Maharashtra

Aurangabad

CC/11/84

Dr. Yaswant S/o Bhalchandra Kulkarni - Complainant(s)

Versus

I.C.I.C. I, Bank ltd - Opp.Party(s)

Adv- M.M.Adwant

28 Feb 2011

ORDER


DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM AURANGABAD - 431001 2nd FLOOR , COLLECTOR OFFICE BUILDING , AURANGABAD - 431001
Complaint Case No. CC/11/84
1. Dr. Yaswant S/o Bhalchandra KulkarniR/i Bhalchandra Hospital Mainroad,Ambad, Tq.Ambad,Dist JalnaJalnaMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. I.C.I.C. I, Bank ltdBranch Manager,Ground Floor,Raguvir Complex,Adalat Road,AurangabadAurangabadMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
Shri.D.S.Deshmukh ,PRESIDENT Smt.Rekha Kapadiya ,MEMBER Smt.Jyoti H.Patki ,MEMBER
PRESENT :Adv- M.M.Adwant, Advocate for Complainant

Dated : 28 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकाल
              (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्‍यक्ष)
 
         तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून बेबाकी प्रमाणपत्र मिळावे यासाठी ही तक्रार दाखल केली आहे.
         तक्रारदाराचे म्‍हणणे असे आहे की, त्‍याने गैरअर्जदार आयसीआयसीआय बँकेकडून वर्ष 2002 मध्‍ये कर्ज घेतले होते आणि त्‍याने संपूर्ण कर्जाची परतफेड दिनांक 8/1/2005 रोजी केली. त्‍यानंतर त्‍याने जुलै 2010 मध्‍ये गैरअर्जदाराकडे बेबाकी प्रमाणपत्राची मागणी केली. परंतु गैरअर्जदाराने 1 ऑगस्‍ट 2010 रोजी त्‍यास कळविले की, त्‍यांना घरपोच एनओसी दिली जाईल. परंतु गैरअर्जदाराने नाहरकत प्रमाणपत्र दिले नाही म्‍हणून त्‍याने पुन्‍हा गैरअर्जदाराकडे संपर्क साधला असता दिनांक 21/8/2010 रोजी गैरअर्जदाराने त्‍यास कोटक महिंद्राकडे त्‍याचे कर्ज खाते हस्‍तांतरीत केल्‍यामुळे कोटक महिंद्रा यांच्‍याकडूनच एनओसी घेण्‍यास सांगितले. त्‍याने कर्जफेडीचा शेवटचा हप्‍ता एप्रिल 2005 मध्‍ये भरल्‍यानंतरही गैरअर्जदाराने त्‍यास एनओसी दिली नाही म्‍हणून तक्रारदाराने त्‍यास गैरअर्जदाराकडून एनओसी आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या अर्जाद्वारे केली आहे.
         तक्रारदाराची तक्रार पाहता प्रस्‍तुत तक्रार मुदतीमध्‍ये आहे काय? असा मुद्दा उपस्थित झालेला आहे. 
 
         तक्रारदाराच्‍या वतीने युक्‍तीवाद करण्‍यात आला. तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार गैरअर्जदाराने ऑगस्‍ट 2010 मध्‍ये ई मेलद्वारे 11 ऑगस्‍ट 2010 पर्यंत एनओसी देण्‍याचे कबूल केले होते म्‍हणून तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे.
         तक्रारदाराच्‍या वतीने करण्‍यात आलेला खुलासा योग्‍य नाही. तक्रारदाराने दिनांक 8/1/2005 रोजी गैरअर्जदाराच्‍या संपूर्ण कर्जाची परतफेड केलेली आहे त्‍यामुळे तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून एनओसी न मिळाल्‍यामुळे ही तक्रार दिनांक 8/1/2007 पूर्वीच दाखल करणे आवश्‍यक होते. परंतु त्‍याने ही तक्रार अत्‍यंत विलंबाने दाखल केलेली आहे. केवळ गैरअर्जदाराने 1 ऑगस्‍ट 2010 रोजी तक्रारदाराच्‍या मागणीला प्रतिसाद म्‍हणून दिनांक 11 ऑगस्‍ट 2010 रोजीपर्यंत बेबाकी प्रमाणपत्र देण्‍याचे सांगितल्‍यामुळे तक्रारदाराला पुन्‍हा तक्रार दाखल करण्‍याचे कारण नव्‍याने घडले असे म्‍हणता येणार नाही. तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्‍याचे कारण दिनांक 8/1/2005 रोजीच घडलेले असून ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 24-अ नुसार तक्रारदाराने ही तक्रार दोन वर्षाच्‍या आत दाखल करणे आवश्‍यक होते परंतु ही तक्रार तक्रारदाराने अत्‍यंत विलंबाने दाखल केलेली आहे म्‍हणून तक्रारदाराची तक्रर मुदतबाहय असल्‍यामुळे दाखल करुन न घेता फेटाळण्‍यात येते.  
 
 
 
 (श्रीमती ज्‍योती पत्‍की)     (श्रीमती रेखा कापडिया)       (श्री डी.एस. देशमुख) 
          सदस्‍य                   सदस्‍य                   अध्‍यक्ष
UNK

[ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER