न्या य नि र्ण य (व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या) 1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे— वि.प.क्र.1 ही दुचाकी उत्पादन करणारी कंपनी असून वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.1 यांचे अधिकृत विक्रेते आहेत. तक्रारदार यांनी वि.प. यांनी उत्पादित केलेली सी.बी. हॉर्नेट 160 आर मॉडेल नं. सी.बी.एफ. 160 एमजीआयडी फ्रेम नं. ME4KC231BG8020789 इंजीन नं. KC23E80025841 ही दुचाकी दि. 2/5/16 रोजी रक्कम रु.90,421/- या किंमतीस वि.प.क्र.2 यांचेकडून खरेदी केली आहे. सदरचे वाहन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तक्रारदाराने वि.प. यांना रक्कम रु.7,465/- व विम्याची रक्कम रु.1,791/- अदा केली आहे. सदरचे वाहनाची वॉरंटी दोन वर्षे आहे. सदरचे वाहन वापरण्यास सुरुवात केल्यानंतर सदरचे गाडीचे अॅक्सीलेटर वाढवले असता गाडीच्या इंजिनमधून विचित्र प्रकारचा आवाज जोरजोरात येवू लागतो. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत वि.प.क्र.2 यांचेकडे तक्रार केली असता त्यांनी गाडी दुरुस्ती करुन दिली परंतु तरीही इंजिनमधून आवाज येणे बंद झाले नाही. वि.प. यांनी विक्री केलेले वाहन हे मुळात उत्पादित दोष असलेले आहे. सदरचे वाहनास एका वर्षाच्या आत एवढी दुरुस्ती करणेची गरज येत नाही. तसेच सदरचे वाहनाचे टायर एका बाजूनेच झिजले आहे. वाहनातून ऑईल लिकेज होत आहे. तसेच वाहनाचे रजिस्ट्रेशनबाबत विचारणा केली असता रजिस्ट्रेशनचे पेपर्स वि.प यांनी गहाळ केलेचे चुकीचे उत्तर वि.प. यांनी दिले आहे. तक्रारदाराने गाडी वि.प.क्र.2 यांना दाखविली असता त्यांचे कर्मचा-यांनी सदरचा दोष मान्य केला. त्यानंतर सदरचे वाहन तक्रारदाराने वि.प.क्र.2 यांचेकडून 10 ते 12 वेळा दुरुस्त करुन घेतले. परंतु त्यामधील दोष अद्यापी दूर झालेला नाही. त्यामुळे वि.प. यांनी उत्पादित दोष असलेली गाडी तक्रारदार यांचे माथी मारुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. सबब, तक्रारदार यांना वि.प. यांनी उत्पादित केलेले दोषविरहित त्याच कंपनीचे त्याच मॉडेलचे वाहन बदली करुन मिळावे, तसे करण्यास वि.प. असमर्थ असलेस वाहनाची संपूर्ण किंमत रु. 90,421/- व त्यावर दि. 25/7/16 पासून 18 टक्के दराने होणारे व्याज, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत वि.प. यांचेकडून वाहन खरेदी केलेचे बिल, सर्व्हिसिंगच्या पावत्या, परवानगी अर्ज इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. 3. वि.प. क्र.2 यांनी याकामी दि.11/8/17 रोजी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल करुन तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. वि.प. क्र.2 यांचे कथनानुसार, तक्रारदाराने वि.प.क्र.2 चे सबडिलर शौर्य मोटर्स यांचेकडून नमूद वाहन खरेदी केले आहे. सदर कामी शौर्य मोटर्स यांना पक्षकार केलेले नाही. तक्रारदाराचे वाहनात कोणताही उत्पादित दोष नाही. टायरचे झिजेची जबाबदारी वि.प. यांची नाही. वाहनाचे रजिस्ट्रेशन वि.प. यांनी केले आहे. त्याबाबतचे कोणतेही पेपर्स गहाळ झालेले नाहीत. तक्रारदाराने खरेदी केलेले वाहन हे स्पोर्ट्स मॉडेलमध्ये गणले जाणारे वाहन असून सदर वाहनात 14 बी.एच.पी. पॉवर्सचे इंजिन बसवलेले आहे. तक्रारदाराने अर्जासोबत दाखल केलेल्या बिलांचे अवलोकन केले असता ती बिले इंजिन ऑईल, जनरल चेकअप, ऑईल बदली, गिअर शाफ्ट, ऑईल सिल बदलणे, इंजिन ऑईल टँकवर असणारी रबरी रिंग बदलणे याबाबतची बिले दाखल केली आहेत. सदरचे वाहन प्रत्यक्षात प्रफुल्ल पाटील नामक व्यक्ती वापरते. सदरचे पाटील यांना वाहनामध्ये कोणताही दोष नसलेचे वेळोवेळी निदर्शनास अणून दिले आहे. वि.प.क्र.2 यांनी सदर वाहनाची संपूर्ण तपासणी करुन ते वाहन दोषरहित असल्याची खात्री श्री पाटील यांना करुन दिली होती. सदरचे पाटील यांनी सदर वाहनाचा वापर अतिशय निष्काळजीपणाने केला असलेचे दिसून आले आहे. तक्रारदाराने वाहनाचे पहिले सर्व्हिसिंग करुन घेतलेले नाही. दुसरे सर्व्हिसिंग वाहनाचे रनिंग 5696 इतके झालेनंतर करुन घेतले आहे. दि.14/10/16 व 28/1/17 रोजी पुन्हा सर्व्हिसिंग करुन घेताना तक्रारदाराने वाहनाबाबत कोणतीही तक्रार नमूद केली नव्हती. दि.1/2/17 रोजी ऑईल सिल बदलून दिले. दि. 2/2/17 रोजी ऑईल टँकवरील खराब झालेली रबरी रिंग बदलून दिली होती. सबब, तक्रारदाराचा तक्रारअर्ज हा खोटया व काल्पनिक कथनांवर आधारित असलेने तो चालणेस पात्र नाही. सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प. क्र.2 यांनी केली आहे. वि.प.क्र.2 यांनी याकामी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. 4. वि.प.क्र.1 यांना याकामी नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द ता. 8/9/17 रोजी एकतर्फा आदेश पारत करण्यात आला. 5. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. क्र.2 यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. अ. क्र. | मुद्दा | उत्तरे | 1 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. | 2 | तक्रारदार हे नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. | 3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. | 4 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा – मुद्दा क्र. 1 – 6. प्रस्तुतकामी तक्रारदार यांना टू-व्हिलरची गरज असलेमुळे त्यांनी वि.प. यांनी उत्पादित केलेली सी.बी. हॉर्नेट 160 आर मॉडेल नं. सी.बी.एफ. 160 एमजीआयडी फ्रेम नं. ME4KC231BG8020789 इंजीन नं. KC23E80025841 ही दुचाकी ता. 25/7/16 रोजी रक्कम रु.90,421/- इतके किंमतीस वि.प.क्र.2 यांचेकडून खरेदी केली. सदर वाहन खरेदी केलेची पावती तक्रारदार यांनी तक्रारीसोबत अ.क्र.1 ला दाखल केलेली आहे. सदरची पावती वि.प. यांनी नाकारलेली नाही. सदरचे वाहन खरेदी करण्यासाठी तक्रारदार यास सदरच्या वाहनाची पूर्ण रक्कम वि.प. यांना रोखीने अदा केली. तक्रारदार यांनी सदरचे वाहनाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी रक्कम रु.7,465/- व गाडीचे विम्याची रक्कम रु.1,791/- वि.प.क्र.2 यांना रोखीने अदा केली. सदरचे वाहनाचा वॉरंटी पिरेड वाहन खरेदी तारखेपासून 2 वर्षे आहे. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. 7. सदरचे वाहनाची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांनी वि.प. यांना रोखीने अदा केलेली आहे. त्याबाबत कोणताही वाद नाही. तथापि सदरचे वाहन खरेदी केल्यानंतर ते वापरत असताना गाडीचे अॅक्सीलेटर वाढले असता, गाडीच्या इंजिनमधून विचित्र प्रकारचा जोरजोरात आवाज येवू लागतो, त्यामुळे सदरचे वाहन वापरताना तक्रारदार यांना भिती वाटते. गाडीचा स्पीड वाढवला असता गाडीला मोठी हानी अथवा अपघात होईल या भितीने तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेकडे तक्रार नोंदविली. सदरचे वाहन वॉरंटी पिरेडमध्ये असलेमुळे त्यामध्ये दुरुस्ती करुन दिले तथापि इंजिनमधील आवाज येणे बंद झालेले नाही. सदरचे वाहनाचे रजिस्ट्रेशन करुन देण्याची जबाबदारी वि.प. यांनी पैसे घेवून स्वीकारलेली होती. त्यासाठी सर्व कागदपत्रे तक्रारदार यांनी वि.प. यांना पुरविलेली होती. तथापि वि.प. यांनी सदरची रजिस्ट्रेशनचे पेपर्स गहाळ झाले असे सांगून व सदरचे सदोष वाहन तक्रारदार यांना देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्याअनुषंगाने दाखल कागदपत्रांचे या मंचाने अवलोकन केले असता तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वाहन खरेदीचे बिल व तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून सदरचे वाहन वेळोवेळी सर्व्हिसिंग करुन घेतलेच्या पावत्या दाखल केल्या आहेत. तसेच अ.क्र.4 ला तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे सदरचे वाहन वेळोवेळी सर्व्हिसिंगला सोडलेच्या पावत्या दाखल केल्या आहेत. वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये सदरची बिले ही इंडिकेटर बझर, इंजिन ऑईल, बॅलेन्सिंग, गिअर स्प्रींग, आर.पी.एम.सेटींग, कॉर्बोरेटर सेटींगची बिले तसेच कंपनीकडून वार्षिक देखभाल मोफत मिळणेसाठी म्हणून आलेल्या रकमेची सदरची बिले असलेचे कथन केले आहे. 8. वि.प. यांनी दाखल केलेल्या म्हणण्याचे या मंचाने अवलोकन केले असता यातील तक्रारदार हे त्यांचे नावावर असलेले वाहन हे प्रत्यक्षात प्रफुल्ल पाटील ही व्यक्ती वापरते. सदरचे वाहनात कोणताही दोष नसलेबाबत वि.प. यांनी वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. सदरचे वाहन दोषविरहीत असलेचे वाहनामध्ये इंजिनमध्ये कोणताही बिघाड नसलेची खात्री तक्रारदारतर्फे प्रफुल्ल पाटील यांस दिेलेली होती. तथापि वि.प. यांनी सदरचे कथनाप्रमाणे सदरच वाहनाचे इंजिनमध्ये कोणताही दोष नसलेचे अथवा सदरचे इंजिन सुस्थितीत असलेचे अनुषंगाने कोणताही परिस्थितीजन्य पुरावा (Circumstantial evidence) या मंचात दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी सदरचे वाहनाचे पहिले सर्व्हिसिंग वि.प. यांचेकडून करुन घेतलेले नाही. दुसरे सर्व्हिसिंगला वाहनाचे रनिंग 5696 किमी झाले असता शौर्य मोटर्स, जयसिंगपूर यांचेकडून करुन घेतले तथापि वि.प. यांनी सदरची कथने पुराव्यानिशी शाबीत केलेली नाही. कोणताही कागदोपत्री पुरावा त्याअनुषंगाने दाखल केलेला नाही. परंतु तक्रारदार यांनी दाखल केलेल्या ता. 3/3/17 ता. 10/5/17 रोजीचे जॉब कार्डवर Customer special Request/comments – Engine noise check, टायर एका साईडला झिजते, gear heard, left side engine oil leakage असे नमूद आहे. सदरची कागदपत्रे वि.प. यांनी नाकारलेली नाहीत. 9. ता. 4/10/17 रोजी तक्रारदार यांनी या मंचात कोर्ट कमिशन नेमणुकीचा अर्ज दिला. प्रस्तुत अर्जावर वि.प. यांना म्हणणे देणेसाठी संधी देवून देखील वि.प. यांनी म्हणणे दिले नाही. सबब, प्रस्तुत अर्ज मंजूर करुन मा. मंचाने कोर्ट कमिशन नियुक्त करण्यास परवानगी दिली. त्यानुसार दि. 15/2/18 रोजी न्यू पॉलिटेक्नीक ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंग उचगांव कोल्हापूर यांचेकडून सदरचे वाहनाचा कोर्ट कमिशनचा अहवाल दि.14/3/18 रोजी मंचात सादर करणेत आला. सदरचे अहवालाचे या मंचाने अवलोकन केले असता - तक्रारदाराच्या वाहन चालविण्याच्या पध्दतीमध्ये (Driving habit) कोणताही दोष आढळला नाही.
