तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले : एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर(सदस्या) ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
तक्रार अर्ज संक्षिप्त स्वरूपात खालील प्रमाणे
1 सा.वाले क्रं 1 ही सहकारी गृह संस्था आहे. सा.वाले क्रं 2 हे संस्थेचे अध्यक्ष आहे सा.वाले 3 हे संस्थेचे सचीव आहेत. तर सा.वाले 4 हे संस्थेचे सहसचीव आहेत. तक्रारदार हे सा.वाले क्रं 1 चे सभासद आहेत.
2. तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, तक्रारदारांना सा.वाले यांचे विरूध्द अनेक तक्रारी आहे त्याबद्दल तक्रारदारांनी सा.वाले क्र. 1 यांच्या पदाधिका-यांना तोंडी व लेखी कळविले. ब-याच वेळा संस्थेविरूध्द तक्रारी हया संस्थेच्या अनेक सभासदांनी
मिळुन एकत्रपणे लेखी केलेले आहे. परंतू सा.वाले यांनी आतापर्यंत तक्रारदारांचे व इतर सभासदांच्या तक्रारीचे दखल घेतली नाही किंवा त्यांनी लिहीलेल्या पत्रास उत्तरही दिले नाही.
3. म्हणून तक्रारदार ग्राहक मंचापूढे तक्रार दाखल करून खालील मागण्या केल्या.
(1) सा.वाले यांनी दिलेल्या सर्व पत्राची उत्तरे द्यावी/दखल घ्यावी.
(2) कार्यकारी मंडळाचे जे सभासद सतत 3 मिटींगला गैरहजर राहीले त्यांना कार्यकारी मंडळातून काढुन टाकावे.
(3) संस्थेविरूध्द व सभासदांविरूध्द कार्यकारी मंडळाचे जे सभासद उर्मटपणे व बेजबाबदारपणे वागले त्यांच्या विरूध्द कारवाई करावी.
(4) तक्रार अर्ज खर्च रू.25,000/-द्यावे.
4. तक्रार अर्ज तक्रारीतील मागण्यापैकी कलम एक एवढयापूरतीच दाखल करून घेण्यात आली व कलम 2 व 3 ही शिस्तभंगाची कारवाई असल्याने त्याबाबत तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही.
5. सा.वाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्तर द्यावे. अशी मंचाकडून सा.वाले यांना नोटीस पाठविण्यात आली. सा.वाले यांचे तर्फे दिनांक- 26.11.2010 रोजी वकील श्री. भन्साळी हजर राहीले. वकालतनामा व कैफियत दाखल करणेकामी मुदत मागीतली परंतू वकालतनामा व कैफियत दाखल केली नाही. म्हणून सा.वाले
यांचे विरूध्द तक्रार अर्ज एकतर्फा निकाली काढण्यात यावा असा आदेश मंचाकडुन पारीत करण्यात आला.
6. तक्रार अर्ज, पुराव्याचे शपथपत्र व अनुषंगीक कागदपत्रे यांची पडताळणी करून पाहली असता निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारदार यांनी सा.वाले यांच्या सेवेतील कमतरता सिध्द केले आहे काय ? | होय.अंशतः |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रार अर्जात केलेल्या मागणीस पात्र आहेत काय ? | होय.अंशतः |
3. | अंतीम आदेश | तक्रार अर्ज अंशतः मान्य करण्यात येते. |
कारण मिमांसा
7. तक्रारदारांनी सा.वाले क्रं 1 यांना सा.वाले संस्थेविरूध्द असलेल्या तक्रारीबाबत बरेच तोंडी व लेखी पत्रव्यवहार केला. परंतू सा.वाले यांनी तक्रारदारांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. व त्यांनी पाठविलेल्या पत्राची उत्तरे दिली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे. तक्रारदारांनी खालीलप्रमाणे सा.वाले यांच्याशी पत्रव्यवहार केला. .
अनु(क्रं) | दिनांक | तक्रारीचे स्वरूप | निशाणी |
1. | 13.06.09 | अपुरी सुरक्षाव्यवस्था, अपुरे पाणीपुरवठा, सभासंदाचे उर्मट वर्तन,संस्थेच्या पदाधिकारींचे संस्थेच्या देखभालीबाबत निर्णय व संस्थेच्या इमारतीच्या दुरूस्तीचे संस्थ्ोच्या सभासदांना न कळविता घेतलेले परस्पर निर्णय व तसेच लेखापरिक्षणाच्या अहवालाचे स्पष्टीकरण याबाबत लिहीलेले पत्र. | ‘ए’ |
2. | 08.08.09 | संस्थेने संस्थेच्या इमारतीचे अनेक दुरूस्तीबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्पष्टीकरण | ‘ब’ |
3. | 11.11.09 | तक्रारदारांकडुन काही कागदपत्रांची पाहणी करण्याकरीता लिहीलेले पत्र. | ‘क’ |
4. | 17.02.2010 | संस्थेच्या वतीने कोर्ट केसेसमध्ये हजर राहण्याकरीता लागणा-या खर्चाच्या मागणीबाबत लिहीलेले पत्र | ‘ड’ |
5. | 20.03.2010 | वरील पत्राचे स्मरणपत्र | ‘ई’ |
6. | 15.04.2010 | कार्यकारी मंडळाच्या सभासदाविरूध्द न घेतलेल्या कारवाई बद्दलचे स्पष्टीकरण | ‘फ’ |
7 | 04.06.2010 | दि. 14.11.2009 व 26.01.2010 चे जनरल बॉडी मिटींगचे मिनिट न पुरवल्या बद्दलचे स्पष्टीकरण | ‘ग’ |
8 | 08.06.2010 | दि. 17.02.2010 व 20.03.2010 च्या पत्रांचे स्मरणपत्र | ‘ह’ |
9 | 09.06.2010 | दि.04.06.2010 चे स्मरणपत्र | ‘य’ |
11. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार त्यांना सामनेवाले हयांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही किंवा त्यांनी पाठविलेल्या पत्रास उत्तरही दिले नाही. तक्रारदारांचे हे म्हणणे शपथपत्रासह दाखल केले आहे सा.वाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्तर दाखल केले नाही. व तक्रारदारांचे म्हणणे खोडले नाही. म्हणून तक्रारदारांचे म्हणणे ग्राहय धरण्यात येते.
12. तक्रारदारांच्या पत्रास किंवा त्यांच्या मागणीस 15 दिवसाच्या आत उत्तर देणे हे आदर्श पोटनियमाप्रमाणेच्या कलम 174 प्रमाणे सोसायटीच्या बॉयलाजप्रमाणे बंधनकारक असते. सा.वाले संस्थेनी तक्रारदारांच्या पत्रांना उत्तर दिले नाही. यात सा.वाले यांच्या सेवेत कमतरता दिसून येते.
13. तक्रारदारांच्या पत्रास उत्तर देणे हे पोटनियमाप्रमाणे सा.वाले संस्थेवर बंधनकारक असल्याने सा.वाले संस्था यांनी तक्रारदारांनी लिहीलेल्या पत्रास उत्तर देण्यास जबाबदार आहेत.
14. वरील विवेचनावरून खालील आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार अर्ज क्रमांक. 498/2008अंशतः मान्य करण्यात येते.
2. सा.वाले संस्थेनी तक्रारदारांच्या प्रस्तुत न्यायर्णियाचे परिच्छेद क्र. 6 मध्ये नमुद केलेल्या पत्रास उत्तर/स्पष्टीकरण द्यावेत.
3. सा.वाले संस्थेनी तक्रारदारास तक्रार अर्ज खर्च 1,000/-रू. द्यावे.
4. सा.वाले यांनी वरील आदेशाची पूर्तता, आदेशाची प्रमाणीत प्रत मिळाल्यापासू 6 आठवडयाचे आत करावी अन्यथा सा.वाले यांनी दरमहा 100/-,रू. दंडात्मक रक्कम तक्रारदारांना द्यावे.
5. आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
. .