निकालपत्र :- (दि.27/09/2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करणेवर आहे. (2) तक्रारदारांच्या तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी सामनेवाला क्र. 1 या कंपनीने उत्पादित केलेले वाहन सामनेवाला क्र. 2 हयुंदाई मोटर्स इंडिया लि. मॉडेल नं. i 20 Astha (O) रजि. नं. एम.एच. 09 3870 दि. 31/04/2010 रोजी सामनेवाला यांचेकडून खरेदी केलेले आहे. सदरचे वाहन खरेदी केलेनंतर स्पेसिफीकेशनप्रमाणे व इतर क्रिस्टल व्हाईट कलर असणा-या गाडीचा रंग नव्हता. तक्रारदारांना पुरविलेल्या स्पेसिफीकेशनप्रमाणे कलर नव्हता हे सामनेवाला यांचे निदर्शनास आणून दिले. सामनेवाला क्र. 2 यांनी त्यावर प्रोसेस करुन वाहनाचा क्रिस्टल व्हाईट कलर झालेला नाही. यामुळे सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. सबब, गाडीच्या रंगाची रक्कम रु. 45,000/-, सेवा त्रुटीमुळे झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 2000/- देण्याचा आदेश व्हावा याबाबतची तक्रार आहे. (3) प्रस्तुत तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून दि. 31/04/2010 रोजी तक्रारीत उल्लेख केलेले वाहन खरेदी केलेले आहे. खरेदी घेतेवेळेस वाहनाची डिलिव्हरी तक्रारदारांनी घेतली आहे. व त्यावेळेसच तक्रारदारांनी गाडीचा रंग पाहून खरेदी केलेली आहे. गाडी खरेदी करुन ताबा घेतल्यानंतर प्रस्तुतची तक्रार ही गाडीचा कलर स्पेसिफीकेशनप्रमाणे नाही याबाबत तक्रार आहे. परंतु तक्रारदारांचे सदर कथनास इस्टॉपेल या तत्वाचा बाधा येतो. तसेच सदरची तक्रार ही गाडीच्या उत्पादित दोष अथवा इतर दोषांबाबात नाही या बाबींचा विचार करता तक्रारदारांची तक्रार अस्विकृत करणेत यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदारांनी दाखल केलेले पूर्वाधार खालीलप्रमाणे- 1. 2004 CCJ 492, NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI HINDUSTAN MOTORS LTD. ……. APPELLANT V/S. C.D. ROY AND ANOTHER ….. RESPONDENT. 2. I (2006) CPJ 54. (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION NEW DELHI. LAXMI AUTOMOBILES …….. PETITIONER V/S. LAL KUNWR CHOUDHARY & ANR. ……. RESPONDENTS 3. IV (2005) CPJ 491 UNION TERRITORY CONSUMER DIPUTES REDRESSAL COMMISSION. CHANDIGARH RAVINDER KUMAR …….. APPELLANT V/S. MARUTI UDYOG LIMITED & ANR. ..….RESPONDENTS प्रस्तुतच्या तक्रारीस सदरचे पूर्वाधार लागू होत नाहीत. सबब, तक्रारदारांची तक्रार अस्विकृत करणेत यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश. आ दे श 1. तक्रारदारांची तक्रार अस्विकृत करणेत येते.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |