(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराच्या पतीचे अपघाती निधन झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम देण्याबाबत केलेली मागणी गैरअर्जदार यांनी नाकारल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. (2) त.क्र.850/09 अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्या भगूर, ता.वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथील रहिवासी असून, त्यांच्या पतीच्या नावे शेतजमिन आहे व त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. दि.18.07.2005 रोजी झाडावरुन पडल्यामुळे त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले. या घटनेचा पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, इत्यादी आवश्यक कागदपत्रासह त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडे शासनाच्या संबंधित अधिका-यामार्फत अर्ज दाखल केला व विमा रक्कम देण्याची मागणी केली. आजारपणामुळे त्यांना तक्रार दाखल करण्यास उशीर झाला व ते गैरअर्जदार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करु शकले नाहीत असे अर्जदाराने तक्रारीत म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा क्लेम नाकारल्यामुळे व्याजासह विमा रक्कम देण्याची, तसेच नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश देण्याची विनंती मंचास केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेल्या जवाबाहनुसार अर्जदाराने, त्यांचे पती शेतकरी होते व त्यांचे अपघाती निधन झाल्याबाबतची कोणतीही कागदपत्रे त्यांना दिलेली नाहीत, त्यामुळे त्यांनी अर्जदाराचा क्लेम नाकारला. महाराष्ट्र शासनाच्या या विमा योजनेअंतर्गत येणारे दावे व प्रकरणे हे फक्त मुंबई उच्च न्यायालयात दाखल करता येतात असे सांगून अर्जदाराची तक्रार ही मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेरची असल्याचे म्हटले आहे. व अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांची या विमा योजनेवर कन्सलटंट म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची नेमणूक 15 जुलै 2006 पासून असल्यामुळे व अर्जदाराची तक्रार त्या आधीची असल्यामुळे त्यांना या प्रकरणी कोणतीही माहिती नाही. गैरअर्जदार क्र.3 यांना नोटीस प्राप्त होऊनही ते हजर राहिले नाही. म्हणून त्यांच्याविरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे निरीक्षण केल्यानंतर असे आढळून येते की, अर्जदाराच्या पतीच्या नावे गट क्र.338, भगूर ता वैजापूर येथे शेतजमिन असून, ते शेतकरी होते. पोलिस पंचनामा तसेच एफ. आय.आर. इत्यादी कागदपत्रांवरुन अर्जदाराचे पती साहेबराव नामदेव थोरात यांचे दि.28.07.2005 रोजी, झाडावरुन पडून अपघाती निधन झाल्याचे दिसून येते. तहसीलदार, वैजापूर व तालुका कृषी अधिकारी वैजापूर यांच्या यादीत दि.20.09.2006 रोजी शेतकरी अपघात (3) त.क्र.850/09 विमा योजनेअंतर्गत दुर्घटना ग्रस्त शेतक-यांच्या यादीत अर्जदाराच्या पतीचे नाव असल्याचे दिसून येते. या प्रकरणात दि.16.08.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराच्या नावे 1 लाख रुपयाचा धनादेश मंचात जमा केला. म्हणजेच अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केल्यानंतर गैरअर्जदार यांनी, विमा योजनेअंतर्गत मिळणा-या रकमेचा अर्जदाराच्या नावे असलेला धनादेश, मंचात जमा केला. यावरुन अर्जदाराचा क्लेम योग्य होता हे स्पष्ट होते. तहसील कार्यालयात क्लेम फॉर्म कधी दाखल झाला, इन्शुरन्स कंपनीला क्लेम केव्हा पाठविला, याबददलची कोणतीही कागदपत्रे अर्जदाराने मंचात दाखल केलेली नाहीत. आदेश 1) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास, तक्रारीचा खर्च रु.1500/- 30 दिवसाच्या आत द्यावेत. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डि.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |