Maharashtra

Nagpur

CC/731/2021

GAURAV PATHAK - Complainant(s)

Versus

HP COMPUTING AND PRINTING SYSTEMS INDIA PRIVATE LIMITED - Opp.Party(s)

SELF

23 Sep 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/731/2021
( Date of Filing : 25 Nov 2021 )
 
1. GAURAV PATHAK
GAURAV PATHAK 45 JAI GANGA MAA LAYOUT GULMOHAR NAGAR BHARATWADA ROAD NAGPUR-440035
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. HP COMPUTING AND PRINTING SYSTEMS INDIA PRIVATE LIMITED
5F SALARPURIA GR TECH PARK KHATHA NO 69/3 MAHADEVAPURA CMC 5 &9 FL WHITEFIELD ROAD P.C. 560066 BANGALORE KARNATAKA PHONE 918033837405
BENGALURU URBAN
KARNATAKA
2. HP SERVICE CENTRE NAGPUR
1ST FLOOR BLOCK NUMBAER 08A, PUSHPKUNJ COMMERCIAL COMLEX RAMDASPETH NAGPUR 440015
NAGPUR
MAHARASHTRA
3. SS COMPUTERS
SHANKAR BHAWAN, SHOP NO 2, MEHADIA SQUARE DHANTOLI NAGPUR 440012
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:SELF, Advocate for the Complainant 1
 
Dated : 23 Sep 2022
Final Order / Judgement

 

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या कलम 35(1)  अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,  त्‍याने ऑनलाईन क्‍लासेस व इंजिनिअरिंगच्‍या शिक्षणाकरिता विरुध्‍द पक्ष 1 ने निर्मित केलेला HP LAPTOP EG-0103 IX S.N.SCD115NICS Code 8471 हा विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांच्‍याकडून invoice no. SSC/21/219, दि. 30.06.2021 ला रुपये 79,500/- एवढया किंमतीत विकत घेतला होता. लॅपटॉपच्‍या स्‍पेसिफिकेशन प्रमाणे व विरुध्‍द पक्ष 3 यांनी सांगितल्‍याप्रमाणे सदरचा लॅपटॉप साडे आठ तास बॅटरी बॅकअप देणार होता. परंतु तक्रारकर्त्‍याने सदर लॅपटॉप विकत घेतल्‍यानंतर एक आठवडयाच्‍या आत लक्षात आले की, लॅपटॉप मधील सिस्‍टीम गरम होत असून अकस्‍मात डाऊन होत आहे आणि लॅपटॉपचा बॅटरी बॅकअप हा दिड तास ते दोन तास पर्यंत आहे, त्‍यामुळे याबाबत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 3 च्‍या दुकानाला भेट दिली असता, त्‍यांनी विरुध्‍द पक्ष 2  सर्विस स्‍टेशनला जाण्‍यास सांगितले. परंतु त्‍यावेळी करोना व्‍हायरस पॅन्‍डेमिकमुळे जाहीर करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनमुळे नागपूर मधील दुकाने फार कमी वेळाकरिता उघडत असल्‍यामुळे तक्रारकर्ता सर्विस स्‍टेशनला जाऊ शकला नाही. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने एच.पी.सर्विस सेंटरशी संपर्क साधला असता त्‍यांनी सेवा देण्‍याचे कबूल केले.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 चे सर्विस इंजिनिअरने तक्रारकर्त्‍याचा लॅपटॉप तपासला व त्‍यातील बॅटरी दुरुस्‍त करुन बदलून दिली. परंतु लॅपटॉप मधील प्रोब्‍लेम कमी न होता त्‍यामधील बॅटरी बॅकअप दुरुस्‍तीनंतर अधिक कमी झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने पुनश्‍च कस्‍टमर केअरला तक्रार केली. त्‍यानंतर   दुस-यांदा इंजिनिअरने  तक्रारकर्त्‍याच्‍या राहत्‍या घरी भेट दिली व त्‍यांनी लॅपटॉप उघडून बॅटरी चेक केली असता इंजिनिअरने सदर लॅपटॉप मध्‍ये दोष असल्‍याबाबतची बाब स्‍वीकारली अणि सदर लॅपटॉपमध्‍ये दोष असल्‍याने त्‍याला स्‍पोर्टची गरज असल्‍याची बाब वरिष्‍ठ अधिका-यांना कळविली. त्‍यानंतर कंपनीच्‍या तिस-या इंजिनिअरने तक्रारकर्त्‍याच्‍या घरी भेट दिली व त्‍याला तक्रारकर्त्‍याच्‍या घरी पुरविण्‍यात येणा-या व्‍होल्‍टेजबाबत शंका आल्‍यामुळे इंजिनिअरने तक्रारकर्त्‍याच्‍या घराला होणा-या विद्युतच्‍या स्‍पलायची तपासणी केली. परंतु  इंजिनिअरला सप्‍लाय बरोबर होत असल्‍याचे आढळले तेव्‍हा वि.प. 1 यांनी पुनश्‍च 4 थ्‍या वेळी व 5 व्‍या वेळी इंजिनिअरला लॅपटॉप तपासणीकरिता पाठविले. परंतु संबंधितांकडून लॅपटॉपमधील दोषाचे निराकरण झाले नाही. विरुध्‍द पक्ष 1 यांनी पुनश्‍च 6 व्‍या वेळा इंजिनिअरला बॅटरी ड्रेन चेक करण्‍याकरिता पाठविले त्‍यावेळी इंजिनिअरने लॅपटॉपची तपासणी केली व लॅपटॉप बॅटरी बॅकअप नॉर्मल असल्‍याचे सांगून प्रकरण बंद करण्‍यात येत असल्‍याचे तक्रारकर्त्‍याला सांगितले. त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याने संबंधित इंजिनिअरला लॅपटॉप मधील प्रोब्‍लेम सॉल न झाल्‍याचे सांगितले असता सर्विस इंजिनिअरने तक्रारकर्त्‍याला सांगितले की, सदर प्रोब्‍लेम करिता मी आपणास मदत करु शकत नाही, तुम्‍ही इतर कुणाशी संपर्क साधावा. याबाबत जेव्‍हा तक्रारकर्त्‍याने सर्विस मॅनेजरशी संपर्क साधला, त्‍यावेळी सर्विस मॅनेजरने लॅपटॉप नॉर्मेल असल्‍याने आम्‍ही आपणास मदत करु शकत नाही असे सांगतले.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, सदर लॅपटॉप विकत घेतल्‍यापासून त्‍यातील दोष दूर करण्‍याकरिता कंपनीच्‍या सर्विस इंजिनिअरकडून कोणतेही सहकार्य व प्रतिसाद न मिळाल्‍यामुळे त्‍याने दि. 14.11.2021 ला विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यानी प्रस्‍तुत तक्रार आयोगासमक्ष दाखल करून मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून लॅपटॉप विक्रीपोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 79,500/- दसा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजासह परत करावी.  तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई  व तक्रारीचा खर्च ही देण्‍याचा आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 ते 3 ला आयोगा मार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष 1 ते 3  आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 25.08.2022 रोजी पारित करण्यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तऐवज व तोंडी युक्तिवाद ऐकल्यावर निकाला करिता खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यात आले

1    तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?            होय

 

2    विरुध्‍द पक्ष 1 व 3 ने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा देऊन

     अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय ?             होय

 

3.    विरुध्‍द पक्ष 2 ने दोषपूर्ण सेवा दिली काय ?             नाही

 

4    काय आदेश ?                                  अंतिम आदेशानुसार

कारणमीमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 ने निर्मित केलेला HP LAPTOP EG-0103 IX S.N.SCD115NICS Code 8471 हा विरुध्‍द पक्ष क्रं. 3 कडून Invoice no. SSC/21/219, दि. 30.06.2021 ला रुपये 79,500/- एवढया किंमतीत विकत घेतला होता. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. सदर लॅपटॉप विकत घेतल्‍यानंतर एक आठवडयाच्‍या आत लॅपटॉप मधील सिस्‍टीम गरम होत असल्‍याचे व लॅपटॉपची बॅटरी बॅकअप ही फक्‍त दिड ते दोन तासापर्यंत असल्‍याचे निदर्शनास आले.  जेव्‍हा की,  नि.क्रं. 2 वर दाखल वि.प. 1 चे Promised Upto 8.30 Hrs. Backup –specifications on company official website. प्रमाणे व विरुध्‍द पक्ष 3 यांनी सांगितल्‍याप्रमाणे सदरचा लॅपटॉप साडे आठ तास बॅटरी बॅकअप देणार होता. त्‍यानंतर ही तक्रारकर्त्‍याच्‍या लॅपटॉप मधील बॅटरी बॅकअप केवळ दिड ते दोन तासापर्यंत असल्‍याच्‍या कारणाने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 3 शी संपर्क साधला असता त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 चे अधिकृत असलेले सर्विस सेंटर विरुध्‍द पक्ष 2 सोबत संपर्क साधण्‍यास सांगितले. परंतु त्‍यावेळी करोना व्‍हायरस पॅन्‍डेमिकमुळे जाहीर करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनमुळे नागपूर मधील दुकाने फार कमी वेळाकरिता उघडत असल्‍यामुळे तक्रारकर्ता सर्विस स्‍टेशनला जाऊ शकला नाही.त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍या सर्विस सेंटरशी संपर्क साधल्‍यानंतर  वि.प. 1 चे सर्विस इंजिनिअरने तक्रारकर्त्‍याच्‍या राहत्‍या घरी भेट देऊन लॅपटॉप मधील बॅटरी बदलून दुरुस्‍त करुन दिली,  परंतु लॅपटॉप मधील बॅटरी बॅकअप न वाढता ती अधिक कमी झाल्‍याचे निदर्शनास आले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 शी पुनश्‍च संपर्क साधला. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष 1 यांनी त्‍यांच्‍या सर्विस इंजिनिअरला तक्रारकर्त्‍याच्‍या घरी सेवा देण्‍याकरिता पाठविले तेव्‍हा संबंधित इंजिनिअरने लॅपटॉप मध्‍ये दोष असल्‍याची बाब स्‍वीकारली व सदर लॅपटॉपला सपोर्टची गरज असल्‍याबाबत वरिष्‍ठ अधिका-यांना कळविले. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष  कंपनीने तिस-या वेळी लॅपटॉप दुरुस्‍तीकरिता इंजिनिअरची नियुक्‍ती केल्‍यानंतर  संबंधित इंजिनिअरने तक्रारकर्त्‍याच्‍या घराला पुरविण्‍यात येणा-या व्‍होल्‍टेजबाबत शंका आल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या घराला होणा-या व्‍होल्‍टेज सप्‍लायची तपासणी केली परंतु त्‍यात कुठलाही दोष आढळून आला नाही. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष 1 यांनी   वेगवेगळया वेळी 3 इंजिनिअर लॅपटॉप मधील बॅटरी बॅकअप मधील दोष दूर करण्‍याकरिता पाठविले, त्‍यानंतर ही तक्रारकर्त्‍याच्‍या लॅपटॉप मधील दोषाचे निराकरण झाले नसतांना विरुध्‍द पक्षाने सदर प्रकरण बंद केले. विरुध्‍द पक्ष 3 ने विरुध्‍द पक्ष 1 चा निर्मिती दोष असलेला लॅपटॉप तक्रारकर्त्‍याला विकलेला आहे व ही विरुध्‍द पक्ष 1 व 3 च्‍या सेवेतील दोषपूर्ण सेवा असून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.

   

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

                             

  1. विरुध्‍द पक्ष 2 विरुध्‍द कोणताही आदेश नाही.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 3 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला  लॅपटॉपची रक्‍कम रुपये 79,500/- व त्‍यावर दि. 30.06.2021 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षांकडून लॅपटॉपची रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतर त्‍वरित 15 दिवसाच्‍या आंत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे लॅपटॉप परत करावा.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 3 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई करिता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 3 यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसांच्‍या  आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.