आदेश (30/08/2010 ) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. तक्रारकत्याचे म्हणणे थोडक्यात खालील प्रमाणेः- दि.15/09/2009रोजी त्याने प्रत्येकी एक लिटर याप्रमाणे 3 पाण्याच्या बाटल्या विरुध्द पक्ष 1 कडुन विकत घेतल्या. या बाटल्यांचा उत्पादक विरुध्द पक्ष 2 असुल विरुध्द पक्ष 1 च्या काऊंटरवरुन त्या खरेदी करण्यात आल्या. प्रत्येकी रु.25/- प्रमाणे रु.75/- रक्कम विरुध्द पक्ष 1 ने त्याचे कडुन वसुल केली. या पाण्याच्या बाटल्यांवर रु.13/- किम्मत छापलेली होती. त्यामुळे प्रत्येक बाटलीवर रु.12/- या प्रमाणे रु.36/- जास्त नियमबाह्य रितीने विरुध्द पक्षाने वसुल केले. दि.19/09/2009 रोजी पत्राद्वारे विरुध्द पक्ष 1ला तक्रार पाठविण्यात आली व नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. त्याची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे प्रार्थनेत नमुद केल्यानुसार विरुध्द पक्षाने अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याने व सदोष सेवा पुरविल्याने जास्तीची वसुल केलेली रक्कम त्याला व्याजासह परत मिळावी, नुकसान भरपाई रु.75,000/- व न्यायिक खर्च रु.10,000/- विरुध्द पक्षानी त्यांना द्यावा असे मंचाने आदेश पारित करावा या उद्देशाने प्रकरण दाखल केले.
... 2 ... (त.क्र.708/2009) निशाणी 2 अन्वये प्रतिज्ञापत्र, निशाणी 3(1) ते 3(3) अन्वये कागदपत्रे दाखल करण्यात आले. यात दि.12/09/2009 चे देयक विरुध्द पक्षाला पाठविलेले पत्र व पोच पावती तसेच पाण्याच्या बाटलीचे छायाचित्र यांचा समावेश आहे.
2. मंचाने विरुध्द पक्ष 1 व 2 यांना सुचनापत्र जारी केले. निशाणी 15 अन्वये विरुध्द पक्ष 1 ने प्रतिज्ञापत्रासह आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे थोडक्यात खालील प्रमाणेः- विरुध्द पक्ष 1 कडुन तक्रारकर्त्याने पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या होत्या, मात्र त्याचे कडुन बेकायदेशीररित्या जास्तीची रक्कम वसुल करण्यात आली हे म्हणणे विरुध्द पक्षानी अमान्य केले. या पाण्याच्या बाटल्या उपहारगृहाच्या काऊंटरवरुन तक्रारकर्त्याने खरेदी केल्या नव्हत्या. हॉटेल रत्ना पार्क येथे कोणतेही काऊंटर सुविधा नाही. प्रत्येकी रु.25/- प्रमाणे तीन पाणी बाटल्यांची किंम्मत रु. 75/- रोख घेण्यात आली. विरुध्द पक्षानी कोणत्याही अनुचीत व्यापार प्रथेचा अवलंब केलेला नाही, अथवा तक्रारकर्त्याला सदोष सेवा पुरविलेली नाही. दि.15/09/2009 रोजी तक्रारकर्ता व त्याचे सोबत अणखी एक व्यक्ती उपहार गृहात आले. तेथे हरी.के.सी नावाचा कर्मचारी काम कारित होता. तक्रारकर्त्याने प्रथम कॉफी व सॅन्डविजची मागणी नोंदविली व तीन पाण्याच्या बाटल्या मागवल्या. कर्मचारी कॉफी आणण्यासाठी आत जात असतांना तक्रारकर्त्याने त्याला परत बोलवले व कॉफी व सॅन्डविजची मागणी रद्द केली व पाण्याच्या तीन वाटल्या त्यांनी आणण्यास सांगितले व त्याप्रमाणे त्याने तीन पाण्याच्या बाटल्या तक्रारकर्त्याला आणुन दिल्या. दरम्यानच्य काळात तक्रारकर्त्या सोबत आलेल्या त्यांच्या मित्राने प्रसाधन गृहाचा उपयोग केला. पाणी दिल्यानंतर त्यांनी बिलाची रक्कम दिली व ते गेले. केवळ पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी ते उपहार गृहात आले नव्हते तर तेथील सोई सुविधांचा लाभ त्यांनी घेतला. हॉटेलच्या 15 मिटर अंतरावर शितपेयगृह आहे व तेथे पाण्याच्या बाटल्या विकत मिळतात मात्र तेथे न जाता तक्रारदार विरुध्द पक्षाच्या उपहार गृहात आला यात विरुध्द पक्षाने नियमबाह्यरितीने बाटल्यांवर छापलेल्या किमतीपेक्षा जास्त रक्कम घेतल्याने कोणत्याही नियमांचा भंग केलेला नाही. सबब सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. निशाणी 16 अन्वये विरुध्द पक्ष 2 नी प्रतिज्ञापत्रासह आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे असे की, ज्या पाण्याच्या बाटल्या तक्रारकर्त्याने विकत घेतल्या त्याचे उत्पादन विरुध्द पक्ष 2नी केलेले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द पक्ष 2 ची सदर तक्रार खरीज करण्यात यावी. निशाणी 18 अन्वये तक्रारकर्त्याने आपले प्रतिउत्तर दाखल केले. विरुध्द पक्ष 1 चे जबाबाचे संदर्भात तक्रारकर्त्याने आपले प्रतिउत्तर निशाणी 19 वर दाखल केले. तक्रारकर्त्याने निशाणी 21 अन्वये आपले लेखी युक्तीवाद दाखल केला. विरुध्द पक्ष 1 ने आपले पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले.
... 3 ... (त.क्र.708/2009) 3. अंतीम सुनावणीच्या वेळेस मंचाने तक्रारकर्ता तसेच विरुध्द पक्ष यांचे वकिलांनी केलेला युक्तीवाद ऐकला तसेच त्यांनी दाखल केलेल्या पुराव्याची छाननी केली. त्याआधारे सदर तक्रारीचे निराकरणार्थ खालील प्रमुख मुद्दयाचा विचार करण्यात आला. 1.विरुध्द पक्ष हा अनुचित व्यापार प्रथेच्या अवलंबनासाठी जबाबदार आहेत काय? उत्तर - होय. 2.तक्रारकर्ता विरुध्द पक्षकार कडुन नुकसान भरपाई व न्यायिक खर्च मिळण्यास पात्र आहे काय? उत्तर - होय स्पष्टीकरण मुद्दा क्र.1- मुद्दा क्र. 1 चे संदर्भात विचार केले असता असे निदर्शनास येते की तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 1 कडुन 'Aquafina' नावाच्या पाण्याच्या तीन बाटल्या दि.15/09/2009 रोजी प्रत्येकी रु.25/- या प्रमाणे एकुण रु.75/- ला विकत घेतल्या याचे बिल निशाणी 3(1) अन्वये तक्रारीसोबत दाखल करण्यात आलेले आहे. या पाण्याच्या बाटल्यांमुळे कमाल विक्री मुल्य (एमआरपी) रु.13/- असे छापलेले आहे, मात्र रु.13/- एवजी रु.25/- या प्रमाणे आपल्याकडुन बेकायदेशिररित्या जास्तीची रक्कम विरुध्द पक्ष 1 ने वसुल केली असा तक्रारकर्त्याचा आरोप आहे. या संदर्भात विरुध्द पक्षाचे स्पष्टीकरण असे की तक्रारकर्त्याने केवळ त्याच्या उपहार गृहातुन पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्यानसुन तक्रारकर्ता व त्यांचा मित्र त्यांच्या उपहार गृहात आले त्यांनी खाद्यपदार्थ व कॉफीची मागणी नोंदविली. विचार बदलल्याने खाद्य पदार्थाची मागणी रद्द केली मात्र प्रसाधनगृहाचा वापर तक्रारकर्त्याने केला होता, त्यामुळे केवळ पाण्याच्या बाटलीची किंमत घेतल्या गेली असे नसुन हॉटेल मधील इतर सेवा सुविधांचा वापर तक्रारकर्ता व त्यांच्या मित्रांनी केल्यामुळे रु.13/- ऐवजी रु.25/- ही किम्मत प्रती बाटली आकारण्यात आली. त्यांचा दुसरा मुद्दा असा की, तक्रारकर्त्याने बाहेरच्या काऊंटरवरुन ही बाटली घेतली नव्हती तर आतल्या बाजुला उपहारगृहातील कर्मचा-यांने या बाटल्या आणुन दिल्या होत्या थोडक्यात पाण्याच्या बाटल्यां व्यतिरिक्त कर्मचा-यांच्या सेवा तक्रारकर्त्याला देण्यात आल्या होत्या त्यामुळे अतिरिक्त रक्कम आकारली. अपरोक्त परस्पर विसंगत भुमिकांच्या पार्श्वभुमीवर परिस्थितीजन्य पुराव्यांची छानानी केली असता तसेच उभय पक्षांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी केली असता काही ठळक बाबी मंचाच्या निदर्शनास येतात. विरुध्द पक्षाने जरी पाण्याच्या बाटल्या तक्रारदाराने बाहेरील काऊंटरवरुन घेतल्या नव्हत्या असे म्हटले तरी तक्रारकर्त्याने स्वतः तक्रारीच्या पृष्ठ क्र. 2 परिच्छेद क्र.4अ यात बाटल्या या काऊंटरवरुनच घेतल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तसेच विरुध्द पक्षाच्या जबाबातील हा उल्लेख आपल्या प्रतिज्ञापत्रासह दाखल केलेल्या प्रतिउत्तरात खोडुन काढलेला आहे. यापेक्षाही अधीक महत्वाची बाब अशी की, तक्रारी सोबत निशाणी 3(3) अन्वये कथीत पाण्याच्या बाटल्यांची प्रकाश चित्रे सादर केलेली आहेत. या चित्रांमध्ये तिनही बाटल्यांचे वरचे झाकण हे सिंलबंद असल्याचे स्पष्टपणे आढळते. बाटल्यांच्या झाकाणवरील तारीख व इतर मजकुर ... 4 ... (त.क्र.708/2009) व्यवस्थितरित्या वाचता येतो. याचाच अर्थ यांचे सिल प्रकाश चित्रे काढण्यापुर्वी तोडण्यात आलेले नव्हते, त्यामुळे विरुध्द पक्षाच्या कर्मचा-यांनी उपहारगृहातील पेल्यात या बाटल्यांतील पाणी स्वतःचे हातानी ओतुन तक्रारकर्त्याला दिले होते व अतीरिक्त सेवा दिली होते असे मुळीच म्हणता येत नाही. सबब आपण केवळ फक्त पाण्याच्या बाटल्या विकल्या नव्हत्या, त्यांना अतिरिक्त सेवा दिली होती हे विरुध्द पक्षाचे म्हणणे मंचाच्या मते अनुचित व निराधार आहे. तक्रारकर्ता व त्यांच्या सोबत्यांनी इतर खाद्य पदार्थ मागविले होते मागाऊन मागणी रद्द केली, मात्र उपहार गृहाच्या स्वछातागृहाचा वापर केला, हे विरुध्द पक्षाचे म्हणणे कोणत्याही सबळ पुराव्या अभावी मान्य करता येत नाही. विरुध्द पक्ष 1 ने शशी जगन्नाथ शेट्टी यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. आपल्या प्रतिज्ञापत्रात ते म्हणण्तात की, तक्रारकर्त्याने कॉफी आणि सॅन्डविजची मागणी रद्द केली मात्र स्वच्छता गृहाचा वापर केला तसेच तेथील कर्मचा-यांने पाणी तक्रारकर्त्याला दिले व त्यानंतर तक्रारकर्ता उपहारगृहातुन बाहेर गेला. मंचाच्या मते दि.15/09/2009 रोजी पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्यानंतर अंतीम सुनावणीच्या दिवशी दि.18/08/2010 रोजी विरुध्द पक्षातर्फे सदर प्रतिज्ञापत्र दाखल केल्या गेले आहे. थोडक्यात जवळपास 11 महिन्याच्या कालावधीनंतर साधारणतः ज्या उपहार गृहात शेकडो ग्राहक दररोज येतात त्याठिकाणी 11 महीन्यापुर्वी तक्रारकर्त्याने काय केले याचा तपशिल तंतोतंत कोणत्याही व्यक्तिला आठवणे अत्यंत कठीण आहे. सबब विरुध्द पक्षाने केवळ पळवाट शोधण्यासाठी मागाऊन अगदी शेवटच्या घटकेला उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकुन प्रकरण आदेशासाठी राखुन ठेवले त्यावेळेस दाखल केलेले सदर प्रतिज्ञापत्र पुरावा म्हणुन विचारात घेणे योग्य ठरणार नाही असे या मंचाचे मत आहे. दुसरा महत्वाचा भाग असा की, पाणी बाटलीच्या विक्री व्यतिरिक्त इतर सेवा विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्याला पुरविल्या होत्या हे त्यांचे म्हणणे जर खरे आहे तर तक्रारकर्त्याला दिलेल्या बिलावर पाणी बाटल्यांची किंमत 13 x 3 = 39 रुपये अधिक सेवा शुल्क म्हणुन दुसरी रक्कम विरुध्द पक्षानी लिहीली असती. मात्र, बिलावर सेवा शुल्काचा मुळीच उल्लेख नाही केवळ तीन पणी बाटल्यांची किंमत रु.75/- एवढाच उल्लेख आहे. त्यामुळे पाणी बाटल्या व्यतिरिक्त इतर सोयी व सुविधा तक्रारकर्त्याला पुरविल्या होत्या व त्याचीही रक्कम एकत्रीतरित्या रु.75/- आम्ही घेतली हे विरुध्द पक्षाचे म्हणणे निराधार व अनाकलनी य आहे. सबब ते अमान्य करण्यात येते. विरुध्द पक्षाने सुनावणीचे वेळेस मा. दिल्ली उच्च न्यायालयाच्या पीटीशन क्र.6517/2003 (दि फेडरेशन आफ हॉटेल व इतर विरुध्द युनियन ऑफ इंडिया व इतर एक) या प्रकरणी दि.05/03/2007 रोजी पारित केलेल्या आदेशाची झेरॉक्स कॉपी सादर केली व आपल्या म्हणण्यांचे समर्थनार्थ त्याचा आधार घेतला मंचाच्या मते सदर प्रकरणातील तथ्य व मा. उच्च न्यायालय दिल्ली यांनी निकाली काढलेल्या प्रकरणाचे तथ्य (facts) एकसमान नाहीत. पाण्याच्या बाटल्या व्यतिरिक्त इतर सोई सुविधा पुरविण्यात आल्या होत्या व यांचा वापर तक्रारकर्त्याने केला होता ही बाब विरुध्द पक्षाला ... 5 ... (त.क्र.708/2009) समाधानकारक पुराव्यानिशी सिध्द करता आली नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाची भुमिका मंचाच्या मते योग्य नाही. उपरोक्त विवेचनाच्या आधारे मंच या स्पष्ट निष्कर्षाप्रत पोचले की तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाचे उपहारगृहाच्या काऊंटरवर तीन बाटल्या घेतल्या या बॉटल्यावर केवळ रु.13/- अधिक्तम मुल्य छापलेले होते पण त्याऐवजी रु.25/- विरुध्द पक्षानी वसुल केली. सबब विरुध्द पक्षाने वैद्य मापन शास्त्र कायद्यातील तरतुदींचा भंग केला तसेच विरुध्द पक्ष 1 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 2(1)(2) अन्वये अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याबाबत दोषी आहे. स्पष्टीकरण मुद्दा क्र. 2 - मुद्दा क्र. 2 चे संदर्भात विचार केले असता मंचाच्या निदर्शनास येते की, प्रत्येकी रु.13/- या प्रमाणे तीन पाणी बाटल्यांची किंमत रु.39 /- होते कारण प्रत्येक बाटलीवर (एमआरपी) अधिक्तम विक्री मुल्य रु.13/- असे छापलेल आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष 1 ने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन रु.75/- - रु.39/- = रु.36/- नियमबाह्यरितीने वसुल केले. ही रक्कम विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्त्याला परत करणे आवश्यक आहे. विरुध्द पक्ष 1 च्या सदोष सेवेमुळे व अनुचित व्यापारामुळे तक्रारकर्त्याला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागला या ठिकाणी ही बाब नमुद करणे आवश्यक आहे की र्स्वसामान्य नागरिकांचा सद्यास्थितीत बाजारातील हा नेहमीचा अनुभव आहे की, छापलेल्या 'एमआरपी' पेक्षा जास्त रक्कम दुकानदार हे ग्राहकाकडुन वसुल करतात. प्रामुख्याने प्रवास करतांना रल्वे स्टेशन, बस स्टॅड व उपहार गृहे या सारख्या ठिकाणी परत जाण्याची घाई असल्याने नाईलाजास्तव ग्राहकाला छापलेल्या किमतीपेक्षा जास्त रक्कम पाण्याच्या बाटल्यांवर द्यावी लागते. त्यामुळे हा अनुचित व्यापार ग्राहकांचे शोशण करणारा असल्याने त्याला आळा बसणे अत्यंत निकळीचे आहे. विरुध्द पक्ष 1 ने यापुढे अशा प्रकारे छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम ग्राहकाकडुन घेऊ नये, तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या असुविधा व मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई रु.10,000/- द्यावे असे मंचाचे मत आहे. तसेच त्याच्या योग्य मागणीची दखल न घेतल्याने सदर प्रकरण मंचात दाखल करणे भाग पडले असल्यामुळे विरुध्द पक्ष 1 तक्रारकर्त्यास न्यायिक खर्च 5,000/- देण्यास पात्र आहे. सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो- अंतीम आदेश 1.तक्रार क्र. 708/2009 मंजुर करण्यात येते. 2.विरूध्द पक्ष क्र. 1 ला पाण्याच्या बाटलीवरील छापील अधिक्तम विक्री मुल्यापेक्षा जास्त रक्कम ग्राहकांकडुन वसुल करण्यास प्रतिबंध करण्यात येतो.
3.विरुध्द पक्ष1 ने तक्रारकर्त्याकडुन जास्तीची वसुल केलेली रक्कम रु.36/- (रु. छत्तीस फक्त) परत करावी.
... 6 ... (त.क्र.708/2009) 4.विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई रु.10,000/-(रु. दहा हजार फक्त) व न्यायिक खर्च रु.5,000/-(रु. पाच हजार फक्त) द्यावा. 5.आदेश तारखेचे 45 दिवसाचे विहित मुदतीत उपरोक्त आदेशाचे पालन विरुध्द पक्षाने न केल्यास उपरोक्त संपुर्ण रक्कम तक्रारकर्ता विरुध्द पक्षकाराकडुन आदेशपारित तारखेपासुन ते प्रत्यक्ष रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे 12% व्याजासह वसुल करण्यास पात्र राहतील.
दिनांक – 30/08/2010 ठिकाण - ठाणे (श्री.व्हि.जी.जोशी) (श्री.एम.जी.रहाटगावकर) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |