तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांच्याविरूध्द शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत पतीच्या निधनाबद्दल रू. 1,00,000/- विम्याचे पैसे मिळण्याकरिता तक्रार क्रमांक 23/2013 दाखल केली होती.
तक्रारकर्तीचे पती धनराज तुकाराम चुटे हे दिनांक 11/08/2005 रोजी नदीवर आंघोळीकरिता गेले असता वाघ नदीत बुडून मरण पावले.
विरूध्द पक्ष यांनी सदर तक्रारीमध्ये हजर होऊन आपले लेखी उत्तर दाखल केले.
तक्रारकर्ती तसेच विरूध्द पक्ष 1 ते 3 यांनी आज दिनांक 24/02/2014 रोजी तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष यांच्यामध्ये मंचाबाहेर आपसी तडजोड झाल्याबद्दल आदेश पारित करण्याकरिता अर्ज दाखल केला. सदरहू अर्जामध्ये विरूध्द पक्ष 1 व 3 यांनी तक्रारकर्तीस शेतकरी अपघात विम्याचे रू. 1,00,000/- देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. तसेच विरूध्द पक्ष 1 व 3 यांनी तक्रारकर्तीस तक्रार खर्चाबद्दल रू. 10,000/- देण्यास तयार आहे असेही म्हटले आहे.
विरूध्द पक्ष्ा 2 तक्रारकर्तीस रू. 1,10,000/- देत आहे तेव्हा तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष 1 ते 3 चे विरूध्द विमा दाव्यावरील कुठलीही व्याजाची व इतर मागण्यांचा हक्क सोडून देत आहे व यापुढेही कुठलाही हक्क राहणार नाही असेही सदरहू अर्जात म्हटले आहे.
आज दिनांक 24/02/2014 रोजी विद्यमान मंचासमक्ष तक्रारकर्ती स्वतः हजर आहे. तक्रारकर्तीचे वकील तसेच विरूध्द पक्ष 1 व 3 चे वकील सुध्दा हजर आहेत. सदरहू अर्जावर तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष यांच्या वकिलांच्या स्वाक्ष-या आहेत. त्यामुळे सदरहू केस अर्ज मंजूर करून खालीलप्रमाणे निकाली काढण्यात येत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. विरूध्द पक्ष 1 ते 3 यांनी तक्रारकर्तीला शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे रू. 1,00,000/- द्यावे.
2. विरूध्द पक्ष 1 ते 3 यांनी तक्रारकर्तीला तक्रारीच्या खर्चापोटी रू. 10,000/- द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 ते 3 यांनी वरील संपूर्ण रक्कम आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसांचे आंत तक्रारकर्तीला द्यावी.