- तक्रारीत उल्लेख केलेल्या वाहनाची नियमित देखभाल व प्रिव्हेंटीव्ह मेंटेनन्सची कामे तक्रारदाराने वेळोवेळी युजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या सुचनांनुसार केलेली आहे.
- तक्रारीत उल्लेख केल्यानुसार 60 कि.मी. प्र.ता. एवढया वेगाच्या आसपास इंजिनमधून विशिष्ट प्रकारचा आवाज येतो ही गोष्ट खरी आहे. कोर्ट कमिशनच्या निष्कर्षानुसार हा आवाज बॅलंसर गियर, कॅमशाफ्ट, कॅमशाफ्ट बेअरिंग, रॉकर अथवा इंजिन व्हॉल्व मधून येत आहे. या प्रकारच्या वाहनांमध्ये सर्वसाधारणपणे असा आवाज येणे अपेक्षित नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीमध्ये तथ्य असून इंजिन मधून येणारा आवाज हा वाहनामधील उत्पादित दोष (Manufacturing Defect) आहे असे कोर्ट कमिशनचे मत आहे. या तक्रारीस अनुसरुन वि.प.क्र.2 यांनी दि. 15/5/2017 रोजी रबर डँपर, गियर बॅलन्सर, ड्रीव्हन बॅलन्सर, शाफ्ट गियर, ड्रीव्हन बुश, बॅलन्सर ड्रिव्हन गियर, स्प्रिंग डँपर, गियर बॅलन्सर ड्राइव हे पार्टस बदलल्याचे दिसून येते. इंजिनमधील आवाज संदर्भात तक्रारदार यांनी वि.प. क्र.2 यांचेकडे वारंवार तक्रार नोंदविल्याचे आढळून आले आहे. इंजिनमधून येणारा आवाज हा तक्रारीसंदर्भात वि.प.क्र.2 कायझन व्हिल्स, सांगली रोड, यड्राव, इचलकरंजी यांचे प्रतिनिधी श्री महेश साबळे, वर्कशॉप मॅनेजर व श्री संजय कोकाटे व हेड टेक्नीशियन यांनी सदरील वाहन हे स्पोर्टस बाईक या प्रकारात येत असलेमुळे त्यास 160 सीसी चे इंजिन आहे व या इंजिनला एक्स्ट्रा व्हाल्व क्लियरन्स असल्यामुळे आवाज येत आहे असा खुलासा केला. हा खुलासा कोर्ट कमिशन यांना पटलेला नाही.
-
- ऑईल लिकेजच्या तक्रारीबाबतचही कोर्ट कमिशनच्या मते वाहनामध्ये उत्पादित दोष आहे असे मत झालेले आहे.
- टायरची Uneven झीज होण्याच्या कारणासंदर्भात कोर्ट कमिशनला स्वींग आर्ममध्ये थोडा बेंड असल्याचे आढळले. स्विंग आर्ममधील बेंड हा वाहनामधील उत्पादित दोष (Manufacturing Defect) आहे. टायरच्या Uneven झीज होण्याचे स्विंग आर्म मधील बेंड हे कारण आहे. याच कारणामुळे वाहनाचा ब्रेक लावला असता वाहन स्कीड होते व त्यामुळे वाहन चालवणे असुरक्षित आहे ही बाब प्रत्यक्ष रोड टेस्टमध्ये कोर्ट कमिशनचे निदर्शनास आली.
असे नमूद असून त्यावर प्रा.श्रीधर वैद्य, विभाग प्रमुख अॅटोमोबाईल इंजिनियरिंग विभाग, न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूर व प्रा. वैभव पाटणकर, अधिव्याख्याता यांच्या सहया आहेत. 10. सबब, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन केले असता, कर्मचा-यांनी गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली असता त्यांनीही गाडीच्या इंजिनमधून विचित्र प्रकारचा आवाज येत असल्याचे मान्य व कबूल केले आहे. वि.प.क्र.2 यांचेकडील इंजिनियरने सदरचे वाहनाची तपासणी करत ठराविक पार्ट बदलून द्यावे असे सांगितलेमुळे सदरचे वाहन तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेकडून वेळोवेळी रिपेअरी केलेचे नमूद आहे. वाहन सुरळीत चालेल व त्यातील दोष दूर होतील अशी हमी वि.प.क्र.2 यांनी तक्रारदारांचे ताब्यात वाहन देवूनही सदरचे वाहनातील नेमका दोष अद्याप दूर झालेला नाही. 11. दाखल तज्ञाचे अहवालाचा सखोलतेने विचार करता सदर वाहनामध्ये उत्पादित दोष असलेचे सिध्द होते. तक्रारदार यांनी सदरचे वाहन वि.प. यांचेकडून खरेदी केले होते तसेच रजिस्ट्रेशनची फी व गाडीचे विम्याची रक्कम वि.प. यांनी नाकारलेली नाही. सदरची फी व विमा रक्कम तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे जमा केलेली असलेने सदरचे रजिस्ट्रेशन करुन देणेची सर्वस्वी जबाबदारी वि.प. यांची होती. त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे तक्रारदार यांनी वि.प. यांना पुरविलेली होती. सदरची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही. या सर्व बाबींचा विचार करता, सदरचे रजिस्ट्रेशनचे पेपर्स गहाळ करुन व वाहनाचा संपूर्ण मोबदला स्वीकारुन देखील तक्रारदार यांना उत्पादित दोष असलेले वाहन देवून वि.प. यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे व तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे. मुद्दा क्र.2 12. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. त्याकारणाने तक्रारदार यांनी सदरचे वादातील वाहन वि.प.क्र.1 व 2 यांना परत करावे व वि.प.क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या सदर वाहनाचे बदलीपोटी तक्रारदार यांना वि.प. यांनी उत्पादित केलेले दोषविरहित नवीन वाहन अदा करावे अथवा वैकल्पिकरित्या वि.प. हे सदरचे वादातील वाहन बदलून देणेस असमर्थ असलेस, तक्रारदार यांनी त्यांचे ताबेतील वाहन वि.प. यांना परत करावे व वि.प. यांनी संयुक्तिकरित्या सदर वाहनाची खरेदीची संपूर्ण रक्कम रु.94,425/- तक्रारदार यांना अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 17/6/17 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे. मुद्दा क्र.3 13. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विवेचनाचा विचार करता, सदर वाहनात उत्पादित दोष असलेने तक्रारदार यांना सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले तसेच नोकरीच्या व अडीअडचणीच्या वेळी सदर वाहन घरी ठेवून बसणे व इतर वाहनाने प्रवास करावा लागणे यामुळे निश्चित तक्रारदार यांना मानसिक व आर्थिक त्रास झाला. त्या कारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे. मुद्दा क्र.4 - सबब आदेश. |