(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून वाहन कर्ज घेतले आहे. गैरअर्जदार यांनी कर्ज वसुलीपोटी अर्जदाराचे वाहन जप्त केले, म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार बँकेकडून 27,500/- रुपयाचे वाहन कर्ज घेतले. अर्जदाराचे कर्जफेडीचे काही हप्ते न भरले गेल्यामुळे गैरअर्जदार यांनी दि.23.05.2008 रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता, त्यांचे वाहन जप्त केले. गैरअर्जदार यांनी हप्ते पाडून दिल्यास ते पैसे भरण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी वाहन परत देण्याची मागणी अर्जदाराने केली आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदार हे ग्राहक नाहीत. अर्जदाराने मंजूर केलेल्या कर्जाची परतफेड 1171/- प्रति हप्ता याप्रमाणे 30 महिन्यात करावयाची होती. अर्जदाराने कर्जाची परतफेड न केल्यामुळे कायदेशिर बाबींची पूर्तता करुन, करारातील अटीप्रमाणे अर्जदाराचे वाहन दि.29.05.2008 रोजी ताब्यात घेण्यात आले. अर्जदारास, कर्जफेडीबाबत अनेकवेळेस सूचना व नोटीस दिल्यानंतरही अर्जदाराने कर्जाची परतफेड केली नाही. अर्जदाराने कर्जाची उर्वरित रक्कम एकरकमी भरल्यास त्यांना करारातील अटींप्रमाणे वाहन परत करता येऊ शकते. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे निरीक्षण केल्यावर असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड 1171/- प्रति महिना या प्रमाणे 30 महिन्यात करावयाची होती. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जदाराच्या खाते उता-याचे निरीक्षण केल्यावर अर्जदाराने दि.05.06.2006 ते 05.07.2009 या काळात कर्जफेडीचे हप्ते नियमितपणे भरलेले नाहीत. अर्जदारास कर्जफेडीची रक्कम भरण्यासाठी गैरअर्जदार यांनी दि.03.03.2008, 30.05.2008 रोजीच्या पत्राद्वारे कळविले असल्याचे दिसून येते. अर्जदाराने रक्कम न भरल्यामुळे गैरअर्जदार यांनी दि.23.05.2008 रोजी अर्जदाराचे वाहन जप्त केले. मंचासमोर या प्रकरणी सुनावणी दरम्यान अर्जदाराने अनेकवेळेस रिजॉईन्डर दाखल करण्यासाठी मुदतवाढ मागितली, पण अनेकवेळेस संधी देऊन दाखल केले नाही. मंचाने दि.28.05.2008 रोजी अंतरिम आदेशाद्वारे अर्जदारास रु.10,000/- गैरअर्जदार यांच्याकडे कर्जफेडीसाठी जमा करण्याचे व गैरअर्जदार यांनी वाहन न विकण्याचे आदेश देण्यात आला. अर्जदाराने ही रक्कम भरल्याबदद्ल कोणताही पुरावा मंचात दाखल केलेला नाही. वरील सर्व निरीक्षणावरुन अर्जदाराने वाहनाची कर्जफेड नियमितपणे केली नसल्याचे दिसून येते. व गैरअर्जदार यांनी करारातील अटीप्रमाणे अर्जदाराच्या वाहनाचा ताबा घेतला असल्याचे दिसून येते. अर्जदाराची वाहन परत करण्याची व नुकसान भरपाई देण्याची मागणी चुकीची असल्यामुळे मंच ती मान्य करीत नाही. आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते. श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |