निकालपत्र (पारीत दि. 08-09-2011) द्वारा-श्रीमती अलका उमेश पटले,सदस्या तक्रारकर्ता श्री. ताजेंद्रसिंग इंदरसिंग छाबडा यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,...... 1 तक्रारकर्ता श्री. ताजेंद्रसिंग छाबडा यांनी वर्ष 2006 मध्ये महिन्द्रा अन्ड महिन्द्रा स्कॉरपिओ टर्बो कार खरेदी केली. त्याचे आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन नं. एम.एच.15/बी.एन-3483 असे आहे व त्यांनी सदर गाडीचे वि.प. आय.सी.आय.सी.आय.जनरल इन्श्युरन्स तर्फे विमा काढलेला आहे. त्यांचा पॉलिसी नं. 3001/51713841/01/BOO असे आहे व पॉलिसीची मुदत दि. 23.04.08 ते 22.04.09 पर्यंत आहे. दि. 29.10.08 ला गाडी राजनगांव वरुन गोंदियाला येत असतांना गाडी मध्ये अचानक सॉट सर्किटमुळे गाडीच्या आत मधल्या वायरिंग जळाल्या तसेच गाडीचे काही पार्टस पण खराब झाले आहे. तक्रारकर्ता यांनी वि.प.कडून गाडीच्या दुरुस्तीसाठी लागलेली रक्कम व नुकसान भरपाईची रक्कम मिळावी म्हणून सदर तक्रार दाखल केली आहे. 2 तक्रारकर्ता मागणी करतात की, वि.प. तर्फै रक्कम रु.91,439/- 9% व्याजासह मिळावी तसेच वि.प.यांनी शारीरिक, मानसिक त्रासासाठी रु.10,000/- व न्यायालयीन खर्च म्हणून रु.5000/- द्यावे. 3 वि.प. यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे की, सदर गाडीला महिन्द्रा कंपनीचा सर्वेअरनी सर्वे केल्यानंतर उन्नती मोटर्स नागपूर येथून इस्टीमेट(खर्चाची यादी) मागविले. त्यांनी रु.2,45,560/- चे खर्च दाखविले परंतु गाडीच्या दुरुस्तीचे खरे बील रु.1,93,115/- असे झाले. कंपनीनेच नियुक्त केलेल्या सर्वेअरच्या रिपोर्टनुसार रु.91,439/- देण्याची जिम्मेदारी कंपनीची आहे. कारणे व निष्कर्ष 4. त.क. व वि.प.यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र, दस्ताऐवज व त्यांनी केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, वि.प.यांनी सदर गाडीच्या विमा दाव्याची रक्कम स्विकारलेली आहे व त्या कालावधीमध्ये झालेल्या अपघातामुळे नुकसान भरपाईची जबाबदारी वि.प. यांची आहे. तक्रारकर्ता यांनी गाडी दुरुस्तीसाठी लागलेल्या खर्चाची संपूर्ण रक्कम दिली आहे. वि.प. यांनी दि. 11/02/2010 ला ई मेल द्वारा नियुक्त सर्वेअरच्या रिपोर्टनुसार उन्नती मोटर्सला सूचना देवून तक्रारकर्ता यांनी काढलेल्या विमा पॉलिसीचे प्रकारानुसार त्यांना रु.91,439/- देण्याची जबाबदारी कंपनीची आहे अशी सहमती दर्शविलेली आहे. परंतु अद्याप पर्यंत ती रक्कम देण्यात आलेली नाही म्हणून वि.प.यांनी तक्रारकर्ताला रक्कम रु.91439/- 9%व्याजासह द्यावे असे मंचाचे मत आहे. असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारीत करण्यात येत आहे. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रु.91,439/- दि. 11/02/2010 पासून रक्कम प्राप्त होईपर्यंत 9 व्याजासह द्यावे. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक, मानसिक त्रासासाठी म्हणून रु.3000/- व न्यायालयीन खर्च म्हणून रु.2000/- द्यावे. 2. वरील आदेशाचे पालन वि.प. यांनी आदेश पारीत झाल्यापासून एक महिन्याच्या आत करावे. (सौ.अलका उमेश पटेल) (श्रीमती प्रतिभा बाळकृष्ण पोटदुखे) सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गोंदिया
| [HONORABLE Smt. Patel] Member[HONORABLE Smt. Potdukhe] PRESIDENT | |