निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) गैरअर्जदार फायनान्स कंपनीने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार आयसीआयसीआय होम फायनान्सकडे दिनांक 29/2/2004 रोजी घर घेण्यासाठी कर्जाची मागणी केली होती. गैरअर्जदार बँकेने त्यास रु 3,50,000/- कर्ज मंजूर केले. त्यासाठी प्रोसेसींग फी म्हणून रु 1750/- घेतले. परंतु बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची रक्कम दिली नाही व प्रोसेसींग फी सुध्दा परत केली नाही म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास बँकेकडून रु 40,000/- नुकसान भरपाई देण्यात यावी. गैरअर्जदार बँकेने लेखी निवेदन दाखल केले. बँकेचे म्हणणे असे आहे की, सदर तक्रार मुदतबाहय आहे. दिनांक 29/2/2004 रोजी तक्रारदाराला रु 3,50,000/- कर्ज मंजूर करण्यात आले होते परंतु त्याबाबतच्या अटी व शर्ती स्विकारण्याबाबत तक्रारदाराला प्रस्ताव पाठविण्यात आला होता व तो प्रस्ताव 6 महिने ग्राहय होता. परंतु तक्रारदाराने अटी व शर्ती मान्य असल्याचे कळविले नाही म्हणून बँकेच्या सेवेत त्रुटी नाही त्यामुळे ही तक्रार फेटाळावी अशी मागणी बँकेने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे 1. तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे काय? नाही. 2. गैरअर्जदार बँकेच्या सेवेत त्रुटी आहे काय? मुद्दा उरत नाही. 3. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्र 1 व 2 :- तक्रारदाराने स्वत: व बँकेच्या वतीने अड यु.एन.शेटे यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराला गैरअर्जदार बँकेने दिनांक 29/2/2004 रोजी कर्ज मंजूर केल्याचे पत्र दिल्यानंतर कर्ज रक्कम वितरीत न करुन त्रुटीची सेवा दिली या कारणावरुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली आहे म्हणजेच तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्याचे कारण दिनांक 29/2/2004 रोजीच घडलेले आहे त्यामुळे तक्रारादाराने ही तक्रार कलम 24-अ, ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील तरतुदीनुसार 2 वर्षाच्या आत म्हणजे दिनांक 28/2/2006 पुर्वी दाखल करणे आवश्यक होते. परंतु त्याने ही तक्रार अत्यंत विलंबाने दिनांक 12/5/2009 रोजी दाखल केली आहे. म्हणून निश्चितपणे ही तक्रार मुदतबाहय आहे. म्हणून मुद्दा क्र 1 व 2 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
(श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |