Maharashtra

Dhule

CC/12/62

kishor nagraj badgujar fagne - Complainant(s)

Versus

I C I C I Lombard janral Insuransha co LTd dhule - Opp.Party(s)

R R Kucarey

18 Nov 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/12/62
 
1. kishor nagraj badgujar fagne
At Post fagne taluka Disst Dhule
dhule
Maharstrha
...........Complainant(s)
Versus
1. I C I C I Lombard janral Insuransha co LTd dhule
no 8/2flor Kakriy Tavar dhule
Dhule
Maharstha
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 HON'ABLE MR. S.S. Joshi MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.


 

 


 

                                 ग्राहक तक्रार क्रमांक    –   ६२/२०१२


 

                                 तक्रार दाखल दिनांक  – २७/०३/२०१२


 

                                तक्रार निकाली दिनांक  – १८/११/२०१३


 

 


 

श्री. किशोर नागराज बडगुजर


 

वय – ३२ वर्षे, व्‍यवसाय – व्‍यापार


 

रा. फागणे, ता.जि. धुळे.                            ------------- तक्रारदार              


 

 


 

        विरुध्‍द


 

 


 

आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्‍शुरन्‍स कंपनी लि.


 

(नोटीसीची बजावणी मा. मॅनेजर,


 

यांचवेर करणेत यावी)


 

पत्‍ता – ऑफिस नं.७, दुसरा मजला


 

कांकरिया टॉवर सि.हॉ. समोर, धुळे.                 ------------ सामनेवाला


 

न्‍यायासन  


 

 (मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

(मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

 (मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)


 

उपस्थिती


 

 (तक्रारदारा तर्फे – वकील श्री.आर.आर. कुचेरिया)


 

 (सामनेवाला तर्फे – वकील श्री.डी.एन. पिंगळे)


 

निकालपत्र


 


(दवाराः मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

      


 

     सामनेवाला आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्‍शुरन्‍स कंपनी ने तक्रारदार यांनी दाखल केलेला विमा दावा चुकीचे कारण देवून नाकारल्‍यामुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली आहे.


 

 


 

१.    तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, त्‍यांच्‍या मालकीचे वाहन


 

४०७ एमए.-१८/अेअे-२२१०, चेसीस नं.०२१४७, इंजीन नं.६०१५१५ चा विमा सामनेवाला आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्‍शुरन्‍स कंपनी यांचेकडुन घेतलेला आहे. त्‍याचा पॉलीसी नं.३००१/५९१८५४५५/०१/००० असा असून तिचा कालावधी दि.०८/०४/२०११ ते ०७/०४/२०१२ असून वाहनाचा आय.डी.ए. व्‍हॅल्‍यू रू.४,१६,०००/- आहे. त्‍याचा प्रिमियम रू.१३,९११/- आहे. दि.२५/१०/२०११ रोजी दुपारी २.०० वाजेचे सुमारास सदर गाडीचे ड्रायव्‍हर साईडचे मागील टायर फुटल्‍याने, सदर गाडीवर चालकाचा ताबा सुटल्‍याने रोडच्‍या बाजुस उभी असलेली बोलेरो गाडी क्र.एम.एच.-०४/सीजे-३८५५ या गाडीत ड्रायव्‍हर साईडला घसून रोडच्‍या उत्‍तरेस पलटी होवून अपघात झाला. त्‍यात वाहनाचे सुमारे रू.२,००,०००/- चे नुकसान झाले.


 

 


 

२.   तक्रारदार यांचे पुढे असे म्‍हणणे आहे की, सदर अपघाताची माहीती सामनेवाला यांना कळविल्‍यानंतर सामनेवाला यांनी सर्व्‍हेअर कडून सर्व्‍हे करून रिपोर्ट सामनेवाला यांचेकडे सादर केला. गाडीचा विमा असल्‍याने तक्रारदारने विमा कंपनीकडे क्‍लेम फॉर्म व आवश्‍यक ती कागदपत्रे दाखल केली आहेत. परंतु विमा कंपनीने दि.२७/०१/२०१२ रोजी पत्र देवून गाडीमध्‍ये रजिस्‍टर सिटींग कॅपेसिटीपेक्षा जास्‍त लोक बसले असल्‍यामुळे क्‍लेम नामंजूर केल्‍याचे कळवले.


 

 


 

३.   तक्रारदार यांचे पुढे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांच्‍या वाहनाचे मागील टायर फुटल्‍याने सदरचा अपघात झाला असतांना व गाडीत जास्‍त लोक होते त्‍यामुळे अपघात झालेला नसतांना व सदर अपघातासंबंधी धुळे तालुका पोलीस स्‍टेशनला मो.अप.र.नं.२३१/२०११ प्रमाणे गुन्‍हा नोंद झालेला असतांना दावा नाकारला आहे व सदोष सेवा देवून अनुचित ग्राहक प्रथेचा अवलंब केलेला आहे. 


 

 


 

४.   तक्रारदार यांनी विमा कंपनीकडून रू.२,००,०००/- नुकसान भरपाई मिळावी. सदर रकमेवर क्‍लेम नाकारल्‍यापासून द.सा.द.शे. १२% प्रमाणे व्‍याज, मानसिक व शारिरिक, आर्थिक त्रासापोटी रू.५०,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे. 


 

 


 

५.   तक्रारदार यांनी आपले म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयार्थ नि.३ वर शपथपत्र, नि.४ सोबत नि.४/१ वर क्‍लेम नामंजूर केल्‍याचे पत्र, नि.४/२ योगेस पाटील यांचा जबाब, नि.४/३ वर फिर्याद, नि.४/४ वर घटनास्‍थळ पंचनामा, नि.४/५ वर विमा पॉलीसी प्रत, नि.४/६ वर वाहन परवाना प्रत, नि.४/५ वर आर.सी.बुक‍, नि.४/८ ते नि.४/१९ वर वाहन दुरूस्‍ती बीले, तसेच वरिष्‍ठ कोर्टाचा न्‍यायनिवाडा, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.


 

 


 

६.   सामनेवाला यांनी आपले लेखी म्‍हणणे नि.७ वर दाखल केलेले आहे. त्‍यात त्‍यांनी तक्रारदारने दाखल केलेली तक्रार खोटी, अयोग्‍य व बेकायदेशीर असल्‍याने खर्चासह बरखास्‍त करावी. या जबाबात नाकारलेल्‍या मुद्दयांसंबंधी पुरावा सादर करावेत, असे नमूद केले आहे.


 

 


 

७.   विमा कंपनीचे पुढे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदारने सदरच्‍या वाहनाची पॉलिसी ही गुडस् कॅरींग पॅकेज पॉलिसी घेतली असून तीची सिंटींग कॅप्‍येसिटी ड्रायव्‍हरसह तीन आहे. अपघातसमयी फिर्यादी प्रमाणे आर.टी.ओ. परमिटचे उल्‍लंघन करून दहा मजुरांची वाहतूक करतांना मिळून आला म्‍हणून ड्रायव्‍हर विरूध्‍द भा.द.वि. कलम २७९,३३७,३३८,४२७ व मो.व्‍हे.का. कलम १८४,६६/१९२ प्रमाणे फिर्याद दाखल आहे. सदरच्‍या फिर्यादी प्रमाणे दहा मजूर घेवून जात असतांना टायर फुटून वाहन पलटी झाले आहे. जास्‍त लोक बसल्‍यामुळे वाहन कंट्रोल न करता आल्‍यामुळे वाहन पलटी झाले आहे. त्‍यामुळे पॉलीसीच्‍या अटी व शर्तीचा भंग झालेला आहे. त्‍यामुळे नुकसानभरपाई देण्‍याची जबाबदारी येत नाही. 


 

 


 

     या सर्व बाबींवरून सामनेवाला यांनी सेवा देण्‍यास कसूर केलेला नाही हे स्‍पष्‍ट होते. दावा प्रक्रियामध्‍ये विम्‍याचे अटी व शर्ती बघून कार्यवाही करणे हा सेवेमधील कसूर असू शकत नाही. म्‍हणून सदरील तक्रार रद्द करण्‍यात यावी.


 

 


 

८.   विमा कंपनीने आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयार्थ नि.८ वर शपथपत्र, तसेच नि.१० सोबत नि.१०/१ वर सर्व्‍हे रिपोर्ट व नि.१०/२ वर क्‍लेम ऑब्‍झरवेशन शीट, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.


 

 


 

 


 

९.   तक्रारदार यांची तक्रार, विमा कंपनीचा खुलासा व वकीलांचा युक्तिवाद ऐकल्‍यानंतर, तसेच दाखल कागदपत्रे पाहता आमच्‍या समोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.


 

 


 

          मुद्दे                                      निष्‍कर्ष


 

१.     सामनेवाला यांनी तक्रारदार यांना


 

दयावयाच्‍या सेवेत त्रृटी केली आहे काय ?             होय  


 

२.     तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्‍यास


 

पात्र आहे ?                                अंतिम आदेशाप्रमाणे 


 

३.     आदेश काय ?                                   खालीलप्रमाणे


 

विवेचन



 

१०. मुद्दा क्र.१-  तक्रारदार यांच्‍या वाहन ४०७ एमए.-१८/अेअे-२२१० चा विमा वैध होता व तक्रारदारचा विमा दावा कंपनीने दि.२७/०१/२०१२ च्‍या पत्रान्‍वये नाकारला आहे. तक्रारदारच्‍या म्‍हणण्‍यानुसार विमा कंपनीने त्‍यांचा कायदेशीर विमा दावा चुकीचे व अयोग्‍य कारण देवून नाकारला आहे. तर विमा कंपनीने विम्‍याचे अटी व शर्ती बघून कार्यवाही केलेली आहे असे म्‍हटले आहे.


 

 


 

११. तक्रारदार व विमा कंपनी यांचे म्‍हणणे पाहता विमा कंपनीचे दि.२७/०१/२०१२ चे पत्रातील कारण पाहणे आवश्‍यक ठरते. विमा कंपनीने सदर पत्रात खालीलप्रमाणे कारण दिलेले आहे.


 

 


 

    We have persued the documents submitted by you and regret to inform you that your claim cannot be settled for the following reason/s.


 

 


 

        At the time of loss your vehicle was carrying more than the registered seating capacity in the vehicle, this is violation of policy “limitations to use”.


 

 


 

१२. सदर पत्रातील मजकूर पाहता सदर विमाकृत वाहन ४०७ मध्‍ये प्रवासी बसले होते याचा अपघात होण्‍याशी कुठेही संबंध येत नाही असे दिसून येते. तसेच सदर वाहनाच्‍या ड्रायव्‍हर साईडकडिल मागील चाकात टायर फुटल्‍याने ड्रायव्‍हर याचा गाडीवरील ताबा सुटल्‍याने बोलेरो गाडीच्‍या ड्रायव्‍हर साईडला घसारा मारत ४०७ गाडी ही रोडच्‍या उत्‍तरेस पलटी झाल्‍याने सदरचा अपघात झाल्‍याचे पोलिस पेपर्स वरून स्‍पष्‍ट होत आहे. यावरून विमा कंपनीने केवळ गाडीत जादा प्रवासी होते हे तांत्रीक कारण देवून विमा दावा नाकारल्‍याचे दिसून येते. मा.राष्‍ट्रीय आयोग व सन्‍माननीय सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी अनेक न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये विमा कंपन्‍यांनी तांत्रिक कारणावरून विमा दावे नाकारू नयेत असे म्‍हटले आहे.


 

 


 

१३. या संदर्भात आम्‍ही B.V. Nagaraju V/s M/s. Oriental Insurance Co. Ltd. Divisional office Hassan 1996(2) T.A. C.429(S.C.)  या वरीष्‍ठ कोर्टाच्‍या न्‍यायनिवाडयाचा आधार घेत आहोत. सदर न्‍यायनिवाडयात पुढीलप्रमाणे तत्‍व विषद आहे. 


 

 


 

     Liability of Insurer for damages - Damage caused to Goods vehicle as a result of accident – Goods vehicle carrying humans more than the number permitted in terms of Insurance Policy – Breach of Contract – whether alleged breach of carrying humans in a Goods vehicle more than the number permitted in terms of the Policy is so fundamental a breach to afford ground to the insurer to cschew liability altogether - Held – No – Contract term provided in policy interpreted – Misuse of vehicle some what irregular though,  but not so fundamental in nature so as to put an end to the contract – Insurer liable for the damages caused.   


 

 


 

१४. मा. राष्‍ट्रीय आयोग, न्‍यु दिल्‍ली यांच्‍या खालील न्‍यायनिवाडयांतही पुढील प्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.


 

 


 

(1)  II 2006 CPJ 17 (NCDRC) National Insurance Co.Ltd.   V/s. Hardayal Rohta.


 

(2)  II 2006 CPJ 249 (NCDRC) National Insurance Co.Ltd. V/s.Nabun Chandra Nasik.


 

(3)  I 2006 CTJ (NCDRC) B.M. Rajshekhar V/s. United India Insurance Co.Ltd.


 

 


 

            Taking extra passengers could not held cause of accident – Company not entitled to repudiate the claim or reduce compensation – Liable indemnify the damange cause to vehicle.


 

 


 

१५. तसेच मा.सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी २०१० CTJ  485 Amaindo Sahoo V/s. Oriental Insurance Co.Ltd. व National Insurance Co.Ltd. V/s. Nitin Khandelwal 2008 CTJ 680 या न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये विमा कंपन्‍यांनी तांत्रिक कारणे देवून विमा दावे नाकारू नयेत असे मत व्‍यक्‍त केलेले आहे.


 

 


 

१६. वरील न्‍यायनिवाडयातील तत्‍वे पाहता तक्रारदार यांचा विमा दावा विमा कंपनीने अयोग्‍य व चुकीचे कारण देवून नाकारला आहे या मतास आम्‍ही आलो आहोत. म्‍हणून मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.


 

 


 

१७. मुद्दा क्र.२- तक्रारदार यांनी विमा कंपनीकडून नुकसानभरपाई रू.२,००,०००/- मिळावी. सदर रकमेवर द.सा.द.शे. १२% प्रमाणे क्‍लेम नाकारल्‍या तारखेपासून व्‍याज मिळावे. तसेच मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रू.५०,०००/- मिळावे व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. विमा कंपनीने सर्व्‍हेअर श्री.प्रफुल्‍ल शाह यांचा सर्व्‍हे रिपोर्ट दाखल केला आहे. सदर अहवाल तज्ञाचा असल्‍यामुळे रिपोर्टमध्‍ये दर्शवलेली रक्‍कम रू.६५,९२५/- मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर विमा दावा नाकारल्‍याचा दि.२७/०१/२०१२ पासून द.सा.द.शे. ९% दराने व्‍याज मिळण्‍यासही तक्रारदार पात्र आहेत. तसेच मानसिक त्रासापोटी रू.३०००/- व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रू.२०००/- मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहेत.


 

 


 

 


 

   १८.     मुद्दा क्र.३- वरील सर्व विवेचनावरून आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.       


 

 


 

 


 

 


 

आ दे श


 

 


 

१.          तक्रारदार यांची तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

२.          सामनेवाला आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्‍शुरन्‍स कंपनी लि.


 

यांनी तक्रारदारास रक्‍कम रू.६५,९२५/- व त्‍यावर दि.२७/०१/२०१२ पासून द.सा.द.शे.९% दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून ३० दिवसाच्‍या आत दयावे.


 

 


 

 ३. सामनेवाला आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्‍शुरन्‍स कंपनी लि. यांनी मानसिक त्रासापोटी रू.३०००/- व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रू.२०००/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून ३० दिवसाच्‍या आत दयावेत.


 

 


 

धुळे.


 

दि.१८/११/२०१३.


 

     


 

        (श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

              सदस्‍य          सदस्‍या          अध्‍यक्षा


 

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER
 
[HON'ABLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.