तक्रारदार : वकील श्री.महेश सहस्त्रबुध्देमार्फत हजर. सामनेवाले : वकील श्री.मन्नाडियार मार्फत हजर. -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाले बँकेकडून तक्रारदारांनी क्रेडीट कार्डची सुविधा प्राप्त करुन घेतली होती व क्रेडीट कार्डची मर्यादा रुपये 25,000/- होती. तक्रारदारांना ऑगस्ट, 2007 चे क्रेडीट कार्डचे विवरणपत्र सा.वाले यांचेकडून प्राप्त झाले व त्यामध्ये क्रेडीट कार्डची देय रक्कम रु.62,125.94 अशी नमुद केली होती. 2. तक्रारदारांचे तक्रारीप्रमाणे त्या विवरणपत्रामध्ये दर्शविलेले काही व्यवहार तक्रारदारांनी केलेले नव्हते. त्याच प्रमाणे क्रेडीट कार्ड वापराची मर्यादा रु.25,000/- असतांना तक्रारदार हे त्यापेक्षा जास्त रक्कमेचा व्यवहार क्रेडीट कार्ड मधुन करु शकतील अशी शक्यता नाही असेही तक्रारदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी दिनांक 4.8.2007 रोजी प्राप्त झालेल्या विवरण पत्रापैकी केवळ रु.15,900/- व्यवहार म्हणजे दागिन्यांची खरेदी मान्य केली. परंतु इतर सर्व व्यवहार नाकारले. या प्रमाणे तक्रारदारांचे तक्रारेीत असे कथन आहे की, सा.वाले यांनी तक्रारदारांच्या क्रेडीट कार्डवर अनाधिकाराने खोटे व्यवहार दाखवून येणे रक्कम जास्तीची व फुगवून दाखविली ज्यामुळे तक्रारदारांना मानसीक त्रास व कुचंबणा झाली. तक्रारदारांनी प्रस्तुतचे तक्रारीमध्ये तसे जाहीर करुन मिळावे. तसेच तक्रारदारांच्या क्रेडीट कार्डचे विवरणपत्र दुरुस्त करुन द्यावे असे सा.वाले यांचे विरुध्द निर्देश मागीतले व त्या व्यतिरिक्त नुकसान भ्ंरपाई रुपये 3 लाखाची मागणी केली. 3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये तक्रारदारांचे सर्व आरोप नाकारले. परंतु तक्रारदारांना क्रेडीट कार्डची सुविधा दिली होती व व्यवहाराची मर्यादा उधारीवर रु.25,000/- व नगद व्यवहाराकरीता रु.5,000/- होती असेही नमुद केले आहे. सा.वाले यांचे असे कथन आहे की, तक्रारदार हे क्रेडीट कार्डमध्ये नेहमीच देणेबाकी ठेवत असत. व त्यानंतर सा.वाले यांना चेक देवून ती मर्यादा ब-याचवेळा वाढवून घेतली. व त्यानंतर तक्रारदारांनी दिलेले चेक नामंजूर झाले. या प्रमाणे तक्रारदारांनी क्रेडीट कार्डचे संदर्भात सा.वाले यांना देय रक्कम अदा करण्याचे टाळून क्रेडीट कार्डचा वापर करत आले व त्यानंतर देणे बाकी रक्कमेचा आकडा बराच मोठा झाल्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. सा.वाले यांच्या कथना प्रमाणे तक्रारदारांची तक्रार खोटी असून प्रस्तुतचे मंचाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. 4. दोन्ही बाजुंनी पुरावे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली. 5. प्रस्तुतचे मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्र, कागदपत्र, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. दोन्ही बाजुंच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यानुसार तक्रारीचे निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी तक्रारदारांच्या क्रेडीट कार्ड खात्यामध्ये बराच व्यवहार अनाधिकाराने नोंदवून क्रेडीट खात्यामधील देय रक्कम फुगवून दाखविली व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. | 2 | तक्रारदार सा.वाले यांचे विरुध्द निर्देश तसेच नुकसान भरपाईची मागणी करुन वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | नाही. | 3 | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 6. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, तक्रारदारांनी जुलै, 2007 या महिन्याचे क्रेडीट कार्डचे विवरणपत्र प्राप्त झाले नाही. व एकदम ऑगस्ट, 2007 या महिन्याचे विवरणपत्र प्राप्त झाले. व त्या विवरणपत्रामध्ये येणे बाकी रक्कम रुपये 62,125/- अशी दाखविण्यात आली होती. जी रक्कम खुपच जादा व फुगवलेली व अनाधिकाराने व्यवहार नोंदविल्यामुळे झालेली होती. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, सुरवातीला प्राप्त झालेल्या विवरणपत्रामध्ये योग्य नोंदी घेण्यात आलेल्या होत्या. परंतु ऑगस्ट, 2007 मधील विवरणपत्रातील नोंदी चुकीच्या होत्या. तक्रारदारांनी सा.वाले यांना वेळोवेळी अदा केलेल्या रक्कमांचे विवरण तक्रारीच्या परिच्छेद क्र.12 मध्ये दिलेले आहे. 7. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीचे परिच्छेद क्र.14 मध्ये तक्रारदारांकडून वेळोवेळी खाते रक्कमा अदा झाल्या नाहीत याचा तपशिल दिलेला आहे. परंतु तक्रारीच्या कलम 12 मध्ये जो तपशिल दिलेला आहे त्यास नकार दिला. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीसोबत ऑगस्ट, 2007 चे विवरणपत्र दाखल केलेले आहे. त्यातील नोंदीचे अवलोकन केले असतांना असे दिसून येते की, तक्रारदारांनी दिनांक 5.6.2007 रोजी 34,900/- येवढी रक्कम धनादेशाव्दारे सा.वाले यांना दिली. परंतु तो धनादेश वटला नसल्याने परत करण्यात आला. तसेच विवरणपत्रामधील नोंदी असे दर्शवितात की, तक्रारदारांनी फॅशन स्टुडीओ मधून रु.24,900/- ची खरेदी केली. जून, 2007 चे विवरण पत्राप्रमाणे क्रेडीट कार्डची येणी बाकी रु.20,055/- होती. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये असे नमुद केलेले आहे की, तक्रारदारांकडून येणे बाकी रक्कमेबद्दल 22 जून 2007 रोजी 1010/- अदा केले. परंतु कार्डची मर्यादा ही संपल्याचे लक्षात आल्यानंतर केवळ 24,900/- येवढया रक्कमेचा व्यवहार केला. त्यानंतर तक्रारदारांनी जुलै महीन्यामध्ये काही व्यवहार केला. ज्याची एकंदर रक्कम रुपये 24,967/- होती. परंतु दरम्यान क्रेडीट कार्डचे लिमिट संपल्याने व पूर्वीची रु.25,000/- मर्यादा संपल्याने तक्रारदारांनी रु.34,900/- चा धनादेश दिला व मर्यादा वाढवून घेतली. व दरम्यान क्रेडीट खात्यावर बराच व्यवहार केल्यानंतर तो धनादेश वटला नसल्याने तक्रारदारांना परत करण्यात आला. ज्यामुळे येणे बाकी रक्कम बरीच फुगली. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 9.6.2007 रोजी रु.69,900/- चा धनादेश दिला व तक्रारदारांच्या क्रेडीट कार्डची शिल्लक असे दर्शविते की, तो धनादेश न वटता परत करण्यात आला. 8. सा.वाले यांच्या कैफीयतीसोबत दाखल केलेली विवरणपत्रे व सा.वाले यांचा लेखी युक्तीवाद मधील कथन असे दर्शवितात की, तक्रारदार सा.वाले यांचे क्रेडीट कार्डची मर्यादा संपत असतांना धनादेश देवून मर्यादा वाढवून घेत असत. व त्यानंतर क्रेडीट कार्डचा व्यवहार करीत असत. व खात्यात शिल्लक नसल्याने तो धनादेश वटला जात नव्हता. परंतु दरम्यान तक्रारदार क्रेडीट कार्डवर व्यवहार करीत असल्याने बाकी रक्कम फुगत राहीली. तक्रारदारांनी जो धनादेश दिला किंवा जी रक्कम अदा केली आहे तो देखील संपूर्ण रक्कमेचा नव्हता, तर विषम संखेचा होता. हे सर्व असे दर्शविते की, तक्रारदारांनी आपल्या क्रेडीट खात्यातील येणे रक्कम बरीच फुगवली व क्रेडीट खात्याची मर्यादा ओलांडली. तरी देखील तक्रारदारांनी काही वेळा धनादेश देवून ती मर्यादा वाढवून घेतली. व नंतर क्रेडीट कार्डवर उधारीचे व्यवहार केले. व तक्रारदारांनी दिलेले धनादेश परत झाल्याने देय रक्कम वाढत राहीली. तक्रारदारांची एकंदर व्यवहार करण्याची पध्दत बघता तक्रारदारांची तक्रार प्रामाणीकपणाची आहे असे दिसून येत नाही. तक्रारदारांच्या तक्रारीतील विशिष्ट व्यवहार खोटा व अनाधिकाराचा आहे ही बाब तक्रारदार सिध्द करु शकत नाही. या प्रमाणे ऑगस्ट, 2007 चे विवरण पत्रामध्ये येणे बाकी रक्कम रु.62,125/- ही सा.वाले यांनी युकीने दाखविली होती हे तक्रारदारांचे कथन स्विकारता येत नाही. 9. वरील निष्कर्षावरुन तक्रारदार आपल्या क्रेडीट कार्ड खात्यातील व्यवहार सिध्द करु शकले नसल्याने तक्रारदार प्रस्तुतचे मंचाकडून कुठलीही दाद मिळण्यास पात्र नाहीत. 10. वरील चर्चेवरुन व निष्कर्षानुरुप पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 278/2008 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबाबत काही आदेश नाही. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |