहीही कागदपत्र दाखल केलेली नाहीत. उलटपक्षी गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीचे म्हणण्यानुसार तक्रारदाराने जुन 2008 मधे पॉलीसी घेतली असून, दि.01.07.2008 रोजी त्यास नोकरीवरुन कमी केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने दाखल केलेल्या पत्रावरुन तक्रारदारास दि.01.07.2008 रोजी नोकरीवरुन कमी केलेले असून, त्याच्या विनंतीवरुन कर्जावरील विम्यासाठी सदर पत्र दिल्याचे दिसून येते. तक्रारदार आणि गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने विमा पॉलीसीची प्रत दाखल केलेली नाही. परंतू विमा कंपनीने दाखल केलेल्या PART II OF THE SCHEDULE मधील एक्सक्लूजन क्लॉज 2.3.3 नुसार पॉलीसी घेतल्यानंतर 90 दिवसाचे आत नोकरी गेलेली असेल तर, विमा रक्कम देण्याची विमा कंपनीवर जबाबदारी नसल्याचे दिसून येते. (4) त.क्र.99/09 तक्रारदार त्याची तक्रार सिध्द करण्यास असमर्थ ठरला आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1) तक्रार फेटाळण्यात येते. 2) तक्रारीचा खर्च दोन्ही पक्षांनी आपापला सोसावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डि.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |