Maharashtra

Thane

CC/08/272

Ashok Bhimsingh Patil - Complainant(s)

Versus

I C I C I Bank - Opp.Party(s)

06 Sep 2008

ORDER


CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE
CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE DISTRICT THANE Room No.214, 2nd Floor, Collector office
consumer case(CC) No. CC/08/272

Ashok Bhimsingh Patil
...........Appellant(s)

Vs.

I C I C I Bank
...........Respondent(s)


BEFORE:


Complainant(s)/Appellant(s):
1. Ashok Bhimsingh Patil

OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):




ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

ग्राहक तक्रार क्रमांकः-272/2008

तक्रार दाखल दिनांकः-29/05/2008

निकाल तारीखः-06/09/2008

कालावधीः-00वर्ष03महिने07दिवस

समक्ष जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे

श्री.अशोक भिमसिंग पाटील

/ 26,जयजलाराम खारकरआळी

ठाणे ()400 601 ...तक्रारकर्ता

विरुध्‍द

आय.सी.आय.सी.आय.बँक

पामकोर्ट,राममारुती रोड,

ठाणे ()400 601 ...वि..(एकतर्फा)



 

उपस्थितीः- तक्रारकर्ताः-स्‍वतः हजर

विरुध्‍दपक्षः-गैरहजर (एकतर्फा)

 

गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्‍यक्षा

2.श्री.पी.एन.शिरसाट, मा.सदस्‍य

एकतर्फा-आदेश

(पारित दिनांक-06/09/2008)

श्री.पी.एन.शिरसाट, मा.सदस्‍य यांचेद्वारे आदेशः-

तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सदर तक्रार दिनांक 29/05/2008 रोजी दाखल केली आहे त्‍याचे थोडक्‍यात कथन पुढील प्रमाणेः-

2/-

1.तक्रारकर्त्‍याने आय.सी.आय.सी.आय.बँकेमध्‍ये बँक खाते उघडले त्‍या खात्‍याचा नंबर 003501010688 असुन त्‍या खात्‍यामध्‍ये रुपये 3,000/- बँकेमधून दोन वेळा काढले असे बँकेकडून मिळालेल्‍या विवरणपत्रामध्‍ये नमुद केले आहे. वस्‍तुतः तक्रारकर्त्‍याने फक्‍त एकदाच रुपये 3,000/-(.टी.एम.)मधून काढले व विवरणपत्रावर ते 2 वेळा दाखविले. त्‍यामुळे त्‍यांनी वरील बँक आणि बँकींग लोकपाल व माहितीच्‍याआधारे बराच वेळा पत्र व्‍यवहार केला व रुपये 3,000/- पुन्‍हा कापू नयेत यासाठी विनंती केली. परंतु बँकेने योग्‍य ती कार्यवाही न केल्‍यामुळे सेवा देण्‍यास त्रुटी / दिरंगाई केली. त्‍यामुळे तक्रारदाराचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले व ते भरुन मिळण्‍यासाठी सदरहू तक्रार दाखल केली व त्‍यामध्‍ये त्‍यांनी 3,500/-मुदत ठेव व व्‍याज रुपये 500/- तक्रार खर्च व रुपये 1,500/- मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती केली आहे.

2.विरुध्‍द पक्षकारांना या मंचाची नोटीस मिळाली व त्‍या नोटीसीनुसार त्‍यांनी त्‍यांचे लेखी जबाब न देऊन तक्रारदाराच्‍या तक्रारीचे निरुपण किंवा निरसन न करता ते मंचासमोर हजरच राहिले नाहीत. त्‍याकारणास्‍तव त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा हुकूम सुनावण्‍यात आला. त्‍या अनुशंगाने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला नोटीस मिळाल्‍याचा पुरावा व पुरसीस दाखल केली. सदरहु तक्रारीसंबंधी खालील मुद्दे उपस्थित होतात.

)विरुध्‍द पक्षकाराने तक्रारदाराला दोषपुर्ण

सेवा दिली हे तक्रारदार सिध्‍द करु

3/-

शकले काय? उत्‍तर- नाही.

)वरील तक्रारीला मुदतीच्‍या कायद्याची बाधा

येते काय? उत्‍तर -होय.

)विरुध्‍द पक्षाच्‍या दोषपुर्ण सेवेसाठी तक्रारदार

नुकसान भरपाई मिळण्‍यास व न्‍यायीक

खर्च मिळण्‍यास पात्र ठरतात काय? उत्‍तर- नाही.

कारणमिमांसा

मुद्दा अ चे स्‍पष्‍टीकरणः- तक्रारकर्ता हा नोकरीनिमित्‍त परदेशी राहत असल्‍यामुळे त्‍याने त्‍याचे पालकाचे उदर निर्वाह चालविण्‍यासाठी वरील बँकेमध्‍ये खाते उघडुन पैसे काढण्‍याची अनुमती दिली. परंतु दिनांक 10/10/2001 रोजी रुपये 3,000/-(.टी.एम)सेबेमधून काढलेअसता तेच 3,000/- रुपये ऋणकोच्‍या खात्‍यामध्‍ये दोनवेळा दाखविले. त्‍या रकमेपैकी रुपये 3,000/- बँकेने तक्रारदाराच्‍ो खात्‍यात जमा केले व तशाप्रकारचे विवरणपत्रही तक्रारदाराला सादर केले. परंतु तक्रारदाराचे वरील उत्‍तराने समाधान न झालेमुळे त्‍यांनी साधारणपणे 27 वेळा निरनिराळया पदाधिका-याला पत्रव्‍यवहार केला उदाः आय.सी.आय.सी.आय ला पत्र, मुंबई ग्राहक पंचायत ठाणे शाखेला पत्र, बँकेचे लोकपाल यांना केलेला पत्रव्‍यवहार, माहितीच्‍या अधिकाराखाली बँकेला पत्र, राज्‍य माहिती आयोगाकडे केलेला पत्रव्‍यवहार वरील सर्व पत्रव्‍यवहाराचे अवलोकन केले असता विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराची तक्रार योग्‍य त-हेने हाताळली आहे व ती सेवेमध्‍ये त्रुटी/कमतरता ठरत नाही असे या मंचाचे मत आहे.

