जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे. मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी ---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ३६३/२०१० तक्रार दाखल दिनांक – २९/१२/२०१० तक्रार निकाली दिनांक – १८/११/२०१३ श्री.कल्याणसिंग जतनसिंह सिसोदिया ----- तक्रारदार. वय-५५, धंदा- शेती व व्यापार राहणार –दोंडाईचा,प्लॉट नं.४० दादासाहेब रावल को-ऑप हौसिंग सोसायटी लि. तालुका-शिंदखेडा,जि.धुळे. विरुध्द (१)हाउसिंग डेव्हलपमेंन्ट फायनान्स ----- सामनेवाले. कॉर्पोरेशन लि,मुंबई रोमन हाउस,एच.टी.पारेख मार्ग १६९ बॅंक वे,रिक्लेमेशन,चर्चगेट मुंबई ४०००२०२ (२)हाउसिंग डेव्हलपमेंन्ट फायनान्स कॉर्पोरेशन लि,शाखा-नाशिक,एच,डी,एफ,सी हाउस,शरणपुर,लिंक रोड,नाशिक ४२२००५ (३)हाउसिंग डेव्हलपमेंन्ट फायनान्स कॉर्पोरेशन लि,शाखा-धुळे सी,के,बी,आर्केड, १ ला माळा,देवपुर बस स्टॅण्ड जवळ आग्रारोड,देवपुर,धुळे. न्यायासन (मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी ) (मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन) (मा.सदस्य : श्री.एस.एस.जोशी) उपस्थिती (तक्रारदारा तर्फे – वकिल श्री.आर.आय.राजपूत) (सामनेवाले तर्फे – वकिल श्री.एस.आर.पंडीत) निकालपत्र (द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी) (१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांनी गृहकर्जाची परतफेड करुन, मुळ दस्तऐवज परत न केल्यामुळे, ते परत मिळण्याकामी सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे. (२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार हे युनिव्हर्सल स्टार्च केम अलाईड लिमीटेड येथे नोकरीला होते. तक्रारदार यांना त्यांच्या घराचे बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी सामनेवाले क्र.२ यांच्याकडून गृहतारण कर्ज खाते क्र. ३००००११८६८ या अन्वये रक्कम रु.४,००,०००/- एल.ओ.सी. (Fix Rate) प्रमाणे गृह कर्ज घेतले. सदर कर्ज हे सामनेवाले क्र.२ यांच्याकडून, सामनेवाले क्र.३ यांच्याकडे फ्लोटींग रेट इंटरेस्ट स्कीमखाली दि.०१-११-२००३ रोजी सदर कर्ज हस्तांतरीत केले व त्याच्यापुर्वीचा खाते क्रमांक बदलून त्यास नवीन क्रमांक १४२९९४३ असा देण्यात आला होता. यावेळी सामनेवाले क्र.२ यांच्याकडे दि.३१-११-२००३ अखेर संपूर्ण व्याजासहीत हिशोब करुन रक्कम रु.३,८७,७८४/- एवढे तक्रारदाराकडे घेणे दाखविण्यात आले होते. तसे तक्रारदाराचा सदर रकमेचा करारनामा वजा कबूलायत पत्र सामनेवालेंनी लिहून घेतले आहे. सदर कर्ज प्रकरण करतेवेळी सामनेवाले क्र.२ यांच्या मागणीप्रमाणे तक्रारदार यांनी मौजे दोंडाईचा येथील शेत मिळकत सर्व्हे नंबर ३१७/अ/१ अ पैकी प्लॉट नं.४० चे दि.०६-०७-२००२ रोजीचे मुळ खरेदीखत व त्यासोबतचे मुळ कागदपत्रे ही सामनेवाले यांच्याकडे जमा केली आहेत. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.३ यांच्याकडून गृहकर्ज म्हणून दुसरे कर्ज घेतले. त्याचा खाते क्र.१४४८९५३ असा असून रक्कम रु.४५,०००/- चे कर्ज घेतले होते. त्याचा इ.एम.आय. कर्ज हप्ता हा रु.५५२/- असा होता व पुर्वीच्या कर्जाचा हप्ता रु.४,७५६/- असा होता. अशा दोन्ही कर्जाच्या एकूण हप्त्याची रक्कम रु.५,३०८/- ही तक्रारदार यांच्या पगारातून कपात होत होती. या दोन्ही कर्जाची परतफेड दि.३१ ऑक्टोबर २०१३ पर्यंत करावयाची होती. तक्रारदारांनी ६ ऑक्टोबर २००९ रोजी सामनेवाले क्र.३ यांचेकडे दोन्ही कर्ज खात्याचा व्याजासह संपूर्ण हिशोब करुन एक रकमी रक्कम भरुन घेण्याबाबत विनंती केली. त्याप्रमाणे सामनेवाले क्र.३ यांनी दि.०६-१०-२००९ रोजी पत्र देऊन दोन्ही कर्ज खात्यावरती खाते क्र. १४२९९४३ रक्कम रु.२,४५,०९९/- व खाते क्र. १४४८९५३ रक्कम रु.२९,९०७/- या व्याजासह रकमा जमा करण्याबाबत कळविले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी दि.०७-१०-२००९ रोजी युनियन बॅंक ऑफ इंडिया या शाखेच्या दोन डिमांड ड्राफ्ट द्वारे सामनेवाले क्र.३ यांना रक्कम अदा केली. अशा प्रकारे तक्रारदार यांनी दोन्ही कर्जाच्या रकमेची परतफेड केली आहे. त्याप्रमाणे सामनेवाले क्र.३ यांनी दि.०७-१०-२००९ रोजी तक्रारदारांच्या नोकरीस असलेल्या कार्यालयास दोन्ही कर्जांची पूर्ण फेड झाल्याने, हप्त्यांची कपात करु नये असे कळविले. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ यांच्याकडे मुळ खरेदी खताची व कागदपत्रांची मागणी केली. परंतु आजतागायत सामनेवाले यांनी त्याची पुर्तता केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराने सामनेवाले यांना नोटीस पाठविली आहे. त्या नोटीसीप्रमाणे सामनेवाले यांनी दखल घेतलेली नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा देण्याची जबाबदारी असतांना देखील जाणूनबुजून टाळाटाळ केलेली आहे. यामुळे तक्रारदार यांना या मंचात सदरचा तक्रार अर्ज दाखल करावा लागलेला आहे. तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांनी तक्रारदाराचे मुळ खरेदीखत व इतर कागदपत्र परत करावेत. तक्रारदार यांना झालेल्या खर्चाकामी रु.१०,०००/- मिळावेत, मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.५०,०००/- औषधाचा खर्च रु.२५,०००/- व अर्जाचा खर्च रु.५,०००/- मिळावेत. याकामी तक्रारदार यांचे शपथपत्र, सामनेवाले यांना पाठविलेली नोटीस, कर्ज करारनामा, दि.०६-१०-२००९ चे सामनेवालेंचे पत्र, डिमांड ड्राफ्टची छायांकीत प्रत, सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या कार्यालयास पाठविलेले पत्र, सामनेवाले यांनी कागदपत्र परत घेऊन जाणेबाबत पाठविलेले पत्र, विभागीय लेखा विभाग यांनी दिलेले पत्र, सामनेवाले यांना पाठविलेले पत्र व सामनेवाले यांनी दिलेला निरंक दाखला इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत. (३) सामनेवाले यांनी त्यांचा लेखी खुलासा दाखल केला असून, त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार मान्य व कबूल नाही. या तक्रारीतील नमूद वाद हा ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत अभिप्रेत असलेला वाद या संज्ञेत मोडत नाही. त्यामुळे या न्यायमंचासमोर सदरची तक्रार चालू शकत नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ यांच्याकडून कर्ज खाते क्र.३००००११८६८ या अन्वये रु.४,००,०००/- कर्ज घेतले. त्यानंतर तक्रारदारांनी या नमुद कर्जाव्यतीरिक्त दुसरे कर्ज घेतले होते. परंतु सदर कर्ज हे सामनेवाला नं.२ यांनी सामनेवाला नं.३ यांचेकडे हस्तांतरीत करण्यात आले व सदर कर्ज खाते क्र. ३००००११८६८ हा बदलून त्यास नविन खाते क्र. १४२९९४३ असा देण्यात आला हे मान्य नाही. तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडून दोन स्वतंत्र कर्ज खात्यांप्रमाणे दोन स्वतंत्र कर्ज घेतलेली आहेत. कर्ज खाते क्र. ३००००११८६८ चे दरमहा येणारे हप्ते हे कर्जखाते क्र.