तक्रारदार तर्फे अॅड उमेश माणगांवे उपस्थित. सामनेवाला क्र.1 व 2 तर्फे अॅड ए.डी.भूमकर उपस्थित. सामनेवाला क्र.3 तर्फे अॅड बी.एस.पाटील उपस्थित. गणपूर्ती :- श्री एम.डी. देशमुख, अध्यक्ष. सौ. वर्षा एन. शिंदे,सदस्या. (निकालपत्र :- (दि.16/07/2010)(सौ.वर्षा एन.शिंदे) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 1 ते 3 हे त्यांचे वकीलांमार्फत उपस्थित राहून त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला यांनी जाहीर केलेली डिस्काऊंट ऑफर अदा न केलेने दाखल केली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार हा कोनवडे पोष्ट कुर ता.भुदरगड जि.कोल्हापूर येथील रहिवाशी असून तो स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत अकौंटन्ट म्हणून काम करतो. प्रस्तुत सामनेवाला हे हुंदाई कंपनी लि.चे डिलर आहेत. सामनेवाला क्र.3 यांनी दि.14/10/2007 च्या दैनिक पुढारीमध्ये फेस्टीवल ऑफर प्रसिध्द केली होती. सदर जाहीरातीनुसार तक्रारदार सामनेवाला क्र.3 यांना भेटले.दि.12/10/2007 रोजी सामनेवालांनी तक्रारदारास कोटेशन दिले. सदर कोटेशननुसार सँट्रो पॅसेंजर कारची किंमत रु.3,63,575/- व रजिस्ट्रेशन रोड टॅक्स रु.28,300/- इन्शुरन्स रु.11,171/- 3 वर्षासाठी वाढीव वॉरंटी किंमत 1,950/- असे एकूण रु.4,04,996/- दर्शवलेली होती. तक्रारदाराने कार बुक करुन रक्कम रु.3,87,875/- अदा केले. तक्रारदाराने दि.20/10/2007 रोजी नमुद वाहनाची डिलिव्हरी घेतली. सामनेवालांनी तक्रारदारास दिलेले इन्व्हाईस बीलवर नमुद कारची किंमत रु.3,23,178/- इतकी दर्शवली होती. तसेच रु.14,330/- डिस्काऊन्ट व निव्वळ विक्री किंमत रु.3,08,848/-(Net selling Price) अधिक 12.50 व्हॅट असे एकूण रु.3,47,454/- दर्शवलेली होती. नमुद इन्व्हाईसचे अवलोकन केले असता सामनेवाला तक्रारदारास रक्कम रु.40,421/- देय लागत होते. नमुद रक्कमेतून रजिस्ट्रेशन चार्जेस रु.25,450 + 300 + 350 = 26100 वजा जाता रु.14,321/- अशी व रु.4,000/- कार्पोरेट डिस्काऊंट असे एकूण रक्कम रु.18,321/- रक्कम सामनेवाला तक्रारदारास देय लागतात. ब) नमुद फेस्टीवल ऑफर प्रसिध्द केली त्यावेळी मोफत विमा रु.11,171/- 3 वर्षाकरिता वाढीव वॉरंटी रु.1,950/- व जादाच्या अक्सेसरीज रु.3,150/- अशी फ्री गिफ्ट ऑफर देऊन मोठया प्रमाणावर लोकांना आकर्षित केले. मात्र नमुद ऑफरप्रमाणे सामनेवालांनी ऑफर दिलेले आयटम दिलेले नाहीत. तक्रारदारास दिलेल्या कोटेशनमध्ये कारची किंमत रु.3,63,575/- तर प्रत्यक्ष इन्व्हाईसवर रक्कम रु.3,47,454/- आहे व रजिस्ट्रेशन चार्जेस व टॅक्स रु.28,300/- आहे. मात्र प्रत्यक्षात सदर रक्कम रु.25,750/- आहे. सबब वर नमुद देय रक्कम रु.18,321/- अधिक रु.2,550/- असे एकूण रु.20,870/- अधिक सदर रक्कमेवर 14 टक्के प्रमाणे व्याज तक्रारदारास परत देणेस सामनेवाला जबाबदार आहेत. अशाप्रकारे तक्रारदारने नमुद रक्कमेची व्याजासहीत रक्कम रु;21,671/- सामनेवालांकडे मागणी केली होती. मात्र सदर रक्कम देणेस सामनेवालांनी टाळाटाळ केली आहे. त्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास झालेला आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन सामनेवालांनी ऑफर केलेली डिस्काऊंट रक्कम रु.14,671/- कार्पोरेट डिस्काऊंट रु.4,000/- तक्रारीचा खर्च रु.5,000/- तसेच दि.20/10/2007 ते 20/10/2008 पर्यंत 14 टक्के दराने व्याज रु.3,000/- व मानसिक त्रास व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- असे एकूण रक्कम रु.49,671/- सामनेवालांकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत तक्रारदारांना सामनेवाला यांनी दिलेले गाडीचे कोटेशन, सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिलेले रिटेल इन्व्हाईस, सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिलेले ऑफर लेटर, सँन्ट्रो गाडीची रजिस्ट्रेशन पावती, ट्रान्झॅक्शन लेटर, अकौन्ट स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला क्र.3 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार factual तसेच legal ground वर फेटाळणेस पात्र आहे. तक्रारदाराची तक्रार ही कार्पोरेट डिस्काऊंट रु.4,000/- मागणीबाबत असलेने तो ग्राहक सरंक्षण कायदयाच्या ग्राहक या कक्षेत येत नसलेने संज्ञेस पात्र नाही. सबब नमुद तक्रार फेटाळणेत यावी. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराने कमिटेड केलेला डिस्काऊटं रु.14,671/- व कार्पोरेट डिस्काऊंट रु.4,000/- तक्रारदारास मिळणेस पात्र नाहीत व त्याबाबतचा हिशोबाचा तपशील खालीलप्रमाणे - Particulars | As per Quatation | As per Bill | Price As per Pro-Forma Invoice | 3,63,575 | 3,47,454 | R.T.O. Tax | 28,300 | 28,300 | Insurance | 11,171 | 11,171 | Third Years Ext.Warranty | 1,950 | 1]950 | Total | 4,04,996 | 3,88,875 | Add Additional Accessories | 3,150 | 3,150 | Total | 4,08,146 | 3,92,025 | Less Discount given | | | a) Insurance free scheme 11,171 | | | b) Accessories 3,150 | | | c) Third YearsWarranty Cost 1,950 | 16,271 | Shown on Bill | | 3,91,875 | 3,92,025 | d) Corporate Discount | 4,000 | 4,000 | Total amount received from the party | 3,87,875 | 3,88,025 | Lesss Credit Note | | 150 | Payment received from the party | | 3,87,875 | Receipt No.5453 dt. 15/10/2007 Rs.10,000 | | | Receipt No.5525 dt 20/10/2007 Rs.3,77,875 | 3,87,875 | 3,87,875 |
नमुद हिशोबाबाबत रक्कम रु.150/- ही तक्रारदारच सामनेवालांना देय लागतात. तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. सबब तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी व तक्रारदाराकडून रक्कम रु.10,000/- सामनेवालांना देणेबाबत आदेश व्हावा अशी मागणी सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार सामनेवालांनी मान्य केलेल्या कथनाखेरीज तक्रारीतील अन्य मजकूर मान्य व कबूल नाही. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार प्रसिध्दीपोटी केलेची तसेच माई हुंदाई इंडिया लिमिटेड या सारख्या नामांकित कंपनीची अप्रतिष्ठा करणेसाठी केली आहे. तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. प्रस्तुत तक्रारीशी सामनेवालांचा काहीही संबंध नसताना त्यांना पक्षकार केले आहे. तक्रारदार हा स्वच्छ हाताने सदर मंचासमोर आलेला नाही. तक्रारदाराने हेतूपूर्वक खरी वस्तुस्थिती उघड केली नसल्याने तक्रार फेटाळणेस पात्र आहे. तक्रारदाराने Hyundai Santro GLS car bearing VIN: MALAA51HR7M196156 and Engine No.G4HG7M246441 invoiced vide Retial Invoice No.H200700445 Dated 20/10/2007 रोजी सामनेवाला कंपनीचे डिलर सामनेवाला क्र.3 माई हुंदाई,कोल्हापूर यांचेकडून खरेदी केली. तक्रारदार व सामनेवाला क्र.3 यांचेमध्ये जी कमिटमेंट झाली असेल त्यास सामनेवाला क्र.1 व 2 जबाबदार नाहीत. सामनेवालांना सामनेवाला क्र.3 कडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराने मंचाची दिशाभूल केलेली आहे. तक्रारदाराने खरी वस्तुस्थिती मंचापासून दडवून ठेवली आहे. तक्रारदारास एक्स शोरुम नमुद वाहनाची किंमत रु.3,63,575 (रजिस्ट्रेशन व इन्शुरन्स वगळून) दि.12/10/2007च्या प्रोफार्मा इन्व्हाईस प्रमाणे माहिती होती. नमुद प्रोफार्मा इन्व्हाईस प्रमाणे तक्रारदार व सामनेवाला क्र.3 यांचेमध्ये व्यवहार झाला. सामनेवाला क्र.3 यांनी Free Insurance Cover 11,171, Free extended Warranty Rs.1,950/- Carporate Discount Rs.4,000/-, Free Accessaries Rs.3,150/-, तक्रारदारास दिलेल्या आहेत. तक्रारदाराने एक्सशोरुम किंमत रु.3,63,575/- व रजिस्ट्रेशन चार्जेस रु.28,300/- ( वनटाईम टॅक्स 25,450 + रजिस्ट्रेशन हायपोथिकेशन 300, स्मार्ट कार्ड 350, एजंट सर्व्हीस हॅन्डलींग चार्जेस 2,200) असे एकूण रु.3,87,875/- नमुद वाहनाचे खरेदीपोटी अदा केले आहेत. रु.4,000/- चा कार्पोरेट डिस्काऊंट तक्रारदारास दिलेला आहे. सामनेवालांची जबाबदारी मर्यादित असून ती Principal to Principal या आधारावर आहे. सबब सामनेवाला क्र.3 यांचे चुकीसाठी (error/omission/misrepresentation) सामनेवाला क्र. 1 व 2 यांना जबाबादर धरता येणार नाही. त्यास पूर्णत्: सामनेवाला क्र.3 हे जबाबदार आहेत. तक्रारदाराने पूर्ण समाधान झालेवरच नमुद वाहन खरेदी केले आहे. सामनेवाला क्र.3 यांनी इन्शुरन्स रक्कम रु.11,171/- वाढीवा वॉरंटी रु.1,950/- फ्री अक्सेसरीज रु.3,000/- असे एकूण रु.16,121/- प्रत्यक्ष डिलरनी incurred केले आहेत. सदर रक्कम एक्स शोरुम किंमतीतून वजावट केली आहे. तक्रारदारास रक्कम रु.3,47,454/- चा इन्व्हाईस दिलेला आहे. सबब सामनेवाला क्र. 1 व 2 विरुध्द तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी सदर मंचास केली आहे. (6) सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत रिटेल इनव्हाईस दि.20/10/007 व प्रोफॉर्मा इनव्हाईस नं.3506 दि.12/10/007 इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (7) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदयाप्रमाणे ग्राहक आहेत का? --- होय. 2) सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 3) तक्रारदार रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? --- होय. 4) काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- सामनेवाला क्र.3 यांनी दैनिक पुढारीमध्ये फेस्टिवल ऑफर दिलेली होती. त्यास अनुसरुन तक्रारदाराने सामनेवाला क्र.3 कडून वाहन खरेदी केले आहे. तसेच सदर ऑफरमध्ये कमिटेड व कार्पोरेट डिस्काऊंट यांचा समावेश होता हे सामनेवालांनी मान्य केलेले आहे. त्या आधारावर तक्रारदाराने त्याचेकडून सामनेवाला क्र.1 व 2 यांनी उत्पादित केलेली सॅन्ट्रो कार सामनेवाला क्र.3 कडून खरेदी केली. सबब तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 ते 3 यांचे ग्राहक होतात. सबब सदरची तक्रार कायदयाचे चालणेस पात्र आहे. मुद्दा क्र.2 व 3 :- सामनेवाला क्र.3 कडून तक्रारदाराने दि.20/10/2007 रोजी वाहन खरेदी केले होते. सदर वाहन खरेदीपोटी रु.3,87,875/- इतकी रक्कम अदा केली होती. हे सामनेवालांनी मान्य केले असलेने वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराने दाखल केलेले निशानी 3-ए च्या दि.12/10/2007 च्या प्रोफॉर्मा इनव्हाईस वर नमुद चार चाकी वाहन हे Hyundai Santro GLS met. car bearing VIN: MALAA51HR7M196156 and Engine No.G4HG7M246441 invoiced vide Retial Invoice No.H200700445, Colour Gels Met. ची किंमत रु.3,63,575/- रजिस्ट्रेशन व रोड टॅक्स रु.28,300/-, इन्शुरन्स रु.11,171, 3 वर्षाची वाढीव वॉरंटी रु.1,950/- असे एकूण रु.4,04,996/- रक्कमांची नोंद आहे. तर निशान 3-बी वर दाखल दि.20/10/007 चे रिटेल इनव्हाईस वरील नोंदीनुसार 1. Price of one Santro - Santro GLS Dynasty Red Rs. 3,23,178/- 2. Discount Rs. 14,330/- 3. Net selling price Rs. 3,08,848/- 12.50 % Vat Rs. 38,606/- Rs. 3,47,454/- नोंद असता तक्रारदाराने रक्कम रु.3,87,875/- अदा केलेले आहेत. रु.40,421/- जादा जमाची नोंद आहे. तसेच निशानी क्र.3-ई वर नमुद वर्णन वाहनाचे तपशील दिलेला आहे.नमुद तपशील पुढीलप्रमाणे- Transaction details of your purchase of Santro Car: GLS - Dynesty Red. payment made by you | Amount | Things offered to you | Amount | Receipt no 5453 dt.15.10.07 Receipt no.5525 dt.20.10.07 Corporate Dis.offered by Hyundai Credit Note issued to you | 10000 377875 4000 150 | Vehicle Invoice(After Discount deduction 1styear comprehensive Insurance 3drd year Extended Warranty Corporate Discount Accessories fitted to Vehicle Registration Exp: One time Tax 25450 Registration & Hypo Fee 300 Smart Card 350 Agent Service & Handling charges 2200 | 347454 11171 1950 3150 28300 | Total | 392025 | | 392025 |
वरीलप्रमाणे कागदपत्रांचे अवलोकन केले असता सामनेवाला क्र.3 यांनी इन्शुरन्स रु.11,171/- वाढीवा 3 वर्षाची वॉरन्टी रु.1,950/- फ्री अक्सेसरीज रु.3,000/- कार्पोरेट डिस्काऊंट रु.4,000/- असे एकूण रु.20,271/- डिस्काऊंट ऑफर केला होता हे सामनेवालांनी मान्य केला आहे. सामनेवालांनी दाखल केलल्या हिशोबाचा तक्ता पुढीलप्रमाणे Particulars | As per Quatation | As per Bill | Price As per Pro-Forma Invoice | 3,63,575 | 3,47,454 | R.T.O. Tax | 28,300 | 28,300 | Insurance | 11,171 | 11,171 | Third Years Ext.Warranty | 1,950 | 1]950 | Total | 4,04,996 | 3,88,875 | Add Additional Accessories | 3,150 | 3,150 | Total | 4,08,146 | 3,92,025 | Less Discount given | | | a) Insurance free scheme 11,171 | | | b) Accessories 3,150 | | | c) Third YearsWarranty Cost 1,950 | 16,271 | Shown on Bill | | 3,91,875 | 3,92,025 | d) Corporate Discount | 4,000 | 4,000 | Total amount received from the party | 3,87,875 | 3,88,025 | Lesss Credit Note | | 150 | Payment received from the party | | 3,87,875 | Receipt No.5453 dt. 15/10/2007 Rs.10,000 | | | Receipt No.5525 dt 20/10/2007 Rs.3,77,875 | 3,87,875 | 3,87,875 |
सामनेवालांनी दाखल केलल्या हिशोबाच्या तक्ता तसेच निशान क्र.3ए वरील प्रोफॉर्मा इनव्हाईस निशानी क्र.3 बी वरील रिटेल इनव्हाईस व निशानी क्र.3-ई वरील ट्राझाक्शन डिटेल्सचा विचार करता आर.टी.ओ. टॅक्स रु.28,300/- या रक्कमेबाबत वाद होणेचा प्रश्नच नाही. कारण प्रोफॉर्मा इनव्हाईसमध्ये (Registration of Road Tax including service charges) निशान क्र.3-ई प्रमाणे वनटाईम टॅक्स रु.25,450/- रजिस्ट्रेशन अन्ड हायपोथीकेशन फी रु.300/-,स्मार्ट कार्ड रु.350/-आणि एजंट सर्व्हीस चार्ज व हॅन्डलींग चार्जेस रु.2,200/-असे एकूण रु.28,300/- या गोष्टींची नोंद आहे. रिटेल इनव्हाईची रक्कम रु.3,47,454/-नोंद असून सदर रक्कमेत रु.14,330/- डिस्काऊंट वजा जाता नेट सेलींग किंमत ही रु.3,08,848/-तसे 12.50 टक्के व्हॅट चे रु.38,606/- चा समावेश आहे. असे एकूण रु.3,47,454/- गाडीची किंमत दाखवलेली आहे. सबब रु.40,421/- जादा जमा दिसतात. यामध्ये निशान क्र.3-ई मध्ये रु.4,000/- कार्पोरेट डिस्काऊंट रु.150/- क्रेडीट नोट, तक्रारदाराचे रु.3,87,875/- असे एकूण रु.3,92,025/- जमा दिसून येतात. तर Things Offered --- Vehicle Invoice after Discount Deduction Rs. 3,47,454/- Insurance Rs. 11,171/- 3 rd year Extended WArranty Rs. 1,950/- Accessories fitted to Vehicle Rs. 3,150/- Registration Exp: Rs. 28,300/- Total Rs. 3,92,025/- दिसून येतात. सदर हिशोबात इन्शुरन्स रु.11,171/-, वाढीव 3 वर्षाची वॉरन्टी रु.1,950/- व अक्सेसरीज रु.3,150/- असे एकूण रु.16,271/- हा कमिटेड डिस्काऊंट आहे. सदरचा कमिटेड डिस्काऊंट व कार्पोरेट डिस्काऊंट वर नमुद हिशोबात समाविष्ट केलेला आहे. मात्र सदरचा डिस्काऊंट देणेचे कमिटमेंट सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारास देणेचे कबूल केले आहे. तसेच रक्कम रु.4,000/-कार्पोरेट डिस्काऊंट तक्रारदारचे जमा रक्कमेत दाखवला आहे. म्हणजेच तक्रारदाराने रु.3,87,875 अधिक रु. 4,000/- अधिक क्रेडीट नोटची रक्कम रु.150/- असे मिळून रु.3,92,025/- जमा दाखवला आहे. याचा विचार करता तक्रारदाराचे सामनेवालांकडे रु.40,421/-जादाचे जमा असून यामधून रु.28,300/- वजा जाता उर्वरित रक्कम रु.12,121/-शिल्लक राहतात. सामनेवाला क्र.3 हे तक्रारदारास रु.20,271/-डिस्काऊंट देय लागत होते. पैकी निशान क्र.3-बी प्रमाणे रु.14,330/- डिस्काऊंट दिलेला आहे. सबब कमिटेड ऑफर रु.16,271/- पैकी दिलेला रु.14,330/- डिस्काऊंट वजा जाता रु.1,941/- व कार्पोरेट डिस्काऊंट रु.4,000/- असे एकंदरीत रु.5,941/- सामनेवाला क्र.3 तक्रारदारास देय लागतात. अधिक तक्रारदाराची सामनेवालांकडे शिल्लक असलेली रक्कम रु.12,121/-असे मिळून एकूण रु.18,062/-तक्रारदारास सामनेवाला क्र.3 देय आहेत. सामनेवाला क्र.3 यांनी ऑफर केलेप्रमाणे आपली जबाबदारी पार पाडलेली नाही. सदरची ऑफर सामनेवाला क्र.3 यांनी जाहीरात केलेली होती. एक्सशोरुम किंमत रु.3,63,575/- दर्शवली आहे. मात्र रिटेल इनव्हाईसवर मात्र रक्कम रु.3,47,454/-दिसून येते. परंतु एक्सशोरुम किंमत व नमुद किंमतीच्या फरकाबाबत कोणताही स्वयंस्पष्ट पुरावा सामनेवाला क्र.3 यांनी दाखल केलेला नाही.त्यासाठी सामनेवाला क्र. 1 व 2 यांना जबाबदार धरता येणार नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब सामनेवाला क्र.3 यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली आहे व सदर रक्कम देणेस सामनेवाला क्र.3 यांची जबाबदारी आहे सबब तक्रारदार रक्कम रु.18,062/- व्याजासहीत मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3 :- तक्रारदार सामनेवालांच्या सेवात्रुटीमुळे झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारास रक्कम रु.18,062/-(रु .अठरा हजार बासष्ट फक्त) दि.20/10/2007 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत. (सौ.वर्षा एन.शिंदे) (श्री एम.डी.देशमुख) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,कोल्हापूर कोल्हापूर, दिनांक :-16/07/2010
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |