** निकालपत्र **
(20/02/2013)
प्रस्तुतची तक्रार, तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. सदर तक्रारीमधील कथने खालीलप्रमाणे आहेत.
1] तक्रारदार यांनी जाबदेणार कंपनीकडून दि. 17/10/2011 रोजी लॅपटॉपची बॅटरी विकत घेतलेली होती. सदर बॅटरी नादुरुस्त झाल्यामुळे तक्रारदारांनी जाबदेणारांशी संपर्क साधला व बॅटरी बदलून मिळावी किंवा दुरुस्त करुन मिळावी अशी मागणी केली होती. जाबदेणारांनी सदरच्या बॅटरीची एक वर्षाची वॉरंटी दिलेली होती. जाबदेणारांकडे वारंवार मागणी करुनही त्यांनी बॅटरी बदलूनही दिली नाही किंवा बॅटरीची रक्कमही परत केली नाही. जाबदेणारांनी निकृष्ट दर्जाची सेवा दिलेली आहे आणि सेवेमध्ये कमतरता केलेली आहे म्हणून तक्रारदारांनी जाबदेणारंकडून एकुण रक्कम रु. 6,10,000/- नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे.
2] प्रस्तुतची तक्रार दाखल केल्यानंतर जाबदेणारांना नोटीस काढण्यात आली. नोटीसची बजवणी होऊनही जाबदेणार मंचासमोर उपस्थित राहिले नाहीत, म्हणून एकतर्फा चोकशी नेमण्यात आली. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र, बीले आणि पावती दाखल केले.
3] सदरच्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, तक्रारदारांनी बॅटरी रक्कम रु. 3,200/- ला विकत घेतलेली होती. ज्या बॅटरीसंबंधी ही तक्रार दाखल केलेली होती, त्यावरुन असे दिसून येते की, सदरची बॅटरी चार्ज होत नव्हती. तक्रारदारांनी वॉरंटी कालावधीमध्ये जाबदेणारांकडे बॅटरीची किंमत किंवा बॅटरी दुरुस्त करुन मागितली होती, परंतु जाबदेणारांनी प्रतिसाद दिला नाही. तक्रारदारांनी मागितलेली नुकसान भरपाईची रक्कम ही अवाजवी आहे. तक्रारदार, नुकसान भरपाई म्हणून बॅटरीची किंमत रक्कम रु. 3,200/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 1,000/- मिळण्यास पात्र आहेत.
4] तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील कथने, कागदपत्रे व शपथपत्र यांचा विचार करुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणारांनी तक्रारदारांना या आदेशाची प्रत मिळाल्यापासून
2.एका महिन्याचा आंत रक्कम रु. 5,200/- द्यावेत. जर
जाबदेणारांनी वेळेमध्ये तक्रारदारांना रक्कम दिली नाही तर
तक्रारदारांना सदरच्या रक्कम रु. 5,200/- वर द.सा.द.शे. 9%
व्याजदर मागण्याचा अधिकार राहील.
3. आदेशाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.
3.