१४२९९४३ मध्ये भरण्याची मुभा तक्रारदार यांना देण्यात आली होती. मात्र वस्तुत: अशी मुभा ज्या दिवसापासून तक्रारदार यांना देण्यात आली त्या आधीचे त्यांचे कर्ज खाते क्र ३००००११८६८ चे मागील हप्ते थकीत आहेत. ते हप्ते भरण्यास तक्रारदार यांना वारंवार कळविण्यात आले होते, परंतु तक्रारदाराने ते हप्ते भरलेले नाहीत. सदर हप्ते बुडविण्याच्या हेतूने कर्ज खात्यातील रकमांच्या नोंदीचा चुकीचा अर्थ काढून सदरची तक्रार या मंचात तक्रारदाराने दाखल केलेली दिसते. तक्रारदार हे स्वच्छ हाताने आलेले नाहीत. त्यामुळे सदरची तक्रार ही दंडासहीत रद्द करावी अशी विनंती केली आहे. सामनेवाले यांनी या कामी शपथपत्र तसेच खाते क्र. ३००००११८६८ व खाते क्र. १४२९९४३ चा उतारा, खाते क्रमांक १४२९९४३ चा कर्ज करारनामा इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत. (४) तक्रारदारांचा अर्ज, लेखी युक्तिवाद, दोन्ही पक्षांचे शपथपत्र व कागदपत्र तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत. मुद्देः | निष्कर्षः | (अ) तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | : होय. | (ब) सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : होय. | (क)तक्रारदार हे मुळ कागदपत्र व मानसिक, शारीरिक त्रासाची रक्कम व अर्जाच्या खर्चाची रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | : होय. | (ड) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन (५) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून गृह कर्ज घेतले आहे हे सामनेवाले यांनी मान्य केले आहे. याचा विचार होता तक्रारदार हे या सामनेवालेंचे “ग्राहक” होत आहेत असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. (६) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ नाशिक शाखेकडून रक्कम रु.४,००,०००/- हे फीक्स रेट प्रमाणे गृहकर्ज म्हणून घेतले आहेत. त्याचा कर्ज खाते क्र. ३००००११८६८ असा असून, त्याचा कर्ज हप्ता हा ४,७५६/- असा होता. त्यानंतर सदर कर्ज हे तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.३ धुळे शाखेकडे फ्लोटींग रेट इंटरेस्ट या स्कीम खाली दि.०१-११-२००३ रोजी हस्तांतरीत केले. सदर कर्ज खात्याचा पुर्वीचा खाते क्र. ३००००११८६८ हा बदलून नवीन खाते क्र. १४२९९४३ असा देण्यात आला. या कामी तक्रारदार यांनी सदर कर्जाचा कर्ज करारनामा नि.नं.४/३ वर दाखल केला आहे. सदर कर्ज करारनामा पाहता, त्यावर लोन अकाऊंट नंबर १४२९९४३ असा असून, तक्रारदार यांच्या नांवे गृहकर्ज दिले आहे. सदर करारनाम्यावर शेवटी सामनेवाले यांनी “रिसीट” यामध्ये मजकूर नमूद केला आहे, तो या प्रमाणे Receipt : Received the day and year above written from the within named HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LIMITED the sum of Rs.387748 (THREE LAKH EIGHTY SEVEN THOUSAND SEVEN HUNDRED FORTY EIGHT ONLY) by way of adjustments against INDIVIDUAL LOAN OF CONV FROM LOC TO NORMAL (A/C No : 3000011868) at borrowers request. असे नमूद केले आहे. यावरुन असे दिसते की, तक्रारदार यांचे मुळ वैयक्तिक कर्जखाते क्र. ३००००११८६८ हे हस्तांतरीत करुन त्याचा नवीन कर्ज खाते क्र. १४२९९४३ यामध्ये उर्वरित रक्कम रु.३,८७,७४८/- या रकमेप्रमाणे दि.०१-११-२००३ रोजी सामनेवाले यांनी तक्रारदार यांना हस्तांतरीत केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.३ धुळे शाखेकडून दुसरे कर्ज रक्कम रु.४५,०००/- कर्ज खाते क्र.१४४८९५३ या अन्वये घेतलेले असून, त्याचा इ.एम.आय. ५५२/- असा होता. या बाबतचा कर्ज करारनामा दाखल केलेला नाही, परंतु सामनेवालेंनी त्याबाबत नाकारलेले नाही. (७) तक्रारदार यांनी ही दोन्ही कर्ज खाते एकरकमी पूर्ण परतफेड करावयाची असल्याने त्यांनी सामनेवाले नं.३ यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. सदर पत्र हे तक्रारदारांनी कर्ज खाते क्र. १४२९९४३ या बाबत सामनेवाले क्र.३ धुळे शाखा यांनी दिलेले पत्र दि. ०६-१०-२००९ रोजीचे नि.नं.४/४ वर दाखल केलेले आहे. त्यानंतर तक्रारदार यांचे दुसरे कर्ज खाते क्र.१४४८९५३ त्या बाबतचे पत्र दि.०७ ऑक्टोबर २००९ चे नि.नं.४/९ वर दाखल आहे. या दोन्ही पत्राप्रमाणे कर्ज खाते क्र. १४२९९४३ व कर्ज खाते क्र. १४४८९५३ चे खाते परतफेडीबाबत आहे. त्यामध्ये, We refer to your enquiry on/dated 6-Oct-2009 expressing your intention to prepay the entire loan on 07-Oct-2009. The calculation as under = Rs.2,45,099/- & Rs. 29,807/- Should you decide to prepay the loan, please send us your Cheque /DD for Rs.2,45,099/- & Rs. 29,807/- असे नमूद आहे. या पत्राप्रमाणे तक्रारदार यांना, दोन्ही नमूद कर्ज खात्याची एकरकमी रक्कम परतफेड करावयाची असल्याने, त्या बाबतच्या हिशोबाची मागणी केलेली आहे. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांनी एकूण थकबाकी ही कर्ज खाते क्र. १४२९९४३ यामध्ये असलेली थकबाकी रु.२,४५,०९९/- व दुसरे कर्ज खाते क्र. १४४८९५३ यामध्ये असलेली थकबाकी रु.२९,८०७/- अशी असून ही रक्कम दि.०७-१०-२००९ रोजी डी.डी. किंवा चेकने भरावयास सांगितलेली आहे. याप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दि.०७-१०-२००९ रोजी डी.डी.क्र.७६४९८२ रक्कम रु.२,४५,०९९/- व दुसरा डी.डी.क्र.७६४९८३ रक्कम रु.२९,८०७/- असे दोन्ही युनियन बॅंक ऑफ इंडियाचे डी.डी. दिले आहेत. त्या बाबतचे दोन्ही डी.डी. ची छायांकीत प्रत नि.नं.४/६ व ४/११ वर दाखल आहे. (८) सदर डी.डी. प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले यांनी दोन्ही कर्जाबाबत तक्रारदार हे नोकरी करत असलेल्या कार्यालयाशी दि.०७ ऑक्टोबर २००९ रोजी पत्रव्यवहार केलेला आहे. सदर पत्र नि.नं.४/७ व ४/१२ वर दाखल आहे. या पत्रामध्ये The above mentioned employee has now fully repaid his/her loan account result of the above prepayment we request you to discontinue the said deduction from his/her salary from the month of October 2009 असे नमूद केले आहे. या पत्राप्रमाणे सामनेवाले क्र.३ यांनी तक्रारदार यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करुन, तक्रारदार यांच्या सदर दोन्ही कर्ज खात्यांची रक्कम पूर्णफेड झाली असल्याने, कपात करु नये असे कळविलेले दिसत आहे. (९) त्यानंतर सामनेवाले क्र.३ यांनी सदर कर्ज प्रकरणातील थकबाकी प्राप्त झाल्यामुळे कर्ज प्रकरणात दाखल केलेले मुळ खरेदीखत व दस्तऐवज तक्रारदार यांनी परत घेऊन जावेत या कामी तक्रारादार यांना पत्र दिले आहे. ते पत्र दि.७ ऑक्टोबर २००९ रोजीचे नि.नं.४/८ व ४/१२ वर दाखल केलेले आहे. (१०) वरील सर्व कागदपत्रांप्रमाणे तक्रारदार यांचे प्रथम कर्ज खाते क्र. ३००००११८६८ अन्वये गृहकर्ज रक्कम रू.४,००,०००/- हे सामनेवाले क्र.२ कडून घेतलेले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी सदर कर्ज हे सामनेवाले क्र.३ कडे त्यामधील थकबाकी रक्कम रु.३,८७,७८४/- हे कर्ज खाते क्र.१४२९९४३ यामध्ये हस्तांतरीत केली व त्याचा इ.एम.आय. रु.४,७५६/- असा होता. त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडून दुसरे गृहकर्ज रक्कम रु.४५,०००/- चे घेतलेले असून, त्याचा कर्ज खाते क्र. १४४८९५३ असा होता. त्याचा इ.एम.आय. रु.५५२/- असा होता. हे दोन्ही कर्ज प्रकरणे तक्रारदार यांनी एकरकमी परतफेड करण्याकामी सामनेवाले यांच्याकडे पत्रव्यवहार केला. सामनेवाला यांच्या थकबाकी मागणीप्रमाणे एकूण थकबाकी रक्कम रु. २,४५,०९९/- व रु.२९,९०७/- हे दि.०७-१०-२००९ रोजी डी.डी. ने अदा केलेले आहेत. सदरची रक्कम सामनेवाले यांना प्राप्त झालेली आहे. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यांचे मुळ दस्तऐवज परत घेऊन जाण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु सामनेवाले यांनी आजतागायत सदर रक्कम प्राप्त झाल्यानंतरही तक्रारदार यांना मुळ दस्तऐवज परत केलेले नाहीत हे स्पष्ट होत आहे. (११) याकामी सामनेवाले यांनी असा बचाव घेतलेला आहे की, तक्रारदारांनी दोन्ही कर्ज घेतलेले आहे. परंतु त्यामध्ये तक्रारदारांचे कर्ज खाते क्र. ३००००११८६८ हे कर्ज खाते क्र. १४२९९४३ यामध्ये हस्तांतरीत केले गेलेले नाही. हे दोन्ही स्वतंत्र कर्ज खाते आहेत व त्यामध्ये तक्रारदार यांचे कर्ज खाते क्र. ३००००११८६८ चे मागील हप्ते थकीत आहेत. परंतु याकामी सामनेवाले यांनी या बचावाचे पुष्टयर्थ दोन कर्ज खात्याचे दोन कर्ज करारनामे दाखल केलेले नाहीत, जो कर्ज करारनामा दाखल केलेला आहे तो नि.नं.३५/१ वर दाखल आहे. सदर कर्ज करारनामा पाहता त्यावर कर्ज खाते क्र. १४२९९४३ असा नमूद आहे. या कर्ज करारनाम्यामध्ये तक्रारदारांचे पुर्वीचे कर्ज खाते क्र. ३००००११८६८ याचे हस्तांतरण होऊन कर्ज खाते क्र. १४२९९४३ यामध्ये केले गेलेले आहे, असे स्पष्ट नमूद आहे. सदरचा कर्ज करारनामा हा तक्रारदार यांनी त्यांच्या मुळ तक्रार अर्जासोबत प्रथम दाखल केलेला आहे. तोच करारनामा सामनेवाले यांनी पुन्हा दाखल केलेला आहे. या करारनाम्याप्रमाणे तक्रारदार यांचे मुळ कर्ज खाते हे हस्तांतरीत झाले आहे असे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार यांचे कर्ज खाते क्र. १४२९९४३ हे पूर्णफेड केलेले आहे, त्याबरोबरच मूळ खाते क्र. ३००००११८६८ यातील थकबाकी त्याबरोबरच पूर्ण परतफेड झालेली आहे हे स्पष्ट होत आहे. सामनेवाले यांनी जुने कर्ज खाते बंद केलेले दिसत नाही. थोडक्यात सामनेवाले यांनी दाखल केलेल्या करारानाम्याप्रमाणे दोन्ही कर्ज खाते एकच आहेत व ती तक्रारदार यांनी पूर्णफेड केली आहे हे स्पष्ट होत आहे. सामनेवालें यांनी त्यांच्या बचावाच्या पुष्टयर्थ कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांचे बचावात तथ्य नाही, असे दिसते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. (१२) मुद्दा क्र. ‘‘क’’ – तक्रारदार यांनी दाखल केलेल्या डी.डी.च्या छायांकीत प्रतीप्रमाणे सामनेवाले यांना थकबाकीची रक्कम मिळालेली असून, त्याबाबत सामनेवाले यांनी कोणताही वाद केलेला नाही. त्यानंतर सामनेवाले यांनी दि.०७-१०-२००९ च्या पत्राप्रमाणे तक्रारदार यांना त्यांचे मूळ दस्तऐवज परत घेवून जाण्याकामी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यानंतर तक्रारदार यांना अधिक्षक लेखा परीक्षण विभागीय कार्यालय एच.डी.एफ.सी. नासीक यांना दि.०५-०५-२००४ रोजी पत्र पाठविलेले आहे. सदर पत्र नि.३८/१ वर दाखल आहे. या पत्राप्रमाणे गृह कर्जाच्या थकीत हप्त्याबाबत सदर पत्र तक्रारदार यांना पाठविलेले दिसत आहे. या पत्रात तक्रारदार यांनी सामनेवाले यांना पैसे भरल्याबाबतचे पत्र पाठवलेले आहे ते नि.३८/२ वर दाखल आहे. त्यानंतर सामनेवाले यांनी दि.१७-०५-२००४ रोजी सदर कर्जाचे पैसे मिळाल्याबाबत व खाते निरंक झाल्याबाबतचा पत्रव्यवहार केला आहे. सदर पत्र नि.३८/३ वर दाखल आहे. या पत्राप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे दोन्ही कर्ज खाते निरंक झाल्याबाबत पत्र व्यवहार केला आहे. त्यातील मजकूर खालील प्रमाणे आहे. Ref : Your File no 1429943 & 1448953 with HDFC Dear Sir, Received your letter dated 11/5/2004 regarding your Housing loan & Top up loan installment. We have check your both account one has excess and another one in short fall we have duly received your Emi as deducted from your salary by Universal Starch Chem. Allied, Dondaicha. We have made necessary changes in your account your both account has been NIL and no outstanding till date. We are extremely sorry for earlier letters sent by us. Thank you for your cooperation. Assuring you always, best of our services. या पत्राप्रमाणे तक्रारदारच्या दोन वेगवेगळी कर्जखात्यांवरील सर्व थकबाकी सामनेवाले यांना प्राप्त झाली असून तक्रारदाराचे कर्ज खाते हे निरंक झालेले दिसत आहे व त्यामुळेच सामनेवाले यांनी तक्रादार यांना मूळ दस्तऐवज परत घेवून जाण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे हे स्पष्ट होते. परंतु आजतागायत सामनेवाले यांनी सदरचे दस्तऐवज तक्रारदार यांना परत केलेले नाही. यावरून सामनेवाले यांची त्रुटी स्पष्ट होत आहे. सामनेवाले यांनी सदर मूळ दस्तऐवज परत केलेले नाही, त्यामुळे निश्चितच तक्रारदार यांना सदरची तक्रार या मंचात दाखल करावी लागलेली आहे व त्यामुळे मानसिक, शारिरिक त्रास व अर्जाचा खर्च सहन करावा लागलेला आहे. त्यामुळे सदर कामी आर्थिक नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले जबाबदार आहे असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘क’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. (१३) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – वरील सर्व कारणांचा, कागदपत्रांचा विचार करता तक्रारदार यांचा तक्रार अर्ज योग्य व रास्त आहे असे आमचे मत आहे. त्यामुळे खालील आदेश पारित करण्यात येत आहे. आदेश (अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे. (ब) सामनेवाले यांनी, या आदेशाच्या दिनांकापासून पुढील तीस दिवसांचे आत. (१) तक्रारदार यांच्या मौजे दोंडाईचा येथील सर्व्हे नं.३१७/अ/१ अ पैकी प्लॉट नं.४० चे दिनांक ०६-०७-२००२ चे मूळ खरेदीखत व इतर मूळ कागदपत्र तक्रारदारास परत करावेत. (२) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम ५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रुपये एक हजार मात्र) द्यावेत. (क) उपरोक्त आदेश कलम ब मधील नमूद कागदपत्र आणि रकमा मुदतीत परत न केल्यास, संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे. ९ टक्के प्रमाण व्याजासह रक्कम देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील. धुळे. दिनांकः १८/११/२०१३ (श्री.एस.एस.जोशी) (सौ.एस.एस.जैन) (सौ.व्ही.व्ही.दाणी) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्ट्र राज्य) |