4/-

मुद्दा ब चे स्‍पष्‍टीकरणः- तक्रारदाराने ही तक्रार या मंचामध्‍ये दिनांक 29/05/2008 रोजी दाखल केली. परंतु सदरहु तक्रारीच्‍या परिच्‍छेद 4 मध्‍ये उल्‍लेख केला तो खालीलप्रमाणेः-

परिच्‍छेद4. तक्रार कोठे व केव्‍हा उदभवली?उत्‍तर-ठाणे दि.10/10/2001 जरी वरील तक्रार या मंचात दिनांक 29/05/2008 रोजी दाखल केली व त्‍यांनी या संबंधी बराच पत्र व्‍यवहार केला. तरी तक्रारदाराने शेवटचे पत्र जे लिहीले त्‍यावर तारीखच टाकली नाही. परंतू बँकेने ते पत्र मिळाल्‍याची तारीख दिली (पोहोचपावती)ती तारीख आहे 16/07/2003 व वेळ 1 वाजुन 05 मिनिटानी व त्‍या पत्राचे उत्‍तर बँकींग लोकपाल यांचे सम क्रमांक BOS/M&G/COMP 271/S/2003-04/1446 Dated 06/08/2003नुसार दिले. त्‍या पत्राचा उल्‍लेख तक्रारदाराच्‍या माहितीसाठी देणे आवश्‍यक आहे तो उल्‍लेख खालीलप्रमाणेः- '' Please refer to your letter dated 16th July 2003. In this connection we advise that we have already examined your complaint on the submission made by both the parties to the complaint in writing as well as in the meetinges taken by the Banking Ombudsman and advised you vide our letter No.BOS/M&G/COMP 271/S/2003-04/944 dated 26th June 2003.

No further correspondence in this regard

5/-

will be entertained by us.''

Sd/-

(Secretary)

सदरची तक्रार ही बँकींग लोकपालाने निकाली काढली आहे. त्‍यामुळे ही तक्रार या मंचात याहीमुद्यावर चालविता येणार नाही.बँकींग लोकपालाच्‍या वरील पत्रानुसार तक्रारदाराने दिनांक 10/10/‍2001 रोजी रुपये 3,000/- काढले. परंतु दोन वेळ ऋणको बाजुला दाखविले त्‍यापैकी बँकेने रुपये 3,000/-धनकोच्‍या बाजुला दाखविले ते बरोबर आहे. तसेच तक्रारदाराच्‍या खात्‍यात दाखविलेली रुपये 500/-ची ऋणको खाते दिनांक 06/05/2002 चे धनको खात्‍यात दाखविले ते दिनांक 06/06/2003 रोजी.अशा प्रकारे तक्रारदाराच्‍या तक्रारीचे निराकरण केले आहे असे विरुध्‍द पक्षकाराचे मत आहे, व विरुध्‍द पक्षकाराच्‍या मताशी हे मंच सहमत आहे.

मुद्दा क चे स्‍पष्‍टीकरणः- सदरच्‍या तक्रारीमध्‍ये विरुध्‍द पक्षाने सेवेमध्‍ये त्रुटी/दोषपुर्ण सेवा दिली असे तक्रारदार सिध्‍द करु शकले नाहीत. तसेच ही तक्रार दिनांक 29/05/2008 रोजी जरी मंचात दाखल केली. परंतू तक्रारीचे कारण उदभवले ते दिनांक 10/10/2001. तेव्‍हापासून तक्रारदाराने बराच पत्रव्‍यवहार केला व त्‍यांच्‍या पत्राला बँकींग लोकपालाने दिनांक 06/08/2003 ला उत्‍तर दिले. तेव्‍हा पासून 3 वर्ष 4 महिने 20 दिवसाचा कालावधी लोटल्‍यानंतर/गेल्‍यानंतर पुन्‍हा तक्रारदाराने आय.सी.आय.सी.आय बँकेला 26/12/2006 रोजी पत्र लिहून त्‍याच रकमेची माहिती मागविली. तसेच यासबंधी माहितीच्‍या

6/-

अधिकारान्‍वयेही बराच पत्रव्‍यवहार केला. वरील कारणाचा सखोल विचार करुन ही तक्रार मुदत बाहय असल्‍यामुळे तक्रारदार कोणताही न्‍यायीक खर्च व नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाही असे या मंचाचे मत आहे. तसेच वरील तक्रारीमध्‍ये कोणतेही तथ्‍य आणि सत्‍य आढळून न आल्‍यामुळे हे मंच खालील अंतीम आदेश करीत आहे.

आदेश

1.तक्रार क्रमांक 272/2008 ही रद्दाबातल ठ‍रविण्‍यात येत आहे.

2.खर्चाबद्दल व नुकसान भरपाईबद्दल कोणताही हुकूम नाही.

3.सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

4.तक्रारदार यांनी मा.सदस्‍य तक्रार दाखल केलेल्‍या दोन प्रती (फाईल)त्‍वरीत परत घेऊन जाव्‍यात.

दिनांकः-06/09/2008

ठिकाणः-ठाणे



 



 

(पी.एन.शिरसाट ) (सौ.शशिकला श. पाटील )

सदस्‍य अध्‍यक्षा

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे