तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांच्याविरूध्द शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत पतीच्या निधनाबद्दल रू. 1,00,000/- विम्याचे पैसे मिळण्याकरिता तक्रार क्रमांक 24/2013 दाखल केली होती.
तक्रारकर्तीचे पती धनीराम पुना मटाले हे दिनांक 26/09/2005 रोजी एका टिप्पर ट्रकवर हमाल म्हणून जात असतांना सदर टिप्पर ट्रक पलटल्यामुळे जखमी होऊन त्याच दिवशी मरण पावले.
विरूध्द पक्ष यांनी सदर तक्रारीमध्ये हजर होऊन आपले लेखी उत्तर दाखल केले.
तक्रारकर्ती तसेच विरूध्द पक्ष 1 ते 3 यांनी आज दिनांक 24/02/2014 रोजी तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष यांच्यामध्ये मंचाबाहेर आपसी तडजोड झाल्याबद्दल आदेश पारित करण्याकरिता अर्ज दाखल केला. सदरहू अर्जामध्ये विरूध्द पक्ष 1 व 3 यांनी तक्रारकर्तीस शेतकरी अपघात विम्याचे रू. 1,00,000/- देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. तसेच विरूध्द पक्ष 1 व 3 यांनी तक्रारकर्तीस तक्रार खर्चाबद्दल रू. 10,000/- देण्यास तयार आहे असेही म्हटले आहे.
विरूध्द पक्ष्ा 2 तक्रारकर्तीस रू. 1,10,000/- देत आहे तेव्हा तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष 1 ते 3 चे विरूध्द विमा दाव्यावरील कुठलीही व्याजाची व इतर मागण्यांचा हक्क सोडून देत आहे व यापुढेही कुठलाही हक्क राहणार नाही असेही सदरहू अर्जात म्हटले आहे.
आज दिनांक 24/02/2014 रोजी विद्यमान मंचासमक्ष तक्रारकर्ती स्वतः हजर आहे. तक्रारकर्तीचे वकील तसेच विरूध्द पक्ष 1 व 3 चे वकील सुध्दा हजर आहेत. सदरहू अर्जावर तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष यांच्या वकिलांच्या स्वाक्ष-या आहेत. त्यामुळे सदरहू केस अर्ज मंजूर करून खालीलप्रमाणे निकाली काढण्यात येत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. विरूध्द पक्ष 1 ते 3 यांनी तक्रारकर्तीला शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे रू. 1,00,000/- द्यावे.
2. विरूध्द पक्ष 1 ते 3 यांनी तक्रारकर्तीला तक्रारीच्या खर्चापोटी रू. 10,000/- द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 ते 3 यांनी वरील संपूर्ण रक्कम आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसांचे आंत तक्रारकर्तीला द्यावी.