निकालपत्र :- (दि.27/07/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 हे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला क्र.2 चे लेखी म्हणणे पोष्टाने दाखल केले. सुनावणीचे वेळेस उभय पक्षकार व त्यांचे वकील अनुपस्थित असलेने प्रस्तुतची तक्रार गुणदोषावर निर्णित करणेत येते. सदरची तक्रार ही सामनेवाला इन्शुरन्स कंपनी यांचेकडून शेतकरी अपघात योजनेअंतर्गत तक्रारदाराचे न्याययोग्य क्लेम न मिळालेने दाखल केली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदार या कासार पुतळे ता.राधानगरी जि.कोल्हापूर या गावच्या रहिवाशी असून तेथे त्यांची स्थावर जंगम मालमत्ता आहे. तक्रारदाराचे पती श्री बापू कृष्णा चौगले यांचा मुख्य व्यवसाय शेती होता. सामनेवाला क्र.1 ही विमा कंपनी असून सामनेवाला क्र.2 ही ब्रोकर कंपनी आहे. तक्रारदाराचे पतीचे नांवे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सामनेवालांकडे विमा उतरविलेला होता व आहे. दि.31/5/2005 रोजी झ-याचा मोळ या नावाने ओळखण्यात येणा-या शेताकडून जाणेकरिता कासार पुतळे ते सरवडे रोडने चालत जात असताना सकाळी 10.15 चे दरम्यान जीप नं.एम.एच.13-ए-5354 ने जोराची धडक देऊन त्यांना जखमी केले व सदर जीप न थांबता निघून गेली. त्यांना उपचारासाठी सी.पी.आर.हॉस्पिटल येथे दाखल केले हेाते. मात्र अपघातामध्ये झालेल्या जखमा मुळे दि.27/08/2005 रोजी उपचारादरम्यान ते मयत झाले. सदर अपघातातील जीपचा चालक सागर शंकर चव्हाण याचेवर भा.द.वि.स. कलम 279, 304, 337, 338 अन्वये राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नेांद करुन गोषवारा पत्र दाखल केलेले होते व आहे. तक्रारदाराने विमा क्लेम रक्कम मिळणेसाठी तहसिलदार राधानगरी यांचे माध्यमातून योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करुन क्लेम फॉर्म भरुन दि.12/01/2006 रोजी सामनेवाला विमा कंपनीकडे दाखल केला असता सदर क्लेमबाबत आजअखेर काहीही कळवलेले नाही. त्यामुळे दि.06/12/2007 रोजी नोटीस पाठवून क्लेमची मागणी केली. सदर नोटीस दि.08/12/2007 रोजी सामनेवाला यांना मिळालेली आहे. सदर नोटीसीस सामनेवाला यांनी काहीही उत्तर दिलेले नाही. तक्रारदार ही गरीब विधवा राधानगरी तालूक्यातील दुर्गम भागात राहणारी आहे; तिचे कुटूंब शेतीवर अवलंबून होते व आहे. पतीचे निधनानंतर त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. सामनेवाला यांनी केलेल्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास क्लेमची रक्कम मुदतीत मिळालेली नाही. त्यामुळे मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे. तक्रारदार ही अशिक्षीत, गरीब व कायदयाचे ज्ञान नसलेने असहाय असलेने तिला कोणताही आधार नसलेने आजअखेर कोर्टात अर्ज दाखल करु शकलेली नवहती. तिच्या अशिक्षीतपणाचा व परिस्थितीचा विचार करुन प्रसतुत तक्रार मंजूर करावी व तक्रारदारास सामनेवालांकडून विमा रक्कम रु.1,00,000/- क्लेम दाखल तारखेपासून 18 टक्के व्याजासह, मानसिक शारीरीक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- वसुल होऊन मिळावेत अशी विंनती केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारदार यांनी भरुन दिलेला क्लेम फॉर्म, प्रकाश तुकाराम मगदूम यांचा खबरी जबाब, घटनास्थळाचा पंचनामा, सी.पी.आर.पोलीस ठाणे यांनी दिलेला रिपोर्ट व अपघाती मृत्यूबाबत दिेलेला रिपोर्ट, मयत बापू कृष्णा चौगले यांचा जबाब, मधुकर बापू चौगले, सागर शंकर चव्हाण यांचा जबाब, इन्क्वेस्ट पंचनामा, एम.ओ.सी.पी.आर.हॉस्पिटल यांनी दिलेला मृत्यूचा दाखला, मयताचा पी.एम.रिपोर्ट, तक्रारदार यांनी त्यांचे वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस, सदर नोटीस सामनेवाला यांना मिळालेची प्रत, तहसिलदार राधानगरी यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव सामनेवाला यांना दिलेचे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार मान्य केले कथनाखेरीज परिच्छेदनिहाय तक्रार नाकारलेली आहे. तक्रारअर्ज कलम 1 मधील मजकूराबाबत सामनेवालांना वैयक्तिक ज्ञान नाही. प्रस्तुत अपघाताबाबतचे पोलीस पेपर्स दाखल नाहीत. सामनेवाला यांनी अदयापही क्लेम नाकारलेला नाही. कारण क्लेम फॉर्म हा विहीत मुदतीत मिळालेला नाही. तक्रारीस कारण घडलेले नाही. तक्रारदाराने केलेल्या कथनाप्रमाणे जीप नं.एम.एच.13-ए-5354 ने धडक देऊन अपघात झालेने तक्रारदाराचे पती मयत झालेले आहे ही दुदैवाची बाब आहे. मात्र शेतकरी अपघात विमा योजना पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे सामनेवाला कंपनी कोणतीही रक्कम देणे लागत नाही. प्रस्तुतचा अपघात दि.27/05/2005 रोजी झालेला आहे. तर प्रस्तुतची तक्रार दि.10/02/2011 रोजी दाखल केलेली आहे. प्रस्तुत तक्रारीस ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 24(1) प्रमाणे मुदतीचा बाध येतो. तसेच तक्रारदार नैसर्गिक न्याय तत्वाचा विचार करता विलंब माफ होणेबाबतचा अर्ज दाखल केलेला नाही. अपघातातील मृत्यूची सुचना एक वर्षाच्या आत सामनेवाला कंपनीस दयावयास हवी होती तशी ती दिलेली नाही. प्रस्तुतची तक्रार चुकीची खोटी व मुदतबाहय असलेने फेटाळणेस पात्र आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे व सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्हणणे इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. प्रस्तुत तक्रारीस मुदतीची बाधा येते काय ? --- नाही. 2. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? --- होय. 3. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे. मुद्दा क्र.1 व 2 :- सामनेवाला विमा कंपनीने आपल्या लेखी म्हणणेतील कलम 4 मध्ये तक्रारदाराचा विमा दाव्याबाबत अदयापही निर्णय दिला नसलेचे तसेच क्लेम नाकारला नसलेचे प्रतिपादन केले आहे. सदर प्रतिपादनाचा विचार करता व मा.राष्ट्रीय आयोग, दिल्ली यांचे पूर्वाधाराचा विचार करता प्रस्तुत तक्रारीस मुदतीचा बाध येत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे तक्रारदाराचे पती मयत बापू कृष्णा चौगले यांचे नांवे शेतकरी व्यक्तीगत विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता याबाबत वाद नाही. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदराकडून क्लेम फॉर्म व त्यासोबतची कागदपत्रे विहीत मुदतीत प्राप्त झाली नसलेने प्रस्तुतच्या दाव्याबाबत निर्णय दिलेला नाही. याबाबत सामनेवाला यांची सेवात्रुटी नसलेचे लेखी म्हणणे दिलेले आहे. सदर बाबींचा विचार करता वादाकरिता जरी दावा विहीत मुदतीमध्ये प्राप्त झाला नसला तरी ज्या वेळेस सामनेवाला कंपनीकडे प्रस्तुत दावा दाखल झाला त्यावेळेस सामनेवाला कंपनीने प्रस्तुत दाव्याचा निर्णय तक्रारदारास कळवावयास हवा होता तो सामनेवाला यांनी कळवलेला नाही हे सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणेतील कलम 4 मध्ये प्रस्तुत तक्रारदाराचा विमा दावा अदयापही नाकारला नसलेचे प्रतिपादन केले आहे. प्रस्तुत दावा व कागदपत्रे त्यांना विहीत मुदतीत मिळाली नव्हती मात्र सदर मुदतीनंतर विमा दावा कागदपत्रे सामनेवाला विमा कंपनीस मिळालेली आहेत हे तहसिल राधानगरी यांनी श्रीमती सुचेता प्रधान, व्यवस्थापक पुणे यांना दि.04/07/2007 रोजी पाठविलेल्या पत्रामध्ये तक्रारदाराचे पतीचा मृत्यू दावा पुढील कार्यवाहीसाठी पाठवलेबाबत नमुद केलेले आहे. यावरुन सामनेवाला यांना विमा दावा सन-2007 मध्ये पाठवलेचे दिसून येते. सदर कागदपत्रे प्राप्त झालेबाबत सदर क्लेमबाबत क्लेम हा मंजूर अथवा नामंजूर केला व तो कोणत्या कारणास्तव केला हा निर्णय सामनेवाला कंपनीने तक्रारदारास कळवावयास हवा होता. सदरचा निर्णय अदयापही सामनेवाला कंपनीने कळवले नसलेचे मान्य केले आहे. सबब त्यामुळेच प्रस्तुतची तक्रार उदभवलेली आहे. सदर क्लेमबाबत मंजूर अथवा नामंजूर बाबत वेळीच निर्णय दिला असता तर प्रस्तुतची तक्रार विहीत मुदतीत दाखल झाली असती. सबब प्रस्तुत तक्रारीस मुदतीची बाधा येत नाही या निष्कषाप्रत हे मंच येत आहे. मात्र सदर कागदपत्रे प्राप्त होऊनही निर्णय दिलेला नाही ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3:- तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता दाखल क्लेम फॉर्म भाग-1 मध्ये तक्रारदाराचे पती बापू कृष्णा चौगले यांचे अपघाती निधन झालेचे नमुद केले आहे व सदर विमा योजनेअतंर्गत विमा रक्कम रु.1,00,000/- ची मागणी केलेली आहे. सदर प्रपत्रावर तहसिलदार राधानगरी यांचे दि.12/01/2006 रोजीचा सहीशिक्का दिसून येतो. सदर प्रपत्राच्या भाग-2 मध्ये तक्रारदाराचे मयत पती हा शेतकरी असून सदर योजनेअंतर्गत त्याचा समावेश असलेमुळे व अपघाती मृत्यूमुळे तक्रारदार वारस म्हणून रक्कम रु.1,00,000/-इतक्या दाव्यास पात्र असलेबाबत प्रमाणपत्र सहीशिक्क्यानिशी दिलेले आहे. दि.22/08/2005चे खबरी जबाबावरुन दि.31/07/2005 रोजी तक्रारदाराचे पती बापू कृष्णा चौगले 10.00 वाजता कामत नावचे शेताकडून फिरुन येतो म्हणून घराकडून बाहेर पडले व ते कासारपुतळे व सरवडे रोडने जात असताना 10.15 चे सुमारास झ-याचा मुळ या ठिकाणी एका जीपगाडी क्र.एम.एच.13-ए-5354ने ठोकरल्याने रस्त्याचे कडेला पडलेमुळे कमरेस व ठिकठिकाणी लागून रक्त आले असलेने व पुराचे पाणी असलेने दि.06/08/2005 रोजी सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले. सदरचा अपघात हा नमुद जीप चालकाच्या चुकीमुळे झालेला आहे. त्यानुसार मोटार व्हेईकल अॅक्ट 209 प्रमाणे नोटीस दिलेली आहे व भा.द.वी.स.कलम 279, 306, 337, 338 प्रमाणे सदर चालकाविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे. प्रस्तुत पंचनामामध्ये वर नमुद बाबीं व अपघाताच्या ठिकाणाची नोंद आहे. दाखल तपास टिप्पण व जबाब व पोलीस पेपर्सवरुन जीप चालकाच्या चुकीमुळे प्रस्तुतचा अपघात होऊंन त्यामध्ये तक्रारदाराचे पती जखमी झालेबाबत दिसून येते. तक्रारदाराचे पतीस सदर अपघातामुळे उपचारासाठी सी.पी.आर.हॉस्पिटल येथे दाखल केले होते. त्यास डिस्चार्ज करणेत आले होते. पुन्हा औषधोचारासाठी दि.27/8/2005रोजी 19.30 वाजता आणले असता औषधोपचारापूर्वी मयत झालेमुळे अपघातात मृत्यू पावलेबाबत पोलीसांनी रिपोर्ट केलेचे दिसून येते. दाखल शवविच्छेदनासाठी पाठवलेला फॉर्म सेकंड-बी नुसार अपघातादरम्यान त्याचे उपचार सुरु होते व पुन्हा उपचारासाठी आणले असता मयत झालेबाबत व तसेच मरणोत्तर पंचनाम्यामध्ये मयतास अपघातात जखमा झालेचे नमुद केलेचे दिसून येते. मृत्यूच्या कारणामध्ये व शवविच्छेदन अहवालामध्ये Septicaemia c¯ broncho Puemaniec¯ Cerebral Oedema या कारणास्तव मृत्यू पावलेला आहे. उपरोक्त विवेचन व दाखल कागदपत्रांचा विचार करता तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा नैसर्गिक नसून अपघाती आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब पॉलीसीप्रमाणे तक्रारदार या लाभार्थी असून विमा रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच तक्रारदार हे सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास क्लेमची रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख 0 फक्त) त्वरीत अदा करावेत. सदर रक्कमेवर दि.24/09/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह अदा करावी. 3) सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदारस मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावी.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |