Maharashtra

Nagpur

CC/09/736

Shri Dhyaneshwar Zibalji Khorgade - Complainant(s)

Versus

Hope Hospital - Opp.Party(s)

Adv.Anand J. Wankhede

26 Apr 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/09/736
 
1. Shri Dhyaneshwar Zibalji Khorgade
Saoner
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Hope Hospital
Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Dr.B.K.Murali
Hope Hospital Third Floor, Girish Higts Besides Bharat Talkies. Kamptee Road, Sadar, Naggpur
Naggpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv.Anand J. Wankhede, Advocate for the Complainant 1
 Adv.P.B.Rathi, Advocate for the Opp. Party 1
 Adv.P.B.Rathi, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

श्री. विजयसिंह राणेयांचे कथनांन्‍वये.
 
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 26/04/2012)
 
1.                 तक्रारकर्ते यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून, तक्रारकर्त्‍यांची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की, त्‍यांचा दि.15.02.2007 रोजी अपघात झाल्‍याने, त्‍यांना इंदीरा गांधी मेडीकल आणि हॉस्‍पीटल, नागपूर येथे भरती करण्‍यात आले. त्‍यानंतर दि.16.02.2007 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे वैद्यकीय उपचारार्थ भरती करण्‍यात आले. गैरअर्जदार क्र. 2 ने त्‍यांचेवर शल्‍य चिकित्‍सा करुन निष्‍काळजीपणे व बेजबाबदारपणे तीन स्‍टीलच्‍या प्‍लेट्स तक्रारकर्त्‍यांच्‍या उजव्‍या पायामध्‍ये बसवितांना त्‍याचे स्‍क्रु, नट-बोल्‍ट लावले नव्‍हते. त्‍यामुळे आतून एक प्‍लेट तक्रारकर्त्‍याच्‍या पायाला स्‍पर्श करीत होती व तक्रारकर्त्‍यास परिणामी असह्य वेदना होत होत्‍या. याबाबत तक्रारकर्त्‍यांनी तक्रार केली असता, त्‍यांना निर्दयीपणे वागणूक देऊन 20.03.2007 रोजी सुट्टी दिली व वैद्यकीय उपचारार्थ आणि शल्‍य चिकित्‍सेकरीता रु.92,370/- तक्रारकर्त्‍याकडून घेतले. गैरअर्जदाराने वर्णन केलेली प्‍लेट तक्रारकर्त्‍याच्‍या उजव्‍या पायातून काढून टाकण्‍याचा सल्‍ला तक्रारकर्त्‍याला दिला. 03.05.2007 रोजी तक्रारकर्ता गैरअर्जदार क्र. 1 येथे भरती झाला व गैरअर्जदारांनी वरील प्रकारची प्‍लेट काढली व जखम तशीच ठेवली आणि रु.8,020/- घेतले. पुढे त्‍या ठिकाणी जंतू संसर्ग झाला. यावर गैरअर्जदाराकडे तक्रारकर्ता गेला असता, त्‍यांनी दोन्‍ही प्‍लेट्स काढाव्‍या लागतील असा सल्‍ला दिला आणि पुढे दोन्‍ही प्‍लेट्स काढून टाकल्‍या व 16.06.2007 पर्यंत त्‍यांचेकडे भरती ठेवले. परंतू त्‍याठिकाणी दुस-या प्‍लेट्स किंवा योग्‍य वैद्यकीय उपचार केले नाही, परिणामी त्‍यांचा उजवा पाय कायमचा निकामी झाला. याकरीता गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याकडून रु.15,000/- घेतले व तशी पावती तक्रारकर्त्‍याला दिली. तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे गैरअर्जदाराने उपचाराकरीता एकूण रु.4,00,000/- घेतले, परंतू पावत्‍या मात्र रु.1,25,000/- च्‍या दिलेल्‍या आहेत. तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांना योग्‍य तो उपचार करुन पाय दुरुस्‍त करुन द्यावा अशी विनंती केली असता, त्‍यांनी त्‍याबाबत रु.1,00,000/- अग्रीम रक्‍कम जमा करण्‍यास सांगितली. तक्रारकर्त्‍याचे मते वास्‍तविकतः गैरअर्जदारांनी वैद्यकीय उपचार न केल्‍याने व झालेल्‍या चुकीची जबाबदारी स्विकारुन कोणतेही वैद्यकीय शुल्‍क न घेता तक्रारकर्त्‍याच्‍या उजव्‍या पायावर योग्‍य उपचार करुन मोडलेले हाड व्‍यवस्थित जुळवून द्यायला पाहिजे होते. परंतू तसे न करता तक्रारकर्त्‍याचा पाय कायमचा निकामी केला, म्‍हणून तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदारांना कायदेशीर नोटीस पाठविला आणि नुकसान भरपाईची मागणी केली. परंतू गैरअर्जदारांनी सदर नोटीसची दखल घेतली नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, उपचाराचा खर्च रु.4,00,000/- मिळावा, नुकसान भरपाई रु.6,00,000/- व्‍याजासह मिळावी, तक्रारीचा खर्च आणि नोटीसचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
2.          सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना मिळाली असता, त्‍यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले आणि तक्रारीतील विपरित विधाने नाकबूल केली. त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यांचा उपचार हा पूर्ण काळजी घेऊन केलेला आहे. त्‍यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा दोष ठेवलेला नाही. तक्रारकर्त्‍याने स्‍वतःच आपल्‍या आरोग्‍याची योग्‍य काळजी घेतली नाही. तक्रारकर्त्‍याचे अस्‍थीभंग (compound graded fracture of Tibia Fibula right along with bone loss with monolpegia left upper limb) झालेला होता.  त्‍यावर शस्‍त्रक्रिया करण्‍याचे ठरविले होते. सुरुवातीस तक्रारकर्त्‍याची प्रकृती चांगली नव्‍हती, म्‍हणून 05.03.2007 रोजी शस्‍त्रक्रिया केली आणि तीन खिळयांचे (Implant) करुन Tibia Fibula हे हाड जोडण्‍यात आले व योग्‍य काळजी घेतली. 19.03.2007 रोजी जखम व्‍यवस्‍थीत असल्‍याने व तक्रारकर्त्‍याची प्रकृती चांगली असल्‍याने त्‍यास सुट्टी देण्‍यात आली व वेळोवेळी पुर्नतपासणीस येण्‍यास सांगितले. त्‍यानंतर दिलेल्‍या तारखेपर्यंत तक्रारकर्ता आला नाही व उशिरा आला. त्‍यावेळी एकच खिळा (Implant) काढण्‍यात आला. कारण त्‍यांची प्रकृती समाधानकारक नव्‍हती. म्‍हणून त्‍यास सुट्टी देण्‍यात आली. 5 दिवसांनी येण्‍यास सांगितले. तो जवळपास एक महिन्‍यानंतर आला. त्‍यावेळेस शस्‍त्रक्रियेद्वारा इतर खिळे (Implant)  काढून घेतले आणि त्‍यास 16.06.2007 रोजी त्‍याचे आरोग्‍य ठीक असल्‍याने सुट्टी देण्‍यात आली. त्‍यानंतर गैरअर्जदारासोबत तक्रारकर्त्‍याने नोटीस मिळेपर्यंत कधीही संपर्क साधला नाही. गैरअर्जदाराने तक्रार चुकीच्‍या आधारावर व गैरसमजूतीने केलेली आहे, म्‍हणून ती खारीज करण्‍यात यावी अशी मागणी गैरअर्जदारांनी केलेली आहे.
 
3.          सदर प्रकरण युक्‍तीवादाकरीता आले असता दोन्‍ही पक्षांचा युक्‍तीवाद त्‍यांच्‍या वकिलांमार्फत ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल करण्‍यात आलेल्‍या दस्‍तऐवजांचे मंचाने अवलोकन केले असता, मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
4.          सदर प्रकरणातील सर्व दस्‍तऐवज जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक यांचेकडे त्‍यांच्‍या तज्ञ अभिप्रायाकरीता पाठविण्‍यात आले होते. त्‍यांनी खालीलप्रमाणे अभिप्राय दिला.
 
Committee Report
 
1.                  The patient had road side accident on 15/2/2007 and sustained fracture both bones ® leg upper one third region comminuted and displaced.
2.                  He was admitted in “Hope Hospital” on 16/2/2007 for the treatment. His fracture of Tibia ® fixed with three enders nails & one of them subcutaneous may painful to the patient.
3.                  During treatment period patient developed infection at operated site and for that matter implant had been removed.
4.                  There are chances of infection in 3-4% of patients, the fixation of fractured fragment with enders nailing, he applied Pop cast to control rotation part of the fragments.
 
Considering the available documents & X-rays available, patient is suffering from infective non-union is one of the complication and not a negligence of treating Doctor.
           
 
            Dr.M.R.Koichade                    Dr.R.N.Gajbhiye,                     Dr.D.U.Kakade
            Prof.&Head,               Prof.&Head,               Prof.&Head,   
            Deptt.of Orthopadiecs,      Deptt.of Surgery,                      Deptt.of Radiology
            I.G.G.M.C.Nagpur         I.G.G.M.C.Nagpur         I.G.G.M.C.Nagpur            
 
वरील निष्‍कर्ष पाहता तक्रारकर्त्‍याने अन्‍य पूराव्‍याद्वारे ते खोडून काढणे गरजेचे होते. परंतू तसे झाले नाही.
 
5.          तक्रारकर्त्‍याने या प्रकरणात गैरअर्जदारांनी केलेली शस्‍त्रक्रिया आणि सर्व उपचार हे चुकीचे होते, वैद्यक शास्‍त्रच्‍या स्‍थापीत पध्‍दतीसारखे नव्‍हते, हे दर्शविणारा कोणताही तज्ञांचा साक्ष पुरावा या प्रकरणात दिलेला नाही आणि गैरअर्जदार ह्यांनी नेमकी कोणती चुक केली हेसुध्‍दा सिध्‍द केलेले नाही. यासंबंधात गैरअर्जदाराने छत्‍तीसगढ राज्‍य आयोगाचा I (2010) CPJ 3 RUPENDRA KUMAR SAHU VS. (DR.) AKHILESH DUBEY याठिकाणी प्रकाशित झालेला आहे, त्‍यावर आपली भिस्‍त ठेवली आहे. मा. राज्‍य ग्राहक आयोगाने त्‍यातील मुद्दे लक्षात घेता, तज्ञांच्‍या अहवालांन्‍वये वैद्यकीय निष्‍काळजीपणा स्‍पष्‍ट होत नसेल, अशा प्रकरणात तक्रारकर्त्‍याची तक्रार सिध्‍द होत नाही असे स्‍पष्‍ट निर्देश दिलेले आहे. वरील सर्व परिस्थितीचा विचार करुन मंच सदर तक्रार निकाली काढीत आहे.
 
-आदेश-
1)    उपरोक्‍त निष्‍कर्षांन्‍वये तक्रारकर्त्‍याची तक्रार निकाली काढण्‍यात येते.
2)    तक्रारीचा खर्च आप-आपला सोसावा.
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.