निकालपत्र :- (दि.07/01/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू होऊनही सदर कामी हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केले नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करणेत आला. तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार ही सामनेवाला इन्शुरन्स कंपनी यांचेकडून तक्रारदाराचे वाहनाचा नुकसानीचा न्याययोग्य क्लेम न मिळालेने दाखल केली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार हा टाटा इंडिका क्र.MH-14-AE-2693 मॉडेल नं.2004चा मालक आहे. सदर कारचा विमा सामनेवाला कंपनीकडे उतरविला होता. नमुद कारचा दि.27/06/2010 रोजी संध्याकाळी 6.45 वाजता तक्रारदार व तिचे पती पुणे ते कोल्हापूर जात असताना सातारा हायवे केळवडे फाटयाजवळ असताना पुढे असणा-या ट्रक नं.MH-04-DK-5606 ने अचानक वळण घेऊन कारला धक्का(डॅश) दिला. त्यामुळे गाडीचे पूर्णत: नुकसान झाले आहे. नमुद ट्रक चालकाविरुध्द राजद पोलीस स्टेशन येथे CR No.30/2010 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. ब) सदर अपघातामध्ये कारचे पूर्णत: नुकसान(डॅमेज) झाले आहे. तदनंतर दि.28//2010 रोजी नमुद अपघातग्रस्त कारच्या नुकसानीची पाहणी करणेसाठी टाटा कंपनीचे बी.यु.भंडारी यांचे वाकड येथील शोरुम मध्ये नेली. सदर अपघाताची तसेच वाकड पुणे येथे कार नुकसानीची पाहणीसाठीची सुचना सामनेवालांचे कार्यालयात दिली आहे. अशी सुचना देऊन व सामनेवालांचे कोणतेही सर्व्हेअर तातडीने नुकसान पाहणीसाठी आलेले नाहीत. सरतेशेवटी दि.28/06/2010 रोजी सर्व्हे करुन तसाच अहवाल दि.02/07/2010 रोजी टाटा शोरुमने पाठवला आहे. सदर अहवालानुसार रक्कम रु.2,01,168/- इतके कार दुरुस्तीचा खर्च, लेबर खर्च दर्शविला आहे. यावरुन कारचे पूर्णत: नुकसान (टोटल डॅमेज) झालेचे दिसून येते. अपघातानंतर 10 दिवसांनी सामनेवालांचे I O चौकशीकरिता आले; तदनंतरही त्यांनी कारची पाहणी केली नाही. अथवा भेट दिली नाही. त्यासाठी बी.यु.भंडारी ऑटो प्रा.लि. यांचे कार ठेवणेसाठी प्रतिदिन रु.300/- भाडे होते. तक्रारदाराने रु.15,000/- भाडेसाठी खर्च केला आहे. क) वारंवार संपर्क साधूनही सामनेवालांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही ही सामनेवालांचे सेवेतील त्रुटी आहे. एक वर्षानी सामनेवालांनी रक्कम रु.1,04,000/- स्विकारलेला असा कोणताही कागदपत्रांचे आधाराशिवाय प्रस्ताव तक्रारदारासमोर ठेवला. सदर प्रस्तावावर चर्चा करुन रु.10,000/- वाढवून सदर प्रकरणी कोणत्याही कागदपत्रांशिवाय रु.1,12,000/- इतक्या रक्कमेवर सेटलमेंट करणेस सामेनवाला कंपनीला हवी आहे. मात्र सदरचा प्रस्ताव तक्रारदाराने मान्य केलेला नाही. कारण नमुद कारचा IDV व्हॅल्यू एकूण रक्कम रु.1,72,372/- इतकी असून त्यासाठी रक्कम रु.7,745/- इतका मोठा हप्ता तक्रारदाराने भरलेला आहे. टाटा शोरुमने रक्कम रु.2,01,168/- इतक्या रक्कमेचा अहवाल दिलेला आहे. तक्रारदाराने घसारा रक्कम रु.5,000/- वजा जाता उर्वरित रक्कम देणेस जबाबदार आहेत. सबब सामनेवाला कंपनीने सदर क्लेमबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार सदर मंचासमोर दाखल करणे भाग पडले. सबब गाडीच्या नुकसानीपोटी रक्कम रु.1,67,372/-, मानसिक त्रासापोटी रकक्म रु.25,000/-, कार ठेवणेचे भाडेपोटी रक्कम रु.15,000/-,कार टोर्इंग चार्जेस रु.10,000/- अशी एकूण रक्कम रु.2,17,372/- व सदर रक्कमेवर अपघात झाले तारखेपासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याज सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ अपघाताबाबतचा खबरी जबाब,पंचानामा, नमुद कारची विमा पॉलीसी, बी.यु.भंडारी ऑटो प्रा.लि. यांचे इस्टीमेंशन रिपोर्ट, ईमेलची हार्डकॉपी, बी.यु.भंडारी यांनी दिलेली पावती, जे.एम.ट्रान्सपोर्टची पावती, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. (04) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे व तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? --- होय. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे. मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराचे मालकीची टाटा इंडिका क्र.MH-14-AE-2693 मॉडेल नं.2004या वाहनाचा विमा प्रायव्हेट कार पॅकेज पॉलीसी अंतर्गत सामनेवालांकडे विमा उतरविला होता हे सिध्द होते. सदर पॉलीसी दि.26/09/2009 रोजी अदा केली आहे. तसेच नमुद वाहनाचे IDV व्हॅल्यू रु.1,72,372/- नमुद असून विम्याची निर्धारीत एकूण रक्कम रु.1,72,372/- नमुद आहे. सदर पॉलीसीसाठीचा रु.7,745/- इतका हप्ता भरलेचा दिसून येतो. नमुद वाहनाचा अपघात दाखल खबरी जबाबावरुन दि.27/06/2010 रोजी सायंकाळी 6.45 वाजता तक्रारदाराचे पती स्वत: गाडी चालवत असताना ट्रक नं.MH-04-DK-5606 यांनी अचानक वळलेमुळे तक्रारदाराचे गाडी धडकून अपघात झालेचे दिसून येते. त्याबाबतचा पंचनामा दाखल आहे. सदर अपघातामध्ये नमुद वाहनाचे मोठया नुकसान झालेचे सदर पंचनाम्यात नमुद केले आहे. अपघातग्रस्त वाहनाची बी.यु.भंडारी ऑटो प्रा.लि.यांनी पाहणी करुन वाहनाच्या नुकसानीबाबतचे इस्टीमेट दिलेचे दिसून येते.बी.यु.भंडारी यांनी दिलेल्या कोटेशननुसार रु.1,71,168/- इतकी रक्कम दिसून येते. तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीस अपघातासंदर्भात तसेच नमुद बी.यु.भंडारी यांनी अपघातग्रस्त वाहनाच्या नुकसानीची पाहणी केलेचे कळवलेचे दाखल ई मेलच्या सत्यप्रतीवरुन दिसून येते. तसेच सदर वाहन पाहणीपोटी बी.यु.भंडारी ऑटो प्रा.लि. वाकड यांचे येथे सवर्हेसाठी ठेवलेले होते व त्यापोटी रक्कम रु.15,000/- इतकी रक्कम भाडयापोटी अदा केलेची पावती प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. तसेच टोईंगच्या खर्चापोटी रक्कम रु.10,000/- दिल्याची पावती दाखल आहे. तक्रारदाराने सामनेवाला व त्यांचेमध्ये झालेल्या ई मेलच्या हार्ड कॉपीची सत्यप्रत दाखल केलेली आहे. यामध्ये अपघाताबाबतची माहिती सामनेवालांना झालेची दिसून येते. तसेच सामनेवाला विमा कंपनी रक्कम रु.1,12,000/- देणेस तयार होती हे दाखल दि.24/09/2010 च्या जी-मेलच्या सत्यप्रतीवरुन दिसून येते. मात्र प्रस्तुतची रक्कम अपघातग्रस्त वाहनाचे संपूर्ण नुकसान झाले असल्यामुळे तक्रारदाराने नाकारलेली आहे. तसेच तक्रारदाराने वारंवार सुचना देऊनही सामनेवालांचे अधिका-यांनी नमुद वाहनाचे नुकसानीची पाहणी करणे तसेच क्लेम संदर्भात निर्णय घेणेची पुढील कार्यवाही करणेची दखल घेतलेली नाही ही सामनेवालांची गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच नमुद वाहनाचे पूर्णत: नुकसान झालेले आहे ही वस्तुस्थिती निर्वीवाद असतानाही कोणत्याही कागदपत्रांच्या आधाराशिवाय सामनेवाला कंपनीने तक्रारदारास प्रथमत: रु.1,12,000/- स्विकारावे तदनंतर रक्कम वाढवून रु.1,25,000/- करावेत याबाबत संपर्क साधलेला आहे. अशाप्रकारे वाहनाची संपूर्ण नुकसान असतानाही योग्य त्या कागदपत्रांच्या आधारावर क्लेम रक्कमेचा निर्णय घेणे क्रमप्राप्त असतानाही सामनेवालांनी सदरची जबाबदारी पार पाडलेची दिसून येत नाही. सबब तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम योग्य तो निर्णय न घेऊन तसेच क्लेमची रक्कम अदा न करुन सामनेवालांनी सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवालांना नोटीस लागू असतानाही ते सदर मंचासमोर उपस्थित राहिलेले नाहीत अथवा लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही अथवा लेखी युक्तीवादही दाखल केलेला नाही. सबब सामनेवाला यांना तक्रारदाराची तक्रार मान्य आहे असे म्हणणे चुकीचे होणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र. 2:- टाटा मोटर कंपनीचे अधिकृत डिलर बी.यु.भंडारी ऑटो प्रा.लि. यांचे वाकड पुणे येथील वर्कशॉपमध्ये नमुद वाहन नेलेले होते. सदर वाहनाच्या नुकसानीपोटी रक्कम रु.1,71,168/- इतक्या रक्कमेचे कोटेशन त्यांनी दिलेले आहे. तसेच सदर वाहन नमुद बी;यु.भंडारी ऑटो प्रा.लि. यांचे वर्कशॉपमध्ये ठेवणेसाठी प्रतिदिन रु.300/- प्रमाणे भाडयापोटी रक्कम रु.15,000/- तसेच टोईंगपोटी रु.10,000/- अदा केल्याच्या पावत्या प्रस्तुत प्रकरणी दाखल आहेत. सदर कोटेशन तसेच खबरी जबाब पंचनामा इत्यादीचे अवलोकन केले असता नमुद वाहनाचे संपूर्ण नुकसान झालेले आहे.(टोटल डॅमेज) या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब तक्रारदार नमुद वाहनाची एकूण निर्धारित विमा रक्कम म्हणजेच IDV व्हॅल्यू रक्कम घसारा वजा जाता मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच तक्रारदाराने नमुद IDV रक्कम रु.1,72,372/- मधून रु.5,000/- घसारा वजा जाता उर्वरित रककम रु.1,67,372/- मिळणेबाबत तक्रारदाराने केलेली मागणी योग्य आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. यासाठी हे मंच खालील पूर्वाधार विचारात घेत आहे. 2008 CTJ 917(Supreme Court) (CP)- Dharmendra Goel Vs Oriental Insurance Co. Ltd.-Insurance-Deficiency in service-Consumer Protection Act,1986-Section 2(1)9g)-Serctin 2(1)(o)-Appellant got his vehicle insured with the respondent for rs.3,54,000/- on a premium of Rs.8,498/- on 13/2/2002-Vehicle met with an accident on 10/09/2002-Respondent duly informed-As per the estimate obtained the repair cost would have come to Rs.3,37,247/- Insurance suryeyor, however, assessed the value of the vehicle on total loss basis at Rs.1,80,000/--However, the assessment on cash loss basis made at only Rs.1,04,433/-Respondent declined to defray any amount taking a plea that the driver did not have a valid driving licence on he date of the accident- Appellant’s complaint dismissed by the Disrtict Forum on the ground that the case involved complicated issues of fact which could only be decided by a civil court-Appeal by the appellant to the State Commission allowed holding that the driver did have a valid driving licence on the date of the accident and the respondent directed to pay Rs.1,04,043/- with 6 % interest per annum-Revision petition preferred by the appellant before the National Commission partly allowed, compensation in the sum of Rs.1,80,000/- granted with interest @ 12 % per annum-Still not satisfied the appeal to Supreme Court-Respondent had itself accepted the value of the vehicle at Rs.3,54,000/- on 13/02/2002 and charged the premium amount accordingly-Therefore, it could not claim that its value on total loss on the date of accident on 10/09/2002 was only Rs.1,80,000/- It was also unbelievable that it could have depreciated to the amount of Rs,1,80,000/- within a span of seven months- Held, the respondent was bound by the value of Rs.3,54,000/- put on by it on the vehicle while issuing the policy on 13/02/2002-Respondent accordingly held liable to pay the said amount-However, considering that seven months of the policy had already expired, depreciation in the sum of Rs.10,000/- allowed-As such the respondent liable to pay Rs.3,44,000/--Appeal allowed with costs quantified at Rs.25,000/- HELD :- The insurance companies being in a dominant position, often act in an unreasonable manner and after having accepted the value of a particular insured good, disown that very figure on one pretext or the other when called upon to pay compensation. This ‘take it or leave it’ attitude is clearly unwarranted not only as being had in law but also ethically indefensible. सदर तक्रारदाराने क्लेम मिळणेसाठी सामनेवालांशी वारंवार संपर्क साधूनही नमुद क्लेमची रक्कम अदा करणेस सामनेवालांनी टाळाटाळ केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास क्लेमची रक्कम रु.1,67,372/-(रु.एक लाख सदुसष्ट हजार तीनशे बहात्तर फक्त) त्वरीत अदा करावेत. सदर रक्कमेवर दि.24/09/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह अदा करावी. 3) सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदारस मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावी.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |